Friday, January 31, 2020

मराठी शाळांत अटल ज्ञानदीप प्रयोगशाळा

भारत सरकारने काही निवडक शाळांत अत्याधुनिक अटल लॅब स्थापन करण्यासाठी भरीव अर्थसाहाय्य दिले आहे.

 शालेय स्तरावर मुलांना नवनिर्मिती आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून डिजिटल आणि रोबोटिक यंत्रसाधने तयार करण्याचे शिक्षण या प्रयोगशाळेत देण्यात येणार आहे. मात्र ही सुविधा इतर शाळांत नसल्ल्याने बहुसंख्य मुलांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार नाही. शिवाय हे सर्व ज्ञान इंग्रजीमध्ये असल्याने मराठी माध्यामाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना हे समजणार नाही.

यासाठी  ज्ञानदीप फौंडेशनने  नगरपालिका, जिल्हा परिषद व इतर माध्यमिक शाळांमध्ये अटल ज्ञानदीप प्रयोगशाळा हा अभिनव उपक्रम राबवायचा संकल्प केला असून त्याअंतर्गत रासबेरी पायचे प्रात्यक्षिक कार्यान्वित केले आहे.

रासबेरी पाय हा एका पट्टीवर बसविलेला छोटा संगणक असून त्याचा उपयोग लहान प्रोग्रॅमपासून ड्रोनसारख्या स्वयंचलित रोबोट बनविण्यासाठी करता येतो.



रासबेरी पाय हा एका पट्टीवर बसविलेला छोटा संगणक असून त्याचा उपयोग लहान प्रोग्रॅमपासून ड्रोनसारख्या स्वयंचलित रोबोट बनविण्यासाठी करता येतो.

हा कार्यान्वित करण्यासाठी पॉवर कनेक्शन, इंटरनेट वा वाय फाय, मॉनिटर व माऊस यांची आवश्यकता असते. मॉनिटर किंवा टीव्ही जोडण्यासाठी एचडीएमआय केबल लागते व्हीजीए पोर्ट असल्यास व्हीजीए चे एचडीएमआय करण्यासाठीची विषेश सुविधा वापरता येते. रासबेरी पायसाठी एक मायक्रो चिप माहिती व प्रोग्रॅम साठविण्यासाठी वापरली जाते,

 खालील चित्रात रासबेरी पाय जोडण्यांची माहिती दिली आहे.


 ज्ञानदीप फौंडेशनचे श्री. राकेश कांबळे यांनी रासबेरी पाय या मायक्रोकॉम्प्युटरची  रचना विशद केली आहे. 
 
रासबेरी पायवरील इतर कनेक्शन वापरून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविता येतात.स्क्रॅच व पायथॉन प्रोग्रॅमिंग शिकविण्यासाठी याचा उपयोग करता येतो अनेक व्हिडिओ गेमही बनविता येतात.

ज्ञानदीप फोंडेशन अर्ड्युनो, रासबेरी पाय आणि विविध सेन्सॉर वापरून अटल ज्ञानदीप प्रयोगसंच विकसित करीत असून त्यात मराठी व इंग्रजी माध्यमातून हे तंत्रज्ञान शिकण्याची सोय उपलब्ध करून देणार आहे.

 ज्ञानदीपच्या या अभिनव उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी शाळांनी ज्ञानदीपशी संपर्क साधावा. -डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली. संपर्क - info@dnyandeep.net / info@dnyandeep.com

No comments:

Post a Comment