सकाळी रस्त्यात निळी गाडी नाही याची खात्री करून ते आपल्या फ्लॅटवर गेले. कुलुपावरील ओरखड्यावरून कुलुप काढण्याचा प्रयत्न झाला हे त्यांनी ओळखले. दार उघडून आत गेल्यावर पाहिले तो कपाटातील कागदपत्रे काढून ती घाईघाईने परत कोंबून ठेवल्यासारखे वाटत होते. कोणतीही किमती वस्तू गेली नसल्याचे त्यांच्या निदर्शानास आले. नाही म्हणायला त्यांची डायरी मात्र गहाळ झाली होती. त्यांनी लगेच इन्स्पेक्टरना ही नवी डेव्हलपमेंट सांगितली.
ऑफिसमध्ये गेल्यावर लागलीच त्याम्नी सर्व स्टापची अर्जंट मीटींग घेतली व प्रत्यक्ष अटनेचा तपशील न देता सर्वांना जागरूक राहण्याचा आदेश देऊन हेरगिरीची शक्यता असल्याचे सूचित केले. नंतर त्यांनी आपल्या विश्वासू शिपायास बोलावून सर्वांवर बारीक लक्ष ठेवण्यास व काही संशयास्पद दिसल्यास तात्काळ कळविण्यास सांगितले. इन्स्पेक्टर माने यांची प्रत्यक्ष गाठ घ्यायची तयंची इच्छा होती. परंतु माने तातडीने परगावी गेल्याचे त्यांना समजले.
ही घटना होऊन एक महिना झाला तरी अजून काही छदा लागला नव्हता.केळकराम्नी सर्व सहकार्यांची संपूर्ण माहिती काढली होती. त्यांना प्रश्न विचारून माहितीची सत्यताही पदताळून पाहिली होती. आता इन्स्पेक्टर माने यांच्याकडे हे प्रकरण सोपवावे ासा विचार करून ते फाईल घेऊन खोलीबाहेर निघाले. तेवढ्यात इन्स्पेक्टर माने स्वतःच येत असल्याचे त्यांना दिसले. ‘ या. मी तुमचीच वाट पहात होतो’ त्यांनी हसून मानेंचे स्वागत केले.पन माने काही बोलले नाहीत. त्यांच्याबरोबर आनखीही कोणी अधिकारी आलेले होते.
माने सरळ केळकरांच्या खुर्चीवरच बसले. केळकर चमकले. केळकर मानेना सीनीअर होते. माने असे काही करतील याची केळकराम्ना कल्पना नव्हती. तरी पन कदाअचित या केसमध्ये माने सर्व सूत्रे हाताळत असल्याने त्यांनी मुख्य खुर्चीत बसणे गैर नाही असे केळकराम्नी मानले व आपली फाईल मानेच्या पुढे ठेवून ते म्हणाले.
‘ हे घ्या. आमच्या ऑपिसचे सर्व रेकार्ड. प्रत्येकाची केस हिस्टरी मी तयार केली आहे. आता पुढचे तुम्ही बघा.’
‘ मूर्खपणा बस्स झाला’ मानेनी मूठ आपटून सांगितले. केळकर चमकलेच. ‘ केळकर, तुम्हाला वाटले आपन सर्वांच्या डोळ्यात फेकून स्वतः नामानिराळे राहू शकू. पण भ्रम आहे तुमचा. भारताचे गुप्तहेर खाते इतके भोळसत नाही हे लक्षात ठेवा. केळकरांच्या डोळ्यापुढे अंधारी आली. ‘ म्हनजे/ माने, तुम्हाला काय म्हणायचे आहे? ’ ‘ हो, तुम्ही स्वतःच हेरगिरी करीत आहात’. केळक्राम्नी इकडे तिकडे पाहिले. बाजूचे अधिकारी काही गडबड केल्यास पकडण्याच्या तयारीत असलेले त्यांना दिसले.
केळकर हसले. ‘ कमाल आहे. मी आणि हेर ? कशावरून निष्कर्ष काढलात तुम्ही हा? आणि मी काही पळून जाणार नाही. त्याची कालजि करू नका.’ मानेनी न बोलता खिशातून डायरी काढून केळकरांपुढे टेबलावर टाकली/ ‘ माझी डायरी? आणि ती तुमच्याकडे कशी आली?’ ‘मीच तुमच्या फ्लॅटवरून ती आनावयास सांगितले होते.’ मानेनी शांतपणे उत्तर दिले. ‘पण का?’
‘कारन आम्हाला फक्त संशय होता. खात्री पटावी म्हणुन दायरी हवी होति.’
‘ मला हे सारे ऎकवत नाही. तरी पण मी हेरगिरी केली असा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात ते कृपा करून सांगता का जरा.’
‘ तुमच्या डायरीत नोंद असलेल्या प्रत्येक ठिकानच्च्या भेटीचा वृत्तांत अमेरिकेच्या हेरखात्याला समजलेला आहे याची आम्ही माहिती काढली आहे.’
सहा महिन्यांपूर्वी तुम्ही अमेरिकेत मुलाकडे गेला असताना तुमच्याशी तेथील एजंताने संधान बांधले व नंतर प्रत्येक बातमी बाहेर कळू लागली. तसे पाहता कॅप्टन डिसूझाही अमेरिकेस गेले होते. परंतु ज्या मीटीगच्या वेळी डिसूझा नव्हते व फक्त तुम्ही होता त्या मीटींगची माहिटि बाहेर जाते याचा अर्थ काय?’
‘ अहो पण माझ्यावर असा संशय घेण्यापूर्वी तुम्ही इतर सर्व शक्यता पडताळून पाहिल्या का? कदाचित उपग्रहाद्वारेही त्यांनी टेहळणी केली असेल.’ ‘ मिस्टर केळकर. उपग्रहाद्वारे खरी माहिती मिळू नय़े म्हणून आपण कनिष्ठ अधिकार्यांना वेगळ्याच ठिकाणी भेटी देण्यास पाठवीत असतो. कोणत्या भेटीवॆळी केळकर जातात हे तिकडे कसे बरोबर समजते ते सांगा’
केळकर हतबुद्धच झाले. ‘ नाही हॊ. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडून असे नीच कृत्य कधीच होणार नाही’ पण कोणीच ऎकण्याच्या मनस्थितीत नव्हते. केळकरांना मुख्य कार्यालयात हलवून कडेकोट बंदोबस्तात त्यांची उलततपासणी सुरू झाली. सर्व प्रकारचे मार्ग वापरूनही केळकरांच्या तोंडून कबुली येईना. मानसिक त्रासाने ते अस्वस्थ झाले व त्यातच त्यांचे पोटाचे दुखणे उफाळून आले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यांच्या पोटाची एक्सरे काढून तपासणी करताना त्यांच्या पोटात एक छोटी धातूची पट्टी असल्याचे डॉक्टरांना दिसले. लगेच ऑपरेशन करून ती पट्टी बाहेर काढली गेली.
त्या पट्टीने सर्व रहस्याचा उलगडा झाला. अमेरिकेत पोटाचे ऑपरेशन करताना त्यांच्या पोटात अशी सेन्सॉर चिप गुप्तपणे बसविली होती हे उघड झाले. केळकरांचे अणुशक्ती विभागातील महत्वाचे स्थान कळयामुळे अमेरिकन हेर खात्याने ही कामगिरी केली होती. या चिपमुळे केळकर जेथे जातील तेथील सर्व माहिती अमेरिकेच्या हेर खात्यास पाठवली जात होती. केळकराच्या मुलाला काय प्रत्यक्ष केळकरांनाही याची काहीच माहिती नव्हती हे सिद्ध झाले.
भारताने अमेरिकेकडे अशा कृत्याबद्दल जोरदार निषेध नोंदविला. व सर्व महत्वाच्या व्यक्तींना परदेशात ऑपरेशन करण्यास बंदी घालण्यात आली.

No comments:
Post a Comment