Saturday, November 1, 2014

गौटी व पिंटू

गौटी व पिंटू - पुस्तक परिचय
लेखक - सु. गो. तपस्वी (suhas@fandsindia.com)
ग्रंथाली प्रकाशन, मूल्य १२५ रुपये

सु. गो. तपस्वी हे व्यवस्थापन शास्त्रातील अध्यापक, प्रशिक्षक व एक अनुभवी व तज्ज्ञ सल्लागार म्ह्णून महाराष्ट्रास परिचित आहेत. त्यांनी सामाजिक व मानवी विकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. ग्रंथालीतर्फे सुरू केलेल्या  ‘जनसंवाद’ या वैचारिक गटाचा अध्यक्ष आणि समन्वयक या नात्याने त्यांनी महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींशी संवाद साधला होता. त्या अनुषंगाने मला त्यांच्या कार्याची ओळख झाली. नुकतेच त्यांनी मला  ‘गौटी व पिंटू’ हे त्यांचे नवीन पुस्तक अगत्यपूर्वक पाठवले. या पुस्तकावरील माझा अभिप्राय येथे देत आहे.

सामाजिक जबाबदारीची जाणीव लहानपणीच मुलांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने आपल्या इतर कामातून वेळ काढून त्यांनी ‘गौटी व पिंटू’ हे पुस्तक लिहिले. याबद्दल त्यांचे अभिनंदन !

गौटी व पिंटू हे शालेय स्तरावरील दोन मित्र आपल्या जिज्ञासू वृत्तीने वरवर साध्या वाटणार्‍या प्रसंगातून अनेक गुन्ह्यांचा कसा माग काढतात व पोलिसांना पुढील कारवाईस मदत करतात तसेच सामाजिक शिस्तीचा स्वानुभव कसा घेतात याचे गोष्टीरूप धडे या पुस्तकात आहेत.  मुलांना हे पुस्तक आवडेल आणि त्यांनी ते वाचले की त्यांच्या मनावर अप्रत्यक्षरीत्या सामाजिक जबाबदारीचे संस्कार व्हावेत असा यात लेखकाचा उद्देश आहे. 

करमणूक व शिक्षण या दोन्हींचा एकत्रित आविष्कार असणारे हे पुस्तक विद्यार्थीजगतात लोकप्रिय ठरेल असे मला वाटते.    गौटी व पिंटू हे शालेय स्तरावरील दोन मित्र आपल्या जिज्ञासू वृत्तीने वरवर साध्या वाटणार्‍या प्रसंगातून अनेक गुन्ह्यांचा कसा माग काढतात व पोलिसांना पुढील कारवाईस मदत करतात तसेच सामाजिक शिस्तीचा स्वानुभव कसा घेतात याचे गोष्टीरूप धडे या पुस्तकात आहेत.  मुलांना हे पुस्तक आवडेल आणि त्यांनी ते वाचले की त्यांच्या मनावर अप्रत्यक्षरीत्या सामाजिक जबाबदारीचे संस्कार व्हावेत असा यात लेखकाचा उद्देश आहे. 

करमणूक व शिक्षण या दोन्हींचा एकत्रित आविष्कार असणारे हे पुस्तक विद्यार्थीजगतात लोकप्रिय ठरेल असे मला वाटते.   

No comments:

Post a Comment