प्राथमिक शाळा
१९५०-५५ चा काळ. मी सातारच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. आमचे वर्गशिक्षक दुडेगुरुजी यांचा अक्षरलेखनावर फार कटाक्ष होता. वोरूपासून लेखणी कशी करायची, टाकाचे नीफ कसे धरायचे, अक्षराला गोलवा व डौलदारपणा कसा द्यायचा हे शिकविण्यासाठी ते आम्हा मुलांना सकाळी ६ वाजता त्यांच्या घरी बोलावत.तास दीड तास आमचेकडून लेखन करवून घेत. हे सर्व फुकट पण सर्वांना सक्तीचे असे.
माझ्या मावशीचे यजमान नाना गोडबोले सातार्याजवळ असणार्या धावडशी या गावी प्राथमिक शिक्षक होते.मी सुट्टीत त्यांच्याकडे रहायला जात असे. गावातील सर्व मुले आपापल्या वाकळी घेऊन रात्री शाळेत झोपायला येत. तेथे नाना त्यांना रोज रामायण महाभारतातील गोष्टी सांगत.त्यासाठी ते गोरखपूरहून प्रसिद्ध होणारे कल्याण मासिक मागवीत शाळेचे सानेगुरुजी वाचवालय होते त्यातील गोष्टींची पुस्तके मुलांना वाचायला देत. त्यांच्या घरच्यांची विचारपूस करीत.
या व अशा शिक्षकांमुळे मला शिक्षणाची गोडी लागली.शिक्षकांबद्दल आपुलकी आणि शाळेविषयी नवे भावबंध निर्माण झाले.
माध्यमिक शाळा
माझे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. दिवसाची सुरुवात ... प्रिय शालामाउली.. या प्रार्थनेने होई. शाळेत गणपती बनविण्याची खुली स्पर्धा असे. ज्या विद्यार्थ्याचा गणपती सर्वात चांगता असे. त्याच्या घरापासून वाजत गाजत मिरवणूकीने शाळेत तो गणपती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येई.
आमचे वर्गशिक्षक श्री ना. ज. सोमण, त्यांच्या घरी दरवर्षी स्वखर्चाने वर्गाचे स्नेहसंमेलन भरवीत. वर्षाचा अहवाल लिहिण्याचे काम माझ्याकडे असे.वर्गातल्या मुली हस्तलिखित मासिक तयार करीत. त्यात प्रत्येक मुलाचा लेख, चित्र वा इतर सहभाग असे.
आमचे विज्ञानशिक्षक केळकर सर आदर्श शिक्षक होते. वर्गात आले की ते एखादा प्रश्न उपस्थित करीत व मुलांना त्याचे उत्तर शोदण्यास प्रवृत्त करीत. मग आम्हां मुलांत चढाओढ लागे. चुकीचे उत्तर असले तर ते फक्त मान हलवीत. आम्हाला उत्त्तर सापडले नाही तर प्रश्न तसाच दुसरे दिवसासाठी राखून ठेवीत. मग शाळा सुटल्यावर आम्ही पुस्तके धुंडाळू लागू. दुसरे दिवशी मी मी म्हणत उत्तर देण्यासाठी आटापीटा करत असू.विज्ञानाची खरी गोडी तसेच अंधश्रद्धा व जुन्या चालिरीती चिकित्सक नजरेने तपासण्याची सवयही त्यांच्यामुळेच लागली.
१९६० नंतर वडिलांच्बा बदलीमुळे आम्ही सातारा सोडून कायमचे सांगलीेस वास्तव्यास आलो. गेली दोन वर्षे जुन्या आठवणीत रमलेल्या मला अमेरिकेला येण्यापूर्वी त्या शाळांना भेट देण्याची अनिवार इच्छा झाली.
त्याप्रमाणे सातारला जाऊन प्राथमिक शाळेचा शोध घेतला पण तिची जागा बदलली होती. न्यू इंग्लिश स्कूलची इमारत तीच असली तरी नव्या शिक्षकांत पूर्वीचा जिव्हाळा मला जाणवला नाही.शिक्षक आपल्या कामात व्यस्त होते. माझी थोडी निराशा झाली.
माझे नातेवाईक श्री नाना रहाळकर यांचेबरोबर मी एसटीने धावडशीला निघालो. पूर्वी हाच प्रवास बैलगाडीने करावा लागे.बस धावडशीच्या शीवेवरच थांबली. कारण रस्त्यावर शाळेची मोठी मिरवणूक चालू होती. आम्ही उत्सुकतेने खाली उतरलो व त्या मिरवणुकीत सामील झालो.
१५ जुलै हा शाळेचा पहिला दिवस असल्याने नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी गावकर्यांनी काढलेली ती मिरवणूक होती. ढोल ताशा वाजवत व सजविलेल्या बैलगाड्या घेऊन मुला-शिक्षकांसोबत नटून थटून गावकरी त्यात सामील झाले होते. आनंदाने माझे मन भरून आले.
पूर्वीची प्राथमिक शाळा तेथे नव्हती मात्र मुख्य देवळानजिक माध्यमिक शाळेची नवी इमारत मोठ्या डौलात उभी होती. भोवतालच्या पंचक्रोशीतील सुमारे ६०० ता ७०० मुले मुली या शाळेत आता शिकत होती. ग्रामीण भागात अजूनही शाळेबद्दल जी आपुलकी आढळून आली त्याचे कौतुक वाटसे. तेथील ग्रामस्थांशी बोलताना त्यांचे शाळेबद्दलचे प्रेम जाणवले मात्र शिक्षक बाहेरगावाहून येत असल्याने व बदलत असल्याने त्यांचेशी गावाचा पूर्वीसारखा संपर्क रहात नसल्याची खंत त्यांनी बोसून दाखवली.

No comments:
Post a Comment