ज्ञानदीप फौंडेशनच्या मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण या योजनेत ज्या शाळेतील किमान 20 विद्यार्थी आणि दोन शिक्षक सहभागी होतील त्या शाळेची मोफत मराठी वेबसाईट स्कूल फॉ़र ऑल या वेबसाईटवर ज्ञानदीप इन्फोटेकच्या टीमतर्फे डिझाीन करून प्रसिद्ध करण्यात येईल व प्रशिक्षम संपल्यानंतर त्या वेबसाईटचे व्यवस्थापन सहभागी शिक्षकांकडे सुपूर्त करण्यात येईल.
यासाठी विजयादशमीपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शाळा या योजनेत भाग घेतील त्या शाळेत एक ज्ञानदीप मंडळ स्थापन करून संगणक क्षेत्रातील इतर प्रगत भाषा आणि रोबोटिक किट तंत्रज्ञान मराठीतून शिकविण्याची तसेच विद्यार्थ्यांना आपले साहित्य वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानदीप इन्फोटेक या सांगलीतील सर्वात प्रगत सॉफ्टवेअर कंपनीचे प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.
तरी या योजनेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना भावी संगणक अभियंते होण्यास शाळांनी मदत करावी आणि ज्ञानदीपच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात आपले योगदान द्यावे ही विनंती.
No comments:
Post a Comment