Tuesday, October 3, 2023

मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण

मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण

डिजिटल भारताचे स्वप्न  साकार करण्यासाठी ज्ञानदीपचा उपक्रम

मराठी संगणक साक्षरता अभियानात विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोंबर २०२३  या महात्मा गांधीजयंती निमित्त्त ज्ञानदीप फौंडेशन एक  अभिनव वेबडिझाईन स्पर्धा  जाहीर करीत आहे.( ज्ञानदीपच्या संस्थापक कै. सौ. शुभांगी रानडे याचीही जन्मतारीख २ ऑक्टोबर आहे.)

या स्पर्धेत भाग घेणा-या प्रत्येकास  मराठी टायपिंग आणि वेबडिझाईन या वेबसाईटच्या माध्यमातून शिकविले जाईल. २ ऑक्टोबर ते   १ डिसेंबरपर्यंत या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मराठी टायपिंग, एचटीएमएल, सीएसएस, जावास्क्रिप्ट व फोटोशॉप व्हिडिओच्या माध्यामातून शिकविले जाईल  तसेच   त्याच्या कल्पनेप्रमाणे कोणत्याही विषयावर  एक वेबसाईट तयार करून घेण्यात य़ेईल व ती त्यांच्या नावाने मायमराठी या ज्ञानदीपच्या मुख्य  वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. ३१ डिसेंबरपर्यंत  प्रेक्षकांना या वेबसाईटचे परिक्षण करून १०० पैकी गुण देता येतील.

गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना रु. ५००० , रु. ३००० आणि रु. २००० अशी बक्षिसे दिली जातील. 


स्पर्धेच्या अटी 

१. ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यासाठी आहे.
२. प्रवेश शुल्क - रू. ५०० /-
३. विद्यार्य़्यानी प्रशिक्षण काळातील सर्व चाचणी परीक्षा व  गृहपाठ ठराविक वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

 शालेय स्तरावर मराठीतून वेबडिझाईन शिकण्याची आवश्यकता


आज मोबाईल आणि टीव्हीच्या माध्यमातून माहिती, शिक्षण व जाहिरात व करमणूक  सर्व क्षेत्रात व घराघरात संगणक व इंटरनेटने प्रवेश मिळविला आहे.कोणत्याही क्षेत्रातील प्रगत ज्ञान घेण्यासाठी संगणक व इंटरनेट वापराची गरज निर्माण झाली आहे. संगणक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याने सॉफ्टवेअर आणि वेबडिझाईनमधील प्राविण्य  ही एक महत्वाची उपलब्धी ठरली आहे.  सुदैवाने आता वेबडिझाईन आणि मराठी टायपिंगच्या सुविधा अगदी सोप्या व  कोणालाही सहज शिकण्याजोग्या झाल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या, शिक्षण विभागाच्या वा विद्यापीठ/मंडळाच्या निर्बंधामुळे शाळा वा शिक्षणसंस्था यांना स्वतःची वेबसाईट करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून ज्ञानदीप फौंडेशनने शालेय विद्यार्थ्यानाच वेबसाईट डिझाईन करण्याचे शिक्षण देण्याचे ठरविले आहे.  शालेय स्तरावरच जर  संगणक तंत्रज्ञान शिकून वेबदिझाईन करता येऊ लागले तर त्याचा  विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात खूप उपयोग होईल.अशा विद्यार्थ्यांच्या गटाकदून शाळेला आपली वेबसाईट सुरू करता येईल आणि आपल्या शाळेच्या कार्यक्रमांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी देता येईल

शिक्षकांनीही हे तंत्रज्ञान शिकले तर असे प्रशिक्षण वर्ग प्रत्येक शाळेत देता येतील. शिक्षकांसाठी तसेच इतरांसाठी ज्ञानदीप फौंडेशन वेबसाईट व मोबाईल प्रोग्रॅमिंगचे वेगळे कोर्सेस आयोजित करणार आहे.

For All
 Full Stack Webmaster Course - Rs. 10000/- 
 with opportunity to participate in live web design projects undertaken by Dnyandeep Infotech Pvt. Ltd. with certificate and remuneration as per work contribution.

For School  Teachers 
 Rs. 5000/-
with opportunity to participate in teaching students in school with certificate and remuneration as per work contribution.

 


No comments:

Post a Comment