Thursday, December 21, 2023

ॲमेझॉनची मीटींग - पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनपेक्षा अनोखी पण प्रभावशाली पद्धत

मी बिंगच्या स्क्रीनवर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनबद्दल माहिती विचारल्यावर मला खालील उत्तर मिळाले,

मीटिंगमध्ये पॉवरपॉइंट किंवा नोट्स वापरण्यासाठी 

  •  वेळेपूर्वी तुमच्या सादरीकरणाची योजना करा आणि तुमच्या नोट्ससह त्याची तालीम करा. · 
  • तुमच्या स्लाइड्स साध्या आणि स्पष्ट ठेवा आणि तुमच्या संदेशाला समर्थन देण्यासाठी व्हिज्युअल वापरा. ·
  • स्क्रिप्टमधून वाचण्याऐवजी तुमच्या नोट्समध्ये बुलेट पॉइंट्स, कीवर्ड किंवा संकेत वापरा. 
  •  श्रोत्यांशी डोळसपणे संपर्क साधा आणि आत्मविश्वासाने आणि उत्साहाने बोला. 
  •  प्रश्न, मतदान किंवा कथांसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवा आणि अभिप्राय आणि चर्चा आमंत्रित करा.

 

मेझॉन या जगप्रसिद्ध कंपनीचे  संस्थापक जेफ बेझोस यानी आपल्या कार्यकारी मंडळाच्या मीटींगमध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनऐवजी एक वेगळी पद्धत सुरू केली. त्यांच्यामते पॉवरपॉईंट हे एक विक्रीचे साधन आहे. आपला मुद्दा इतरांना पटवून देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो परंतू  पाहणा-यांना स्वतः विचार करण्यास उद्युक्तत करण्याऐवजी त्यांना फक्त श्रोते व्हावे लागते. त्यामुळे विचारविनिमय किंवा नवनिर्मितीसाठी ते मारक ठरते.

 

यासाठी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनऐवजी अमेझॉनमध्ये मीटींगच्या सुरुवातीस एक सहा पानी आराखडा सर्व उपस्थितांना वाचायला देतात. पहिला अर्धा तास सर्वजण  तो आराखडा वाचून आपल्या शंका, सूचना व कल्पना समासामध्ये लिहून ठेवतात. 

सर्वांचे वाचून झाले की मीटींगला सुरुवात होते. आता प्रत्येकाला एकूण काय मुद्दे आहेत याची  सविस्तर माहिती झाल्याने  आपल्या विभागाशी संदर्भित प्रश्न विचारणे, माहिती देणे व परस्पर संवाद साधणे केव्हा करायचे हे लक्षात येते.

नेहमीच्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये पुढील स्लाईडची माहिती नसल्याने अनावश्यक शंका उपस्थित होउन विषयांतर होते.

आता कोणी म्हणेल की मीटींग विषयाची सविस्तर माहिती मीटींगपूर्वीच का पाठविली तर मीटींगचा वेळ वाचेल. पण जेफ बेझोस यांच्यामते बहुतेकवेळा मीटींगला येणारे ते वाचत नाहीत शिवाय आयत्या वेळेला वाचण्यास वेळ दिल्याने त्याचे गांभीर्य वाढते व सर्वांचा सहभाग अधिक चांगला हेऊन नवीन कल्पनांना वाव मिळतो.

मला ही पद्धत खरेच अधिक चांगली वाटली. शाळा कॉलेजात शिकविण्यासाठी देखील ही पद्धत अधिक प्रभावी ठरेल.

सध्या व्हिडीओचा जमाना असल्याने नवीन विषय शिकण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ पाहण्याकडे बहुतेकांचा कल असतो.

मला व्हिडिओपेक्षा पुस्तक वापरणे अधिक चांगले वाटते. कारण पुस्तक वाचताना आपण मालक असतो व वाचताना आपल्या कल्पनाशक्तीने आपण दृश्य डोळ्यासमोर आणू शकतो पुढे मागे पाने उलटून पुस्तकातील   हवा तो मजकूर वा संदर्भ वाचू शकतो. ती सोय व्हिडिओत नसते. व्हिडिओ करणा-याच्या इच्छेनुसार व त्याने आखलेल्या क्रमानेच आपल्याला  शिकावे लागते.

आता व्हिडिओतही पुढेमागे करणे, स्पीड बदलणे, सबटायटल वाचणे या सोय़ी असतात.

 मी पुस्तक वाचताना पहिल्यांदा लेखक परिचय व त्याने दिलेली पार्श्वभूमी आवर्जून वाचतो. त्यामुळे लेखकाबद्दल व विषयाबद्दल माझ्या मनात एक स्पष्ट प्रतिमा तयार होते. माझ्या स्मृतीतील पूर्वीच्या अनुभवांचे मिश्रण होऊन पुस्तक वाचन एक आनंददायी अनुभव ठरतो.

मला वाटते अमेझॉनच्या मीटींगमध्ये वाचनाची पार्श्वभूमी अशीच उपस्थितांना विषयाशी मनाने जोडण्यास मदत करीत असेल. 

No comments:

Post a Comment