व्हाट्सएपवर कोयना धरण बांधकामाची चित्रफीत पहायला मिळाली.
कोयना धरण बांधकामाची
चित्रफीत पाहिली आणि माझ्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या. १९५६ पासूनच या
धरणाविषयी माहिती कानावर पडत होती. कारण आम्ही ज्या फणसळकर वाड्यात रहात होतो.
त्यांचे जावई श्री कापरे कोयना प्रकल्पावर काम करीत होते.वालचंद कॉलेजमध्ये प्रा.
सखदेव व तलाठी सर यांचा कोयना धरणाच्या उभारणीत सहभाग होता. प्रा. ब्रह्मनाळकर उकाई धरणाची माहिती सांगायचे. प्रा. बर्वे मिलिटरीतून तर प्रा. गोळे बॉर्डर रोड कामाचा अनुभव घेऊन आले होते.
त्यावेळचे बहुतेक सर्व
प्राध्यापक प्रत्यक्ष अनुभव घेतलेले होते. त्यमुळे त्यांच्या शिकविण्यात आत्मविश्वास
होता व त्यांचे ज्ञान केवळ पुस्तकी वव्हते. दॉ. सुब्बाराव यांचेबरोबर प्रत्यक्ष
कामाची संधी मिळाल्याने मलाही खूप फायदा झाला. आयआयटीच्या विद्यार्यांपेक्षा
वालचंदचे विद्यार्थी अधिक भाग्यवान होते. आता असे शिक्षणाऐवजी व्यवसायात अनुभव
असणारे प्राध्यापक कमी असल्याने तसेच अभ्यासक्रमाचे ओझे वाढल्याने विद्यार्थी
पुस्तकी बनत आहेत.
निवृत्त अनुभवी इंजिनिअर्सना या कामी कॉलेजने आपल्या
शश्रणप्रक्रियेत सामावून घेण्याची गरज आहे. ज्ञानदीप फौंडेशनने नवनिर्मिती व
स्वयंरोजगार योजना सुरू करून असा समन्वय साधण्याचे उद्दीष्ट छेवले आहे. – डॉ. सु.
वि. रानडे
No comments:
Post a Comment