कोणत्याही उद्योग वा व्यापारासाठी इन्व्हॆन्टरी
मॅनेजमेंट म्हणजे वस्तुभांडार व्यवस्थापन या
गोष्टीला अतिशय महत्वाचे स्थान
आहे.
ज्या उद्योगामध्ये विक्रीयोग्य वस्तू तयार
केल्या जातात. त्यांच्या उत्पादनासाठी
काही कच्चा माल
( Raw material) लागतो. उत्पादन सुरळीत चालू
रहावे यासाठी उद्योग
कच्च्या मालाचा पुरेसा साठा
करून ठेवतात. त्याचप्रमाणे
तयार झालेल्या विक्रीयोग्य
वस्तू (Product) प्रत्यक्ष विक्री होईपर्यंत
साठवून ठेवाव्या लागतात. म्हणजे
प्रत्येक उत्पादन उद्योगासाठी कच्चा
माल व पक्का
माल यांचा साठा
करण्यासाठी वस्तुभांडाराची
(गोडाऊन) सोय करावी
लागते. या वस्तुभांडारात
(Store) असणारा कच्चा माल व
पक्का माल आणि
प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेमध्ये असलेला
अर्धवट प्रक्रिया झालेला माल हे
उद्योगाचे वस्तुरूप भांडवलच ( Stock) असते. या
वस्तुभांडाराच्या मूल्यांकनावर बँक उद्योगाला
खेळते भांडवल पुरवते.
वस्तु निर्मिती उद्योग
कच्च्या मालाची खरेदी
-> कच्चा माल वस्तुभांडार ->उत्पादन
प्रक्रिया
उत्पादन प्रक्रिया
->विक्रीयोग्य तयार वस्तुभांडार->वस्तूंची
विक्री
व्यापारामध्ये
वस्तूंचे प्रत्यक्ष उत्पादन नसले
तरी खरेदी केलेल्या
वस्तू विक्री होईपर्यंत
साठवून ठेवाव्या लागतात.
व्यापार
घाउक वस्तु खरेदी
-> वस्तुभांडार -> वस्तूंची विक्री
अशा दुकानातील वस्तू म्हणजे
वस्तुरूप भांडवलच असते. मग ते
दुकान कपड्यांचे असो, किराणा मालाचे असो अथवा अन्य वस्तूंचे. अगदी हातगाडीवर माल विकणार्या
फेरीवाल्यापासून ते वालमार्टसारख्या महाकाय वस्तुभांडारापर्यंत, तसेच घरगुती उद्योगापासून
ते मोटारीच्या कारखान्यापर्यंत सर्वांना वस्तुभांडार व्यवस्थापन सुनियोजित करण्याची
गरज असते.
वस्तुरूप भांडवल उत्पादन वा
विक्री यासाठीच वापरावे लागत
असल्याने त्याचा इतर आर्थिक
व्यवहारांसाठी वापर करता
येत नाही(Locked-in capital). त्यामुळे ते
जरूर तेवढेच व
किमान पातळीवर ठेवणे
हितावह ठरते.
उद्योग व व्यापार
यात वस्तुरूप भांडवल
महत्वाचे असल्याने त्याचे योग्य
नियोजन करणे आवश्यक
असते. यालाच इन्व्हॆन्टरी
मॅनेजमेंट किंवा वस्तुभांडार व्यवस्थापन म्हणतात.
अगदी घरातले उदाहरण द्यायचे
तर चहा, साखर,
गहू, तांदूळ यासारखे
पदार्थ आपण आणतो
तेव्हा आपले पैसे
खर्च झालेले असतात.
काही लोक वर्षावर्षाचे
धान्य साठवून ठेवतात.
ते पदार्थ खराब
न होता सुस्थितीत
रहावेत यासाठी आपल्याला व्यवस्था
करावी लागते. दूध,
भाजी यासारख्या नाशवंत
पदार्थांच्या साठवणुकीसाठी आपण
फ्रीजचा उपयोग करतो. अशा
साठवलेल्या पदार्थांची किंमत व
साठवण व्यवस्थापनाचा
खर्च म्हणजे गृहउद्योगातील
इन्व्हेंटरीच होय. हा
खर्च कमीत कमी
राहील याची काळजी
घेणे आवश्यक असते.
अर्थात उद्योग व व्यापारातील कच्चा
माल व पक्का
माल यांचे प्रकार
व संख्या फार
मोठी असल्याने व
त्यासाठी लागणार्या वस्तुभांडाराचा
आर्थिक फायद्यातोट्याशी थेट संबंध
असल्याचे त्याचे योग्य व्यवस्थापन
करण्यासाठी संगणकाची मदत घ्यावी
लागते.
No comments:
Post a Comment