मराठीतील अपार साहित्यसंपदा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी त्याचे अन्य भाषांत भाषांतर वा रुपांतर होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर राहणारे मराठी बांधव हे कार्य अधिक सुलभतेने करू शकतील कारण त्यांना मराठी साहित्याची जाण असतेच शिवाय स्थानिक भाषा व तिची वैशिष्ठ्ये माहीत असतात. असे भाषांतर मोठ्या प्रमाणावर झाले तर मराठी साहित्य सर्वदूर पोहोचेल व त्याचा येथील साहित्यिकांना फायदा होईल. मराठी साहित्य अधिक समृद्ध होण्यासाठी इतर भाषांतील साहित्याचे मराठीत भाषांतर वा रुपांतर करणे तर महाराष्ट्राबाहेर राहणार्या मराठी बांधवांना अधिक सोपे जाईल. युनिकोड अक्षरसंच वापरून संगणकावर मराठी मजकूर लिहिणे सोपे झाल्याने आज इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर लोक आपले विचार मराठीतून व्यक्त करू लागले आहेत. निश्चित योजना व योग्य व्यासपीठ मिळाले तर केवळ अभिप्राय, गप्पा वा चर्चा एवढ्यापुरताच याचा उपयोग न राहता त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर पडू शकेल. मायमराठी या संकेतस्थळावर या उद्देशाने स्वतंत्र भाषांतर विभाग सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्राबाहेर राहणार्या मराठी लोकांचे सक्रीय सहकार्य मिळाले तर ते त्यांच्यासकट सर्वांनाच लाभदायक ठरेल.
या कार्याला व्यावसायिक संदर्भही आहे. आज जागतिकीकरणामुळे जाहिरात व प्रसारमाध्यमांसाठी मराठीत लेखन व भाषांतर करण्याची गरज वाढली आहे. महिला, विद्यार्थी व शिक्षकांना याद्वारे आर्थिक लाभ मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात
मराठी साहित्य व उद्योग यांच्या प्रगतीसाठी मराठीचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा व्यवसाय वृद्धींगत होण्याची गरज आहे. ज्ञानदीप आपल्या मायमराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर असा विभाग सुरू करीत आहे. असे कार्य व्यवसाय म्हणून करणार्या परदेशातील काही मराठी व्यक्तींनी यात सहभागी होण्याचे व नवोदितांना सर्व ते मार्गदर्शन करण्याचे मान्य केले आहे.
No comments:
Post a Comment