Saturday, April 12, 2008

साहित्य आणि साहित्यिक

किती योगायोग पहा. मी नुकताच साहित्यिक या विषयावर ब्लॉग लिहिला.
’इ सकाळ’ मध्ये आज खालील बातमी वाचली आणि माझ्या मताला पुष्टी मिळाली. खरंच प्रत्येकाने रोज काहीतरी लिहीत राहिले तर साहित्य समृद्ध हॊईल.
लेखन कुणाची जहागिरी नाही - महेश भट
मुंबई, ता. ११ - ""लेखन ही कुणाची जहागिरी नाही. तेव्हा ज्याच्याकडे शब्दभांडार आहे किंवा ज्याला लिहिता येते त्यानेच लिहिले पाहिजे असे नाही. तर जो जगतोय, जो अनुभवतोय, तो लिहू शकतो आणि जेव्हा अशी पुस्तके लिहिली जातात तेव्हाच त्यात जीवनाचा अस्सल गंध अनुभवता येतो,'' असे विचार सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट यांनी व्यक्त केले. वैशाली हळदणकर लिखित "बारबाला' या आत्मचरित्राचे प्रकाशन आज भट यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

No comments:

Post a Comment