Thursday, May 21, 2026

ज्ञानदीप फौंडेशनची स्मृतीवृक्ष योजना

 ज्ञानदीप फौंडेशनची स्मृतीवृक्ष योजना


शिल्प चिंतामणी साोसायटीच्या श्रीगणेश मंदीर आणि सोसायटी हॉलच्या परिसरात सोसायटीतील सभासदांना आपल्या स्वर्गीय व्यक्तीच्या स्मरणार्थ एक वृक्ष लावण्याची योजना ज्ञानदीप फौंडेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळास सुचवीत आहे.


प्रत्येक स्मृतीवृक्षासाठी रु. १०,०००-(रुपये दहा हजार मात्र) सोसायटीस देणगी स्वरुपात ध्यावे लागतील. 


वृक्षाचे नीट संगोपन करण्यासाठी त्यातील रु. ५०००रु. खर्च केले जातील. जर सोसोयटीस हे शक्य नसेल तर ज्ञानदीप फौंडेशन त्याच्या संगोपनासाठी हे काम हाती घेईल.


५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनादिवशी वालचंद कॉलेज रिटायर्ड टीचर्स असोसिएशन साठी ज्ञानदीप फौंडेशन स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करणार असून त्या दिवशी या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याचे योजिले आहे.


त्यादिवशी माझी पत्नी स्व. सौ. शुभांगी रानडे हिच्या स्मरणार्थ मी रु. १००००य- ची देणगी सोसोयटीस दोणार आहे.


कल्पना अशी आहे की सोसायटीतील प्रत्येक मूळ सभासदासाठी एक /अधिक जागा वृक्षारोपणासाठी आखून देण्यात येईल. तेथे  त्या सभासदाची माहिती,व मूळ घराचा फोटो क्यू आर कोड वर लिंक देऊन देण्यात येईल. यामुळे सोसायटीसही आवश्यक निधी उपलब्ध होईल.


डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली 



No comments:

Post a Comment