Thursday, October 5, 2023

शाळेची मोफत मराठी वेबसाईट व शाळेत ज्ञानदीप मंडळ

 ज्ञानदीप फौंडेशनच्या मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण या योजनेत ज्या शाळेतील किमान 20 विद्यार्थी आणि दोन शिक्षक सहभागी होतील त्या शाळेची मोफत मराठी वेबसाईट स्कूल फॉ़र ऑल या  वेबसाईटवर ज्ञानदीप इन्फोटेकच्या टीमतर्फे डिझाीन करून प्रसिद्ध करण्यात येईल व प्रशिक्षम संपल्यानंतर त्या वेबसाईटचे व्यवस्थापन सहभागी शिक्षकांकडे सुपूर्त करण्यात येईल.

यासाठी विजयादशमीपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शाळा या योजनेत भाग घेतील त्या शाळेत एक ज्ञानदीप मंडळ स्थापन करून संगणक क्षेत्रातील इतर प्रगत भाषा आणि रोबोटिक किट तंत्रज्ञान मराठीतून शिकविण्याची तसेच विद्यार्थ्यांना आपले साहित्य वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानदीप इन्फोटेक या सांगलीतील सर्वात प्रगत सॉफ्टवेअर कंपनीचे प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.

तरी या योजनेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना भावी संगणक अभियंते होण्यास शाळांनी मदत करावी आणि ज्ञानदीपच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात आपले योगदान द्यावे ही विनंती.

Tuesday, October 3, 2023

Simple Arithmatic with ChatGPG

I wanted to see how Chat GPG helps in simple arithmetic operations and then whether it can give step by step solution as it is required for answering written test in a primary school.

Ref: https://chat.openai.com/
Default (GPT-3.5)
After registering I could get following answers 

Addition

User

2+5

ChatGPT

2 + 5 equals 7.

Subtraction

User

2-5

ChatGPT

2 - 5 equals -3.

Multiplication

User

2*5

ChatGPT

2 multiplied by 5 equals 10.

Division

User

2/5

ChatGPT

2 divided by 5 is equal to 0.4.

Step by Step Solutions- Addition

User

34649+4285 solve step by step

ChatGPT

Sure, here's the step-by-step solution for the addition of 34,649 and 4,285:

markdown

   34649

+   4285

---------

  38934

  Start by adding the digits in the rightmost column (ones place): 9 + 5 = 14. Write down the 4 and carry over the 1 to the next column.

markdown

   34649

+   4285

---------

     4

    Move to the next column (tens place): 1 (carry) + 4 + 8 = 13. Write down the 3 and carry over the 1 again.

markdown

   34649

+   4285

---------

    34

    Move to the next column (hundreds place): 1 (carry) + 6 + 2 = 9. Write down the 9.

markdown

   34649

+   4285

---------

   934

    Move to the next column (thousands place): 3 + 8 + 4 = 15. Write down the 5 and carry over the 1.

markdown

   34649

+   4285

---------

  5934

    Move to the next column (ten thousands place): 1 (carry) + 4 + 2 = 7. Write down the 7.

markdown

   34649

+   4285

---------

 75934

The final result of the addition is 75,934.


Step by Step Solution - Subtraction

User

421892 -57849 step by step

ChatGPT

Certainly, here's the step-by-step solution for the subtraction of 421,892 and 57,849:

markdown

   421892

-   57849

---------

  364043

    Start by subtracting the digits in the rightmost column (ones place): 2 - 9. Since 2 is smaller than 9, we need to borrow 1 from the tens place. So, the 2 becomes 12, and then subtracting 9 from 12 gives 3. Write down the 3.

markdown

   421892

-   57849

---------

     3

    Move to the next column (tens place): 8 (borrowed) - 4 = 4. Write down the 4.

markdown

   421892

-   57849

---------

    43

    Move to the next column (hundreds place): 1 (borrowed) - 8. Similar to before, we need to borrow 1 from the thousands place, so the 1 becomes 11. Then, subtracting 8 from 11 gives 3. Write down the 3.

markdown

   421892

-   57849

---------

   343

    Move to the next column (thousands place): 2 (borrowed) - 7. Again, borrow 1 from the ten thousands place, making the 2 into 12. Subtracting 7 from 12 gives 5. Write down the 5.

markdown

   421892

-   57849

---------

  5343

    Move to the next column (ten thousands place): 4 (borrowed) - 5. Borrowing 1 from the hundred thousands place, the 4 becomes 14. Subtracting 5 from 14 gives 9. Write down the 9.

markdown

   421892

-   57849

---------

 95343

The final result of the subtraction is 95,343.

---

Step by Step Solution - Multiplication

User

484*947 step by step

ChatGPT

Sure, here's the step-by-step multiplication of 484 and 947 using the long multiplication method:

css

    484

×   947

---------

   1936    (484 × 7)

 1452      (484 × 4, shift one position to the left)

+1936      (484 × 9, shift two positions to the left)

---------

 458348

    Multiply the ones digit of the second number (7) by each digit of the first number (484) and write down the partial products:

     484

× 7

1936

sql


2. Multiply the tens digit of the second number (4) by each digit of the first number (484), but shift one position to the left:

484

× 4

1452

sql

3. Multiply the hundreds digit of the second number (9) by each digit of the first number (484), but shift two positions to the left:

484

× 9

1936

sql

4. Add up all the partial products:

1936

1452

+1936

458348

csharp

So, the result of the multiplication 484 × 947 is 458,348.

----

Step by Strep Solution - Division

User

67842/87 step by step

ChatGPT

Sure, here's the step-by-step division of 67,842 by 87 using long division:

lua

       780

   ----------

87 | 67842

     - 609

     -----

        696

      - 696

     -----

          0

    Start by dividing the leftmost digits of the dividend (67) by the divisor (87). The result is 0 with a remainder of 67. Bring down the next digit (8) to form 678.

    Divide 678 by 87. The result is 7 with a remainder of 39. Bring down the next digit (4) to form 394.

    Divide 394 by 87. The result is 4 with a remainder of 22. Bring down the next digit (2) to form 222.

    Divide 222 by 87. The result is 2 with a remainder of 48. Since there are no more digits to bring down, the division process ends.

The quotient is 780 and the remainder is 48. So, 67,842 divided by 87 equals 780 with a remainder of 48.

--------------------------------

झेन ऑफ पायथॉन – अजगराचे ध्यान

 

पायथॉन म्हणजे अजगर. पायथॉन या संगणक भाषेचे नाव आणि लोगो हे अजगराच्य मुकाट्याने सर्व गिळून टाकण्याच्या क्षमतेचे प्रतिक आहे. झेन हा शब्द मध्य चिनी शब्द 禪 (chán), 禪那 (chánnà) चा संक्षेप, जो संस्कृत शब्द ध्यान (“ध्यान”) चे चीनी लिप्यंतरण आहे, या जपानी उच्चारावरून आला आहे. त्यामुळे Zen of Python (झेन ऑफ पायथॉन) म्हणजे अजगराचे ध्यान. एकाजागी स्वस्थ पडून राहिलेला अजगर काय विचार करीत असेल या कल्पनेवर आधारित पीटर्सची झेन ऑफ पायथॉन ही कविता पायथॉन भाषेचे सामर्थ्य आणि क्षमतेचे यथायोग्य वर्णन करीत असल्याने अधिकृत पायथॉन भाषेमध्ये तिचा समावेश केलाआहे.

पायथॉन >>>या चिन्हावर वर खालील प्रमाणे टाईप केल्यास ही कविता दिसू लागते.

import this

वरील इंग्रजी कवितेचे मराठी रुपांतर मी खालीलप्रमाणे केले आहे.

    कुरुपापेक्षा सुंदर चांगले 
    अस्पष्ट पेक्षा स्पष्ट चांगले 
    साधे हे क्लिष्टपेक्षा चांगले 
    गुंतागुंतीपेक्षा क्लिष्ट चांगले 

    आतल्या गाठीपेक्षा सरळ सूत  चांगले 
    दाट पेक्षा पातळ चांगले 
    सहज समजण्यासारखे चांगले

    विशेष प्रकारचे लिखाण नियम मोडण्यासाठी पुरेसे विशेष नसतात

    जरी व्यावहारिकता शुद्धतेपेक्षा उपयुक्त असते
    तरी चुका कधीही नकळत्या राहू  नयेत.
    त्यांचे स्पष्टपणे निरसन करणे आवश्यक आहे

    अस्पष्टता असेल तरी अंदाज करण्याचा मोह करू नका
    ते करण्याचा एक- आणि प्राधान्याने फक्त एकच-स्पष्ट मार्ग असतो.

    जोपर्यंत तुम्ही  प्रयत्न करीत नाही तोपर्यंत तो मार्ग प्रथम स्पष्ट नसेल.

    जरी आता करणे कधीही न करण्यापेक्षा चांगले वाटत नसले 
    तरी कधीही न करण्यापेक्षा आता करणे श्रेयस्कर असते

    कार्य करण्यात स्पष्टता नसणे वाईट
    कार्यपद्धती सोपी केल्यास  स्पष्ट करणे सोपे असेल, 
    तर ती चांगली कल्पना असू शकते.

    संकल्पनेला नाव असणे ही एक चांगली कल्पना आहे 
    – चला त्यापैकी आणखी काही करूया!

मुलांची आवडती जिरोनिमो स्टिल्टनची पुस्तके

 

अमेरिकेत मुलाकडे रहात असताना माझा बहुतेक वेळ 8 वर्षाच्या नातीबरोबर, अस्मीबरोबर खेळण्यात जातो. तिच्याबरोबर खेळताना मी माझे वृद्धत्व विसरून जातो. तिचा उत्साह, नवीन काहीतरी करण्याची हौस आणि निरागस भावना मला माझे हरवलेले बालपण परत मिळवून देतात. तिच्या आवडीनिवडीवरून मला बालमानसशास्त्रही शिकायला मिळते.

मुलांवर मनोरंजनातून चांगले संस्कार करण्यासाठी खेळणी, पुस्तके, व्हिडीओ गेम एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी वाल्ट डिस्नेसारखे काल्पनिक विश्व उभारणे हा अमेरिकेत फार मोठा व्यवसाय झाला आहे. मुलांना वाटणारे याचे आकर्षण आणि शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष याचा अनुभव मला 2003 मध्ये अमेरिकेत गेलो असताना आला होता. त्यावेळी मी याविषयी चिंता व्यक्त करणारा लेखही लिहिला होता. परंतु त्यानंतरच्या अनेक अमेरिका वारीत माझे मत बदलत गेले. य़ा मनोरंजक खेळणी व पुस्तकांमुळे मुले अधिक चौकस, धीट बनून  नकळत सभोवतालचे मोठ्यांचे जग, निसर्ग आणि भविष्यातील आव्हाने  याबाबतीत जागरूक व सक्षम होतात हे माझ्या लक्षात आले.

या दृष्टीकोनातून मी जेव्हा अस्मीची आवडती जिरोनिमो स्टिल्टनची पुस्तके पाहिली व वाचली तेव्हा लेखकाच्या कल्पनाशक्तीएवढीच पुस्तकातील चित्रांची मांडणी, छपाईतील वैविद्ध्य, रंगसंगती यांनी भारावून टाकले. वाल्ट डिस्नेप्रमाणेच या पुस्तकात उंदीर हा नायक असून सॅन फ्रॅन्सिस्कोसारखेच त्यांचे एक काल्पनिक विश्व लेखकाने मुलांपुढे उभे केले आहे. आपल्याकडील आरके लक्ष्मण यांच्या सामान्य माणसाच्या व्यक्तीरेखेप्रमाणे स्वतः लेखकच मुख्य पात्र बनून अनेक प्रसंगांना सामोरे जातो. प्रथम अपयश, उपेक्षा, अपमान यांचा सामना करीत शेवटी विजयी व सर्वश्रेष्ठ पद कसे मिळवितो हे मनोरंजक प्रसंगातून दाखवून जीवनात यशस्वी होण्याचे तत्वज्ञान मुलांच्या मनात रुजविण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ गोष्टीतलाच एखादा प्रसंग चित्रित करते. कथेची सुरुवातच चित्तवेधक असते. अवघड शब्दांना मोठ्या ठळक अक्षरात दाखवून अर्थाप्रमाणे रंगीत वेडीवाकडी वळणे घेणारी वाक्ये, चित्रे यांनी पुस्तकाचे प्रत्येक पान सजलेले असते. साहजिकच मुलांना ही पुस्तके वाचायला आवडतात. कथानकही रोमहर्षक प्रसंगांची मालिकाच असते. वाचताना मुले रंगून जातात आणि नकळत शिकतही जातात.

आपल्याकडेही अशा पद्धतीने पुस्तके तयार केली तर शिक्षण हे ओझे न वाटता करमणुकीचा प्रकार वाटेल व मुले आनंदाने एरवी क्लिष्ट वाटणारे विषयही सहजगत्या शिकू शकतील.

सहासहा महिने आलटून पालटून भारत आणि अमेरिकेत रहायला मिळत असल्याने ज्ञानदीपच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी व कल्पना यांची देवघेव करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली आहे. माझ्या मुलीने मला ग्रीन कार्ड मिळवून दिले त्यामुळेच हे शक्य होत आहे. भारतातही मला वरच्या दर्जाच्या हुषार व श्रीमंत मुलांपेक्षा ग्रामीण भागातील अर्धवट शिक्षण झालेल्या व परिस्थितीने गांजलेल्या लहान मुलांच्यात हे परिवर्तन घडवून आणायचे आहे.

ज्ञानदीपचे कार्य त्यामुळेच मराठीतून आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवून सुरू आहे. ते पुढे सतत चालू राहण्यासाठी नव्या पिढीतील अशा जीव ओतून काम करणा-या युवक-युवतींची साथ मिळेल अशी मला आशा आहे.

धनंजय दातार आणि नर्मदा परिक्रमा

मे 2023 मध्ये मी सांगलीत असताना  नाशिकचा माझा मावसभाऊ धनंजय मलो भेटायला आला. त्याने केलेल्या नर्मदा परिक्रमांबाबत मला कुतुहल होते. त्यामुळे  ज्ञानदीपचया ऑफिसमध्ये मी त्याची व्हिडीओ मुलाखत घेतली. दातार कुटुंबिय, नर्मदा परिक्रमा आणि स्वतः धनंजयच्या कर्तृत्वाविषयी मला पहिल्यांदाच बरीच नवी माहिती मिळाली. दोन भागात सुमारे तासाभराचा हा व्हिडीओ आम्ही यूट्यूबवर प्रसिद्ध केला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या मुलाखतीत मला कळलेल्या नव्या गोष्टी या लेखात मांडत आहे.

दातार कुटुंब – कोकणातून साता-याजवळील लिंब-गोवा येथे 1928 मध्ये वास्तव्यास आले. पुढे पुण्यात त्यांनी भिक्षुकी आणि दूधडेअरीचा व्यवसाय सुरू केला होता सध्या प्रसिद्ध असलेले चितळे यांनीही त्यावेळेसच पुण्यात डेअरी व्यवसाय सुरू केला होता. लहानपणी पुण्याला लक्ष्मी रोडवरील पाषाणकर वाड्यात त्याच्या घरी गेलो असताना पहाटे दूध तापविणे, मोठ्या लाकडी रवीने दोरीच्या साहाय्याने ताक घुसळणे हे मी पाहिले होते. रात्री आम्ही समोरच्या डेअरीत पहारा म्हणून झोपत असू. दोघे मोठे भाऊ खालच्या मजल्यावर तर माझ्या मावशीचे घर तर माळ्यावर होते.

चितळे यांनी आपल्या शेतीवाडीच्या जोरावर व्यवसाय पुढे वाढविला. मात्र भांडवल नसल्याने दातारांना तो व्यवसाय पुढे बंद करावा लागला.म्हणजे व्यवसाय यशस्वी होण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. आज यशस्वी असणारे बरेचसे उद्योग हे मुख्यत्वे स्वतःच्या भांडवलावरच सुरू झाले होते. आपली संपत्ती आपल्या उद्योगासाठी खर्च करण्याचे धाडस ज्यानी दाखविले तेच पुढे यशस्वी उद्योजक बनले.

नर्मदा परिक्रमा – धनंजयने आपल्या ओघवत्या भाषेत नर्मदा नदी,तिचे पौराणिक महत्व, परिक्रमेचा मार्ग आणि रोज 30-35 कि. मी. पायी चालत सुमारे 3500 कि. मी. लांबीची परिक्रमा एकट्याने करीत असताना आलेले अनुभव, निसर्गसौदर्य, देवालये आणि आश्रम यांची माहिती दिली.

दिवसा प्रवाशांना लुटून त्यावर उदरनिर्वाह करणारे जंगलातील आदिवासी घरात येणा-या पांथस्थाला देव मानून त्याला जेवण व निवारा देत असत. हे ऐकून आश्चर्य वाटले. तेथील स्थानिक लोकांची नर्मदेवर अमाप श्रद्धा आहे आणि ते परिक्रमा करणा-या लोकांना सर्वतोपरी मदत करतात हे त्यांनी आवर्जून सांगितले.शब्दांतील वर्णनाबरोबर प्रत्यक्ष नर्मदेची चित्रे आणि फोटो व्हिडीओत घालता आले नाहीत. ते मी खाली देत आहे.

धनंजय दातार यांचे खालील व्हिडीओ पाहताना वरील ठिकाणे प्रत्यक्ष भेट देऊन पाहिल्याचा अनुभव येईल.

या नर्मदा परिक्रमा केल्यानंतरही धनंजय दातार यांनी अलिबाग ते गोवा आणि गोवा ते थेट कन्याकुमारी पायी प्रवास कसा केला आणि दरवर्षी न चुकता आपल्या मूळ लिंब गोवा या गावी उत्सवाला आणि सज्जनगडावर पायी चालत जातात हे ऐकून माझा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला.

त्यांची जीवननिष्ठा, कष्ट करण्याची जिद्द आणि आनंदी वृत्ती नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल. त्यांनी आमच्या ज्ञानदीपच्या कार्यातही असाच सहभाग घ्यावा असे आवाहन करून मी मुलाखतीचा समारोप केला.

त्यांच्या या अलौकिक जीवननिष्ठेला माझे विनम्र अभिनादन.

इलेक्ट्रॉनिक्स सर्किटसाठी ब्रेडबोर्ड

 इलेक्ट्रॉनिक्स सर्किट तयार करून तपासण्यासाठी  ब्रेडबोर्ड हे एक साधन वापरतात. यात दोन थर असतात वरच्या थरातील पट्टीवर आडव्या आणि उभ्या ओळीत 0.1’’ ग्रिडवर अनेक लहान सॉकेट्स किंवा छिद्रे असतात.तर खालच्या थरात तांब्याच्या पट्या लावलेल्या असतात.

वरच्या थरातील छिद्रे वर दोन आडव्या ओळी, खाली दोन आडव्या ओळी आणि मधल्या भागात उभ्या ओळीत खालच्या तांब्याच्या पट्ट्यांनी एकमेकास जोडलेली असतात.

रेझिस्टर, डायोड, ट्रान्झिस्टर इत्यादी बहुतेक काम्पोनंटचे लीड्स किंवा टर्मिनल्सच्या तारा या छिद्रात घालून खालच्या थरातील पट्टीवर तांब्याच्या पट्यांना त्या जोडता येतात.

त्यामुळे सोल्डरिंग न करता सर्किट तयार होते व कांपोनंट काढून दुसरे सर्कीट करता येते. यात कांपोनंट सुरक्षित राहतात.

कृत्रिम बुद्धीमत्तेचे अखिल मानवजातीवर नवे संकट

 विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यंत्रमानव निर्माण करण्यात माणसाने स्पृहणीय यश मिळविले आहे. आतापर्यंत असे यंत्रमानव माणसाच्या आज्ञेनुसार काम करीत होते. कारण बुद्धीचा मूलभूत अधिकार माणसाने आपल्याकडेच ठेवला होता. मात्र ही बुद्धी मेंदूतील मज्जातंतूनी कशी कार्यान्वित होते (न्यूरल नेटवर्क)  याचा अभ्यास करून माहितीचे विश्लेषण करून निर्णय देण्याची क्षमता असणारी कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित झाल्याने य़ंत्रेच मनुष्यबळाला पर्याय होऊन बेरोजगारीचे फार मोठे संकट नव्या पिढीपुढे येऊन ठाकले आहे.

 या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या विकासात अग्रेसर असणा-या गुगलमधील मुख्य संशोधक हिंटन, ज्यांना ‘एआयचे गॉडफादर’ म्हटले जाते,  त्यांनी या धोक्याची कल्पना आल्याने आपली नोकरी सोडली असून आता ते जागतिक पातळीवर या धोक्याविषयी जनजागृती करीत आहेत. मात्र या स्पर्धेच्या युगात गुगलपाठोपाठ इतर सर्व बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या हजारो संगणक अभियंत्यांच्या मदतीने कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग आरोग्य, वाहतूक, उद्योग याबरोबरच युद्धसामुग्री निर्माण करण्यात गुंतल्या असून त्यात तारतम्य वा नियंत्रणाचा अभाव आहे. 

औद्योगिक क्रांतीमुळे श्रमजीवी कामगारांच्या नोक-या गेल्या आता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराने बुद्धीचे काम करणा-या पांढरपेशी, उच्चभ्रू आणि मानाचे काम करणा-या शिक्षक, व्यावसायिक, डॉक्टर,वकील, संशोधक एवढेच नव्हे तर असे संशोधन करणा-या संगणकतज्ज्ञांच्या नोकरीवर गदा येणार असून मानवाचे पुढील भवितव्य कृत्रिम बुद्धीमत्ता असणारी यंत्रेच ठरविणार आहेत.

त्याहीपेक्षा मोठा धोका आंतरराष्ट्रीय य़ुद्धाचा असल्याचे युक्रेन – रशिया संघर्षावरून लक्षात येत आहे. कारण येथे बुद्धीमान घातक यंत्रेच एकमेकांशी लढत आहेत. त्यांना मानवता वा नैतिकतेचे शिक्षण नसल्याने विजयासाठी सर्वनाश झाला तरी त्यांना त्याचे दुःख नाही कारण त्यांना बुद्धी आणि शक्ती असली तरी मानवी मन नाही. कोणी विकृत मनाचा राष्ट्रप्रमुख हा सर्वनाश घडवू शकतो. सध्या अमेरिकेत घडत असलेली आत्मघाती  सामुहिक हत्याकांडाची उदाहरणे, काश्मीरमधील दहशतवादी कारवाया, सूदानमधील गृहयुद्ध या त्याच्याच छोट्या धोक्याच्या घंटा आहेत.

माणूस यातून काही शिकेल काय ? कृत्रिम बुद्धीमत्तेला आपल्या बुद्धीमत्तेच्या नियंत्रणाखाली ठेऊ शकेल काय ? दुर्दैवाने एका माणसाच्या बुद्धीलाआता काही महत्व उरले नसून सामुहिक बुद्धीमत्तेलाच हे शक्य आहे. त्यासाठी एखाद्या नव्या महात्मा गांधींसारख्या दृष्ट्या नेत्याची गरज आहे.

मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण

मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण

डिजिटल भारताचे स्वप्न  साकार करण्यासाठी ज्ञानदीपचा उपक्रम

मराठी संगणक साक्षरता अभियानात विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोंबर २०२३  या महात्मा गांधीजयंती निमित्त्त ज्ञानदीप फौंडेशन एक  अभिनव वेबडिझाईन स्पर्धा  जाहीर करीत आहे.( ज्ञानदीपच्या संस्थापक कै. सौ. शुभांगी रानडे याचीही जन्मतारीख २ ऑक्टोबर आहे.)

या स्पर्धेत भाग घेणा-या प्रत्येकास  मराठी टायपिंग आणि वेबडिझाईन या वेबसाईटच्या माध्यमातून शिकविले जाईल. २ ऑक्टोबर ते   १ डिसेंबरपर्यंत या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मराठी टायपिंग, एचटीएमएल, सीएसएस, जावास्क्रिप्ट व फोटोशॉप व्हिडिओच्या माध्यामातून शिकविले जाईल  तसेच   त्याच्या कल्पनेप्रमाणे कोणत्याही विषयावर  एक वेबसाईट तयार करून घेण्यात य़ेईल व ती त्यांच्या नावाने मायमराठी या ज्ञानदीपच्या मुख्य  वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. ३१ डिसेंबरपर्यंत  प्रेक्षकांना या वेबसाईटचे परिक्षण करून १०० पैकी गुण देता येतील.

गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना रु. ५००० , रु. ३००० आणि रु. २००० अशी बक्षिसे दिली जातील. 


स्पर्धेच्या अटी 

१. ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यासाठी आहे.
२. प्रवेश शुल्क - रू. ५०० /-
३. विद्यार्य़्यानी प्रशिक्षण काळातील सर्व चाचणी परीक्षा व  गृहपाठ ठराविक वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

 शालेय स्तरावर मराठीतून वेबडिझाईन शिकण्याची आवश्यकता


आज मोबाईल आणि टीव्हीच्या माध्यमातून माहिती, शिक्षण व जाहिरात व करमणूक  सर्व क्षेत्रात व घराघरात संगणक व इंटरनेटने प्रवेश मिळविला आहे.कोणत्याही क्षेत्रातील प्रगत ज्ञान घेण्यासाठी संगणक व इंटरनेट वापराची गरज निर्माण झाली आहे. संगणक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याने सॉफ्टवेअर आणि वेबडिझाईनमधील प्राविण्य  ही एक महत्वाची उपलब्धी ठरली आहे.  सुदैवाने आता वेबडिझाईन आणि मराठी टायपिंगच्या सुविधा अगदी सोप्या व  कोणालाही सहज शिकण्याजोग्या झाल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या, शिक्षण विभागाच्या वा विद्यापीठ/मंडळाच्या निर्बंधामुळे शाळा वा शिक्षणसंस्था यांना स्वतःची वेबसाईट करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून ज्ञानदीप फौंडेशनने शालेय विद्यार्थ्यानाच वेबसाईट डिझाईन करण्याचे शिक्षण देण्याचे ठरविले आहे.  शालेय स्तरावरच जर  संगणक तंत्रज्ञान शिकून वेबदिझाईन करता येऊ लागले तर त्याचा  विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात खूप उपयोग होईल.अशा विद्यार्थ्यांच्या गटाकदून शाळेला आपली वेबसाईट सुरू करता येईल आणि आपल्या शाळेच्या कार्यक्रमांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी देता येईल

शिक्षकांनीही हे तंत्रज्ञान शिकले तर असे प्रशिक्षण वर्ग प्रत्येक शाळेत देता येतील. शिक्षकांसाठी तसेच इतरांसाठी ज्ञानदीप फौंडेशन वेबसाईट व मोबाईल प्रोग्रॅमिंगचे वेगळे कोर्सेस आयोजित करणार आहे.

For All
 Full Stack Webmaster Course - Rs. 10000/- 
 with opportunity to participate in live web design projects undertaken by Dnyandeep Infotech Pvt. Ltd. with certificate and remuneration as per work contribution.

For School  Teachers 
 Rs. 5000/-
with opportunity to participate in teaching students in school with certificate and remuneration as per work contribution.