ग्रीन एफ एम ९०.४ या सांगलीतील कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर दिनांक ३ अॉगस्ट २०१२ रोजी माझ्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला होता. . त्या मुलाखतीचा वृत्तांत आहे त्याच बोली भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.एक जुनी आठवण आणि आमचे त्यावेळचे संकल्प यांचे दर्शन त्यात होईल अशी आशा आहे.
मेधा सोवनी - तर मंडळी तुम्ही ग्रीन एफएम ऐकताय आणि आज शुक्रवार असल्याने आज आपला सेकंड इनिंगचा दिवस आहे, त्यामुळे मी मेधा आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते या कार्यक्रमामध्ये. मंडळी मागच्या सुक्रवारी आपम निवृत्त प्राध्यापक डॉ. रानडे यांच्याशी बातचित केलेली होती. तुमच्या लक्षात असेलच. अतिश. उत्तम विचार असणारी ही व्यक्ती आपल्याला लाभलीय. आजही त्यांच्याशी आपण बातचित करणार आहोत. इंटरनेटचा वापर चांगल्या कारणासाठी कशापद्धतीने होऊ सकतो. उत्तम शिक्षणासाठी कशापद्धतीने होऊ शकतो हे सरांनी आपल्याला सांगितलं आणि त्याच इंटरनेटचा वापर महिलांसाठी उत्पन्नाचे साधन म्णून कसा होऊ शकतो.मुलांसाठी ज्ञानामी दालनं कशी खुली होऊ शकतात. याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आमि त्यासाठी सर इतं हजर आहेत. नमस्कार सर,
डॉ. रानडे - नमस्कार
सौ. मेधा सोवनी - सर आपण मागच्या वेळेला खूप छान माहिती दिलीत की आतापर्यंत तुम्ही कायकाय केलेलं आहे. आणि आता आुण वळणार आहोत ते इथून पुढे तुमचे संकल्प काय आहेत तर तुम्ही म्हणाला होतात मागच्या वेळेस की ज्ञानदीप मंडळाची माझी एक संकल्पना आहे. आता ज्ञानदीप फौंडेशनची संस्था काम करते काय तर हे ज्ञानदीप मंडळ नेमके कशासाठी उद्देश काय आहे त्याचा
डॉ. रानडे - त्याची पूर्वपीठिका अशी की मी गेल्या पाचसात वर्षांमध्ये दोनतीन वेळा अमेरिकेला गेलो होतो. आणि तिथं मी असं बघितलं की आमचे नातू किंवा इतर मुतं ही बरीचशी कॉम्प्युटरमध्ये असणारे व्हिडिओ गेम व इतर काही खेळणी यामध्ये फार गर्क झालेली आहेत आमि त्याचा त्यांच्या शिक्षणावरती परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये जरा मागे पडतात.
सौ. मेधा सोवनी - म्हणजे आपण त्या लोकांकडे बघतो ना ते काहीतरी ग्रेट म्हणून बघतो आणि तुम्ही हे जे सांगताय ते याहून वेगळे जाणवतंय.
डॉ. रानडे - याचं कारण असं आहे की त्याठिकाणी संगणकाचा जो वापर आहे तो जास्तीतजास्त मनोरंजनासाठी केला जातोय. मनोरंजन हा भाग असा आहे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भुरळ घालणारा आहे.
अगदी
डॉ. रानडे - आणि त्यामुळं काय झालं की अमेरिकेच्या मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या विविध क्षेत्रात आहेत तशा मनोरंजन क्षेत्रातही आहेत. म्हणजे फार मोठ्या अशा संस्था आहेत की खेळण्याची एक मोठी इंडस्ट्री त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे एखाद जरी खेळमं असेल, समजा स्पायडरमॅन आहे, स्टार वार्स आहे किंवा हरी पॉटर आहे आसी साधी आपण खेळणी बघतो डायनॉसॉर्स आहेत त्यांनी त्यावर प्रचंड प्रमाणात विहिडिओ गेम्स, वस्तू, खेळणी, गाणी, सिनेमे तयार करून मुलांनी त्याच्या मागं लागाव, त्याला अॅडिक्ट व्हाव या पद्धतीनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि ब-याच मुलांचं त्यामुळं शिक्षणाकडं दुर्लक्ष होतय फक्त तिथं काय आहे फायदा असा की तिथले लोकं, सगळ्यांनाच संगणक माहिती असल्यामुळं आणि त्यांच्या जीवनाचा तो अविभाज्य भागच बनलाय सकाळपासून रात्रीपर्यंत सारखं त्यचा वापर चालू असतो त्यामुळे त्यांना माहिती आहे की मुलांनी काय बघावं त्यामुळे ते नियंत्रण करतात. त्यामुळे ते योजना आकतात की मुलांनी जास्तीतजास्त त्याचा उपयोग अभ्यासासाठी करावा. शिक्षणासाठी तेथे प्रचंड प्रमाणात तिथे संगणकाचा वापर होतो.
आणि याउलट आपल्याकडं मात्र या संगणकाच्या बाबतीत एक वेगळीच लाट निर्माण झाली की संगणकाचा वापर जास्तीतजास्त व्हिडिओ गेम, चित्रे बघणे, किंवा फेसबुक, आर्कुटवरनं गप्पा मारणं याच्यासाठी जास्त व्हायला लागला. आमि अब्यासापासून ही मुलं दूर व्हायला लागलीयत. याचं कारण याच फॅसिनेशन निर्माण झालय. त्याना असं वाटायला लागलंय की काही सहज गोष्टी केल्या की एकदम यश मिळते. आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो की स्वत मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसंच स्वत अभ्यास केल्याशिवाय यश येत नाही. पण ह्या गोष्टीला थोडसं वेगळं व विकृत स्वरूप या असल्या खेळांमुळं किंवा अशा खेळांमुळं त्या मुलांना मिळतय आणि याच कारण असं आहे की काही कल्पनारम्य म्हणजे पूर्वी पंचतंत्र होतं,अरेबियन नाईट्स होत्या इसापनितीच्या गोष्टी होत्या पण इसापनितीता काहीतरी तात्पर्यहोतं आता तिकडं जे नवीन खेळ विकसित झाले या खेळांमध्ये हिंसा, विध्वंस आमि त्यात आनंद मिळवणं शिकार करायची कुणाला मारायचं कसं ह्याच्यामध्ये आनंद मिळवायचा आता तुम्ही घुगलवर बघितलं असेल अॅंग्री बर्ड म्हणून खेळ प्रचंड पॉप्युलर खेळ आहे. म्हणजे तिथे काय आहे की ते पक्षी जाऊन एक मोठा मनोरा फोडतात. व त्यातली लोकं खाली पडतात. कारण काहीही सांगितलं असेल परंतु पाडण्याकडं प्रवृत्ती जास्. आणि काहीतरी लकने पैसे मिळवणं आता नशीब म्हणून काही टीव्हीवर चाललय तर टीव्हीचीही तीच स्थिती आहे आपल्याकडे तर कुठल्याही माध्यमाचा उपयोग शिक्षणासाठी न होता जाहिरात व मनोरंजन यासाठी जास्तीत जास्त व्हायला लाहलाय मध्यंतरी आपल्या कपिल सिब्बल यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक विद्यार्त्याच्या हातात एक लॅपटॉप देणार आहे. अगदी कमी किमतीत देणारे की शिक्षण चांगलं करता येईल. भारत सरकारची योजना खरच चांगली आहे की शिक्षणासाठी कित्.ेक कोटी त्यांनी खर्च केलेत आणि हे सगळे लॅपटॉप आणायची त्यांनी आर्डर धिली आहे आणि एकदोन वर्षांमध्ये सगळ्यांच्या हातांमध्ये हे लॅपटॉप मिळतील आणि हे लॅपटॉप मिळाल्यावर त्याच्यावर काय बघायचे ते मटेरियलच नाही आपल्याकडे. मटेरियल तिकडले जे येईल तेच,
सौ. मेधा सोवनी - म्हणजे येणार ते सगळे गेम्सच येणार.
डॉ. रानडे - हो,
सौ. मेधा सोवनी - इंटरनेट मुलांनी ओपन केले तर त्यातून काय चांगलं घ्यावं ते आधी शिकवायला लागणार आहे
डॉ. रानडे - हो, बरोबर आहे आणि या लॅपटॉपवरती एकदा तो खेळ बघायला लागला की तो खेळच बघत बसणार आमि सिनेमेच बघत बसणार आमि याच्यापासून वाचविणार कोण कारण शिक्षण देणारे आहेत ते शिक्षक आणि घरात अब्यास घेणारे पालक या दोघांनाही कॉम्प्युटर माहिती नाही. कॉम्प्युटरपासून ती चार हात दूर आहेत. त्यामुलं काय होतं की आपला मुलगा कॉम्प्युटर वापरतोय लॅपटॉप करतोय
सौ. मेधा सोवनी - त्याच्यावर काय चाललय हे त्यांना माहीत नाही.
डॉ. रानडे - म्हणजे लॅपटॉपवर कुठले गेम्स बघतोय कुठले व्हिडिओ बघतोय काय करतोय काहीच माहिती नाही.आणि याचा परिणाम असा होईत की अज्ञानी प्रौढ व ज्ञानी लहान मुलं असं म्हणायचं पण त्यांना माहिती नाही काय बघायचं ते अनियंत्रित वापर झाल्यामुळे त्याचे अधोगतीत रुांतर झालं आणि त्याना असं वाटायला लागलं की मी त्यातनं जास्त पैसे मिळतील किंवा काहीतरी फायदा होईल त्यामुळे अभ्यासाकडं दुर्लक्ष होईल
सौ. मेधा सोवनी - म्हणजे योग्य ते ज्ञान त्याला मिळणार नाही असं वाटतयं तुम्हाला.
डॉ. रानडे - हो.
सौ. मेधा सोवनी - म्हणजे त्यासाठी तुमची ज्ञानदीप मंडळाची संकल्पना आहे.
डॉ. रानडे - हो. म्हणजे माझे मत असे होते की सरकारने असा सर्वांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्याऐवजी मोठमोठ्या शाळा सांगली हायस्कूल लठ्ठे एज्युकेशन संस्था यांनी डिजिटलस्कूलसाठी प्रचंड पैसा खर्च केलाय. प्रत्येक वर्गामध्ये कॉम्प्यु़टर ठवायची योजना आहे पण या कॉम्प्युटरवर दाखविणार काय. ते सध्या इंटरनेटवर मिळते ते दाखवितात. पण यात देखील बरेचसे प्रोग्रॅम हे अशा कंपन्यांनी केलेले आहेत. येथे त्यांचा इथे उद्देश वेगळा असतो. तिकडलं जे ज्ञान आहे ते तिकडल्या परिस्थितीशी जुळमारी असतात. तिकडली नावं आपल्याकडं रुळायला लागतात. इथल्या परिस्थितीची जी जाण आहे व इथे ज्याची गरज आहे ती माहिती आपल्याला यातून मिळत नाही. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं असतं ते इंग्रजीमधलं, त्यामुळे मराठी माध्यमातील मुलांना केवळ करमणूक सिनेमा बघतोय एवढच त्याच समाधान होईल. शिक्षकांनाही काय टिव्ही लावलाय त्यावर आम्ही शिकवतो स्वत शिकवण्याचे कष्टही घ्यायला नकोत रेडिमेड आहे ते दाखवायचं मुलांनी त्यावर उत्तरे लिहायची. त्याचा जेवढा अभ्यास व्हायला पाहिजे ते कशापद्धतीने चालवायचे याची काहीच तयारी नाही तर नुसते लॅपटॉप दिले तर त्यामा परिणाम चांगला व्हायट्याएवजी वाईट होईल असे मला वाटते. तर यासाठी आधी सर्व शिक्षकांना कॉम्प्युटर शिकवणं त्याचा वापर कसा करायचा हे शिकवण्याची फार मोठ्ठी गरज आहे आणि फक्त आपल्याकड कसं आहे की शाळेमध्ये एक संगणकाचा शिक्षक असतो तो त्याचे काम असतं संगणक ठीक ठेवायचं. असं नाही संगणक हे साधन आहे. प्रत्येक विषयाच्या शिक्षकाला संगणकाचा वापर करून शिकवायचंय.
सौ. मेधा सोवनी - म्हणजे शिक्षकांनी संगणकाचा उपयोग करायचा आणि आपला विषय विद्यार्थ्यांना समजाऊन सांगायचा.
डॉ. रानडे - ह्याची खरी गरज आहे. आपल्याकडं काय होतं आमच्याकडं चार कॉम्प्युटर आहेत. संगणकाचे सिक्षक आहेत झालं काम असं नाही. प्रत्येक शिक्षकाची ती आता जबाबदारी आहे आमि येत्या दोन वर्षांत त्यांना संगणक साक्षर व्हावच लागेल. आणि ते जर झाले नाहीत तर मुलांचे भवितव्य फार भयावह होणार आहे. कोणीच हा विचार करत नाहीत. राज्यकर्ते विचार करत नाहीत मोठ्या संस्था आहेत त्या आपल्या बिल्डींगच्या जाहिरात करतात. अरे शिक्षकांची जाहिरात करा बिल्डींगची करू नका. बिल्डींग किती मोठी आमि किती कॉम्प्युटर याएवजी कोण शिक्षक आहेत ते काय शिकवतात याला महत्व आहे. म्मजे मी नेहमी म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर नको आपल्याला इन्फोस्ट्रक्चरची गरज आहे. माहितीचे आमि ज्ञनाचे भांडार पाहिजे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालय आपलं. असं मला वाटतं.
सौ. मेधा सोवनी - त्याकरताच आपल्याला काही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटलं आणि त्यासाठी तुम्ही संकल्प सोडलाय तुम्ही इतके उत्तम चांगले संकल्प मोडलेत त्याबद्दल आपम एक मस्त गाणं ऐकूया. गाणं ऐकवते आणि मग आपण या संकल्पाकडे वळूया.
--- गाणं---
मंडळी, ९०.४ ग्रीनएफएमवर आपण प्राध्यापक रानडे यांच्याशी बातचित करतोय. आता त्यांनी सांगितलं की ज्ञानदीप मंडळ स्थापन करावं असं मला का वाटलं त्याची पार्श्वभूमी काय काय होती हे सगळ बघितलं आपण तर अॅक्चुअल हे मंडळ स्थपन करायचय म्म्हणजे काय करायचं सर, याविषयी सांगाल जरासं
डॉ. रानडे - आमचा असा उद्देश आहे की ग्रामीण भागातल्या वा म्युन्सिपालिटीच्या ज्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत की ज्यांच्याकडे या सगळ्या सुविधा नाहीत डिजिटल स्कूल इत्यदी अशाठिकामी कॉम्प्युटर चालू करायचे तेथल्या एखाद्या शिक्षकाला आपले चांगले शैक्षमिक साहित्य ज्ञानदीपकडे आहे ते मोफत त्यांना देणार आणि ते विद्यार्थ्यांना दाखवायची सोय करायची आमि मुलांना मराठीत टाईप करायचं शिकवायचं. म्हणजे तिथलं मराठीतलं ज्ञान आपल्याला संगणकात घेता येईल आमि ते सा-या जगापर्यंत पोचविता येईल. म्हणजे निसते ज्ञान देणे ही प्रवृत्ती नाहीय़े त्यामध्ये तर ज्ञान जनरेट करणे ग्रामीण भागातून ज्ञान जनरेट व्हायला पाहिजे. त्या सिक्षकाची जबाबदारी असेल की सगळ्या शिक्षकांना एकत्र करून त्यांना या संगणकाचे महत्व सांगायचे. आमि प्रत्येक विषयामध्ये खूप माहिती आहे हे त्यांना पटवून द्यायचे आणि जबाबदारी आहे त्यांची हे दोन वर्षात शिकाययी हे पण त्यांना सांगायचे. ह्याच्यासाठी आम्ही एक ज्योत लावल्यासारखी आहे. आम्ही काही जास्त करू शकणार नाही. माझ्याकडे चार मुले आहेत. पण तेथे एकएक सेक्शन जर जागृत झाला तर तो अशा शिक्षकांना प्रवृत्त करेल तिथे जे ज्ञान जनरेट होईल ते माझ्या भांडारात पडेल मग अशा शाळा आपण एकत्र जोडू शकतो.
सौ. मेधा सोवनी - पण सर आता तुम्ही म्हणालात की मी काय करू शकणार आहे . चार मुलं आमि मी एवडंच आम्ही काम करू सकतो पण ही तुमची जी इच्छा आहे ही कल्पना जर असा अनेक शाळांच्या मनात जर रुजली तर आपण म्हणतो न जसे ज्योत से ज्योत हे गाणं ऐकलं तशापद्धतीने एका ज्योतीने अनेक ज्योती लावल्या आणि त्या पणत्या वा दिवे तेवले तर त्याचा प्रकाश जगाला उजळून टाकेल अशा पद्धतीचा असणार आहे.
डॉ. रानडे - त्याच्यासाठी मी स्कूल फॉर अॉल या नावाची वेबसाईट सुरु केलीय. त्यावर या सर्व शाळांची माहिती त्यांचे फोटो व उपक्रमांची माहिती देणार त्याबरोबरच तेतली मुलं काय शिकतायत त्याची माहिती जगभर पोचविणार. अगदी साधी गोष्ट बघा. परवा आमचं दोघांच रेकॉर्डिंग झालं ते मी आमच्या मायचांगली वेबसाईटवर टाकलं. टाकल्याबरोबर अमेरिकेतल्या माझ्या मुलाने ऐकलं आणि त्याने फोन केला ग्रीन एफएमने खूपखूप चांगलं काम केलय. दोन तासात हा फोन आला म्हणजे याचा अर्थ अमेरिकेतील तोकांनी ती ऐकली म्हणजे या ज्ञानाचा प्रसार अतिशय वेगाने होऊ शकतो.
सौ. मेधा सोवनी - बरोबर. म्हणजे आता खर तर आमचा हा कम्युनिटी रेडिओ आहे.आणि आपलं हे प्रसारण हे फार कमी लोकांपर्यंत पोचू शकते आमि वेळेचे बंधन म्हणजे मी त्या वेळेत रेडिओ लावू नाही शकले तर मला ते ऐकू येणार नाही. पण असा पद्दतीने केल्यामुळे म्हणजे इंटरनेटचा वापर करून ही चांगली गोष्ट आपण दूर अमेरिकेत बसलेल्या मुलालासु्द्धा ऐकवू शकलो. तर हा ज्ञानाचा उपयोग वा ज्ञानाचा प्रकाश आहे आपल्या सांगलीकरांच्यापर्यंत पोचवायचा आहे . खूप चांगला उपक्रम आहे तुमचा आणि डिजिटल स्कूल म्हणालात तुम्ही तर त्याबद्दल काय तूमची प्रतिक्रिया ते सांगाल का.
डॉ. रानडे - ते काय आहे. डिजिटल स्कूलमध्ये प्रत्येक विषयामध्ये व त्यातील छोट्या भागावरही प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे. तेही विविध स्वरुपात आहे म्हणजे लिखित स्वरुपात आहे, चित्रांच्या स्वरुपात आहे. पॉवर पॉईंट्स आहेत चांगले व्हिडिओज आहेत. आणि जवळजवळ सर्व फ्री मटेरिएल आहे. फक्त त्याकड लोकांचे लक्ष नाही. ते आपण गोळा करू शकलो पाहिजे आणि ते मी एकटा करू शकणार नाही. प्रत्येक शिक्षकाला जबाबदारी दिली तर गोळा करू शकतील त्याचे नीट वर्गीकरण करू सकतील त्याचे मराठीत रुपांतरण करू शकतील. आणि हे रूपांतर केल्यानंतर त्याचा एक ज्ञानकोश तयार होईल आणि एकमेकांच्या शाळांमध्ये हे गेलं की हॉरिझांटल इंटिग्रेशन होईल आणि कॉलेजमध्ये केलं म्मजे कॉलेजमधले जमा केलेले ज्ञान जर आपण शाळांमध्ये पोहोचवू शकलो तर व्हर्टिकल इंटिग्रेशन होईल. व्हर्टिकल आणि हॉरिझांटल इंटिग्रेशन झाल्याशिवाय शिक्षणाचा व इंटरनेटचा वापर चांहलो होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही नुसतेच वाईट सांगताय की हे सगळं इतकं भयावह आहे आणि कसं शिकऱार काय होणार तर असं नाही कारण याच वेळी आपल्याला फार मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सगळ्या शिक्षकांना, महिलांना संधी ही आहे की हे जे काम आहे ते कोण करणार अमेरिकातले लोक करणार नाहीत आपमच करायचं आहे त्यामुळं ही मोठ्ठी व्यवसायाची संधी आपल्याला मिळाली आहे. ज्यांना कॉम्प्युटर प्रोग्रॅम करता येतात त्यांना यातून प्रचंड उत्पन्न होऊ शकते.
सौ. मेधा सोवनी - बरोबर. म्हणजे ज्ञानार्जनाबरोबर अर्थार्जनही यातून होणार आहे. मंडळी हे पम तुम्ही लक्षात घ्या म्हणजे इंटरनेटचा वापर करून ज्ञानार्जन तर होणार आहेच आहे पण ज्या महिला आपले घरातले काम आवरून जो वेळ त्यांच्याशी सिल्लक आहे अशा महिलांनी जर हे वेब डिझाइनिंग शिकले किंवा इंटरनेटचा वापर चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे होऊ शकतो हे जर शिकलं तर ते नक्कीच आपल्या मुलांच्याबाबतीतसुद्धा त्यांना चांगला आदर्श घालून देऊ शकणार आहेत
डॉ. रानडे - बरोबर आहे. तिकडे असे आहे की पालकांसाठी वेबसाईट असते शिक्षक व त्यांया चालकांसाठी असते मुलांना इंटरनेटवर बघून रोज उत्तरे लिहावी लागतात. शिक्षक रोज ब्लॉग लिहितात. आपल्या सिक्षकांनी ब्लॉग लिहिले पाहिजेत त्यांचे ज्ञान लोकांच्यापर्यंत पोचले पाहिजे. आणि ते आपल्या भाषेत लिहिले पाहिजेत जसं ज्ञानेश्वरांनी त्यावेळी संस्कृतमधलं सगळं ज्ञान मराठीत आणलं त्यामुळं आपण आज बघतोय तसं इंग्रजीतलं जे ज्ञान आहे ते इंटरनेटम्टा माध्यमातून आपल्या डोक्यावर पडतेय. पण आपल्याला ते समजत नाही. तर त्यातलं चांगलं कुठलं आहे ते काढून आपण ते विद्यार्थ्याला द्यायला पाहिजे कारण विद्यार्थ्याला माहीत नाही काय चांगले आणि काय वाईट घ्यायचे ते. विद्यार्थी सगळेच घेतात. आमि ते घेतल्यानंतर त्यातले वाईट चटकन घेतात कारण त्यात जास्त भुरळ पाडण्यासारख्या गोष्टी असतात. तर जे चांगले आहे त्यात कष्ट वाटतात. ते घ्यावे लागेल त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्यातून तुम्हाला त्याचा उपयोग करऊन सांदिपनीसारखे तुम्ही ज्ञान मिळवा व ते ज्ञान लोकांच्यासाठी वापरा. असं करता येईल.
सौ. मेधा सोवनी -बरोबर. सर, ऑनलाईन वेबडिझाइनिंगबद्दल सुद्द्धा आपण मागच्यावेळेला बोललो होतो. तर हे वेबडिझाइनिंग आहे ते ऑनलाईन तुम्ही कशापद्धतीने काय केले पाहिजे म्हणजे एखाद्याला वाटले की अॉनलाईन शिकायचे तर त्यासाठी काय केले पाहिजे.
डॉ. रानडे - सर्वप्रथम म्हणजे त्या व्यक्तीकडे एकतरी कॉम्प्युटर व इंटरनेट असावं पहिली गोष्ट. त्यानंतर त्याला प्राथमिक थोडी माहिती पाहिजे गुगल याहू सारख्या इमेल सर्व्हीस आहेत त्यांची माहितई पाहिजे आणि शिक्षण अकरावी बारावी झालेले असले तर त्याचे लॉजिक तेव्हढे तयार असते. तर त्या तेवढ्या पूर्वपीठिकेवर आपण त्यांना कोठलाही कॉम्प्युटरचा विषय शिकवू शकतो. अगदी सुरवातीपासून. फक्त काम करण्याची व कष्ट करण्याची तयारी हवी. असं होणार नाही की मी इथे कोर्स केला चाळीस तासांचा की मी उद्या पऐसे मिळवायला लागिन असं नाही. चाळीस तासांचा कोर्स झासा तर तुम्ही चारशे तासांचे त्याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणजे एखादे काम स्वत केल्याशिवाय ते अंगात मुरत नाही.
कारण कॉम्प्युटर जितका सोपा ाहे तितकाच तो स्वत ढुझाईन करण्यासाठी अवघड आहे. आणि त्यासाठी काय लागतं नुसतं प्रॅक्टिस बाकी काही नाही. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस ,प्रॅक्टिस दुसरे काही नाही. आता आमच्याकडे डिप्लोमा झालेला मुलगा होता. तो इथं एमएसइबीची बिलं रात्री टाईप करायचा तो आमय्च्याकडे शिकला तीनचार वर्ष शिकल्यानंतर तो आता न्यू जर्सीमध्ये आहे. अशी अनेक माझी मुले गेलेली आहेत म्हणजे शिक्षणाचा काही संबंध नाही ज्या विषयात तुमचे डेडिकेशन किती आहे त्यावर तुम्ही मिळवू शकता आता ब-याच महिला म्हणतात आम्हाला शिकायचय पण दुपारी दोन ते तीन च्या वेळात शिकेन तर असं नाही होणार तर त्याच्यवर दिवसभर काम केले पाहिजे प्रश्नांची उत्तरे द्यायला पाहिजेत. आम्ही सर्वबाबतीत तुम्हांला मदत करू. तर या पद्धतीने आपल्याला शिकवायचेय तर कसे आहे तुम्ही एखादे व्रत घेता तसे. सणाचे व्रत घेतलं जशी माळ घालायची गळ्यात तसंट व्हायला पाहिजे. मी आता वेबडिझाईनचे व्रत घेतले मी ते करणार आणि करणारच असं जोपर्.ंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत तुमच्या हातनं होणार नाही. नाही तर करमणुकीचे म्णून त्यात गंमत वाटती नंतर वाटते जाऊदे आता जास्त काही करायला नको असं होऊ नये
सौ. मेधा सोवनी -एखादी गोष्ट हातात घेतली की त्याच्या मुळाशी जाऊन नेमकं काय आहे ते शोधायची तयारी हवी.
डॉ. रानडे - अगदी बरोबर आपण नवी पुस्तक घेतली, नवी असतात म्हणून हवी वाटतात आत वाचायची वेळ आली की नको वाटते. अहदी साध बघा आपली लिहायची सवय गेली. मोबाईलवर बोललं की काम होत. पत्रच लिहीत नाही आपण. म्पणून आम्ही लिहिले होते कग हस्ताक्षरातील पत्राच आम्ही छापू आमच्या साईटवर. अक्षर विसरायला लागलं हस्ताक्षरामुळं त्याट्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटतो हे त्याच्या लक्षात येत नाही. तुमचे अक्षर कसेही असो तुम्ही लिहिलेलं आहे ते जाणवतं अक्षरांचा संबंध नाही तुम्ही ते लिहिता स्वत ते सिग्नेचरला महत्व आहे. अमेरिकेमध्ये आता हॅंडरायटिंग डे आहे. २३ जानेवारीला हॅंडरायटिंग डे पाळतात आणि तिथे हा प्रश्न फार महत्वाचा आहे.
सौ. मेधा सोवनी - तसा दिवस आपल्याकडे पाळायची गरज लागू नये.
डॉ. रानडे - मुलं ही हस्ताक्षर काढू शकतात. जर मुलांना हे कळलं की आपण लिहिलेली माहिती तिथले ज्ञान उदा. भोवतालच्या झाडांची माहिती नेटवर घातली तर जगभर जातीय तर मुलं उत्साहाने लिहितील.
सौ. मेधा सोवनी - तर आतापर्यंत तुम्ही ज्ञानदीप मंडळ सुरू केले आहे तर काय काय परिस्थिती आहे त्याची.
डॉ. रानडे - आता दोन ठिकाणी सुरू केलेली आहेत मला जळगाव येथून फोन आला. आम्हाला सुरू करायचंय. मी म्हटले शाळाप्रमुखाच्या सहीचे एक पत्र पाठवा आॅफिशियल की आम्हाला ज्ञानदीप मंडळ सुरू करायचय कारण नंतर प्रॉब्लेम व्हायला नको कारण शिक्षकांच्या मनात असते त्यांना याचे महत्व कळते मात्र संस्थाचालक यांना त्याचे महत्व जाणवेल असे नाही आणि त्यामुळे जरा थोडसं अडतं अगदी आमच्या एन्व्हायर्नमेंटच्या बाबतीतील उदाहरण देतो. आम्ही टेक्निशियन्सना पोल्युशन कसे टाळावे प्लॅंट कसे चालवावे याचे खूप शिक्षण देतो.पण ते होत नाही कारण त्यांचे जे मालक असतात इंडस्ट्रीचे त्यांना आम्ही शिकवित नाही. खालच्यांच्या काहीच हातात नसतं.
सौ. मेधा सोवनी - इम्प्लिमेंटेशन करणारे त्यांना हे कळले पाहिजे,
डॉ. रानडे - डिसिजनमेकर महत्वाचा. म्हणून आम्ही संस्थाचालकाना महत्व देतो. परवा कोरेगाववरून दोन शिक्षक आले होते. त्यांनी खूप माहिती आणली होती. तिथे एक सरस्वती शिक्षण शाळा आहे ते म्हणाले आम्ही करतो. एक शिक्षक मिळाला दुसरा शिक्षक मिळाला ब-याच शिक्षकांपर्यंत पोचवलय
सौ. मेधा सोवनी - म्हणजे बाहेरून तुम्हाला रिस्पॉन्स आले सांगली भागामध्ये तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळाला.
डॉ. रानडे - सांगली भागामध्ये सर्व शिक्षकांपर्यंत आम्ही पोचलोय. पण शिक्षकांच्याकडून संस्थाचालकांच्चाकडे गेलो नाही. संस्थाचालकांची दृळ्टी ही फक्त फी मिळवणे किंवा जाहिरातीसाठी काही मटेरियल मिळते का याकडे असते. त्यांना याचे महत्व अजून कळलेले नाही म्हणून तुमच्या या माध्यमामुळे कदाचित त्यांना उपयोग होईल आणि दोन वर्षांनंतर कॉम्प्युटर आल्यानंतर शिक्षणाला याचे महत्व कळेल. कारण काय दाखविणार मुलांना आज डिजिटल स्कूल म्हणून जाहिरात करताय पण त्यावेळी प्रत्येकाकडेच लॅपटॉप असणार आहे.त्यावेळी तुम्ही देणार काय. त्यावेळी आमच्याकडे चांगले प्रोग्रॅम आहेत आम्ही चांगले शिकवू शकतो
सौ. मेधा सोवनी - म्हणजे येणा-या कालावधीसाठी तयारी आतापासून करायला हवी.
डॉ. रानडे - ती कोण करणार कुणाचेच तिकडे लक्ष नाही.
सौ. मेधा सोवनी - तर मह, सर आता आपली मुलाखत तर लोक ऐकतीलच व त्यातून कोणाला वाटलं काही करावं तर तुम्ही काय करणार,
डॉ. रानडे - आता सांगलीमधल्या शाळांमध्ये आम्ही आलरेडी अॅप्रोच झालोय. या शाळातील कॉम्प्युटर काढून साफ करून चालू करणार आमचे संस्कृतदीपिकाचे सऑफ्टवेअर आहे ते घालून देणार. मराठी टायपिंगचे सऑफ्टवेअर घालून देणार. माझ्या विज्ञान, स्कूल फॉर अॉल मध्ये प्रचंड माहिती गोळा केलेली आहे. ती सगळी देणार. तिथ व्याख्यान देऊन ती मुलांना दाखविणार शिक्षकांना दाखविणार. तिथल्या शिक्षकांना प्रशिक्षित करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षक आमि विद्यार्थी यांनी समाजाला भोवतालच्या करावं. अशी कल्पना आहे ाणि याचप्रमाणे शाळांशी कॉन्टक्ट करतोय. एमओयू करतोय आमच्या एन्व्हायर्नमेंट शिक्षणासाठी कॉलेजेसशी सहकार्य करार केला होता. आता एन्व्हायर्नमेंट मधून मी अंग काढुन घेतलंय आता वेबडिझाईनसाठी सगळ्या कॉलेजशी सहकार्. करार करणार आहे. त्यांच्याकडे ज्ञानदीपचा क्लब सुरू करायचा प्रयत्न करणार आता ते म्हणतील ज्ञानदीप कशाला आमचा आहेच क्लब. असेल पण विषय असा आहे की सगळ्या विषयांचे शिक्षम त्यात यावे.अशाप्रकारचा कुठलाही क्लब निवडा. आम्ही त्याला ज्ञानदीप क्ब म्हणणार आमि त्याचे ज्ञान खालच्या स्तरावर म्हणजे भोवतालच्या शाळा नेणे. शाळांतून हे ज्ञान मुलांच्या पालकांपर्यंत जाईल. म्हणजे ज्ञानाचा प्रसार आहे तो आसे कॅटेगराईज होऊनतो व्हर्टिकल व्हायला पाहिजे. भारताच्या म्हणजे देशाच्या पातळीवर कोणीतरी याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. इथल्या शिक्षणतजज्ञांनी हा विचार केला नाही तर दोन वर्षांनी अमेरिकेतील व परदेशातील व्हिडिओगेम्सच पक्त येतील आणि मुलं आपली वाया जातील.
सौ. मेधा सोवनी - सर , खूप मोठी धोक्याची घंटा तुम्ही वाजवून दाखविलेली आहे. सो बी सिरीयस कारण सर जे काही बोलत आहेत ते खूप माहिती घेऊन बोलत आहेत. त्यामुळे या गोष्टी ापण नक्कीच लक्षात ठेवल्टा पाहिजेत. तर येणारा काळ हा थोडासा कठीम आहे आपल्यासाठी त्यातून तरून जाण्यासाठी आपल्टाला काय करणे गरजेचे आहे त्या सरांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. तर सर तुमही इथ येऊन खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आपल्या सहळ्या पालकांसाठी, शि७कांसाठीसुद्धा. त्याबद्दल करच मी आपले मनापासून आभार मानते.
डॉ. रानडे - नमस्कार.

No comments:
Post a Comment