Friday, May 5, 2023

आधुनिक तंत्रज्ञान आता शालेय स्तरावर येणे आवश्यक

जीवनाच्या सर्व क्षेत्रात संगणक आणि संवेदक उपकरणांचा वापर सुरू झाला असून महाविद्यालयात शिकविले जाणारे तंत्रज्ञान शालेय स्तरावर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. आपली सध्याची पुस्तकी व परिक्षेलाच सर्वोच्च महत्व देणारी शिक्षणपद्धती जागतिक दृष्टीकोनातून पाहता अकार्यक्षम आणि कालबाह्य ठरली आहे.

शालेय विद्यार्थी वा अशिक्षित व्यक्तीही मोबाईलवरील विविध सुविधा सहज वापरू शकतात आणि स्वयंचलित यंत्रे चालवू शकतात किंवा कोणतेही ज्ञान विनासायास नेटवरून मिळवू शकतात.

मात्र अशा यंत्रांचे कार्य कसे चालते वा त्यांचे डिझाईन व उत्पादन कसे केले जाते हे शिकण्याची आवश्यकता नसते. मात्र अशा उपकरणांची दुरुस्ती, विक्री व सेवा या क्षेत्रात रोजगाराच्या व उद्योगाच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत. तैवान,सिंगापूर, कोरीया, व्हिएटनामसारख्या छोड्या आशियन देशांनी या संधीचा उपयोग करून आपली अर्थव्यवस्था बळकट केली आहे. रोजगाराच्या समस्येवरही त्यांनी कौशल्य विकासातून मार्ग काढला आहे.

आपल्या भारतात वाढती लोकसंख्या, गरीबी आणि रोजगाराची समस्या गंभीर आहे. कौशल्याधारित शिक्षणासाठी बराच काळ कृतीशील काम करण्याची गरज असते. पिढीजात व्यवसायाची पण शाश्वत रोजगार देणारी पूर्वीची पद्धत आता समानता व लोकशाही मूल्यांत न बसणारी असल्याने नाहिशी होत आहे.

नव्या युगाची आव्हाने आणि उपलब्ध संधी यांचा विचार करता शालेय स्तरावरच पण आधुनिक उपकरणांच्या वापराचे, दुरुस्तीचे आणि विक्रीचे शिक्षण दिले तर मुलांमध्ये एक नवीन उत्साह येईल. इतर स्रर्वसामान्य जनतेपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळे येत असल्याने त्यांना आपण मदत करू शकतो व त्यातून अर्थार्जन ङोऊ शकेल. काही हुशार मुलांना संशोधन किंवा डिझाईन करण्याची इच्छा असेल त्यांची प्राथमिक तयारी शाळेतच होईल.

ज्ञानदीप फौंडेशनने याच विचाराने बालविज्ञान तंत्रज्ञान केंद्र शुरू केले आहे. याचा उद्देशही आधुनिक उपकरणांची ओळख आणि वापर मुलांना प्रत्यक्ष कृतीतून वा प्रयोग करून देणे एवढाच आहे. भारत शरकारच्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळेचेही ङेच उद्धीष्ट होते. मात्र शाळांकडून अशी संधी मिळण्यात अनेक अडचणी येतात हे निदर्शनास आल्याने एक पथदर्शी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले पाहिजे.

No comments:

Post a Comment