वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगलीचा माजी विद्यार्थी मेंळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनानंतर यंदा प्रथमच भव्य स्वरुपात मेळावा झाला. या मेळाव्याला पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 साली पदवी घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता टिळक हॉलमध्ये मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. समारंभास प्रमुख फाहुणे म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन विभाग संचालक व माजी विद्यार्थी श्री. शंकर देशपांडे उपस्थित होते. याशिवाय जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र मोहिते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव विनयकुमार देशपांडे विशेष निमंत्रित होते.
महाविद्यालयाच्या अँडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिलचे सदस्य तथा खासदार संजय पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक उदय दबडे, अर्थ समितीचे दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजो विद्यार्थी संघटना, तसेच विकास समितीचे श्रीनिवास पाटील, कॉर्पोरेट रिलेशन, तसेच विद्यार्थी करिअरचे अधिष्ठाता प्रा. संजय धायगुडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होतो.
सर्वप्रथम कॉलेजचा गेल्या पंचाहत्तर वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची चित्रफीत दाखविण्यात आली. नंतर विद्यार्थी करिअरचे अधिष्ठाता प्रा. संजय धायगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दीप प्रज्वलन आणि पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर कॉलेजचे प्रभारी संचालक डॉ. उदय दबढे यांनी प्रास्तविक करून कॉलेजच्या प्रगतीची माहिती दिली. यानंतर श्री दीपक शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यानंतर प्रमुख पाहुणे श्री. देशपांडे म्हणाठे, “सध्या वातावरणातोल बदलाने अनेक क्षेत्रात बदल दिसत असून भारताचा आधार असलेल्या शेतो क्षेत्रासाठी यायाबतचे प्रगत संशोधन आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकासही झपाट्याने होत आहे. या दोन्ही क्षेत्रांतील प्रगत संशोधनासाठी वालचंद महाविद्याल्याने अद्ययावत केंद्र उभारणीसाठी पुढाकार घ्यावा.
१९८३ चे माजो विद्यार्थी श्री. राजेंद्र मोहिते म्हणाले, '*या सांगलीत शिकलो, त्या सांगलीसाठीच्या टेंभू योजनेसाठी कामाची संधी मिळाल्याचा आनंद आहे. 'वालचंद'ने आत्मविश्वास दिला. प्रत्यक्ष कामाचाही अनुभव गरजेचा, हे पटवून दिले. जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांमध्ये 'वालचंद'च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय आम्ही उपलब्ध करू देऊ."
बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव विनयकुमार देशपांडे म्हणाले, ''केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रोय महामार्गाचे जाळे विणण्यात मला सहभाग मिळाला. राज्यात १९ हजार किलोमोटरचे राष्ट्रीय महामार्ग झाले. सावित्री नदीवरील १८० वर्षांचा वाहून गेलेला पूल आम्ही अवघ्या १६५ दिवसांत उभा केला. अत्ते तंत्रज्ञान देण्या-या अभ्यासक्रमांची गरज वाढली असून त्यासाठी माजो विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सांगलीचे खासदार श्री. संजयकाका पाटील म्हणाले की वेअरमन अजित गुलाबचंद यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा संकल्प आहे. त्यासाठी माजी संस्थेसाठी आम्ही सारे काम करू. याकामी मी माझ्या राजकारणाचीही चिंता करीत नाही. 'एमटीई'चे संस्थापक धोंडूमामा साठे यांचा शुद्ध शैक्षणिक उद्देश पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.
शेवटी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि माजी विद्यार्थी संघटनेसाठी ऑफिल व माजी विद्यार्थ्यांसाठी गेस्ट हाऊस उभारण्यासाठी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले.
या समारंभास 1998चे व इतरही माजी विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते. याशिवाय माजी प्राचार्य डॉ. पी. जे. कुलकर्णो. माजी प्राध्यापक डॉ. बी. सुब्बाराव, प्रा. भालबा केळकर, डॉ. आर. एस. पाटील, माजी उपप्राचार्य श्रीराम कानिटकर, डॉ. एस. एम. कुलकर्णी, प्रा. जे. जी. कुलकर्णी, डॉ. शैला सुब्बारामन, माजी महापौर सुरेश पाटील, अशोक सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मुख्य समारंभानंतर दुपारी माजी विद्यार्थ्यांनी सर्व विभागाना भेटी दिल्या. मी सिव्हिल डिपार्टमेंटच्या सादरीकरणास हजर राहून सहकारी प्राध्यापक तसेच आजी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मी यावेळी माझ्या मोबाईलवरून घेतलेले फोटो आणि व्हिडीओ ज्ञानदीपच्या वालचंद हेरिटेज डॉट कॉम या वेबसाईटवर प्रसिद्ध करणार आहे. यावेळी विभाग प्रमुखांशी झालेल्या प्राथमिक चर्चेआधारे ज्ञानदीप कॉलेजच्या विविध विभागाशी परस्पर सहकार्य करार करणार असून इंटर्नशिप, प्रशिक्षण आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यात सहभागी होणार आहे.
एकूणच हा कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने आणि चांगल्याप्रकारे साजरा झाला. कार्यक्रमाचे ऩियोजन करणा-या सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना धन्यवाद.
No comments:
Post a Comment