“ज्ञानोदय ' हे नियतकालिक शंभर वर्षांहून अधिक काळ चालू आहे. याचे जुने अंक अभ्यासकांना सर्वच ठिकाणी सहज उपलब्ध होण्यासारखे नाहीत. मूळ अंक आता इतक्या जीर्ण अवस्थेत आहेत को, ते हाताळणे म्हणजे ते पुढीळ संदर्भासाठी योग्य त्या अवस्थेत न ठेवणे, असा प्रकार आहे. म्हणून त्यांचे जतन वस्तुसंग्रहालयासारख्या पद्धतीनेच (म्युझियममध्ये) करता येणे शक्य आहे आणि आवश्यकही आहे. इतवया दीर्घकाळातील अंकांची छपाई करणे हे बरेच अवाढव्य काम आणि असे एखाद्याच ठिकाणी राष्ट्रीय प्रकल्पात उपलब्ष करणे शक्य आहे.
ही परिस्थिति लक्षात घेऊन या अंकांची शभर वर्षांची 'लेखनसारसूची' तयार करून प्रकाशित करण्याची कल्पना डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्या सूचनेद्वारा प्रथम नजरेसमोर आली. त्या अनुरोधाने डॉ. हिवाळे एज्यकेशन सोसायटी व अहमदनगर कॉलेज येथील अधिकारीवर्गाशी आणि अहमदनगर कॉलेजमधील मराठोवे प्राध्यापक व विभागप्रमुख, डॉ. गंगाधर मोरजे यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. या सर्व विचारविनिभयातून व चर्चेतून 'लेखनसारसूची'चा आराखडा
तयार होऊ लागला. इ. स. १८४२ ते १९४१ या कालावघीतील अंकांमधील सर्व लेख-कविता-इत्यादी साहित्याची ही सार-सूची सहा खंडांत तयार करण्याची योजना नक्की करून हा प्रकल्प संघटित केला. मदतीसाठी तो महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळापुढे ठेवला. सं प्रकारच्या सहकार्याची आणि उवंरित मदतीचो जवाबदारी डॉ. हिवाळे एज्युकेशन सोसायटी, अहमदनगर कॉलेज, यांनी स्वीकारली. साहित्य आणि संस्कृती मंडळानेही हा भार उचलण्यास आम्हांस मदत करून आश्वासित केले.
"ज्ञानोदय या नियतकालिकाचे महत्त्व ते शंभर वर्षांहून अधिक काळ चालले आहे, ख्रिस्ती मराठी मंडळींनी ते चालविले आहे, इतकेच नाही.ख्रिस्ती मराठो संस्कृतीचे ते प्रतीक तर आहेच, पण त्याशिवायही महाराष्ट्रातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, वाइमयीन, इत्यादी अनेक जीवनांगांमधील स्थित्यंतरे, विचारमंथने, वस्तुस्थिती, यांचे दप्तर म्हणूनही ते महत्त्वाचे आहे. या विषयांतील अभ्यासकाला व जिज्ञासूलाही या नियतकालिकातील हे लेखन अवकोकनार्थ आणि चिकित्सेसाठी मिळाले नाही, त्याचा उपयोग करून घेता आला नाही, तर त्याच्या अभ्यासात व ज्ञानात बरीच मोठी
उणीव राहिल्यासारखे होईल. म्हणून ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न या लेखनसारसूचीद्वारे केला आहे. या सूचीमध्ये केवळ सारकथन केलेले नाही, तर मुळांतील शैली व भाषा यांची जाणोवही वाचकाला होऊ शकेल, अशा धोरणाने संशोधन-संपादन केलेले आहे.
मराठीतील कोणत्याही नियतकालिकाची अशी सारसूची केली गेलेली नाही. या दृष्टीने ही अशी पहिलीच सूची आहे. इतकेच नव्हे, तर कोणत्याही विषयाची जशी सारसूची मराठीत अजून तयार झालेली नाही. प्रस्तुत सूचीने आरंभ करून दिला आहे आणि धडा घालून दिला आहे, ही वस्तुस्थिती नमूद करण्यात आत्मस्तुती नाही. हा पहिलाच आणि अलौकीक असा प्रकल्प आहे. त्यामुळे तो चुकतमाकत झालेला असणे शक्य आहे. प्रयोग करीत आणि अनुभव घेत यातील उणीवा दूर होतील. इतर काही विषयांत असे प्रयत्न मुरू झाले की, या प्रकारच्या सूचीचे प्रारंभिक प्रवर्तनाचे कार्य
म्हणून “ज्ञानोदया'च्या या सूचीकडें बघावे लागेल. अशा प्रकारच्या कार्याचे “द्तोउवाच करण्याची संधी आलोचना प्रस्थानला डॉ. हिवाळे एज्युकेशन सोसायटी-अहमदनगर कॉलेज आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या बहुमोल साहाय्याने मिळाली आहे.
सारसूचीमध्ये प्रत्येक अंकातील मजकुराचे क्रमवार आणि कालानुक्रमाने सारकथन केलेले आहे. त्यांचे संदर्भही नमूद आहेत. विषयवार सूचीचीही जोड दिलेली आहे. उपयुक्तता, संदर्भ सहजतेने सापडणे आणि पद्धतशीर मांडणी, यांच्याकडे लक्ष देऊन सारसूचीची रचना केलेलो आहे. हे काम निव्वळ संकलनाचे जाही. शास्त्रीय संशोधनपद्धती नजरेसमोर ठेवून, सार करताना मुळातील विचार, अनुभव, , मांडणी, इत्यादींना धक्का लागणार नाही, काळजी घेत, भस्थासनोती पाळीत सारसूचीतील लेखन व त्याची मांडणी केलेली आहे. अभ्यासकांची सोय जाणि एका मराठी सांस्कृतिक ठेव्याचे मुळाशी संवादी राहून जतन, या दृष्टींनी वा सारसूचीची पूर्तता करण्यासाठी अवश्य ते संयोजन केलेले आहे. असे हे काम
करण्यांत सहभागी होण्याची संधी आलोचना प्रस्थानला मिळाली, याबद्दल संबंधित सर्वांचेच मनःपूर्वक आभार.
No comments:
Post a Comment