महाराष्ट्र शासनाने राज्यात उद्योग वाढीस लागावेत यासाठी इंटरनेटवर सर्व माहिती प्रसिद्ध करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे.
मात्र या http://di.maharashtra.gov.in/_layouts/15/DOIStaticSite/Marathi/index.html वेबसाईटचे डिझाईन जुने पुराणे असून त्याच्या नूतनीकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
बहुतेक सर्व माहिती न वाचता येईल इतक्या बारीक पुसट अक्षरात आहे. वेबसाईटमध्या शेवटची माहिती घातल्याची तारीख २०१६ दिसते.
राष्ट्रीय स्तरावरील वेबसाईट आकर्षक व मल्टीमिडियाने लक्ष वेधणा-या असताना महाराष्ट्र शासनाची ही वेबसाईट दुर्लक्षित राहिली आहे असे वाटते. उद्योगमित्र यानावाने शोध घेतला तर इतर राज्यांच्या वेबसाईट दिसतात व आपली महाराष्ट्र चेंबरची साईट दिसते मात्र राज्यशासनाची मुख्य वेबसाईट दिसत नाही.
याबाबतीत शासनाने त्वरीत पावले उचलावीत आणि उद्योगात अग्रेसर असणा-या महाराष्ट्राच्या उद्योग जगतास नवी आधुनिक मोबाईलला अनुकूल अशी वेबसाईट तयार करून घ्यावी असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.
मराठी वेबसाईटच्या क्षेत्रात अनेक वर्षे कार्य करीत असलेले ज्ञानदीप इन्फोटेक याबाबतीत शासनाला सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे.
No comments:
Post a Comment