Saturday, August 15, 2020

ज्ञानदीप अटल प्रयोगसंच प्रशिक्षणवर्ग

 आज १५ ऑगस्ट २०२०.  भारताचा स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना ज्ञानदीपच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या या शुभ मुहुर्तावर  "ज्ञानदीप अटल प्रयोगसंच "  शिकण्यासाठी खास प्रशिक्षण वर्ग सुरू करीत आहे.

 

दुपहरी मे अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतर्तम का नेह निचोडॅ
बुझी हुई बाती सुलगाऍ
आओ फिर से दिया जलाऍ

हम पडाव को समझे मंजिल
लक्ष्य हुआ आंखोसे ओझल
वर्तमान के मोहजाल मे -
आने वाला कल न भुलाऍ
आऒ फिरसे दिया जलाये 

------- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा संदेश...


शिक्षण, समाज व राजकारणाला नवी दिशा देणारे अटलजी आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी आपल्या वरील काव्यातून पुन्हा दीप प्रज्वलित करण्याचा  संदेश शिरोधार्य मानून आपण अटल इनोव्हेशन मिशनच्या कार्यात आपले तन, मन,धन  समर्पण करू या.

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या " डिजिटल इंडिया" व "मेक इन इंडिया" या महत्वाकांक्षी  प्रकल्पांसाठी भारताला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची गरज लागणार आहे. 

 या विषयासंबंधी सर्वसामान्यांच्या मनात एक  गूढतेचे वलय  असते. रोजच्या जीवनात आपण मोबाईल, रेडिओ, टीव्ही तसेच इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत असलो तरी त्याचे कार्य कसे चालते वा त्याची कशी रचना केलेली असते याविषयी आपणास काहीच माहिती नसते. इलेक्ट्रॉनिक्स हे एक अतिशय अवघड व गुंतागुंतीचे तंत्रज्ञान असून ते मुलांना समजणार नाही या कल्पनेने शालेय स्तरावरील शिक्षणात  या विषयाचा समावेश केलेला नाही असे वाटते.

डिप्लोमा व पदवीस्तरावरील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमातही या विषयाच्या  थिअरीवर जास्त भर दिला जात असून प्रत्यक्ष स्वतंत्र उपकरण तयार करण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण व्हावे या दृष्टीने फारसे प्रयत्न केले जात नाहीत.साहजिकच इलेक्ट्रॉनिक्स हा विषय फक्त अभ्यासाचा विषय ठरतो. 


अमेरिका व इतर विकसित देशात इलेक्ट्रॉनिक्स विषयाला शालेय शिक्षणात फार महत्व दिले जाते. हा विषय शिकणे सोपे जावे व त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची दूर संवेदक आणि स्वयंचलित उपकरणे तयार करता यावीत यासाठी "आर्डिनो" व " रासबेरी पाय" सारखी उपयुक्त साधने बाजारात उपलब्ध झाली आहेत.


जे विकसित देशात आज चालू आहे ते भारतातही सुरू व्हावे आणि आपले विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे तयार करण्यास सक्षम व्हावीत या हेतूने ज्ञानदीप फौंडेशन या बाबतीत इलेक्ट्रॉनिक्स छंदवर्गाच्या माध्यमातून या विषयात शिक्षण व संशोधन करण्याचा नवा उपक्रम सुरू करीत आहे.  

खालील चित्रातअटल ज्ञानदीप प्रयोगसंचा जोडण्यांची माहिती दिली आहे.



 

स्क्रॅच व पायथॉन प्रोग्रॅमिंग शिकविण्यासाठी याचा उपयोग करता येतो अनेक व्हिडिओ गेमही बनविता येतात


 रासबेरी पायचे प्रात्यक्षिक  


स्क्रॅच  प्रोग्रॅमची उदाहरणे



माईनक्रॉफ्ट हा लोकप्रिय गेम





प्रत्यक्षात अटल ज्ञानदीप प्रयोगसंचावरील इतर कनेक्शन वापरून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविता येतात.

ज्ञानदीपच्या या अभिनव उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी शाळांनी ज्ञानदीपशी संपर्क साधावा.

 

No comments:

Post a Comment