सध्या नव्या आलिशान व आकर्षक इमारती आणि सोयी सुविधा असणा-या अनेक शैक्षणिक संस्था आपल्या भव्य जाहिरातींच्या जोरावर विद्यार्थी व पालकांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतांना दिसत आहेत. पण त्याचवेळी जुन्या, मान्यवर ध्येयवादी संस्था दुर्लक्षित व अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत.
त्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय व धनवान शक्ती कुटील कारस्थाने करण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी जागरूक राहण्याची गरज आहे. त्याना समाजाने आधार देऊन बलवान आणि सुसज्ज करण्याची गरज आहे.
पुण्याला विद्येचे माहेरघर असे नाव मिळण्यास डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा मोठा वाटा आहे. सांगलीसही पुण्याखालोखाल असे नाव मिळवून देण्यात या सोसायटीच्या विलिंग्डन आणि चिंतामणराव कॉमर्स या कॉलेजचे मोठे योगदान आहे.
आज या संस्थेकडे पुणे व सांगली या दोन्ही ठिकाणी मध्यवर्ती भागात मोठी जागा आहे. मात्र आर्थिक पाठबळ नसल्याने नवे उपक्रम आणि सोयी सुविधा सुरू करणे सोडा पण साधे परिसराचे संरक्षण व संवर्धन करणेही मुष्कील झाले आहे.
विविध रंगी आकर्षक कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या शैक्षणिक संस्था पाहिल्यावर डोळे दिपून जातात. तर जुन्या ध्येयवादी शिक्षणसंस्थांचा परिसर पाहताना डोळे पाणावतात. त्याचवेळी या संस्था राजकीय आणि धनवान शक्तींपासून वाचविण्याचे प्रयत्न करणा-या वृद्ध, आजारी विश्वस्थांची जिद्द पाहून धन्य वाटते.
त्यांच्या या संघर्षाला या संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून समर्थ साथ मिळावी यासाठी ज्ञानदीप फौंडेशन आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे.

No comments:
Post a Comment