Tuesday, February 13, 2024

महिला - घरात, निवृत्त - देवळात वा बँकेत तर युवक - रस्त्यावर

वरील एका वाक्यात भारतातील सद्यस्थितीचे यथायोग्य वर्णन केले आहे.  या महिला, निवृत्त व नोकरी न मिळोलेल्या युवकांना कार्यप्रवण केले तर जवळजवळ साठ टक्के निद्रिस्त बौद्धिक संपदा उपयोगात येऊन भारत स्वयंपूर्ण व समृद्ध बनेल. गरज आहे ती त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आणि उद्योग व्यवसायासाठी व्यासपीठ मिळवून देण्याची.

ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत पुढाकार घेण्याचे ठरविले असून समविचारी व सहकार्य करू इच्छिणा-या सभासदांची एकजूट करून संगणक प्रशिक्षण, उद्योग व व्यवसायातील संधी शोधून त्याची माहिती देणे, विशिष्ट प्रकल्पासाठी गट स्थापन करणे व आवश्यक त्या सर्व तांत्रिक बाबी, नियोजन व सादरीकरण, गुणवत्ता परिक्षण आणि ग्राहकपेठ मिळविण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून प्रसार व प्रचार करणे ही कामे केली जातील.

घरबसल्या संगणक वापरून पैसे मिळविण्याच्या अपार संधी उपलब्ध आहेत. पण त्यांचेविषयी फारच थोड्यांना माहिती असते. शिवाय फसवणुकीचे भय असल्याने शक्यतो या संधीचा गांभिर्याने कोणी विचार करीत नाहीत. मात्र  शहर आणि ग्रामीण भाग यातील जीवनशैलीतील फरक, तसेच देशोदेशींच्या चलनविनियमातील फरक यामुळे ग्रामीण भागातील युवकांना तसेच महिला व निवृत्त व्यक्तींना संगणकसाक्षर होण्याची गरज आहे. 

साधे मराठी, इंग्रजी टायपिंग, इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी भाषांतर, स्कॅन केलेल्या    कागदपत्रांचे टायपिंग व डाटा एन्ट्री, संगणक चित्रकला, चलचित्र बनविणे, प्राचीन ग्रंथ व साहित्य याचे डिजिटायझेशन, लेख, कथा, कविता, गोष्टी लिहून त्यांची पुस्तके नेटवरून विकणे, वेबसाईट वा मोबाईल एप तसेच स्थानिक उद्योगांसाठी  सॉफ्टवेअर  तयार करणे. नेटवरून शिकविणे, वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारात नेटद्वारे विक्री करणे. संकल्पन सल्ला देणे एक ना दोन. अक्षरशः हजारो संधी उपलब्ध आहेत.

ज्ञानदीप परिवारात सामील होउन आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करा व इतरांनाही अशा व्यवसायासाठी मदत करा. डॉ. सु. वि रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली

No comments:

Post a Comment