Wednesday, January 30, 2019

स्क्रॅच - मुलांसाठी संगणक खेळ निर्मिती सुविधा


एम.आयटी, मिडीया लॅब या अमेरिकेतील संस्थेने स्क्रॅच (Scratch) हा ८ ते १६ व्रषांच्या मुलांसाठी संगणक खेळ प्रकल्प  तयार केला असून शिक्षक व विद्यार्थ्यांना नवे संगणक खेळ बनविण्यास अत्यंत सोपा व सर्व साधनांनी परिपूर्ण असून त्याद्वारे संगणक प्रोग्रॅम कसा करावा लागतो याचे ज्ञान होते.

याचा वापर करून नवे संगणक  खेळ करणे व ते आपल्या नावावर प्रसिद्ध करणे मोफत असून, शिक्षकांनी याचा उपयोग आपल्या विषयाचे शिक्षण देण्यासाठी करावा यासाठी एम.आयटी, मिडीया लॅबतर्फे प्रोत्साहन दिले जाते. तसेच ती संस्था अनेक प्रशिक्षण शिबिरे  आयोजित करीत असते.

टर्टल ग्रापिक्सपेक्षाही हा अधिक सोपा असून यात प्रोग्रॅम लिहावा लागत नाही. तर केवळ कृतीच्या चित्रपट्ट्या हलवून व एकाखाली एक जोडून खेळ तयार करता येतो.


इंटरनेटवर https://scratch.mit.edu वेबसाईट उघडून कोणालाही स्क्रॅचमध्ये आकर्षक संगणक खेळ (व्हिडीओ गेम) करून स्क्रॅच वेबसाईट वर प्रसिद्ध करणे अगदी सोपे झाले आहे.

Getting Started [English]

 https://download.scratch.mit.edu/ScratchGettingStartedv14.pdf

   अमेरिकेतील प्राथमिक शाळांमध्ये स्क्रॅच कसे वापरायचे ते शिकविले जाते. जगभरातील लाखो विद्यार्थी व अनेक शिक्षक याचा उपयोग करीत असून शिकण्यासाठी अनेक तयार खेळ कृतीसह उपलब्घ आहेत. जगातील अनेक भाषांत हा खेळ रुपांतरीत केला गेला आहे. मात्र या यादीमध्ये  मराठी नाही हे पाहून मला वैषम्य वाटले.



   ज्ञानदीप तर्फे नवनिर्मिती प्रकल्प म्हणून मराठीत याचे रुपांतर करावे व सर्व शाळांत ज्ञानदीप मंडळाद्वारे याचा प्रसार करण्याचा मनोदय आहे. मात्र यासाठी शिक्षकांचे सक्रीय योगदान मिळणे आवश्यक आहे.
  

1 comment:

  1. Hі! Would you mind if I share your blog with my myspace grouр?
    There's ɑ lоtt of folks that I think would really enjoy your content.
    Pleаse let mе know. Thanks

    ReplyDelete