ज्ञानदीपने इलेक्ट्रॉनिक्स छंद वर्ग सुरू करायचा संकल्प केला खरे. पण शालेय विद्यार्थ्यांना हा विषय शिकविताना मराठी माध्यम वापरायचे का इंग्रजी याबद्दल माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला.
तसे पाहता अणुची रचना, इलेक्ट्रॉनचे उत्सर्जन, चुंबकत्व, विद्युत भार, विद्युत प्रवाह, मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाचे याबाबतीतील संशोधन, विद्युत घटाची रचना व कार्य, विद्युत जनित्र आणि विद्युत निर्मिती याविषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये अगदी समर्पक शब्द वापरून व सोप्या भाषेत उपलब्ध आहे.
संदर्भ -
१. विद्युत चुंबकीय प्रवर्तन
२. विद्युत चुंबकीय उत्सर्जन
३. इलेक्ट्रॉनिक्स
मात्र इलेक्ट्रॉनिक्समध्ये अनेक नवे इंग्रजी शब्द वापरावे लागत असल्याने तसेच बाजारात उपलब्ध असणारी उपकरणे व साधने यांची नावे इंग्रजी असल्याने त्यासाठी योग्य मराठी शब्द तयार करून वापरण्याऎवजी मूळ इंग्रजी शब्द वापरूनच मराठीमध्ये शिकविणे अधिक उपयुक्त ठरेल असे मला वाटले.
अर्थात हा विषय आठवीनंतरच्या विद्यार्थ्यांना शिकवायचा असल्याने मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यम वापरले तरी फारसे बिघडणार नाही. शिवाय इंग्रजीमधून हा विषय मांडला तर याविषयी इंटरनेटवर उपलब्ध असणार्या नव्या माहितीचा उपयोग करणे विद्यार्थ्यांना सहज शक्य होईल व त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होईल या दृष्टीकोनातून इंग्रजी भाषेचा वापर करणे हितावह ठरेल हे लक्षात आले.

No comments:
Post a Comment