Sunday, September 6, 2015

अँड्रॉईड ऍप विकसित करण्याचा उद्योग

भारतात इंटरनेटपेक्षा मोबाईलचा वापर फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोबाईलचा  उपयोग केवळ संदेश वहनापुरता मर्यादित न रहाता अनेकविध कार्यासाठी वापरता येईल असे स्मार्ट मोबाईल फोनही आता लोकप्रिय झाले आहेत.

 गुगलने मोबाईलवर अँड्रॉईड ऍपच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मनोरंजन, जाहिरात, व्यापार व शिक्षण अशा विविध क्षेत्रात उपयोगी पडणारी अनेक ऍप गुगलच्या प्लेस्टोअरमधून आपल्याला डाऊनलोड करता येतात व त्यायोगे आपल्याला मोबाईलचा अधिक चांगला वापर करता येतो.
गुगल प्लेस्टोअरवर मिळणार्या ऍपमध्ये काही मोफत तर काही विकत घ्यावे लागतात.  मोफत मिळणार्या ऍपमध्ये  कंपनीची जाहिरात किंवा इतर जाहिराती असतात. अशा ऍपच्या विकासाचा खर्च ऍपमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून भागवला जातो.

अमेरिकेत आयफोनचा वापर जास्त प्रमाणात होतो. मात्र भारतात आयफोनची किंमत बरीच जास्त असल्याने तसेच इतर मोबाईलवर आयफोनच्या सुविधा वापरता येत नसल्याने येथील सर्वसामान्य लोकांची पसंती  अँड्रॉईड ऍप  असणार्या मोबाईल घेण्याकडेच जास्त असते.  अँड्रॉईड ऍप च्या माध्यमातून शालेय शिक्षणासाठी अगदी कमी किमतीचे टॅब बाजारात उपलब्ध असून शासनातर्फेही असे टॅब विद्यार्थ्यांना देण्याच्या योजना आखल्या जात आहेत.

साहजिकच भारतात मोबाईल व टॅबवर चालणारे गुगल ऍप विकसित करण्याचा उद्योग प्रचंड वेगाने वाढणार आहे. कॉम्प्युटर क्षेत्रातील नवयुवकांना ही एक चांगली संधी आहे. ज्ञानदीपने या दृष्टीकोनातून अँड्रॉईड ऍप विकसित करण्याचा संकल्प केला व गेल्या वर्षभरात मराठी व इंग्रजी व संस्कृत माध्यमातील खालील ऍप विकसित केले आहेत.

इंग्रजीमराठीसंस्कृत
Dnyandeep (Foundation Websites)
Dnyandeep_Infotech
Anusha and Ojas in Wonderland
Sagava_KavyaSangrah
Say_kavyaSangrah
Kavyadeep Poem Book
कोल्हापूर नकाशे
सांगली_नकाशे
विज्ञान प्रश्नसंच
Learn Web Designing in Marathi
Sanskrit_deepika
Sanskrit Dictionary

ही सर्व अँड्रॉईड ऍप आपल्याला गुगल प्लेस्टोअरवरून Dnyandeep या नावाने शोध घेतल्यास दिसू शकतील व  डाऊनलोड करता येतील.

बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी अँड्रॉईड ऍप विकसित करण्याचा उद्योग  नोकरी वा स्वत:चा उद्योग यासाठी साहाय्यभूत होऊ शकेल.

यापुढे अँड्रॉईड ऍप विकसित करण्याचे शिक्षण मराठीतून देण्याचा प्रयत्न ज्ञानदीप करणार असून  छोटी साधी व शालेय अभ्यासक्रमावर आधारित अँड्रॉईड ऍप मराठी शाळेतील शिक्षकांकडुन करवून घेण्याची योजना ज्ञानदीपने आखली आहे.

ज्यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी ज्ञानदीपशी संपर्क साधावा.

1 comment:

  1. सर ! मला तुमच्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. माझा मोबाईल नं 9225846682 असा आहे.

    ReplyDelete