[ माझ्या शालेय जीवनानंतर केव्हातरी स्वानुभवावर लिहिलेले एक नाटक ]
[पडदा वर जातॊ तेव्हा स्टेजवर डॉक्टरच्या अद्ययावत कन्सल्टिंग रूमचा देखावा. एका बाजूस फिरत्या खुर्चीत रेलून बसलेलेचाळीशीतील डॉ. सुहास देशपांडे सिगारेट शिलगावत आहेत. मागील बाजूस मेडिकलच्या पुस्तकांचे शेल्फ, शो केस, अक्वारियम, खोलीस फिकट निळा रंग, वर पंखा, टेबलावर केसपेपरचा गठ्ठा, पुढे दोन खुर्च्या. रिकाम्या दुसर्या बाजूस दार. त्यावरील पडदा बंद. पडदा उघडून एक समवयस्क पेशंट, कपडे अगदी साधे, चेहरा ओढलेला, येऊ लागतॊ.]
डॉक्टर - (त्रासिकपणे) - काय पाहिजे तुम्हाला ?
पेशंट - ‘डॉक्टर, माझ्या मुलीला दाखवायचे होते?’
डॉक्टर - ‘तुम्हाला बोलावले म्हणजे या. मी कामात आहे.’
पेशंट नाखुशीने बाहेर जातो. डॉक्टर बेल वाजवितात. कंपौंडर आत येतो.
डॉक्टर - ‘ अरे कुठे गेला होतास? पेशंट सरळ आत घुसतायत.’
कंपौंडर - ‘ मी येथेच होतो. पण त्या गृहथांची मुलगी आजारी आहे म्हणून घाई त्यांची घाई चालली होती.
डॉक्टर घडाळ्याकडे पहात ‘ हे बघ. आता पाच वाजले आहेत. मला ५॥ वाजता एक महत्वाची अपॉइंट्मेंट आहे. तेव्हा उद्या सका्ळी ९ वाजता या म्हणून सांग सगळ्यांना.’
कंपौंडर जातो. डॉक्टर फोन लावतात. ‘कोण? नेने आर्किटेक्ट का. हां . जरा त्यांना फोन द्या. हॅलो विजय. अरे पाच वाजले. प्रिमीयर शोला जायचे विसरलास काय?’ ‘जरा कामात आहे. वेळ लागेल.’ ‘ अरे कटव त्या क्लायंटला. आपल्याला काही हे लोक आपले ताबेदार समजतात की काय ! जाने दो यार ! मार गोली कामाला. मी निघालोच. वेस्टएंड्ला भेटू अच्छा.’ डॉक्टर फोन खाली ठेवतात. टेबलवर एशट्रेत सिगरेट विझवतात. शीळ घालत उठतात.
तेवढ्यात पडदा बाजूला होतो व पुन्हा तोच पेशंत आत येतो. डॉक्टर काही बोलणार तेवढ्यात तो अजिजीने म्हणतो.‘ डॉक्टर, तुम्ही मला ओळखलेले दिसत नाही. मी आणि तुम्ही सातार्याला एकाशाळेत च्व एका वर्गात होतो. मी गजानन पंडीत’
डॉक्टर - सॉरी हं. अरे मगाशीच नाही का सांगायचे. आता आठवले तू फडणीसांच्या वाड्यात रहात होतास.आमच्या बंगल्यावर आपण खेळायचोदेखील. आता सध्या कुठे असतोस? आणि काय झालंय मुलीला?’
गजानन - मी सातारलाच कापडाच्या दुकानात लिहिण्याचे काम करतो. माझी मुलगी शांता हार्ट पेशंट आहे. तू या विषयात तज्ज्ञ मह्णून सार्या पुण्यात प्रसिद्ध आहेस असे मला कळले. म्हणून तिला घेऊन आलॊ आहे.
डॉक्टर- ‘तिला येथे आणले आहेस काय?’
गजानन - ‘नाही. पण येथे जवळच तिचा मामा रहातो. त्याच्याकडे तिला घेऊन आलो आहे.’
डॉक्टर घडाळ्याकडे पहात - ‘ मला एक महत्वाचे काम आहे. म्हणून मला जाणेच भाग आहे. तू कोठे उतरला आहेस ते सांग मीच तेथे रात्री १०-१०॥ ला येऊन बघतो. काही काळजी करू नकोस’
गजानन - मी वाट पहातो. आपली फार कृपा होईल.
डॉक्टर - ‘ अरे असे काय बोलतोस. त्याच्या पाठीवर थाप मारत ‘गजा रे गजा, तुझी काय मजा’म्हणून मी तुला चिडवायचो तुला आठवतंय का नाही. आणि हो. त्यावेळी तर शास्त्रात तू सगळ्यांचा दादा होतास. तुझे प्रयोगच आम्ही उतरवून नाही का काढायचो.! बरे झाले तुझी गाठ पडली अन मला पुन्हा आपल्या बालपणीची आठवण झाली बघ.’
गजानन - उत्साहित होऊन ‘ आणि आपण एकदा आमच्या स्वयंपाकघरात साबण तयार केला होता. आठवतंय? चुलीवर ठेवलेल्या भांद्यातले तेल पेतले. आई वडिलांचा मार केवळ तुझ्यामुळेच वाचला होता.’
डॉक्टर - ‘दोन मिनिटे बस. कशी काय वाटतेय माझी रूम. हे पडदे खास काश्मीरहून आणले आहेत. ही पेंटींग्ज तर जहांगीर आर्ट गॅलरीतच विकत घेतली आहेत.’
गजानन चौकसपणे खोलीत पहातो आहे. त्याची नजर पुस्तकाच्या शोकेसवर स्थिरावते. न बसता तो तेथे जातो व पुस्तक काढून पहातो.
गजानन- ‘तुमच्याकडे शास्त्रातली बरीच पुस्तके दिसताहेत. सर्व वाचायला वेळ तरी केव्हा मिळतो तुम्हाला?’
डॉक्टर - ‘ अरे वेडा की काय? ही पुस्तके कोण वाचणार. अरे पेशंटवर इम्प्रेशन नको का पडायला. म्हणून आमच्या आर्किटेक्टने ही शोकेस लावली आहे. मल वाचायचा किती कंटाळा तुला माहीत नाही का? पण तुला एवढी वाचनाची आवड होती मग तू कसा काय या खर्डेघाशीच्या लाईनवर गेलास?
गजानन - आहो काय करणार ? मॅट्रीक पास झालो तरी लगेच चांगली नोकरी मिळेना व घरचा भार उचलायला नोकरी करणे भाग्च होते.आता काय. दोन मुलांचा संसार करण्यातच सगळा वेल चालला आहे. नाही म्हटलम तरी मी आता फुरसतीच्या वेळी शाळेतल्या मुलांना काहीतरी शिकवीत बसतो.
डॉक्टर - मी मात्र लकी ह>. त्यावएली मणिपालला पैसे भरून काहोईना वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळाला म्हणून तर ही स्टेज आली. नाहीतर करावी लागली
असती कोठे तरी उमेदवारी. तुला आश्चर्य वाटेल मी मुंबईला हॉटेल मॅनेजमेंट्च्या कोर्ससाठी अर्ज देखील केला होता. तसे झाले असते तर तुझे स्वागत एखाद्या
पंचतारांकित हॉटेलमध्ये मी केले असते. (घडाळयकडे पहाताच चमकून ) अच्छा मला आता निघालेच पाहिजे. अर्जंट व्हिजिट कारयची आहे. मग काय. रात्री मी
येईनच . डोन्ट वरी.
गजानन - बरं मी वाट पहातो. दोघेही बाहेर जातात व पडदा पडतो.
दवाखान्याचा सीन. डॉक्टर गडबडीने प्रवेश करतात. कंपौंडर त्यांचे पाठोपाठ येतॊ. सर पेशंट तुमची वाट पहाताहेत त्यांना पा्ठवू का?
डॉक्टर - ‘अरे काल सिनेमानंतर पार्टीला गेलो आणि घरी यायला उशीर झाला. अरे हो. त्या गजाननकडे जायचे विसरूनच गेलो. जरा फोन डायरी दे.’
‘ हॅलो, मी डॉ. देशपांडे बोलतोय आपल्याकडे गजानन पंडित आले आहेत ना. त्याम्ना जरा फोन द्या. हॅलो गजानन का? अरे मला काल नाही जमले यायला. मुलीची तब्बेत कशी काय आहे? काय? रात्री अटॅक आला होता? मग काय केले. ... थँक गॉड ! मसाजचा उपयोग झाला. छान. अरे पण कोणी मसाज केला. काय? तू केलास? कोठून षिकलास हे? माझ्या लेखावरून? कोणत्या?
अच्छा तो होय. मी घरी गेल्यावर पाहीन. पण या स्टेजला आपल्याला सर्व काही देवाच्या हाती सोडावे लागते. नशीबाने साथ दिली तर खैर म्हणायचे. अच्छा ये की? मी दवाखान्यात आहेच.’
डॉक्टर फोन ठेवतात व कंपौंडरला बोलावतात. ‘ अरे सकाळला आपण ह्रुदयविकारासंबंधी लेख दिला होता काय? जरा शोधून दे पाहू.’प्रतिथयश ह्रुदयरोग तज्ज्ञ डॉ. सुहास देशपांडे यांची हदयरोगावरील आकस्मिक उपचारांसंबंधी खास मुलाखत ’ हॅ हॅ. मुलाखत म्हणून आपणच पुस्तकातली माहिती देऊन फोटोसह जाहिरात देतो काय आणि त्याचा उपयोग गजाननला होतो काय. देवाची लीला अगाध आहे.
अर्थात गजानन खरंच ग्रेट ह. आपल्य मुलीवर असा प्रसंग ओढवला असता तर आपल्याला करता आला असता का असा मसाज?
दार वाजते. तंद्रीतून जागे होत
गजानन - येऊ का डॉक्टर ?
डॉक्टर - उभे राहून पुढे जात ‘ अरे ये ये. सॉरी हं. मी खरे म्हणजे कालच तुझ्याबरोबर यायला हवे होते. तुझ्यावर भलताच प्रसंग ओढवला. आपण जाऊ या का लगेच तुझ्या मुलीला पहायला?

I read your blog and I really liked it. I have read another blog similar to this one, I liked the table very much Baby boy names in Marathi
ReplyDelete