भारतातील आरोग्यसेवा सर्व जगात उत्तम प्रतीची व कमी खर्चाची समजली जाते.भारतातील सर्व महत्वाच्या शहरांत अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त अशी अनेक हॉस्पिटल्स आहेत.तसेच त्यामध्ये विविध व्याधींवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. यामुळे खेड्यापाड्यातून व दूरच्या गावातील रुग्ण अशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. एवढेच नव्हे तर बाहेरच्या देशातील , विशेषकरून अरब राष्ट्रातील रुग्ण इंग्लंड अमेरिकेऎवजी भारतात उपचार करून घेणेच अधिक पसंत करतात.
हॉस्पिटल सेवा उत्तम प्रतीची असली तरी बाह्यरुग्ण विभागात दिसणारी रुग्णांची गर्दी पाहिली की या सेवेत फार मोठी उणीव राहिली असल्याचे जाणवते. प्रगत देशात प्रत्येक पेशंट आपली अपॉइन्टमेंट वेळ नेटवरून आधीच निश्चित करतो. त्यामुळे तेथे पेशंटनी गजबजलेला बाह्यरुग्ण विभाग असे दृश्य क्वचितच दिसते. ठराविक वेळेस हॉस्पिटलमध्ये गेले की तेथील रिसेप्शनिस्ट आपला केस पेपर व एक इलेक्ट्रॉनिक डॉकेट आपल्याकडे देते. मग थोडावेळ आपणास तेथील फोटोगॅलरी, वाचनालय, कॉम्प्युटररूम वा बागेत थाबता येते. आपला नंबर ( जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिटात) आला की हातातील डॉकेटवरील लाल दिवा लागतो व आपल्याला भेटीची सूचना मिळते.या प्रक्रियेत दूरवरून येणा-या पेशंटनाही ठराविक वेळात भेटीची खात्री असते.
अनेक ग्रामीण भागातील स्थानिक पातळीवरील डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी पेशंटना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवितात. अशावेळी आपल्या भावी वेळापत्रकाचे नियोजन केले तर तज्ज्ञ डॉक्टरांना आपला वेळ अधिक उपयुक्तपणे वापरता येतो. डॉक्टरांची भेट घेऊ इच्छिणा-या पेशंट्सना मात्र असे नियोजन करता येत नाही. कारण अनेक रुग्ण आधीच बाह्यरुग्ण विभागात उपस्थित असल्याने त्याना आपला नंबर येईपर्यंत तेथेच वाट पहात थांबणे भाग पडते. प्रत्येक रुग्णाला किती वेळ लागेल याची काही खात्री नसल्याने एकूण लागणा-या वेळॆचा अंदाज त्यांना बांधता येत नाही.
ब-या च वेळेस आजारीपणामुळे रुग्णाला एका जागी जास्त वेळ बसता येत नाही. तसेच लहान मुले असतील तर त्यांना अशा बाबतीत अधिक त्रास होतो. लहान मुलांना जवळच्या इतर रुग्णांमार्फत सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांची लागण होऊ शकते. रुग्णाबरोबर येणा-या नातेवाईकांनाही आपला कामधंदा सोडून अशा प्रतिक्षा यादीत थांबावे लागते. काही वेळा प्रत्यक्ष आवश्यक ते तज्ज्ञ डॉक्टर बाहेरगावी वा अन्य कामासाठी गेल्याने त्यांची भेट घेता येत नाही. पेशंट परगावाहून आलेला असला तर त्याला अशी भेट घेण्यासाठी प्रवासाव्यतिरिक्त प्रसंगी राहण्याचीही सोय करावी लागते. मोठ्या शहरात यासाठी खर्चही जास्त होतो.
अशा कारणांमुळे रुग्ण आवश्यक त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी दूरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याऎवजी जवळपास उपलब्ध असणा-या हॉस्पिटलमध्येच उपचार घेणे पसंत करतात. यात रुग्णास योग्य औषधोपचार व सल्ला मिळेलच याची खात्री देता येत नाही.
मोठ्या हॉस्पिटलमध्ये सध्या फोनवरून वेळ ठरविण्याची सोय उपलब्ध असते मात्र हॉस्पिटलमधील प्रत्येक डॉक्टरच्या वेळापत्रकाविषयी सर्वसाधारण माहिती असली तरी रिसेप्शनिस्टला निश्चित माहिती नसते. शिवाय पेशंटने त्यासाठी आवश्यक ती फी भरलेली नसते. तसेच तो प्रत्यक्षात वेळेवर येईल याची खात्री नसते. त्यामुळे अशा अपॉईंटमेंटचा फारसा उपयोग होत नाही.
या सर्व अडचणींचा विचार केल्यावर ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेने भारतातील प्रथितयश हॉस्पिटलमध्ये उपयुक्त ठरेल असे ऑनलाईन अपॉइन्टमेंटचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यात ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठीच्या पेशंट, डॉक्टर व व्यवस्थापक यांना लागणा-या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र वेबसाईट बनवून डॉक्टरांच्या उपलब्ध वेळापत्रकाची माहिती तेथे संकलित केली जाते. सर्व माहिती नेटच्या माध्यमातून कोणासही उपलब्ध होऊ शकते.
या सॉफ्टवेअरद्वारे पेशंटला वा त्याच्या नातेवाईकांना घरी बसून इंटरनेटद्वारे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेळापत्रकावरून त्यांची उपलब्धता पाहता येईल व आपल्या सोयीनुसार भेटीची वेळ ठरविता येईल. या सॉफ्टवेअरमध्ये नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्ड वापरून भेटीसाठी लागणारे शुल्क भरण्याची सोय असल्याने अशी भेट निश्चित होऊ शकेल.
ही माहिती भरण्याचे काम रुग्णाशिवाय इतर व्यक्तीसही( व्हिजिटर) करता येते व त्या व्यक्तीस एकापेक्षा अधिक व्यक्तींची(मेंबर) नोंद करण्याची सुविधा असल्याने हे सॉफ्टवेअर अधिक सुलभ करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमधील व्यवस्थापक सार्वजनिक सुट्ट्या, आठवड्यातील हॉस्पिटलचे कामाचे दिवस व तास यांची माहिती भरून कॅलेंडर तयार करू शकतील. तसेच नवीन डॉक्टरांचे नाव यादीत समाविष्ट करणे वा त्यात बदल करणे हेही त्यांना करता येईल. हॉस्पिटलमधील डॉक्टरना आपली माहिती, फोटो, भावी काळातील त्यांच्या उपलब्धतेनुसार संभाव्य वेळापत्रक इत्यादी माहिती घालता येईल तसेच त्यात आवश्यकतेनुसार केव्हाही बदल करता येतील.
नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्ड वापरत असताना माहितीची गोपनीयता व सुरक्षितता सर्वात महत्वाची असते. त्यादृष्टीने या क्षेत्रातील भारतात अग्रगण्य असणार्यास सीसीअव्हेन्यू या संस्थेच्या पेमेंट गेट्वेशी हे सॉफ्टवेअर संलग्न केले असल्याने पेमेंटविषयक आवश्यक ते सुरक्षा कवच सीसीअव्हेन्यूच्या सिस्टीममध्येच अंतर्भूत असते. अपॉइन्टमेंटविषयीची सर्व माहिती दूरस्थ सर्व्हरवरील डाटाबेसमध्ये साठविली जाते व व्हिजिटर व व्यवस्थापक यांना लॉगिन करूनच याची माहिती मिळविणे वा त्यात काही बदल करणे शक्य असते.
हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासाठी लागणारे अपॉइन्टमेंटविषयीचे विविध प्रकारचे रिपोर्ट या सॉफ्ट्वेअरमधून मिळू शकतात. तसेच या रिपोर्टचे रुपांतर एक्सेलच्या तक्त्यात करता येऊ शकते.
सांगलीतील प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. मिलिंद किल्लेदार यांच्या अनुराधा आय हॉस्पिटलमध्ये हे सॉफ्टवेअर तीन वर्षे यशस्वीपणे चालू होते. मात्र त्यात वापरले जाणारे फ्लॅश तंत्रज्ञान कालबाह्य झाल्याने आता क्लाऊड बेस्ड मोबाईल फ्रेंडली सॉफ्टवेअर बनविण्यासाठी ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीने त्यांच्या कडे पूर्वी काम करीत असलेल्या व पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी करणा-या माजी डेव्हलपरला सांगलीत पुन्हा बोलावून हे काम युद्धपाताळीवर करावयाचे ठरविले आहे. सुदैवाने ज्ञानदीपच्या व्यवस्थापनात आता सांगलीतील गणपती कॅंन्सर हऑस्पिटलमध्ये अनेक वर्षे अॅडमिनिस्ट्रेटर म्हणू काम केले.्या प्रा. डॉ. यशवंत तोरो यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने थोड्याच अवधीत हे सऑफ्टवेअर सर्व डॉक्टर व पेशंट याच्या सेवेस उपलब्ध होईल.

ज्या हॉस्पिटल्स वा डॉक्टर्सना या संधीचा फायदा घ्यावयाचा असेल त्यांनी आपली माहिती व अपेक्षा कळवून सऑफ्टवेअरसाठी आपली मागणी नोंदवायची असेल त्यांनी डॉ. यशवंत तोरो यांचेशी संपर्क साधावा.
. डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि., सांगली.
No comments:
Post a Comment