Sunday, March 16, 2014

सांगली आयटी पार्क सुरू होण्याची गरज


सांगली येथील विश्रामबाग रेल्वेस्टेशन नजिक सांगलीच्या आय टी पार्क चे बांधकाम झाले. त्याचे उद्‌घाटनही थाटात झाले. आमच्या ज्ञानदीप इन्फोटेकने त्यात जागा मिळण्यासाठी अर्ज केला होता.

 

आम्ही या सांगली आयटी पार्कची वेबसाईटही डिझाईन केली होती.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सांगलीचे आय टी पार्क नावलौकीक मिळवेल. सांगलीच्या उद्योगजगतास नवी संजीवनी मिळेल व येथील या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल अशी आशा सर्व सांगलीकर बाळगून होते.

मात्र डेक्कन एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र उद्योग विकास मंडळ यांच्यात काही न्यायालयीन वाद निर्माण होऊन आयटी पार्क कार्यान्वित होण्यात अडचणी आल्या. आज या आयटी पार्कची तयार इमारत उपयोगाविना रिकामी पडून आहे.

सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन न्यायालयीन वाद बाजूला ठेवून संयुक्तरीत्या आयटी पार्क चालविण्यासाठी पुढाकार घेतला तर सांगलीचे भाग्य उजळेल. सांगलीच्या विकासासाठी राजकीय पक्षांनी जर यात पुढाकार घेऊन समन्वय घडवून आणला व शासनाकडे पाठपुरावा करून बाकी अडचणी दूर केल्या तर तो निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची एक महत्वाची उपलब्धी ठरेल. ज्ञानदीप फौंडेशन याबाबतीत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे.

1 comment:

  1. आता आपला ब्लॉग जोडा 'मराठी ब्लॉग लिस्ट' ह्या मराठी ब्लोग्सच्या डिरेक्टरीवर तेही अगदी कमी वेळात
    लिंक आहे- http://marathibloglist.blogspot.in/

    ReplyDelete