Saturday, August 31, 2019

ब्लॉग कसा लिहावा

इंटरनेटवर आपण आपली मते, लेख, फोटो प्रसिद्ध करण्यासाठी ब्लॉग लिहू शकता.रेडिफ, मनोगत, उपक्रम, इसकाळ, महाराष्ट्र टाईम्स इत्यादी अनेक वेबसाईटवर मराठीत मोफत ब्लॉग प्रसिद्ध करण्याची सोय करण्यात आली आहे. ब्लॉगर डॉट कॉम(www.blogger.com) या गुगलच्या वेबसाईटवर आपल्याला आपला जीमेलचा युजरनेम, पासवर्ड वापरून स्वतःची ब्लॉग वेबसाईट सुरू करता येते.आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

ब्लॉगसाईट सुरू करणे


प्रथम ब्राउजरमध्ये http://www.blogger.com/ ही वेबसाईट उघडावी. ब्लॉगर वेबसाईटच्या बॅनर खाली डाव्या बाजूला ब्लॉग सुरू करण्यासाठी काय करावे याची लिंक, ब्लॉगसाईटच्या नमुन्यांची चित्रे तर उजव्या बाजूला गुगल मेल अकौंटचा बॉक्स दिसतो. त्यात आपला जीमेलचा युजरनेम व पासवर्ड भरावा. साईन इन बटन दाबले की नवे वेबपेज उघडते. ब्लॉगवर आपले नाव कसे असावे ते लिहावे. ब्लॉगर साईटच्या अटी व नियम वाचून त्याला मान्यता द्यावी. Create a Blog वर क्लिक करावे.

नव्या पानावर ब्लॉगसाठी द्यावयाचे नाव (शीर्षक) नाव व ब्लॉगरसाईटच्या लिंकचे नाव लिहावे (ते यापूर्वी दुसर्‍या कोणी घेतले असेल तर वेगळे नाव निवडावे लागते.) त्या पानावर दिलेल्या ब्लॉग नमुन्यांमधून आपल्या पसंतीचा नमुना (Template) निवडावा.आपली स्वत;ची माहिती व फोटो घालावा. तसेच आवश्यक भासल्यास ब्लॉगच्या मांडणीत व दृश्य स्वरुपात आपणास हवे असणारे बदल सीएसएसमध्ये करावेत.

ब्लॉगरसाईटच्या डॅशबोर्डवर नवा ब्लॉग पर्याय निवडावा. ब्लॉगचे शीर्षक लिहावे व खालच्या मोकळ्या रकान्यात आपल्या ब्लॉगचा मजकूर लिहावा. हा मजकूर आधी नोटपॅडमध्ये वा वर्डमध्ये टाईप करून कॉपी पेस्ट केला तरी चालतो.

Preview बटन दाबून ब्लॉग कसा दिसेल ते पाहता येते व Edit बतन दाबून त्यात दुरुस्त्या करता येतात. खालच्या पट्टीत आपणास ब्लॉगसाठी काही शोधसूचक शब्द(Label) द्यावयाचे असल्यास देता येतात. ब्लॊग व्यवस्थित तयार झाला की Publish बटन दाबावे व तो प्रसिद्ध करावा.

आता आपला ब्लॉग प्रसिद्ध झाला आहे अशी सूचना व View Blog / Edit Blog असे पर्याय येतात. View Blog बटनावर क्लिक केले की ब्लॉग आपणास प्रसिद्ध झालेला दिसतो.

ब्लॉगवर फोटो वा चित्र घालणे
ब्लॉगच्या टूलबारमधील Add Image असा टॅग असणार्‍या चित्रावर क्लिक करावे. नव्या पॉप अप विंडोमध्ये हवा तो फोटो वा चित्र आपल्या कॉम्प्युटरवरून ब्राऊज करून निवडावे त्याची जागा ( डावीकडे, उजवीकडे वा मध्यात) ठरवावी व Upload Image या बटनावर व नंतर Done या बटनावर क्लिक करावे.त्याचे कोड मजकुराच्या विंडोमध्ये दिसू लागते. ते काढून मजकुरात आवश्यक त्या ठिकाणी पेस्ट करावे.

असे अनेक ब्लॉग आपल्याला लिहिता येतात. त्यांचे संपादन करता येते. वाचकांचे त्यावर अभिप्राय घेता येतात.

इतर अनेक सोयी ब्लॉगर साईटवर आहेत. त्याव आपण गुगल अ‍ॅड्ची वा अन्य जाहिरात करू शकतो व त्यातून आपल्याला पैसेही मिळविता येतात.

No comments:

Post a Comment