Saturday, February 15, 2025

Circular Economy for Sustainable Development

Circular Economy is a new and novel concept to reduce wastage, prevent degradation of the environment and result in the economy in production and energy requirements. 

Institute of Engineers ( India)     Pune local centre had organized a one day seminar on this important topic on 24th January 2025. 

Dr.Rajendrakumar Saraf took great efforts to invite experts at international level to speak on this topic and persuaded major Engineering Colleges in Pune to participate and sponsor the program.

As Dnyandeep Foundation was conducting similar seminars and conference on Green Tech and Environment Protection for last 10 years, it supported this activity by donation for Tea Event. It also tried to record all presentations for dissemination of information to all concerned.

I give below the details of the seminar proceedings as recorded by us.

Circular Economy for Sustainable Development - Seminar by IEPLC, Pune

Link - https://youtu.be/xe_HqrvpAKQ


Welcome Speech by the President, IEPLC, Pune

Link - https://youtu.be/QMzs0rfFZdY


Introduction by Dr. Uttam Awari, Hon. Secretary, IEIPLC

Link - https://youtu.be/abRhmY3a63s


Circular Economy and Net Zero - Dr. Rajendra.Shende

Link - https://youtu.be/jAICtP6BE-4


Circular Economy for Integrated Water Management - Dr. Rajendrakumar Saraf

Link - https://youtu.be/IrpjeD1m5pw


Circular Economy for Water Governance - Dr. Pradip Kalbhar

Link - https://youtu.be/nFfmqDM7-uc


Waste Management & Circular Economy - Dr. Rakesh Kumar


Link- https://youtu.be/4XgUdCdEXcM


Net Zero in Industries & Residential Complex - Er. Rahul Dhadphale

Link -https://youtu.be/ZCoCoMV0cxo


Extended Producers Responsibility - Er. Subodh Singh


Link -https://youtu.be/VYiQtnV83YU


There are other videos about the seminar which will be compiled and published later.

It is requested that Inst. of Engrs.(India) Pune Local center should provide modern recording facilities and appoint expert assistant.  

It can request Maharashtra  State Govt. and Pune Corporation to provide suitable financial assistance and appeal the industries and organization members to give donations with advt advantage.  Dnyandeep Foundation is ready to sponsor this facility provided it is given status of collaborating agency.

- Dr. S. V. Ranade, Chairman, Dnyandeep Foundatipon, Sasngli


Friday, February 14, 2025

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स(इंडिया)ची पुणे शाखेच्या इमारतीचे आधुनिकीकरण आवश्यक

 पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.शिक्षणक्षेत्रात तर पुण्याचे स्थान भारतात सर्वोच्च पदावर आहे. कला, विज्ञान,विधी,  व्यापार, तंत्रज्ञान याच क्षेत्रात शिक्षण देणा-या अनेक नामवंत संस्था पुण्यात आहेत. सा-या महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्याला प्रथम पसंती देतात.

तंत्र वैज्ञानिक क्षेत्रातही  पुण्याने जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळविले असून इंजिनिअरिंगच्या विविध शाखात मोठे उद्योग पुणे परिसरात उदयास आले असून असंख्य तज्ज्ञ अभियंते त्यात काम करीत आहेत. या अभियंत्यांसाठी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स(इंडिया)ची पुणे शाखा एक हक्काचे व्यासपीठ असून तिची इमारत पुण्यातील शिवाजीनगरच्या मध्यवर्ती भागात  1962 साली बांधण्यात आली असून त्यात  १४० क्षमतेचे एक सभागृह, ५० आणि १०० क्षमतेचे दोन पूर्ण बैठक कक्ष, एक प्रदर्शन कक्ष, १५ क्षमतेचे दोन कॉन्फरन्स हॉल, ६० क्षमतेचे पाच वर्ग खोल्या आणि २० क्षमतेचे दोन वर्ग खोल्या आहेत. शिवाय 8000 पेक्षा जास्त पुस्तके संस्थेच्या ग्रंथालयात आहेत असे समजले. 

असे असूनही गेल्या अनेक वर्षात या इमारतीमध्ये नव्या सुधारणा झालेल्या दिसून येत नाहीत. 1982 साली मी दिलेले व्याख्यान आणि गेल्या महिन्यात केलेले प्रेझेंटेशन यात इन्फ्रास्ट्रक्चर व सुविधा तशाच मर्यादित राहिल्याचे जाणवले.आज पुण्यातील इतर इंजिऩिअरिंगची ऑफिसेस, सकाळ इटरनॅशनल स्कूल, यशवंतराव सभागृह, अनेक कॉलेजमध्ये असणा-या आधुनिक सुविधा पाहिल्या तर या संस्थेकडे  मोठी जागा, देखणी प्रशस्त इमारत व विविध शाखांतील अनेक मान्यवरअभियंत्याचे सद्स्यत्व असूनही संस्था दुर्लक्षित राहिल्याचे दिसून येते. 

या स्थितीवर सर्वानी गांभिरयाने विचार करून संस्थेचे आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

या संस्थेच्या ऐतिहासिक वास्तूचे आधुनिकीकरण करून तंत्रज्ञान प्रशिज्ञण तसेच इंटर्नशिपयाठी सर्व सुविधा निर्माण केल्या तर विद्यार्थ्यांना तसेच नोकरी व व्यवसायात प्रविण्य मिळविण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक, उद्योजक यांचे मार्गदर्शन मिळण्याची सोय या मध्यवर्ती सर्वसमावेशक अभियांत्रिकी केंद्रात होऊ शकेल. 

कमवा व शिका  या कै. भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत सुरू केलेल्या योजनेचा वापर इंटर्नशिप योजनेत केला तर हे शिक्षण गरीब विद्यार्थ्यांनाही मिळू शकेल.शासन आणि उद्योग यांचे सहकार्य या योजनेस मिळू शकते.

ज्ञानदीप फौंडेशन यासाठी आयईपीएलसी ( इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स(इंडिया)ची पुणे शाखा)बरोबर परस्पर सहकार्य व आर्थिक गुंतवणूक करण्यास तयार असून वेबसाईटचे नूतनीकरण,  ग्रंथालय व्यवस्थापन, प्रशिक्षण ऑडिओव्हिज्युअल व्यवस्था यात सहभागी होऊ इच्छिते.

24 जानेवारी 2025 रोजी सर्क्युलर इकॉनॉमी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर एक दिवसाचे सेनिनार झाले. त्यासाठी भारतातील प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ  यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यांचे ध्वनीचित्रण व्यवस्थित होऊ शकले नाही. माझ्या मोबाईलवरून केलेल्या व्हिडीओ मी यूट्यूबवर विद्य़ार्थ्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केल्या आहेत मात्र त्याचा दर्जा चांगला नाही. याची मला खंत वाटते. 

https://youtu.be/jAICtP6BE-4?si=rOgn2objxl4bJkWj

येथे होत  असणा-या सा-या शैक्षणिक कार्यक्रमांचे ध्वनीचित्रण व ऑनलाईन प्रसारण शक्य झाल्यास ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू करता येतील.

असे झाले तर या संस्थेला दूरस्थ शिक्षणसंस्थेचे स्वरूप येईल व त्याचाी फायदा विद्यार्थी तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी होऊ शकेल.

ज्ञानदीप फौंडेशन याबाबतीत पुढाकार घेऊन वेबसाईटट्सया माध्र्वयमातून  सभासद व उद्योग यांचेकडून देणगी वा अन्य साहाय्य मिळविण्याचा प्रयत्न करेल.फौंडेशनकडे असणारी सर्व पुस्तके व टेक्निकल जर्नल्स तसेच ईबुक्स या ग्रंथालयात ठेऊन विद्यार्थ्यांना सशुल्क देता येतील. 

संस्थेच्या पदाधिका-यांनी या प्सतावास मान्यता द्यावी ही विनंती.

- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली


Monday, February 3, 2025

New Danger to Kids Education from character.ai - News in Silicon Valley

 News Appeared in Mercury News published in Silicon Valley which has highlighted the  dangers of exposing new AI tools to school children.


Though AI has revolutionized the learning system and increased capability of automating knowledge acquisition and its application, its use to exploit the kids education market may create unpresidential damage to society.  

The character.ai tool created for kids  to become virtual friend for amusement has become very popular may turn into a viral social disrupter. 

I quote the content of the news 

"They are called artificial intelligence companions, led by a service called Character.ai, an AI-driven platform that permits the creation of fictitious character chatbots. These companion chatbots engage in personal and evolving conversations like real people. The chatbots even have profile pictures and bios and can be custom-tailored for their user.

This new technology is already hurting our kids. According to numerous reports, Character.ai’s chatbots sometimes try to persuade children to kill themselves, to avoid consulting doctors, to engage in sexualized conversations, and to embrace anorexia and eating disorders.

In one widely reported instance, a Character.ai chatbot suggested a child should murder his parents because they tried to limit screen time."

Ref.: Opinion: AI is harming our children. California must step up

I had expressed similar views in my first blog in 2007 about the toy industry in US. 

While advocating need of learning AI, we have to be cautious while applying it in school education as it is a hidden demon which can make students idle, egoist or violent.

In India, this is more relevant as the parents are not educated like in USA. We already have many differences in cast, creed, religion, political views and beliefs. 

AI can do good or bad for social harmony. You cannot stop growth of AI. 

What you need is the control to its use for good. Dnyandeep Foundation shall develop the norms for using AI in school education with the help of experts in Education field and getting suggestions from society by creating a open platform for discussion on school4all.org.



The website used Marathi medium as it is designed for schools in Maharashtra State. The scope can be expanded later to include other Indian languages.
 
This task is initiated by Dnyandeep Foundation, but its implementation needs support from all governmental and other social organizations.






 

Tuesday, January 28, 2025

डॉक्टर आणि इंजिनिअर्स: विकसित भारत-2047 मध्ये चर्चा - वालचंद कॉलेज शिक्षणपद्धती आदर्श

 27 जानेवारी रोजी  ThinkEdu कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये,सास्त्र विद्यापीठाच्या संचालक डॉ. सुधा शेषयान आणि एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी (KTU) चे कुलगुरू डॉ के शिवप्रसाद यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाचा आकार बदलण्याची गरज अधोरेखित केली.

 वेगाने विकसित होणाऱ्या विविध क्षेत्रात नोकरीसाठी आवश्यक असणा-या कौशल्याच्या  मागण्या पूर्ण करण्यासाठी मानसिक लवचिकता आणि अनुकूलनक्षमतेवर लक्ष केंद्रित करून  जागतिक  प्रशिक्षण पद्धतींचा मागोवा घेऊन भारतासाठी योग्य अभ्यासक्रमाची रचना करण्याची आवश्यकता आहे. 

मानसिक आरोग्य आणि रोजगारक्षमता

डॉ के शिवप्रसाद यांनी महाविद्यालयीन प्लेसमेंट दरम्यान मानसिक आरोग्यावर वाढत्या लक्ष केंद्रित करण्याकडे लक्ष वेधले. अभियंत्यांमधील रोजगारक्षमतेच्या संकटाला संबोधित करताना ते म्हणाले - “अंतिम निर्णय हा एचआर किंवा तांत्रिक मूल्यमापनावर अवलंबून नसून तो मानसशास्त्रज्ञ ठरवतो. उमेदवाराची मानसिक स्थिती त्यांच्या रोजगारक्षमतेला चालना देते. ते मला उमेदवार सुचवायला सांगतात - रँक होल्डर किंवा उच्च स्कोअरर नाही तर त्यांच्या कंपनीत प्रभावीपणे काम करू शकेल अशी व्यक्ती”.

डॉ शेषयान यांनीही त्यांचे मत मांडले आणि ते जोडले की तरुण पिढीच्या मानसिक लवचिकतेवर आधारित वैद्यकीय शिक्षणातील अंतर भरून काढले जाऊ शकते. "हे शालेय स्तरावर केले पाहिजे आणि उच्च शिक्षण स्तरावर नाही," 

सामान्य औषधप्रणाली पुनरुज्जीवित करणे

डॉ. शेषयान यांनी वैद्यकीय शिक्षणासंबंधीच्या आव्हानांवर, विशेषत: सामान्य औषधांच्या स्पेशलायझेशनच्या बाजूने होत असलेल्या घसरणीवर भर दिला. “आम्ही फॅमिली फिजिशियनची संस्कृती गमावली आहे. प्रत्येकाला विशेषज्ञ बनवायचे आहे, सामान्य वैद्यकातील अंतरांसह एक उच्च-भारी प्रणाली तयार करणे. विशेष प्रशिक्षणावर जोर द्या. हे सुपर स्पेशालिटी नाही; ही उप-विशेषता आहे. आम्ही त्याला आयुष्यापेक्षा मोठी प्रतिमा देत आहोत,” 

तिने प्रायोगिक शिक्षण आणि हाताने प्रशिक्षणाच्या गरजेवर भर दिला. “वैद्यकशास्त्रात, रुग्णाला एकट्याने हाताळणे हे पर्यवेक्षणाने करण्यापेक्षा वेगळे आहे. विद्यार्थ्यांनी ग्राउंड रिॲलिटी लवकर समोर आणली पाहिजे. दुसरीकडे, तुम्ही एका रुग्णावर 30 इंटर्न ठेवू शकत नाही. इंटर्नशिप आणि प्रशिक्षणासाठी आम्हाला ग्रामीण आणि लहान रुग्णालयांचा अधिक चांगला विकास आवश्यक आहे,”

उद्योग-शिक्षणसंस्था यांच्यात समन्वय व सहकार्य हवे

सेशायान यांनी भारतातील इंटर्निंग डॉक्टरांच्या मर्यादित अनुभवावर प्रकाश टाकला, तर डॉ. शिवप्रसाद यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये औद्योगिक अनुभव वाढवण्यासाठी सरकार आणि कंपन्यांनी केलेल्या अलीकडील प्रयत्नांची प्रशंसा केली. स्वत:च्या अनुभवांवर चिंतन करून, त्यानी इंटर्नशिपच्या दरम्यान हाताने शिकण्याच्या अभावावर टिप्पणी केली.

“तुम्ही कॅम्पसमध्ये जहाजाचा काही भाग तयार करू शकत नाही; इंटर्नशिपसाठी आम्हाला शिपयार्डमध्ये जावे लागेल. मात्र, इंटर्नसाठी कोणत्याही सुविधा नव्हत्या. आम्हाला उभे राहून इतरांचे निरीक्षण करायचे राहिले. आता, इंटर्न आणि पदवीधरांसाठी त्यांची कौशल्ये शिकण्यासाठी आणि सुधारण्यासाठी CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) फंड उघडले जात आहेत,” असे जहाज तंत्रज्ञानाचे प्राध्यापक डॉ शिवप्रसाद यांनी सांगितले.

त्यांनी अधिकाधिक उद्योग-शैक्षणिक सहकार्याचे आवाहन केले, शिक्षकांना वास्तविक-जगातील औद्योगिक समस्या हाताळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक उपायांमध्ये गुंतवून ठेवण्याचे आवाहन केले.

वालचंद कॉलेजची वैभवशाली शिक्षणपरंपरा

वालचंद कॉलेज, सांगलीमध्ये 1970 ते 2000 या काळात याच शिक्षण पद्धतीचा वापर केला जात असे. प्रत्येक विभागाचा स्थानिक  उद्योग, संस्था यांच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग असे. विद्यार्थी असतानाच कारखान्यात, सहकारी  व सामाजिक संस्थात विद्यार्थी व प्राध्यापक योगदान देत. 

प्रा. भालबा केळकर, देशिंगकर, साने - एआरई, 

डॉ. सुब्बाराव - परिसर संरक्षण, 

प्रा. सखदेव - पाटबंधारे, 

डॉ. कृष्प्णस्वामी. घारपुरे, ए. बी. कुलकर्णी, - स्ट्रक्चरल 

प्राचार्य पी. ए. कुलकर्णी  - रोटरी आणि तंत्रउत्पादन,

 प्रा. भाटे - इंजिनिअर्स आर्किटेक्ट्स असोशिएशन

प्रा. आराणके, प्रा आवटी - लघुउद्योग

प्रा. आर. आर मराठे - विद्युत बॅटरी, 

प्रा. जोगळेकर - मराठी विज्ञान प्रबोधिनी  व नाट्य 

प्रा. तिलवल्ली, रिसबूड, सीजी जोशी. 

एक ना दोन. प्रत्येक प्राध्यापक अशा आपल्या स्वीकृत कार्यात मग्न असे.आणि त्यांच्याबरोबर विद्यार्थी शिष्यगण मदतीला असत.

 मला आठवते  आम्ही प्रा. एच. यु. कुलकर्णी  यांचेबरोबर मुंबईच्या उषाकिरण बिल्डिंगचे बांधकाम बघण्यासाठी गेलो होतो. प्प्रारा. बर्वे सरांबरोबर सर्वे प्रोजेक्ट व  सु. ग रानडे यांचेबरोबर गोकाकची ट्रीप नियमित असे. 

त्या काळात शिक्षण घेतलेले त्यावेळचे विद्यार्थी आम्हा निवृत्त प्राध्यापकांना एवढा मान देतात याचे कारण हेच असावे. आमचे ज्ञान वा उपलब्धीआता त्यांच्या तोडीचे नाही तरीदेखील आमच्या स्वप्नांना बळ देण्याचे कार्य ते मनापासून करत आहेत हे पाहून धन्यता वाटते.

सिस्टेड फौंडेशन, ज्ञानदीप फौंडेशन आणि अशा अनेक सामाजिक शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा ती जुनी समाज व उद्योगस्नेही प्रभावशाली शिक्षणपद्धती आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आजही माजी प्राध्यापक संघटना नियमितपणे कार्य करीत असून वालचंद कॉलेजच्या उज्वल भवितव्यासाठी आपले सहकार्य देत आहे. 

विकसित भारत 2047 चे उद्धीष्ट साध्य करण्यात  वालचंद कॉलेजचे  माजी प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी मोलाची कामगिरी करतील असा मला विश्वास वाटतो.  


Saturday, January 18, 2025

सुनील देशपांडे यांच्या 'निर्मितीकडून नवनिर्मितीकडे' या पुस्तकाचे प्रकाशन

 आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी ज्ञानदीप फौंडेशनला वालचंद कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागात अनेक वर्षे काम करण्याचा अनुभव असणारे  आणि सांगलीतील मराठी विज्ञान परिषदेचे प्रायोजक श्री. सुनील देशपांडे यांनी भेट दिली व त्यानी प्रकाशित केलेल्या   इलेक्ट्रॉनिक्स आणि अर्ड्युनो आधारित सर्कीटविषयी सर्व माहिती असणा-या  'निर्मितीकडून नवनिर्मितीकडे'या पुस्तकाविषयी अटल ज्ञानदीप प्रशिक्षण वर्गात त्यांनी माहिती सांगितली. 

ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे यांनी त्यांचे अभिनंदन करून या पुस्तकाच्या पाच प्रती ज्ञानदीप साठी विकत घेतल्या तसेच विलिंग्डल कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉ. यशवंत तोरो यांचे हस्ते या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले.



यावेळी रेकॉर्ड करण्यात आलेला व्हिडीओ 

 फोटो - ज्ञानदीपच्या अटल ज्ञानदीप प्रशिक्षण वर्गातील सौ. मुग्धा कानिटकर, प्रा. कानिटकर, श्री. सुनील देशपांडे, डॉ. यशवंत तोरो आणि डॉ. सु. वि. रानडे.
 
श्री. सुनील देशपांडे यांनी यावेळी इलेक्ट्रॉनिक सर्किटचे  पाण्याच्या प्रवाहाशी असणारे साधर्म्य उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच ब्रेडबोर्ड, त्यावरील कांम्पोनंटची जोडणी तसेच अर्ड्युनोची रचना यावर मार्गदर्शन केले.

यापुढे ज्ञानदीपच्या अटल ज्ञानदीप प्रशिक्षण योजनेत ते सहभागी होणार असून विद्यार्थ्यांना सर्व ते मार्गदर्शन करणार आहेत.