Sunday, June 9, 2024

ज्ञान आणि व्यवसाय

 [ माझ्या शालेय जीवनानंतर केव्हातरी स्वानुभवावर लिहिलेले एक नाटक ]

[पडदा वर जातॊ तेव्हा स्टेजवर डॉक्टरच्या अद्ययावत कन्सल्टिंग रूमचा देखावा. एका बाजूस फिरत्या खुर्चीत रेलून बसलेलेचाळीशीतील डॉ. सुहास देशपांडे  सिगारेट शिलगावत आहेत. मागील बाजूस मेडिकलच्या पुस्तकांचे शेल्फ, शो केस, अक्वारियम, खोलीस फिकट निळा रंग, वर पंखा, टेबलावर केसपेपरचा गठ्ठा, पुढे दोन खुर्च्या. रिकाम्या दुसर्‍या बाजूस दार. त्यावरील पडदा बंद. पडदा उघडून एक समवयस्क पेशंट, कपडे अगदी साधे, चेहरा ओढलेला, येऊ लागतॊ.]

डॉक्टर - (त्रासिकपणे) - काय पाहिजे तुम्हाला ?
पेशंट - ‘डॉक्टर, माझ्या मुलीला दाखवायचे होते?’
डॉक्टर - ‘तुम्हाला बोलावले म्हणजे या. मी कामात आहे.’

 पेशंट नाखुशीने बाहेर जातो. डॉक्टर बेल वाजवितात. कंपौंडर आत येतो.

डॉक्टर - ‘ अरे कुठे गेला होतास? पेशंट सरळ आत घुसतायत.’
कंपौंडर - ‘ मी येथेच होतो. पण त्या गृहथांची मुलगी आजारी आहे म्हणून घाई त्यांची घाई चालली होती.
डॉक्टर घडाळ्याकडे पहात ‘ हे बघ. आता पाच वाजले आहेत. मला ५॥ वाजता एक महत्वाची अपॉइंट्मेंट आहे. तेव्हा उद्या सका्ळी ९ वाजता या म्हणून सांग सगळ्यांना.’

कंपौंडर जातो. डॉक्टर फोन लावतात. ‘कोण? नेने आर्किटेक्ट का. हां . जरा त्यांना फोन द्या. हॅलो विजय. अरे पाच वाजले. प्रिमीयर शोला जायचे विसरलास काय?’ ‘जरा कामात आहे. वेळ लागेल.’ ‘ अरे कटव त्या क्लायंटला. आपल्याला काही हे लोक आपले ताबेदार समजतात की काय ! जाने दो यार ! मार गोली कामाला. मी निघालोच. वेस्टएंड्ला भेटू अच्छा.’ डॉक्टर फोन खाली ठेवतात. टेबलवर एशट्रेत सिगरेट विझवतात. शीळ घालत उठतात.

 तेवढ्यात पडदा बाजूला होतो व पुन्हा तोच पेशंत आत येतो. डॉक्टर काही बोलणार तेवढ्यात तो अजिजीने म्हणतो.‘ डॉक्टर, तुम्ही मला ओळखलेले दिसत नाही. मी आणि तुम्ही सातार्‍याला एकाशाळेत च्व एका वर्गात होतो. मी गजानन पंडीत’

डॉक्टर - सॉरी हं. अरे मगाशीच नाही का सांगायचे. आता आठवले तू फडणीसांच्या वाड्यात रहात होतास.आमच्या बंगल्यावर आपण खेळायचोदेखील. आता सध्या कुठे असतोस? आणि काय झालंय मुलीला?’

गजानन - मी सातारलाच कापडाच्या दुकानात लिहिण्याचे काम करतो. माझी मुलगी शांता हार्ट पेशंट आहे. तू या विषयात तज्ज्ञ मह्णून सार्‍या पुण्यात  प्रसिद्ध आहेस असे मला कळले. म्हणून तिला घेऊन आलॊ आहे.

डॉक्टर- ‘तिला येथे आणले आहेस काय?’

गजानन - ‘नाही. पण येथे जवळच तिचा मामा रहातो. त्याच्याकडे तिला घेऊन आलो  आहे.’

डॉक्टर घडाळ्याकडे पहात - ‘ मला एक महत्वाचे काम आहे. म्हणून मला जाणेच भाग आहे. तू कोठे उतरला आहेस ते सांग मीच तेथे रात्री १०-१०॥ ला  येऊन बघतो. काही काळजी करू नकोस’
गजानन - मी वाट पहातो. आपली फार कृपा होईल.

 डॉक्टर - ‘ अरे असे काय बोलतोस.  त्याच्या पाठीवर थाप मारत ‘गजा रे गजा, तुझी काय मजा’म्हणून मी तुला चिडवायचो तुला आठवतंय का नाही. आणि हो. त्यावेळी तर शास्त्रात तू सगळ्यांचा दादा होतास. तुझे प्रयोगच आम्ही उतरवून नाही का काढायचो.! बरे झाले तुझी गाठ पडली अन मला पुन्हा आपल्या बालपणीची आठवण झाली बघ.’

 गजानन - उत्साहित होऊन ‘ आणि आपण एकदा आमच्या स्वयंपाकघरात साबण तयार केला होता. आठवतंय? चुलीवर ठेवलेल्या भांद्यातले तेल पेतले. आई वडिलांचा मार केवळ तुझ्यामुळेच वाचला होता.’
 डॉक्टर - ‘दोन मिनिटे बस. कशी काय वाटतेय माझी रूम. हे पडदे खास काश्मीरहून आणले आहेत. ही पेंटींग्ज तर जहांगीर आर्ट गॅलरीतच विकत घेतली आहेत.’

गजानन चौकसपणे खोलीत पहातो  आहे. त्याची नजर पुस्तकाच्या शोकेसवर स्थिरावते. न बसता तो तेथे जातो व पुस्तक काढून पहातो.

 गजानन- ‘तुमच्याकडे शास्त्रातली बरीच पुस्तके दिसताहेत. सर्व वाचायला वेळ तरी केव्हा मिळतो तुम्हाला?’
 डॉक्टर - ‘ अरे वेडा की काय? ही पुस्तके कोण वाचणार. अरे पेशंटवर इम्प्रेशन नको का पडायला. म्हणून आमच्या आर्किटेक्टने ही शोकेस लावली आहे.  मल वाचायचा किती कंटाळा तुला माहीत नाही का? पण तुला एवढी वाचनाची आवड होती मग तू कसा काय या खर्डेघाशीच्या लाईनवर गेलास?
 गजानन - आहो काय करणार ? मॅट्रीक पास झालो तरी लगेच  चांगली नोकरी मिळेना व घरचा भार उचलायला नोकरी करणे भाग्च होते.आता काय. दोन मुलांचा संसार करण्यातच सगळा वेल चालला आहे. नाही म्हटलम तरी मी आता फुरसतीच्या वेळी शाळेतल्या मुलांना काहीतरी शिकवीत बसतो.
 डॉक्टर - मी मात्र लकी ह>. त्यावएली मणिपालला पैसे भरून काहोईना वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळाला म्हणून तर ही स्टेज आली. नाहीतर करावी लागली

असती कोठे तरी उमेदवारी. तुला आश्चर्य वाटेल मी मुंबईला हॉटेल मॅनेजमेंट्च्या कोर्ससाठी अर्ज देखील केला होता. तसे झाले असते तर तुझे स्वागत एखाद्या

पंचतारांकित हॉटेलमध्ये मी केले असते. (घडाळयकडे पहाताच चमकून ) अच्छा मला आता निघालेच पाहिजे. अर्जंट व्हिजिट कारयची आहे. मग काय. रात्री मी

येईनच . डोन्ट वरी.
 गजानन - बरं मी वाट पहातो. दोघेही बाहेर जातात व पडदा पडतो.
 दवाखान्याचा सीन. डॉक्टर गडबडीने प्रवेश करतात. कंपौंडर त्यांचे पाठोपाठ येतॊ. सर पेशंट तुमची वाट पहाताहेत त्यांना पा्ठवू का?
 डॉक्टर - ‘अरे काल सिनेमानंतर पार्टीला गेलो आणि घरी यायला उशीर झाला. अरे हो. त्या गजाननकडे जायचे विसरूनच गेलो. जरा फोन डायरी दे.’
‘ हॅलो, मी डॉ. देशपांडे बोलतोय आपल्याकडे गजानन पंडित आले आहेत ना. त्याम्ना जरा फोन द्या. हॅलो गजानन का? अरे मला काल नाही जमले यायला. मुलीची तब्बेत कशी काय आहे? काय? रात्री अटॅक आला होता? मग काय केले. ... थँक गॉड ! मसाजचा उपयोग झाला. छान. अरे पण कोणी मसाज केला. काय? तू केलास? कोठून षिकलास हे? माझ्या लेखावरून? कोणत्या?
 अच्छा तो होय. मी घरी गेल्यावर पाहीन. पण या स्टेजला आपल्याला सर्व काही देवाच्या हाती सोडावे लागते. नशीबाने साथ दिली तर खैर म्हणायचे. अच्छा ये की? मी दवाखान्यात आहेच.’
डॉक्टर फोन ठेवतात व  कंपौंडरला बोलावतात. ‘ अरे सकाळला आपण ह्रुदयविकारासंबंधी लेख दिला होता काय? जरा शोधून दे पाहू.’प्रतिथयश ह्रुदयरोग तज्ज्ञ डॉ. सुहास देशपांडे यांची हदयरोगावरील आकस्मिक उपचारांसंबंधी खास मुलाखत ’ हॅ हॅ. मुलाखत म्हणून आपणच पुस्तकातली माहिती देऊन फोटोसह जाहिरात देतो काय आणि त्याचा उपयोग गजाननला होतो काय. देवाची  लीला अगाध आहे.
अर्थात गजानन खरंच ग्रेट ह. आपल्य मुलीवर असा प्रसंग ओढवला असता तर आपल्याला करता आला असता का असा मसाज? 
दार वाजते. तंद्रीतून जागे होत
गजानन - येऊ का डॉक्टर ?
डॉक्टर - उभे राहून पुढे जात ‘ अरे ये ये. सॉरी हं. मी खरे म्हणजे कालच तुझ्याबरोबर यायला हवे होते. तुझ्यावर भलताच प्रसंग ओढवला. आपण जाऊ या का लगेच तुझ्या मुलीला पहायला?

Tuesday, June 4, 2024

वेबमास्टर – दूरस्थ वेबडिझाईन प्रशिक्षण कोर्स

सध्याच्या इंटरनेट युगात प्रत्येक संस्थेची स्वत:ची वेबसाईट असणे ही एक  आवश्यक गोष्ट बनली आहे. वेबसाईट डिझाईन हे एक नव्याने उदयास आलेले व सतत बदलणारे तंत्रज्ञान आहे. गेली चोवीस वर्षे वेबडिझाईन क्षेत्रात कार्य करीत असलेल्या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या  सांगलीतील सॉफ्टवेअर कंपनीने  शाळा, कॉलेज व इतर अनेक संस्थांच्या वेबसाईट डिझाईन केल्या असून वेबडिझाईनचे प्रशिक्षणही या संस्थेतर्फे दिले जाते.



वेबसाईट तयार झाली तरी त्यात नियमितपणे नवी माहिती घालणे आवश्यक असते. या कामासाठी वेबडिझाईन प्रशिक्षित  व्यक्तीची गरज भासते. संस्थांकडे अशा व्यक्ती उपलब्ध नसल्याने वेबसाईटचे नूतनीकरण करण्याचे कामही ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीकडून केले जाते. मात्र यासाठी वेबसाईट व्यवस्थापनासाठी जबाबदारी निश्चित न केल्याने, नवी माहिती संकलित करणे व नियमितपणे  वेबसाईटवरील माहितीचे नूतनीकरण करणे राहून जाते. परिणामी अनेक वेबसाईटवरील माहिती जुनी व कालबाह्य  राहते. साहजिकच वेबसाईटचा मुख्य उद्देश सफल होत नाही.

या परिस्थितीचा विचार करून  ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनने वेबडिझाईन व त्याचे नूतनीकरण यांचे दूरस्थ पद्धतीने प्रशिक्षण देण्याची एक अभिनव योजना सुरू केली आहे. सहा महिन्याच्या या कोर्सची फी १२००० रुपये असून अभ्यासाचे साहित्य प्रत्येक प्रशिक्षणार्थीस एका स्वतंत्र सबडोमेनवर टप्प्याटप्प्याने दिले जाईल. प्रत्येक धड्यावरील प्रश्नांची योग्य उत्तरे आल्यानंतरच पुढील धड्याचे साहित्य पाठविले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर एका वेबसाईटचे पूर्ण डिझाईन प्रशिक्षणार्थीकडून करवून घेतले जाईल.  प्रत्येक कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनतर्फे ‘वेबमास्टर’ सर्टिफिकेट देण्यात येईल.  शाळा, कॉलेज वा इतर उद्योग व संस्थांत काम करणार्‍या व्यक्तींना आपली नोकरी सांभाळून घरबसल्या आपल्या फावल्या वेळेत हा कोर्स पूर्ण करता येईल. हा कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्या संस्थेची साधी (स्टॅटिक) वेबसाईट डिझाईन करणे व त्यातील माहिती अद्ययावत करणे या गोष्टी प्रशिक्षित व्यक्तीस करता येतील एवढेच नव्हे तर इतर संस्थांच्या वेबसाईट डिझाईन करून त्याला अर्थार्जन करता येईल.

कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी  इमेलने info@dnyandeep.net या पत्त्यावर संपर्क साधावा.

Saturday, June 1, 2024

हॉस्पिटलसाठी ऑनलाईन अपॉइन्टमेंट सॉफ्टवेअर

भारतातील आरोग्यसेवा सर्व जगात उत्तम प्रतीची व कमी खर्चाची समजली जाते.भारतातील सर्व महत्वाच्या शहरांत अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त अशी अनेक हॉस्पिटल्स आहेत.तसेच त्यामध्ये विविध व्याधींवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. यामुळे खेड्यापाड्यातून व दूरच्या गावातील रुग्ण अशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. एवढेच नव्हे तर बाहेरच्या देशातील , विशेषकरून अरब राष्ट्रातील रुग्ण इंग्लंड अमेरिकेऎवजी भारतात उपचार करून घेणेच अधिक पसंत करतात.

हॉस्पिटल सेवा उत्तम प्रतीची असली तरी बाह्यरुग्ण विभागात दिसणारी रुग्णांची गर्दी पाहिली की या सेवेत फार मोठी उणीव राहिली असल्याचे जाणवते. प्रगत देशात प्रत्येक पेशंट आपली अपॉइन्टमेंट वेळ  नेटवरून आधीच  निश्चित करतो. त्यामुळे तेथे पेशंटनी गजबजलेला बाह्यरुग्ण विभाग असे  दृश्य क्वचितच दिसते. ठराविक वेळेस हॉस्पिटलमध्ये गेले की तेथील रिसेप्शनिस्ट आपला केस पेपर व एक इलेक्ट्रॉनिक डॉकेट आपल्याकडे देते. मग थोडावेळ आपणास तेथील फोटोगॅलरी, वाचनालय, कॉम्प्युटररूम वा  बागेत थाबता येते. आपला नंबर ( जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिटात) आला की हातातील डॉकेटवरील लाल दिवा लागतो व आपल्याला भेटीची सूचना मिळते.या प्रक्रियेत दूरवरून येणा-या पेशंटनाही ठराविक वेळात भेटीची खात्री असते.

अनेक ग्रामीण भागातील  स्थानिक पातळीवरील डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी पेशंटना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवितात. अशावेळी आपल्या भावी वेळापत्रकाचे नियोजन केले तर तज्ज्ञ डॉक्टरांना आपला वेळ अधिक उपयुक्तपणे वापरता येतो. डॉक्टरांची भेट घेऊ इच्छिणा-या पेशंट्सना मात्र असे नियोजन करता येत नाही. कारण अनेक रुग्ण आधीच बाह्यरुग्ण विभागात उपस्थित असल्याने त्याना आपला नंबर येईपर्यंत तेथेच वाट पहात थांबणे भाग पडते. प्रत्येक रुग्णाला किती वेळ लागेल  याची  काही खात्री नसल्याने एकूण लागणा-या वेळॆचा अंदाज त्यांना बांधता येत नाही.

ब-या च वेळेस आजारीपणामुळे रुग्णाला एका जागी जास्त वेळ बसता येत नाही. तसेच लहान मुले असतील तर त्यांना अशा बाबतीत अधिक त्रास होतो. लहान मुलांना जवळच्या इतर रुग्णांमार्फत सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांची लागण होऊ शकते. रुग्णाबरोबर येणा-या नातेवाईकांनाही आपला कामधंदा सोडून अशा प्रतिक्षा यादीत थांबावे लागते. काही वेळा प्रत्यक्ष आवश्यक ते तज्ज्ञ डॉक्टर बाहेरगावी वा अन्य कामासाठी गेल्याने त्यांची भेट घेता येत नाही. पेशंट परगावाहून आलेला असला तर त्याला अशी भेट घेण्यासाठी प्रवासाव्यतिरिक्त प्रसंगी राहण्याचीही सोय करावी लागते. मोठ्या शहरात यासाठी खर्चही जास्त होतो.

 अशा कारणांमुळे  रुग्ण आवश्यक त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी दूरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याऎवजी जवळपास उपलब्ध असणा-या हॉस्पिटलमध्येच उपचार घेणे पसंत करतात. यात रुग्णास योग्य औषधोपचार व सल्ला मिळेलच याची खात्री देता येत नाही.

मोठ्या हॉस्पिटलमध्ये सध्या फोनवरून वेळ ठरविण्याची सोय उपलब्ध असते मात्र हॉस्पिटलमधील प्रत्येक डॉक्टरच्या वेळापत्रकाविषयी सर्वसाधारण माहिती असली तरी रिसेप्शनिस्टला निश्चित माहिती नसते. शिवाय पेशंटने त्यासाठी आवश्यक ती फी भरलेली नसते. तसेच तो प्रत्यक्षात वेळेवर येईल याची खात्री नसते.  त्यामुळे अशा अपॉईंटमेंटचा फारसा उपयोग होत नाही.

 या सर्व अडचणींचा विचार केल्यावर ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेने भारतातील प्रथितयश हॉस्पिटलमध्ये  उपयुक्त ठरेल असे ऑनलाईन अपॉइन्टमेंटचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यात ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठीच्या पेशंट, डॉक्टर व व्यवस्थापक यांना लागणा-या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र वेबसाईट बनवून डॉक्टरांच्या उपलब्ध वेळापत्रकाची माहिती तेथे संकलित केली जाते. सर्व माहिती नेटच्या माध्यमातून कोणासही उपलब्ध होऊ शकते.

या सॉफ्टवेअरद्वारे पेशंटला वा त्याच्या नातेवाईकांना घरी बसून इंटरनेटद्वारे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेळापत्रकावरून  त्यांची उपलब्धता पाहता येईल व आपल्या सोयीनुसार भेटीची वेळ ठरविता येईल. या सॉफ्टवेअरमध्ये नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्ड वापरून  भेटीसाठी लागणारे शुल्क भरण्याची सोय असल्याने अशी भेट निश्चित होऊ शकेल.

ही माहिती भरण्याचे काम रुग्णाशिवाय इतर व्यक्तीसही( व्हिजिटर) करता येते व त्या व्यक्तीस एकापेक्षा अधिक व्यक्तींची(मेंबर) नोंद करण्याची सुविधा असल्याने  हे सॉफ्टवेअर अधिक सुलभ करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमधील व्यवस्थापक सार्वजनिक सुट्ट्या, आठवड्यातील हॉस्पिटलचे कामाचे दिवस व तास यांची माहिती भरून कॅलेंडर तयार करू शकतील. तसेच नवीन डॉक्टरांचे नाव यादीत समाविष्ट करणे वा त्यात बदल करणे हेही त्यांना करता येईल. हॉस्पिटलमधील   डॉक्टरना आपली माहिती, फोटो, भावी काळातील त्यांच्या उपलब्धतेनुसार संभाव्य वेळापत्रक इत्यादी माहिती घालता येईल तसेच त्यात  आवश्यकतेनुसार केव्हाही बदल करता येतील.

 नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्ड वापरत असताना  माहितीची गोपनीयता व सुरक्षितता सर्वात महत्वाची असते. त्यादृष्टीने या क्षेत्रातील भारतात अग्रगण्य असणार्यास सीसीअव्हेन्यू या संस्थेच्या पेमेंट गेट्वेशी हे सॉफ्टवेअर संलग्न केले असल्याने पेमेंटविषयक आवश्यक ते सुरक्षा कवच सीसीअव्हेन्यूच्या सिस्टीममध्येच अंतर्भूत असते.  अपॉइन्टमेंटविषयीची सर्व माहिती दूरस्थ सर्व्हरवरील डाटाबेसमध्ये साठविली जाते व व्हिजिटर व व्यवस्थापक यांना लॉगिन करूनच याची माहिती मिळविणे वा त्यात काही बदल करणे शक्य असते.

हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासाठी लागणारे अपॉइन्टमेंटविषयीचे विविध प्रकारचे रिपोर्ट या सॉफ्ट्वेअरमधून मिळू शकतात. तसेच या रिपोर्टचे रुपांतर एक्सेलच्या तक्त्यात करता येऊ शकते.

सांगलीतील प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. मिलिंद किल्लेदार यांच्या अनुराधा आय हॉस्पिटलमध्ये हे सॉफ्टवेअर तीन  वर्षे  यशस्वीपणे चालू होते. मात्र त्यात वापरले  जाणारे फ्लॅश तंत्रज्ञान कालबाह्य झाल्याने आता क्लाऊड बेस्ड मोबाईल फ्रेंडली सॉफ्टवेअर बनविण्यासाठी ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीने त्यांच्या कडे पूर्वी काम करीत असलेल्या व पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी करणा-या माजी डेव्हलपरला सांगलीत पुन्हा बोलावून हे काम युद्धपाताळीवर करावयाचे ठरविले आहे. सुदैवाने ज्ञानदीपच्या व्यवस्थापनात आता सांगलीतील गणपती कॅंन्सर हऑस्पिटलमध्ये अनेक वर्षे अॅडमिनिस्ट्रेटर म्हणू काम केले.्या प्रा. डॉ. यशवंत तोरो यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने थोड्याच अवधीत हे सऑफ्टवेअर सर्व डॉक्टर व पेशंट याच्या सेवेस उपलब्ध होईल.

ज्या हॉस्पिटल्स  वा डॉक्टर्सना या  संधीचा फायदा घ्यावयाचा असेल त्यांनी आपली माहिती व अपेक्षा कळवून सऑफ्टवेअरसाठी आपली मागणी नोंदवायची असेल त्यांनी डॉ. यशवंत तोरो यांचेशी संपर्क साधावा.
 

. डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि., सांगली.