Dnyandeep Foundation has launched a revolutionary internship training program to provide training and experience in real life business projects with the help of academic institutes, who can use their infrastructure and teaching faculty to train their own fresh graduates.
Dnyandeep Infotech Pvt. Ltd., an IT company with track record of 22 years will be happy to share their projects and knowledge resources and issue experience certificates after successful completion of training.
Dnyandeep Foundation has vast experience of training in IT and Env. Engg. and Green Technology with network of academicians and professionals in these fields.
It will be a Win-Win proposal, both for Dnyandeep and participating institute.
Moreover, it will help in creating entrepreneurs and create opportunities of good job placements in private sector.
I feel that on the occasion of Teachers Day, the teachers should become main stake holders in business growth.
Interested organizations may contact info@dnyandeep.com or info@dnyandeep.net to finalise terms of collaboration.
- Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli
- Phone -- + 919422410520 / +01 4083387672
You can any of these numbers for WhatsApp message
Saturday, November 11, 2023
Dnyandeep internship training program.
ज्ञानदीपच्या सहकार्याने इंटर्नशिप प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करा.
ज्ञानदीप फाऊंडेशनने उद्योग व व्यवसाय प्रकल्पांमध्ये प्रशिक्षण आणि अनुभव प्रदान करण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या सक्रीय सहभागातून इंटर्नशिप प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची योजना आखली आहे. यात सहभागी होणा-या संस्थांना आपल्या खोल्या, प्रयोगशाळा व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साहाय्याने आपल्याच संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडणा-या माजी विद्यार्थ्यांना असे व्यवसायोपयोगी प्रशिक्षण देऊ शकतात.
ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि.ही सांगलीतील कंपनी वेबडिझाईन, सॉफ्टवेअर व मोबाईल एप डेव्हलपमेंट क्षेत्रात गेली 22 वर्षे कार्यरत आहे. या संस्थेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन अनेक विद्यार्थी भारत व परदेशात उच्च पदावर काम करीत आहेत. ज्ञानदीप फौंडेशन पर्यावरण अभियांत्रिकी, हरित तंत्रज्ञान आणि संगणक प्रशिक्षण या क्षेत्रात गेली 15 वर्षे कार्य करीत असून महाराष्ट्रात तसेच परदेशांत अनेक सेमिनार व प्रशिक्षण वर्ग संस्थेने आयोजित केले आहेत. अनेक शिक्षण संस्थांतील सध्या कार्यरत असणारे व निवृत्त अनुभवी प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिक ज्ञानदीपच्या या योजनेत सहभागी होऊ शकतील.
अमेरिकेतील हॉरवर्ड विद्यापिठाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या स्टार्ट अप उपक्रमात पार्टनर होऊन त्यांच्या व्यवसायवाढीस मदत व प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढे आले पाहिजे. तरच माजी विद्यार्थ्यांतून उद्योजक निर्माण होण्यास वा खाजगी क्षेत्रात त्याना चांगल्या नोकरीच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.
मला असे वाटते की शिक्षणसंस्थांनी व्यवसाय वाढीचे मुख्य भागधारक बनले पाहिजे. ज्ञानदीप याबाबतीत उद्योग व शिक्षणसंस्था यातील समन्वयाचे काम करेल. तसेच ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या व्यावसायिक संस्थेच्या माध्यमातून परिक्षा घेऊन प्रत्यक्ष अनुभवाचे शिफारसपत्र देऊ शकेल.
या योजनेत सहभागी होण्याची इच्छा असणा-या व्यक्ती व संस्थांनी info@dnyandeep.com किंवा info@dnyandeep.net वर ज्ञानदीपशी संपर्क साधावा आणि योजनेचे प्रारूप ठरवावे ही विनंती.
या प्रस्तावित योजनेबाबत आपली मते वा मार्गदर्शक सूचना कळवाव्यात ही विनंती. कारण सर्वांच्या सक्रीय सहभागाशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही.
आभारी आहे.
- डॉ. एस. व्ही. रानडे ( निवृत्त प्राध्यापक, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली) , ज्ञानदीप, सांगली
- फोन -- + 919422410520 / +01 4083387672
व्हॉट्सअॅप मेसेजसाठी तुम्ही यापैकी कोणताही नंबर वापरू शकता.
Tuesday, November 7, 2023
आंतरभारती -भारतीय भाषा भगिनी
भारतातील गोरगरीब, अशिक्षित आणि ग्रामीण भागात राहणा-या लोकांपर्यंत देशातील सुधारणा पोचाव्यात व त्यांचे जीवनमान सुधारावे या हेतूने शासनाने त्रिभाषा सूत्र स्वीकारून भाषावार प्रांतरचना अंमलात आणली. मात्र याचा फायदा होण्याऐवजी भाषा हेच प्रांताचे आत्मसन्मानाचे स्वरूप बनून प्रांताप्रांतात सीमेवरून संघर्ष सुरू झाला. त्याचेच पर्यवसान, दुस-या भाषेच्या व ती बोलणा-या लोकांविषयी तिरस्कारात रुपांतर झाले. परिणामी राष्ट्रीय एकात्मतेच्या मूळ कल्पनेलाच धक्का बसला. प्रत्येक दोन प्रांतांच्या सीमारेषेलगतच्या प्रदेशात भाषा अभिमानावरून दुही माजली आणि संघर्षमय वातावरण निर्माण झाले.
खरे पाहता दर कोसागणिक (२० मैल) भाषा बदलते. लिपी तीच राहिली तरी बोली बदलते. दोन भाषांच्या सीमारेषेवरील लोकांना आपल्या दैनंदिन कामासाठी दोन्ही भाषा याव्या लागतात. त्यामुळे या भागातील लोकच खरे तर भाषा एकमेकांना विनाविवाद एकत्र जोडण्यात मदत करू शकतात. भाषेची लिपी वेगळी असेल तर मात्र यात ब-याच अडचणी येतात. कारण अक्षरओळख आणि लिहिण्याच्या सवयीला फार वेळ लागतो जो फक्त बालपणातच सर्वांना उपलब्ध असतो.
आता मायमराठीचे कार्य वाढवत असताना भाषांतर व्यवसायाला आलेले महत्व लक्षात आले. सीमाभागातील लोकांना दोन भाषा येतात किंवा समजतात. दोन्हील प्रांतातील साहित्य आणि संस्कृतीची त्याना माहिती असते. भाषांतर व्यवसायात या भागातील लोकांना सहज प्रगती करता येईल. त्याहीपेक्षा उद्योग आणि व्यवसायासाठीही दोन्ही प्रातांत त्याना वाव मिळेल.
त्याबरोबर भारतीय भाषांमध्ये असलेले साहित्य आणि इतर शास्त्रांचे ज्ञान एकत्र झाल्यावरच या भाषांची खरी प्रगती होईल आणि भाषांभाषांतील दुरावा नाहिसा होऊन परस्पर विश्वास व आदर वाढीस लागून राष्ट्रीय एकात्मतेस बळ मिळेल. शिवाय भाषांतराच्या व्यवसायातून सर्वसामान्य लोकांनाही अर्थार्जनाचे साधन उपलब्ध होईल.
प्रत्येक दोन प्रांतांच्या सीमाभागात असणा-या शाळा कॉलेजमधील शिक्षकांच्या मदतीने हा मोठा प्रकल्प हाती घेता येईल.अनेक भारतीय भाषांच्या खिडक्या वेबसाईटच्या माध्यामातून उघडल्या की प्रत्येक खिडकीतून एक वेगळे साहित्यविश्व पहावयास मिळेल. साहित्यकार व इतर सर्व क्षेत्रातील आजवर माहीत नसलेल्या मान्यवरांचा परिचय होईल. माहिती देवाण घेवाणासाठी नवे सेतू तयार होतील. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानदीपचे हे आंतरभारतीचे योगदान निश्चितच सर्वमान्य होईल.
शिक्षणक्षेत्रांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच सामाजिक संस्थांमधील लोकांचे याला सक्रीय सहकार्य मिळेल असा मला विश्वास वाटतो.
शालेय स्तरावर मराठीतून वेबसाईट डिझाईन
ज्ञानदीपने मराठीतून वेबसाईट डिझाईन शिकविण्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांना हा प्रसिद्धी स्टंट वाटला. अमेरिकेतील माझ्या माहितीच्या काही लोकांनी वेबसाईट डिझाईन आता कालबाह्य तंत्रज्ञान झाले असून फेसबुक, व्हॉट्सएप, गुगलसारख्या सर्वव्यापी आणि सोप्या प्रसारमाध्यमांचा उपयोग आपल्या शिक्षण, व्यवसाय वा छंद जोपासण्यासाठी करणे जास्त उपयुक्त आहे असे मत व्यक्त केले. शिवाय वेबडिझाईनसाठी अनेक नो-कोड किंवा ड्रॅग-ड्रॉप सुविधा नेटवर उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले.
मात्र या सुविधा वापरत असताना वेबसाईट म्हणजे काय, तिचे कार्य कसे चालते याची माहिती न झाल्याने एक प्रकारचे परावलंबित्व येते. तसेच या प्रसारमाध्यमांचे तंत्रज्ञान एक अवघड आणि अनाकलनीय असून आपल्याला त्यात काही काम करणे अशक्य आहे असा ग्रह होतो.
वेबडिझाईन हे तंत्रज्ञान आता शालेय विद्यार्थीही मराठीतून सहज शिकू शकतो. या माहितीचा उपयोग करून त्याला हवी तशी वेबसाईट तयार करता येते आणि आपले विचार इंटरनेटवर प्रसिद्ध करता येतात. आतापर्यंत गृहपाठात लिहिले जाणारे लेख, कविता वा गोष्टी विद्यार्थ्यांना नेटवर प्रसिद्ध करता आल्या तर त्याना जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळू शकते. शिवाय गुगल ट्रान्स्लेटद्वारे भाषांतर होऊ शकत असल्याने त्याचा लाभ इतर भाषा येणा-या विद्यार्थ्यांनाही होऊ शकतो.
यासाठी वेबडिझाईनची प्राथमिक सर्व माहिती व्हिडिओ, मराठीतून लेख आणि प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून देऊन त्यांना या तंत्रज्ञानाविषयी वाटणारी भीती दूर करून एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा ज्ञानदीप प्रयत्न करणार आहे. शिवाय मराठी भाषेचा वापर करणे आपल्या परिसर व निसर्गसंवर्धनाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी याचा उपयोग ङोईल व एकूणच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे शक्य होईल असे ज्ञानदीपला वाटते.
तरी या ज्ञानदीपच्या अभिनव प्रयोगाचे विद्यार्थी व महाराष्ट्रातील जनता स्वागत करेल व इंग्रजीचा वरचष्मा मोडून काढून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीला आपले मानाचे स्थान मिळू शकेल अशी मला आशा आहे.