Thursday, July 30, 2020

भारतीय भाषा आणि भाषांतर व्यवसायास नवसंजीवनी

 नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेण्याची तसेच पुढील शिक्षणासाठीही मातृभाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची सोय सर्व शिक्षणसंस्थांना करावी लागणार आहे.

आत्मनिर्भर भारताच्या विकासासाठी आणि समाजाच्या तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण अपरिहार्य आहे. ज्ञानदीपने इ. स. २००० पासूनच यासाठी प्रयत्न सुरू केले. मराठी तसेच संस्कृत भाषेतील वेबसाईट, सॉफ्टवेअर  आणि मोबाईल सुविधा निर्माण केल्या. भाषा, स्थानिक माहिती याबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान यातही मराठीचा आवर्जून वापर केला.

मात्र अजूनही महाराष्ट्रात मराठीला शिक्षणक्षेत्रात गौण स्थान  राहिले आहे.मराठीत शिकलेल्या विद्यार्थ्यांना कमीपणाची वागणूक समाजाकडून दिली जाते. कोणत्याही शहराची वा गावाची सर्व माहिती मराठीत  उपलब्ध नाही ही खेदाची गोष्ट आहे.

मराठी भाषेत असलेले ज्ञानभांडार इतर भाषांत भाषांतर करून ते देशभरात व सर्व जगभर पोहोचविणे आणि इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठीत आणणे या दोन्ही क्षेत्रात सरवसामान्य जनतेलाही घरबसल्या व्यवसायाची आणि पैसे मिळविण्याची फार मोठी संधी या धोरणामुळे निर्माण झाली आहे.

भाषांतराचा हा व्यवसाय भविष्यात फार मोठ्या प्रमाणावर वाढणार असून ज्ञानदीप फौंडेशन यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार करून याचा प्रसार करणार आहे.

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणसंस्थांनी यात पुढाकार घेऊन ज्ञानदीपच्या या अभियानात सक्रीय सहभागी व्हवे असे आवाहन मी करीत आहे. - सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

No comments:

Post a Comment