Tuesday, February 25, 2020

सांगली आयटी पार्क सुरू होण्याची गरज

महाराष्ट्राचे माजी उद्योगमंत्री कै. श्री. पतंगराव कदम यांनी सांगलीच्या विकासासाठी  सांगली येथील विश्रामबाग रेल्वेस्टेशन नजिक सांगलीच्या आय टी पार्कची उभारणी केली होती. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सांगलीचे आय टी पार्क नावलौकीक मिळवेल. सांगलीच्या उद्योगजगतास नवी संजीवनी मिळेल व येथील या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल अशी आशा सर्व सांगलीकर बाळगून होते.

आमच्या ज्ञानदीप इन्फोटेकने त्यात जागा मिळण्यासाठी अर्ज केला होता. तसेच आम्ही या सांगली आयटी पार्कची वेबसाईटही डिझाईन केली होती.


मात्र डेक्कन एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र उद्योग विकास मंडळ यांच्यात काही न्यायालयीन वाद निर्माण होऊन आयटी पार्क कार्यान्वित होण्यात अडचणी आल्या. आज या आयटी पार्कची तयार इमारत महाराष्ट्र उद्योग विकास मंडळाच्या ताब्यात असून ती एका उद्योगाला भाड्याने देण्यात आली आहे.

सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन न्यायालयीन वाद बाजूला ठेवून संयुक्तरीत्या आयटी पार्क चालविण्यासाठी पुढाकार घेतला तर सांगलीचे भाग्य उजळेल.

सांगलीच्या विकासासाठी राजकीय पक्षांनी जर यात पुढाकार घेऊन समन्वय घडवून आणला व शासनाकडे पाठपुरावा करून बाकी अडचणी दूर केल्या तर ती एक महत्वाची उपलब्धी ठरेल. ज्ञानदीप फौंडेशन याबाबतीत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे.

Monday, February 24, 2020

Parallel processing in sub-conscious mind

We often perceive interactions with many persons closely related to us and get their views pertaining to event or scenario, which are typical of their thought process and completely different than our own thinking. How it is possible as our mind is governed by our own thought process.

It has to originate from our mind, has to collect resources like context and information and build conclusive opinion to put before our main thought process.

It indicates that the patterns of their thinking process and logic are stored in our memory, they get activated during dream as there is no binding of conscious mind.

 Thus parallel threads of thinking go on building in the mind and provide a virtual reality to the scene or event in dream.

This might be the reason, why
  • The saints and pious people experience the God as they have imagined  and built their personality during their lifetime study.
  •  Scientists get clues to intriguing problems in novel way which surprises them and leads to new discovery.
The idea of parallel processing is not new to chip design and computer coding. This enhances processing power of computer many times. Our brain is a great master computer and it must be using all methods of computer algorithums like parallel processing, object oriented working, MVC pattern and what not.

We say that our parents and  loved ones create a permanent separate memory zone in our mind and help us with their care and advise. I feel that it is physically and psychologically true.

May be our all characteristics are carried from our ancestors in the same way but are more deeply embedded in our conscious thought process and physical build up.

Experts in philosophy, psychology and physiology may open up this secret relationship which builds our personality.





Saturday, February 22, 2020

बीओटीतून देशाचा विकास की विक्री

व्यापाराच्या निमित्ताने ब्रिटीश भारतात आले व त्यानंतर त्यांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले हे सर्वांना माहीत आहे. डच, पोर्तुगीज या छोट्या परदेशातून व्यापार करण्यासाठी आलेल्या लोकांनीही आपल्या देशाच्या काही भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली. हे विसरता कामा नये. आज प्रत्यक्ष भूभागाची मालकी परदेशांकडे जाण्याची शक्यता नसली तरी सत्तेचे उद्दीष्ट असणारा पैसा परदेशात जाऊन भारतातील पुढची पिढी कर्जरुपी गुलामगिरीत जाण्याचा धोका बीओटीतून विकासाच्या गोष्टी करणार्‍यांनी ध्यानात घेतला पाहिजे.

माझ्या माहितीत अशी अनेक उदाहरणे आहेत की जेथे आवश्यकता नसताना व दुसरा पर्याय उलब्ध असतानाही बीओटी पद्धतीचा वापर केला गेला आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षण व खर्चाचा अंदाज काढण्याचे काम खरे पाहता स्थानिक पातळीवर कमी खर्चात व अधिक प्रभावीपणे होऊ शकले असते. मात्र त्यासाठी राज्यातल्या सर्व शाळांचे काम एकत्र करून निविदा काढण्यात आली. इकोव्हिलेज योजना स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडून स्थानिक परिस्थिती व गरजांनुसार होऊ शकत असताना त्यांच्याऎवजी त्याचे एकत्रीकरण करून मोठे कंत्राट करण्यात आले. सोलापूर मलजलशुद्धीकरण बीओटी प्रकल्पात बलाढ्य परदेशी कंपन्यांच भाग घेऊ शकतील अशा विशिष्ट अटीं घालण्यात आल्या. शाळेत संगणक शिक्षणाचे काम शिक्षक नेमून करण्याऎवजी ५००० शाळांसाठी बीओटी तत्वावर निविदा मागवल्याचे उदाहरण ताजे आहे.

विविध प्रकल्पांसाठी जपान, स्विट्झर्लंड, अमेरिका, आस्ट्रेलिया अशा देशातून बीओटी तत्वावर योजना हाती घेणार्‍या कंपन्यांना व आर्थिक पतपुरवठा करणार्‍या संस्थांना बोलावण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली दिसते. जो त्यात यशस्वी होईल त्याला विकासाचे श्रेय मिळते हे उघड आहे. मात्र या प्रकल्पात परदेशी कंपन्यांना त्यांचे तंत्रज्ञान व तेथील यंत्रसामुग्री विकण्याची संधी यामुळे मिळते तसेच भांडवल परतीचे खात्रीचे व फायद्याचे साधन उपलब्ध होते हे कोणाच्या लक्षात येत नाही. जागतिक बॅंकेच्या सहकार्याने होणार्‍या बहुतेक प्रकल्पात असा धोका दडलेला असतो.

आपल्या देशात गरिबी व बेरोजगारी आहे. त्यावर मात करण्यासाठी जलद गतीने देशाचा सर्वांगीण विकास होणे ही आवश्यक गोष्ट असली तरी हा विकास आपल्याला आर्थिक गुलामगिरीत ढकलत नाही ना याची काळजी घॆणॆ तितकेच महत्वाचे आहे. बीओटीतून विकास प्रकल्प राबविताना भांडवलाची चिंता नसल्याने उठसूट गल्लीपासून दिल्लीपर्यंत व छोट्या प्रकल्पापासून महाकाय प्रकल्पांपर्यंत सर्वठिकाणी बीओटी पद्धतीचा उपयोग करण्याची जी सवय नेत्यांना लागली आहे ती चुकीची आहे. त्यातून अनेक छोटी कामे एकत्र करून त्याचे बजेट एवढे मोठे करायचे की कोणतीही स्वदेशी कंपनी वा सहकारी संस्था त्यात सहभागी न होता केवळ परदेशी बहुराष्ट्रीय कार्पोरेट कंपन्यानाच ते काम मिळेल अशी व्यवस्था करणे तर देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीनेही अत्यंत घातक ठरणार आहे.

मुळात बीओटी हवीच कशाला? बॅंकाकडून थेट कर्ज घेऊन छोट्या प्रकल्पाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी उचलणे बंधनकारक करावयास हवे. साहजिकच अत्यावश्यक कामांसाठीच व काटकसरीने प्रकल्प राबविले जातील. प्रकल्पांचे एकत्रीकरण न करता उलट शक्य तितके विकेंद्रीकरण करून ते स्थानिक उद्योगांच्या आवाक्यात येतील एवढे छोटे केल्यास स्थानिकांचा सहभाग वाढेल. रोजगारनिर्मिती होईल व होणारा विकास हे अवजड ओझे न वाटता जनताही त्याचा आनंदाने स्वीकार करेल.

बीओटीसाठी भांडवल उभारणी व परतफेडीची व्यवस्था भारतातील आस्थापनांच्या साहाय्याने करणे हा काही मोठा अवघड प्रश्न नाही. आपल्या देशात सहकाराने चांगले मूळ धरले आहे. आपली बॅंकिंग व्यवस्था मजबूत आहे. प्रकल्प आखणी करणार्‍या तज्ज्ञ सल्लागारांची व अभियंत्यांची काही उणीव नाही. व्यवस्थापन व संगणकीय कार्यातही आपला देश अग्रेसर आहे. संधी दिली तर देशातील प्रत्येक प्रकल्पासाठी भारतातच भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी अनेक सहकारी संस्था व छोटे स्वदेशी उद्योग पुढे येऊ शकतील. महत्वाचे म्हणजे त्यांनी मिळविलेला नफा परदेशात न जाता आपल्या देशातच समृद्धीचे नवे पीक आणेल.

यासाठी गरज आहे ती दृष्ट्या योजकाची. देशातील साधनसंपत्तीचा व कुशल मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करण्याच्या हेतूने प्रकल्पांची व्याप्ती व कालमर्यादा ठरविणॆ. परदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना येथील ग्राहक मिळवून देण्याचा प्रयत्न न करता ते काम आपल्या देशातील संस्थांनाच कसे मिळवून देता येईल याचा कसून प्रयत्न करायला हवा. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच परदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य घॆणे हितकारक ठरेल. याबाबतीतही प्रकल्पाचा स्वामित्व अधिकार स्वदेशातच राहील याची काळजी घेतली पाहिजे.

अन्यथा बीओटीतून देशाचा विकास न होता ती देशाची विक्री केल्यासारखे होईल व आपली पुढची पिढी आर्थिक कर्जाच्या गुलामगिरीत खितपत पडेल.

Thursday, February 20, 2020

जुन्या ध्येयवादी शिक्षणसंस्था धोक्यात

सध्या नव्या आलिशान व आकर्षक इमारती आणि सोयी सुविधा असणा-या अनेक शैक्षणिक संस्था आपल्या भव्य जाहिरातींच्या जोरावर विद्यार्थी व पालकांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतांना दिसत आहेत. पण त्याचवेळी जुन्या, मान्यवर  ध्येयवादी संस्था दुर्लक्षित व अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत.

 त्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय व धनवान शक्ती  कुटील कारस्थाने करण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी जागरूक राहण्याची गरज आहे. त्याना समाजाने आधार देऊन बलवान आणि सुसज्ज करण्याची गरज आहे.

पुण्याला विद्येचे माहेरघर असे नाव मिळण्यास  डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा मोठा वाटा आहे. सांगलीसही पुण्याखालोखाल असे नाव  मिळवून देण्यात या सोसायटीच्या विलिंग्डन आणि चिंतामणराव कॉमर्स  या कॉलेजचे मोठे योगदान आहे.

आज या संस्थेकडे पुणे व सांगली या दोन्ही ठिकाणी मध्यवर्ती भागात मोठी जागा आहे. मात्र आर्थिक पाठबळ नसल्याने नवे उपक्रम आणि सोयी सुविधा सुरू करणे सोडा पण साधे    परिसराचे संरक्षण व संवर्धन करणेही मुष्कील झाले आहे.

विविध रंगी आकर्षक कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या शैक्षणिक संस्था पाहिल्यावर डोळे दिपून जातात. तर जुन्या ध्येयवादी शिक्षणसंस्थांचा परिसर पाहताना डोळे पाणावतात. त्याचवेळी या संस्था राजकीय आणि धनवान शक्तींपासून वाचविण्याचे प्रयत्न करणा-या वृद्ध, आजारी विश्वस्थांची जिद्द पाहून धन्य वाटते.

त्यांच्या या संघर्षाला या संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून समर्थ साथ मिळावी यासाठी ज्ञानदीप फौंडेशन आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे.

Friday, February 14, 2020

आजच्या युवापिढीसाठी नवे अर्थशास्त्र

लहानपणापासून आपल्या मनावर श्रीमंत होण्यासाठी खूप अभ्यास करणे अत्यावश्यक आहे हे बिंबविलेले असते. मात्र प्रत्यक्षात बहुतेक वेळा आपल्याला अभ्यासात फारशी प्रगती न केलेली माणसेच श्रीमंत झालेली दिसतात. हे असे का याचे कोडे आपल्याला उलगडत नाही. याचे कारण म्हणजे  जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारे खरे अर्थशास्त्रच आपल्याला ठाऊक नसते.

रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या  रिच डॅड पुअर डॅड ( Rich Dad Poor Dad) या जगप्रसिद्ध पुस्तकात मोठ्या मनोरंजक गोष्टीच्या स्वरुपात या अर्थशास्त्राची ओळख करून दिली आहे. पुस्तक वाचल्यानंतर भारतातील नोकरी की उद्योग या संभ्रमात पडलेल्या  युवा पिढीला यातून चांगले मार्गदर्शन मिळेल असे मला जाणवले. त्यादृष्टीने या पुस्तकातील सारांश मी खालील ब्लॉगमध्ये मांडला होता.
http://dnyandeep.blogspot.in/2008/05/rich-dad-poor-dad.html
तरीदेखील मराठी वाचकांसाठी त्याचा मतितार्थ पुढे देत आहे.

रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात अमेरिकेतील श्रीमंत आणि गरीब वडील असणार्‍या दोन शाळकरी मुलांची गोष्ट आहे. प्रत्यक्षात दोघांची आर्थिक स्थिती उत्तम आहे.  तरीदेखील एकाला श्रीमंत व दुसर्‍याला गरीब संबोधण्यामागे लेखकाचा उद्योजक व नोकरदार यांच्यातील आर्थिक स्थितीतील फरक दाखविण्याचा उद्देश आहे.

आत्मकथनाच्या स्वरुपात रॉबर्ट कियोसाकी यांच्या जीवनातील अनुभव शेरॉन लेश्टर लेखिकेने या पुस्तकात मांडले आहेत. पुस्तकाचा नायक एका प्रतिथयश विद्वान प्रोफेसरचा मुलगा आहे. नऊ वर्षाच्या या मुलाला त्याच्या उच्चशिक्षित आईवडिलांकडून ‘नियमितपणे चांगला अभ्यास कर. उत्तम मार्काने पास हो. पुढे उच्च शिक्षण घेतलेस की तुला उत्तम नोकरी मिळेल व जीवनात तू सुखी होशील’ असे सांगितले जाई. पण या मुलाला जेव्हा असे दिसते की शाळेतला त्याचा मित्र माईक याचे वडील फारसे शिकलेले नसूनही आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडून श्रीमंत होण्याची विद्या मिळविण्याचे तो ठरवितो.

माईकचे वडील छोटे उद्योजक असतात. त्यांचे ऑफिस अगदीच साधे कामचलाऊ स्वरुपाच्या इमारतीत असते. ही दोन्ही मुले त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटतात व श्रीमंत होण्याचा मार्ग विचारतात. माईकचे वडील म्हणतात. मी ते शिकवीन पण त्याबदलात तुम्ही माझ्याकडे काम करावयास हवे. मोठ्या उत्साहाने शाळा सांभाळून शनिवार रविवार यादिवशी ते इतर कामगारांप्रमाणे काम करू लागतात. दिवसाच्या कामाचे वेतनही त्यांना दिले जाते. मात्र माईकचे वडील महिनाभर झाला तरी त्यांना भेटतच नाहीत. रॉबर्टचे वडीलही म्हणतात तुमच्या कामाच्या मानाने पगारही अगदी तुटपुंजा आहे.  ते तुमची पिळवणूक करीत आहेत. 

रॉबर्ट शेवटी धाडस करून माईकच्या वडिलांना भेटतो व विचारतो की आम्हाला तुम्ही काहीच शिकविले नाही आमच्याकडून काम मात्र करून घेत आहात. आणि पगारही खूपच कमी आहे. ते हसतात व म्हणतात. ‘आता खरे तुमचे शिक्षण सुरू झाले आहे. तुमच्या पगारात मी वाढ करतो. पुन्हा नंतर भेटू. ’ काही शिक्षण न होताच वाढीव पगारावर काम चालू रहाते. 

थोडे दिवसांनी रॉबर्ट कंटाळतो व त्यांच्याकडे जाऊन आपली चीड व्यक्त करतो व नोकरी सोडत असल्याचे सांगतो. त्यावेळी माईकचे वडील त्याला सांगतात. ‘आता तुझ्या शिक्षणातील महत्वाचा टप्पा पार पडला आहे. मला तुझे कौतुक वाटते की तू इतर कामगारांसारखा पगारवाढीची मागणी न करत नोकरी सोडण्याचा विचार करीत आहेस. प्रत्यक्षात बहुतेक सर्व लोक अधिक पगाराची नोकरी हाच श्रीमंतीचा मार्ग आहे असे समजतात व उंदरांच्या धावण्याच्या स्पर्धेप्रमाणे ठराविक मर्यादेतच धडपड करीत राहतात. याउलट उद्योजक किंवा भांडवलदार हे स्वतः अगदी काम करतात. मात्र पैसा मिळविण्याचे काम त्यांनी उभारलेल्या उद्योगातील कर्मचारी वा घातलेल्या भांडवलामार्फत केले जाते.

नोकरदार मिळालेले पैसे अनुत्पादक गोष्टी म्हणजे घर, गाडी वा चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरतात. त्यासाठी बॅंकांकडून दिलेल्या कर्जाचा व क्रेडिट कार्डचा वापर करतात.  या गोष्टी त्यांना गुंतवणूक वाटते. मात्र घर व गाडीचे कर्ज फेडण्यासाठी बॅंकांचे ते कायम कर्जदार बनतात. शिवाय पगारवाढीबरोबर सरकारी करांचा बोजाही त्यांच्यावर पडतो. त्यामुळे पगार वाढला तरी त्याप्रमाणे खर्चही वाढत जातो व कर्ज फेडीचे दायित्व त्यांना श्रीमंत होऊ देत नाही.

 याउलट उद्योजक चैनीसाठी खर्च न करता ज्यामुळे उत्पादन वाढेल अशा यंत्रसामुग्रीत वा कुशल कामगार नेमण्यासाठी कर्ज काढतात. या कर्जातून संपत्तीची निर्मिती होते. उद्योजकाच्या खिशाला या्ची चाट बसत नाही. भांडवलदार आपले पैसे फायद्याच्या उद्योगात गुंतवितात व त्यातून श्रीमंत होतात.’

भारतात आज नोकरीसाठीच मुख्यत्वे शिक्षण घेतले जाते. त्यामुळे जास्त पगाराच्या नोकर्‍या मिळण्याची शक्यता असणार्‍या व्यावसायिक शिक्षणासाठी पालक प्रचंद खर्च करण्यास मागेपुढे पहात नाहीत. विद्यार्थीही परिक्षेत जास्त मार्क मिळण्यासाठी कसून अभ्यास करतात. तरी नोकरी हवी असणार्‍या युवकांच्या प्रचंड संख्य्च्या मानाने उपलब्ध नोकर्‍या अगदी कमी असल्याने बहुतेकांची निराशा होते व कमी पगारावर खालच्या दर्जाची नोकरी स्वीकारणे किंवा आणखी शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी एमबीए वा स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करीत वेळ पैसा घालवतात.

 अशावेळी उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी लागणारे अर्थशास्त्र वेगळ्या पद्धतीने शिकविण्यासाठी अशा पुस्तकांची गरज आहे.

 प्रस्तुत लेखकानॆ रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाच्या यशानंतर कॅशफ्लो क्वाड्रंट (Cash Flow Quadrant) या नावाचे दुसरे पुस्तक प्रसिद्ध केले व सर्वांना सहज हे खरे अर्थशास्त्र शिकण्यासाठी एक खेळ विकसित केला आहे. 

Thursday, February 13, 2020

नव वर्षाची भेट - शुभांगी काँम्प्यूटर प्रशिक्षण योजना

नव वर्षानिमित्त ज्ञानदीप आपल्या info@dnyandeep.net या वेबसाईटवर खास महिलांसाठी परस्पर  सहकार्यावर आधारित शुभांगी काँम्प्यूटर प्रशिक्षण योजना सुरू  करीत  आहे. यात  सहभागी  होण्यासाठी  कोणतेही शुल्क  नाही.

ज्या महिलांना या योजनेत  भाग घ्यायची  इच्छा असेल त्यांनी info@dnyandeep.net या पत्त्यावर ईमेल पाठवून आपले नाव नोंदवावे  तसेच आपले काँम्प्यूटर प्रोग्रेमिंगमधील पूर्व शिक्षण  व कोणत्या प्रकारचे  प्रशिक्षण घ्यायची  इच्छा आहे  या विषयी माहिती  द्यावी ही  विनंती.

As a new year gift, Dnyandeep Foundation is planning to start collaborative self paced learning platform Shubhangi Computer Education Forum for  women who can use this forum to exchange information, teach and learn computer programming online from home at any convenient time without hampering home bound duties. 

No pre-requisite qualification or experience is needed. Initially Web Design is considered as starting point. But different topics like computer languages, app development, CMS, digital marketing can be taken up based on group formation where  at least one expert is available for that topic.  

The membership of this forum is Free.

Those who wish to take part in this project may contact Dnyandeep Foundation by sending mail to info@dnyandeep.net. 

You may inform details about your learning preference of topic and your capability of guiding topic where you have expertise and experience.

This facility is being provided as a homage to 

Late Sou. Shubhangi S. Ranade

who pioneered formation of 

Dnyandeep Infotech Pvt. Ltd. 

and 

Dnyandeep Education and Research Foundation 

at Sangli for computer education and empowerment of women.

Wednesday, February 12, 2020

Time machine for predictive imagination

We all know the story of time machine written by H. G. Wells, wherein we can go in past or future to experience the life at that time. Based on this concept many interesting stories, TV series and films were produced applying this idea for particular period in history of mankind or what would happen in future due to technical advances or environmental changes.

 A thought came in my mind that we can use this concept proactively to trace the possible alternatives in our own life. Accordingly, in my imaginary time machine there will be options for going back with time slots like day, week,  year or events in our life where we have taken major decisions to select our course of life. It would be an interesting exercise to plot our possible  change in life  pattern with that changed decision.

It will be more useful for future planning if the same concept is used to predict the scenarios in our life or business. Our all decisions are outcome of our predictions about future at current time. But if we extend this concept and explore all the possible future options that could be available in time periods like next week, month or year or expected future state, we can analyse the resulting scenarios much beforehand based on our present understanding of our life or business.

Thorough analysis of options that would be available in future would produce a multi threaded  diagram of scenarios and decision events. This diagram will be modified continuously as we travel in future by considering changes in  options and or emergence of new events.

Many large scale  complex projects like international corporate businesses, weather predictions, biodiversity changes may be greatly benefited by such approach as they have access and capacity to gather and analyse large time variable data continuously.

At individual level, we can develop our own future decision tree based on our limited knowledge. This would be an interesting exercise giving scope to our imagination and mental satisfaction of traveling in time machine.