Saturday, August 31, 2019

ब्लॉग कसा लिहावा

इंटरनेटवर आपण आपली मते, लेख, फोटो प्रसिद्ध करण्यासाठी ब्लॉग लिहू शकता.रेडिफ, मनोगत, उपक्रम, इसकाळ, महाराष्ट्र टाईम्स इत्यादी अनेक वेबसाईटवर मराठीत मोफत ब्लॉग प्रसिद्ध करण्याची सोय करण्यात आली आहे. ब्लॉगर डॉट कॉम(www.blogger.com) या गुगलच्या वेबसाईटवर आपल्याला आपला जीमेलचा युजरनेम, पासवर्ड वापरून स्वतःची ब्लॉग वेबसाईट सुरू करता येते.आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

ब्लॉगसाईट सुरू करणे


प्रथम ब्राउजरमध्ये http://www.blogger.com/ ही वेबसाईट उघडावी. ब्लॉगर वेबसाईटच्या बॅनर खाली डाव्या बाजूला ब्लॉग सुरू करण्यासाठी काय करावे याची लिंक, ब्लॉगसाईटच्या नमुन्यांची चित्रे तर उजव्या बाजूला गुगल मेल अकौंटचा बॉक्स दिसतो. त्यात आपला जीमेलचा युजरनेम व पासवर्ड भरावा. साईन इन बटन दाबले की नवे वेबपेज उघडते. ब्लॉगवर आपले नाव कसे असावे ते लिहावे. ब्लॉगर साईटच्या अटी व नियम वाचून त्याला मान्यता द्यावी. Create a Blog वर क्लिक करावे.

नव्या पानावर ब्लॉगसाठी द्यावयाचे नाव (शीर्षक) नाव व ब्लॉगरसाईटच्या लिंकचे नाव लिहावे (ते यापूर्वी दुसर्‍या कोणी घेतले असेल तर वेगळे नाव निवडावे लागते.) त्या पानावर दिलेल्या ब्लॉग नमुन्यांमधून आपल्या पसंतीचा नमुना (Template) निवडावा.आपली स्वत;ची माहिती व फोटो घालावा. तसेच आवश्यक भासल्यास ब्लॉगच्या मांडणीत व दृश्य स्वरुपात आपणास हवे असणारे बदल सीएसएसमध्ये करावेत.

ब्लॉगरसाईटच्या डॅशबोर्डवर नवा ब्लॉग पर्याय निवडावा. ब्लॉगचे शीर्षक लिहावे व खालच्या मोकळ्या रकान्यात आपल्या ब्लॉगचा मजकूर लिहावा. हा मजकूर आधी नोटपॅडमध्ये वा वर्डमध्ये टाईप करून कॉपी पेस्ट केला तरी चालतो.

Preview बटन दाबून ब्लॉग कसा दिसेल ते पाहता येते व Edit बतन दाबून त्यात दुरुस्त्या करता येतात. खालच्या पट्टीत आपणास ब्लॉगसाठी काही शोधसूचक शब्द(Label) द्यावयाचे असल्यास देता येतात. ब्लॊग व्यवस्थित तयार झाला की Publish बटन दाबावे व तो प्रसिद्ध करावा.

आता आपला ब्लॉग प्रसिद्ध झाला आहे अशी सूचना व View Blog / Edit Blog असे पर्याय येतात. View Blog बटनावर क्लिक केले की ब्लॉग आपणास प्रसिद्ध झालेला दिसतो.

ब्लॉगवर फोटो वा चित्र घालणे
ब्लॉगच्या टूलबारमधील Add Image असा टॅग असणार्‍या चित्रावर क्लिक करावे. नव्या पॉप अप विंडोमध्ये हवा तो फोटो वा चित्र आपल्या कॉम्प्युटरवरून ब्राऊज करून निवडावे त्याची जागा ( डावीकडे, उजवीकडे वा मध्यात) ठरवावी व Upload Image या बटनावर व नंतर Done या बटनावर क्लिक करावे.त्याचे कोड मजकुराच्या विंडोमध्ये दिसू लागते. ते काढून मजकुरात आवश्यक त्या ठिकाणी पेस्ट करावे.

असे अनेक ब्लॉग आपल्याला लिहिता येतात. त्यांचे संपादन करता येते. वाचकांचे त्यावर अभिप्राय घेता येतात.

इतर अनेक सोयी ब्लॉगर साईटवर आहेत. त्याव आपण गुगल अ‍ॅड्ची वा अन्य जाहिरात करू शकतो व त्यातून आपल्याला पैसेही मिळविता येतात.

Online surveillance of roads and rail for preventing accidents and sabotage


We often hear the news of accidents due to damaged road surface  or dislocation of rails. There are many cases of landmine blasts resulting in heavy casualty on the roads  in the Naxalite affected remote areas.

Visual surveillance of the road and rails for detecting any fault or any sabotage activity is not effective due to sheer long stretches of road and rails and impossibility of  physical inspection through security guards. The only effective and economical option is to set up online surveillance system with the help of CCTV cameras, laser scanners and frequent satellite imagery service. Potholes on the road, implantation of landmines could be easily and readily detected by analyzing road surface profiles.  If the entire road and rail stretches are continuously monitored by these unmanned sensor devices, any abnormal changes in the road surface  or rail alignment can be detected, sabotage activities can be identified and major accidents can be averted.

The CCTV cameras could located on electric poles on both sides of road or rails. There should be extra survellience cameras near culverts, sharp bends and thick jungle.

In addition to CCTV cameras, actual road surface profiles can be scanned by moving vehicle equipped with laser scanner.

Researchers at the Fraunhofer Institute for Physical Measurement Techniques have come up with a car-mounted laser scanner the size of a shoe box, that can survey the contours of road surfaces at speeds of up to 100 km/h (62 mph).

Fraunhofer's actual image of its road-scanning laser technology
( Ref:  http://www.gizmag.com/road-laser-scanner/27345/)

 The orientation and position of the vehicle is accomplished using the Global Navigation Satellite System (GNSS) and an inertial measurement system. Pavement Profile Scanner (or PPS) so developed by the institute  surveyed 15,000 km of road since mid-2012, in which time it has proven cheaper, faster and more accurate than existing systems which require hefty attachments to the carrier vehicle.

Online survelliance system for roads and rails can prove to be a much better,  effective and economical preventive measure to avoid accidents and detect any suspicious sabotage activities.
 The system will also help in better traffic control, rescue operations and ensure safety to passengers.

 

   

Friday, August 23, 2019

सौ. शुभांगीचा स्मृतीदिन आणि तिचे ज्ञानदीपविषयी सुवर्ण स्वप्न


आज (दिनांक २२ ऑगस्ट २०१९) माझी पत्नी कै. सौ. शुभांगीचा तृतीय स्मृतीदिन. या दिवशी तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची, जिद्दीची आणि संवेदलशीलतेची आठवण माझ्या मनात एका अनामिक पोकळीची जाणीव करून देत आहे. तिच्याबरोबर व्यतीत केलेला कालखंड आपली विविध रूपे दाखवीत मनाला भावविवश करीत आहेत. 

संगणक क्षेत्रातील तिचा प्रवास, ज्ञानदीपची स्थापना करताना असलेला उत्साह, व्यवस्थापन कौशल्य आणि स्वतः शिकण्याची व रात्रंदिवस कष्ट करण्याची सवय आणि भविष्याबाबत कायम आशावादी राहण्याची मनोवृत्ती सारेच अद्वितीय होते. ज्ञानदीपच्या यशाची तीच खरी प्रेरणास्रोत होती.

सुमारे दहा वर्षांपूर्वी ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फौंडेशन या दोन्ही संस्था तिच्या मारगदर्शनाखाली यशाच्या अत्युच्च शिखरावर गेल्या होत्या.

ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीकडे वालचंद कॉलेज, उगार शुगर, इंडियन वाटरवर्क्स, बंगलोर महाराष्ट्र मंडळ, कोल्हापूर महापालिका, कॅंन्सर ह़स्पिटल यासारख्या मान्यवर संस्थांच्या वेबसाईट  तसेच मधुरंग मेट्रिमोनियल, डॉ. किल्लेदार नेत्र रुग्णालय, नूतन बुद्धीबळ मंडळ यांचे सॉफ्टवेअर  विकसित करण्याचे काम होते.

 याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फ्रीलान्स (मुक्त स्पर्धा) तत्वावर अनेक अमेरिकन कंपन्यांची कामे ज्ञानदीप इन्फोटेकने यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉलरच्या स्वरुपात पैसे मिळविले होते. त्यावेळी ज्ञानदीप इन्फोटेककडे असणा-या कर्मचा-यांचे वेतन महिना १५ हजार रुपयांपासून ५५ हजार रुपयांपर्यंत होते.

याचवेळी ज्ञानदीप फौंडेशनने ग्रीन बिल्डींग डिझाईन व ग्रीन टेक्नॉलॉजी या विषयावर भारतात सेमिनार, कार्यसत्रे तसेच बॅंकॉक व दुबई येथे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस घेऊन लोकमान्यता व या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे संघटन करण्यात यशस्वी झाली होती.

तिच्या सुदृढ आरोग्याला अचानक ग्रहण लागले आणि तिची तब्बेत दिवसेंदिवस ढासळत गेली. याच काळात ज्ञानदीपला  इतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. हळूहळू ज्ञानदीपचे तेज मंद होत गेले. सुमारे दहा वर्षांपूर्वी ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फौंडेशन या दोन्ही संस्था यशाच्या अत्युच्च शिखरावर होत्या.

आयुष्याचा दिवस मावळत जात असला तरी  गडद होत जाणा-या अंधारातही तिला ज्ञानदीपच्या सोनेरी भविष्याची  आस होती. तिच्या आश्वासक, धैर्यशील व कार्यमग्न मनोवृत्तीमुळे माझेही मन सतत उल्हसित रहात होते. नवनव्या योजना आम्ही त्याही परिस्थितीत आखत होतो. मात्र दैवाचे फासे उलटे पडू लागले. तिची तब्बेत खालावून २२ ऑगस्ट २०१६ रोजी ती आम्हाला सोडून गेली. त्यावेळीही तिच्या चेह-यावरील निर्धार व मंद स्मित तसेच टिकून होते.

त्यानंतर मला अमेरिकेत जावे लागले. ज्ञानदीपच्याबाबतीत उषःकाल होता होता काळरात्र का झाली याचा शोध गेली दोन वर्षे त्रयस्थ वृत्तीने मी घेत होतो. दोन्ही संस्था विकल स्थितीस पोचण्यास अनेक गोष्ठी कारणीभूत झाल्या. माझ्या चुकाहा त्यास अपवाद नाहीत.

ज्ञानदीपच्या पुनरुत्थानासाठी मी इतका निग्रही, आशावादी आणि कार्यरत का झालो आहे आणि आर्थिक नुकसान का सोसत आहे याचे कोडे माझ्या जवळच्या नातेवाईकांना पडले आहे. माझे सहकारी आणि विद्यार्थीही माझ्याकडे सहानभूतीच्या दृष्टीकोनातूनच मदत करीत आहेत. परदेशात राहून ज्ञानदीपच्या या संस्था चालविण्याचा खटाटोप न करता आयुष्याच्या संध्याकाळी शांतपणे उरलेले आयुष्य व्यतीत करावे अशीच सगळ्यांची माझ्याबानतीत भावना आहे.पण माझ्या या धडपढीमागे सौ. शुभांगीचे सोनेरी स्वप्नाची पूर्तता हेच कारण आहे.

सुदैवाने आज माझ्याकडे आवश्यक तेवढा पैसा आहे. दरमहा मिळणारी पेन्शन आहे. कोणतीही आर्थिक जबाबदारी माझ्या अंगावर नाही. माझी तब्बेतही मला साथ देऊ लागली आहे. कोणी काही म्हणो आपल्या आतल्या आवाजाला मान देत यापुढील वाटचाल मी करणार आहे. माझी पत्नी कै. सौ. शुभांगीने मला शिकविलेली जिद्द आणि चाल एकला या कवितेत दिलेला संदेश मला कायम प्रेरक साथ देत राहील,

आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. एकट्या दुकट्याने प्रयत्न न करता सर्वांनी सामुहिकरीत्या एकमेकांना मदत करीत सशक्त संघटना बनवली तर ती स्थायी व परिस्थितीनुसार परिबर्तनशील होऊन आपला विकास साधू शकेल याची मला खात्री वाटत आहे. भुभांगीच्या मनातील ज्ञानदीपचा सुवर्णकाळ माझ्या दृष्टीपथात आला आहे. यामुळेच. बदललेल्या नव्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मी नव्या दमाने पुनश्च हरि ओम म्हणण्याचे ठरविले आहे. सर्वांची साथ मिळाली तर मी यात नक्की यशस्वी होईन

.( उषःकाल होता होता ... अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली )

-    आणि तीच माझी तिला योग्य श्रद्धांजली ठरेल.
-     --- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

Sunday, August 11, 2019

विकास आणि काटकसर



विकास म्हटले की अवाढव्य खर्चाच्या योजना डोळ्यापुढे येतात. सध्या निवडणुकीच्या धामधुमीत सर्व पक्ष भरघोस आश्वासने कोट्यावधी रुपयांच्या विकास योजनांच्या घोषणा करीत आहेत. प्रत्यक्षात आधी मंजूर झालेल्या योजनांसाठीही पैसा उपलब्ध नाही. मग ही भव्य दिव्य विकासाची स्वप्ने म्हणजे पोकळ घोषणांची आतषबाजीच नव्हे काय?

विनोबांनी आपल्या बोधकथेत एक छोटी गोष्ट सांगितलेली मला आठवते. रस्त्याने जात असताना त्यांना एक भला मोठा मातीचा ढीग दिसला. त्यांच्या मनात आले कि येथे एवढा मोठा ढीग आहे तर कोठेतरी तेवढाच खड्डा पडलेला असणार. जेव्हा आपण श्रीमंतांच्या मोठ्या आलिशान मोटारी टोलेजंग आकर्षक इमारती पाहतो. त्यावेळी अनेक लोकांना झोपडपट्टीत आधार घ्यावा लागला आहे हे आपण विसरतो. जर गरीब श्रीमंत यातली दरी वाढत गेली तर श्रीमंतांची श्रीमंती वाढत असताना गरीबांची गरीबीही वाढत जाणे स्वाभाविक आहे.

याच तत्वाने कोणताही मोठा विकासप्रकल्प हाती घेतला की त्यासाठी लागणारे भांडवल हे राज्याच्या वा देशाच्या आर्थिक ताळेबंदात मोठा बदल घडवते. जरी खाजगी संस्था, बँका वा परदेशी साहाय्यातून अशा भांडवलाची व्यवस्था झाली तरी त्याचा अंतिम परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतच असतो

कोणतीही नवी खरेदी करताना आपण इतर खर्चात तेवढीच काटकसर केली नाही तर कर्जाचा बोजा वाढून घराचे अर्थकारण बिघडते. त्यामुळे खरेदीला काटकसरीची जोड देणे आवश्यक असते. जे घराच्या बाबतीत लागू ते तेच राज्याच्या वा देशाच्या बाबतीत खरे आहे.

आज आपल्या देशात गरीबी उन्मूलनासाठी, शिक्षण देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आरोग्यसेवेसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना जाहीर झाल्या आहेत. या योजनांना किती खर्च येईल याची आकडेवारी पाहिली की आपण घेतलेल्या  प्रचंड आर्थिक बोज्याची कल्पना येईल. या आवश्यक योजनांचा  आपल्या अर्थव्यवस्थेवर किती  ताण पडणार आहे याचे मूल्यमापन केल्यास नव्या विकास योजना राबविण्याइतपत आपली आर्थिक क्षमता आहे का याचा  विचार होणे जरूर आहे

 याशिवाय  दुष्काळ,  महापूर, सामाजिक राजकीय संघर्षातून होणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यांचाही अर्थव्यवस्थेवर ताण पडतो.

अशावेळी विकासयोजनांच्या घोषणांबरोबर काटकसरीचे आवाहन प्रसंगी कायदेशीर उपाययोजना करणे यांची नितांत आवश्यकता आहे.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अन्नधान्याच्या काटकसरीचे आवाहन करताना सोमवारी भात खाऊ नये असे सुचविले होते. मोठा समारंभातील खर्चाची उधळपट्टी जेवणावळी यावर निर्बंध आणले होते.  तशाच उपाययोजना आता अमलात आणण्याची आवश्यकता आहे

 तसेच योजनांना मंजुरी देताना त्यांचा इतर अर्थव्यवस्थेवर इतर योजनांवर दूरगामी काय परिणाम होईल याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. अन्यथा ज्याप्रमाणे सध्या अनेक विकास प्रकल्प भूमीपूजन होऊन वा अर्धवट स्थितीत पडलेले आहेत. तीच अवस्था या नव्या योजनांची होईल आणि ही जनतेची घोर फसवणूक ठरेल.