Thursday, August 30, 2018

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: ।

आदर्श शिक्षक हा शिक्षक असतो. त्याला जात नसते. त्याला धर्म नसतो. त्याला पक्ष नसतो. त्याची निष्ठा फक्त ज्ञानावर असते. ज्ञान देणे हाच त्याचा धर्म, हाच त्याचा पक्ष.  शिक्षणव्यवस्थेत त्याचे स्थान परमोच्च आहे.

शिक्षणसंस्था, संस्थापक, व्यवस्थापक वा नियंत्रक मंडळ, जागा व इमारती, सोयी सुविधा ह्या फक्त शिक्षणास साहाय्यकारी आहेत. साहाय्यकारी घटकांमध्ये वाद निर्माण झाले तर शिक्षण प्रक्रियेत अडचणी येतात. शिक्षक हाच खरा मालक आहे हे साहाय्यकारी घटकांच्या लक्षात येत नाही.

\
विद्यार्थी शिक्षकाकडून विद्या प्राप्त करतो. त्याच्या जोरावर आपला व्यवसाय, धंदा, नोकरी मिळवतो. मिळालेल्या विद्येचा वापर करून  धन, संपत्ती व समृद्धी  मिळवून समाजात स्थिरस्थावर होतो. समाजाचे नेतृत्वही करतो. मात्र शिक्षक आहे तेथेच राहतो. त्याचे विद्यादानाचे कार्य आयुष्यभर चालू असते. तो शिक्षक असला तरी तो विद्यार्थीही असतो. अद्ययावत ज्ञान देता यावे यासाठी त्याला विद्यार्थी असावेच लागते.

या शिक्षकांच्या कल्याणाची जबाबदारी माजी विद्यार्थ्यांनी उचलायला हवी.  केवळ प्रासंगिक हार, तुरे देऊन सत्कार करण्यापेक्षा त्यांचे विद्यादानाचे कार्य निर्वेध चालू राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आमच्या कॉलेजच्या प्रा. एच. यु. कुलकर्णी यांनी याबाबतीत आदर्श घालून दिला आहे. आपल्या शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाचे घर बांधून देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते खरोखर प्रशंसनीय आहेत. अर्थात ते स्वत: शिक्षक असल्यानेच त्यांना शिक्षकांच्या योगदानाची  जाण होती.

ज्ञानदीप फॊंडेशनने त्यांची ही शिकवण लक्षात घेऊन वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. यामध्ये वालचंद कॉलेजमधील सर्व माजी शिक्षकांची माहिती संकलित करून ती माजी विद्यार्थ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. शाळा, कॉलेज व सर्व शिक्षणसंस्था यातील माजी शिक्षक व माजी विद्यार्थी संघटना यांचे संवेदनशील व्यापक जाळे तयार करून जिज्ञासा, नवनिर्मिती व उद्योगशीलतेस चालना देणे, शिक्षणव्यवस्थेतील सध्याचे परिक्षा व नोकरभरतीचे उद्दीष्ट बदलून स्वयंउद्योजक बनण्यासाठी योग्य ते उपाय सुचविणे हे कार्य केले जाईल.

गेले दोन महिने याच उद्देशाने विविध माजी ज्येष्ठ उपक्रमशील प्राध्यापक तसेच प्रथितयश उद्योजक यांच्याशी चर्चा करून या योजनेविषयी त्यांची मते जाणून घेतली.  पलूसच्या शाळेत विज्ञान कृतीसत्र तसेच वालंद कॉलेजमध्ये या विषयावर एक परिसंवादही घेण्यात आला. या सर्व अनुभवावर आधारित एकूण योजनेचा स्थूल आराखडा बनविण्यात आला. मुख्यत्वे माजी शिक्षकांनी यात पुढाकार घेतल्याने कल्पनाविलास व विकास खूप झाला. भावनिक इच्छाशक्तीही प्रबळ असल्याचे जाणवले. मात्र उद्योजक व व्यावसायिकांनी प्रथम आर्थिक बाजू भक्कम करण्याचा इशारा दिला. हा उपक्रम स्थायी स्वरूपात कार्यरत व्हायचा असेल तर त्याला जागा, मनुष्यबळ व नॆमित्तिक खर्च भागविण्यासाठी शाश्वत उत्पन्न स्रोताची व्यवस्था अत्यावश्यक असल्याचे ध्यानात आले.

शिक्षक हा यशस्वी व्यावसायिक होऊ शकत नाही हे मला गेल्या २० वर्षांच्या अनुभवावरून कळून चुकले आहे. समाजही आपल्याकडे शिक्षक म्हणूनच पाहतो. प्रा. भालबा केळकरांनी आपल्या नवनिर्मितीच्या तळमळीतून  एआर ई चा उद्योग उभा केला मात्र तो स्थायी राहू शकला नाही.  वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटर हा तर मोठाच प्रकल्प आहे व संकल्पनेचे ज्ञान व प्रयत्न करण्याची तयारी असली तरी व्यावसायिक दृष्टीकोन नसल्यामुळे तो प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योजक व व्यावसायिकांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

मग यासाठी धनवानांकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये या दृष्टीने सांगलीचे लाडके नेते मा. वसंतरावदादा पाटील यांनी सुरू केलेल्या सहकार चळवळीचा आधार घेऊन स्वत:च्या पायावर आपली सहकारी संस्था स्थापन करून कार्यास सुरुवात करावी असे ठरले.

अशा कार्याचे महत्व पटलेल्या व त्यासाठी आपले योगदान देऊ इच्छिणार्‍या  समविचारी व्यक्तींची सहकारी संस्था स्थापन करावी, प्रतिव्यक्ती दरवर्षी ५००० रुपये अशी सभासद वर्गणी ठेवावी. किमान २० सभासद मिळाल्यास दरवर्षी एक लाखाची सोय होऊ शकेल व त्यातून काही कार्य उभे राहील.  सहकारी सोसायटीच्या नियमाप्रमाणे सर्वांना समान अधिकार देऊन त्यातून कार्यकारी  मंडळाची निवड करावी व कार्यास स्थायी रूप द्यावे असा विचार आहे. 

Wednesday, August 29, 2018

Walchand Seminar - Student feedback

More than 75 students attended the Seminar on Innovation & Entrepreneurship arranged by Dnyandeep Education & Research Foundation at Walchand College of Engineering, Sangli.
.


We have compiled their feedback which shows the impact made and their suggestions for arranging more such programs. 

Please be patient and read all the feedback and send your feedback about the outcome of the seminar.



We urge the college authorities to take note of the students expectations about such change in education objectives.

Sunday, August 26, 2018

Walchand Innovation Seminar

Seminar on Innovation & Entrepreneurship arranged by Dnyandeep Education & Research Foundation at Walchand College of Engineering, Sangli on 12 th August 2018




Seminar Objective




Walchand Innovation Part 1

Inauguration - Welcome by Dr. S. V. Ranade, Introduction - Director Dr. Parishwad




Walchand Innovation Part 2

Presentation by Hon'ble His Highness Gopalraje Patwardhan, Miraj 



Walchand Innovation Part 3
Key Note Speech by industrialist and Ex President of Association of Past Students Shri. Arvind Deshpande



Walchand Innovation Part 4

Interaction with Walchand's first innovator Shri. S. R. Apte



Walchand Innovation Part 5

Presentation by Shri. Narayan Deshpande of Yerala Projects, Sangli 



Thanks to all participants.

I shall add description of each video later. Please visit again. 

Friday, August 17, 2018

आओ फिर से दिया जलाऍ

भावपूर्ण श्रद्धांजली !


भरी दुपहरी मे अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतर्तम का नेह निचोडॅ
बुझी हुई बाती सुलगाऍ
आओ फिर से दिया जलाऍ

हम पडाव को समझे मंजिल
लक्ष्य हुआ आंखोसे ओझल
वर्तमान के मोहजाल मे -
आने वाला कल न भुलाऍ
आऒ फिरसे दिया जलाये 
 -
शिक्षण, समाज व राजकारणाला नवी दिशा देणारे अटलजी आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी आपल्या वरील काव्यातून पुन्हा दीप प्रज्वलित करण्याचा  संदेश शिरोधार्य मानून आपण अटल इनोव्हेशन मिशनच्या कार्यात आपले तन, मन,धन  समर्पण करू या.






Reference Handbook for Non-Profit Incubator Managers 

Wednesday, August 15, 2018

Let us truly understand Mahatma Gandhi and Nationalism.

On this auspicious day of 72nd  anniversary of India's freedom, let us truely understand our great leader and philosopher, Mahatma Gandhi.



He not only gave an ideal nationalism to India which is a perfect combination of Secularism, Hinduism and Socialism, he pioneered basic axioms for nationalism for every country on the globe.

His love for humanity, nature, his own religion and simplicity in life together with firm belief in non-violence made him the idol for all time.

His thoughts are very essential today, when the world is facing insecurity, violence and evils of capitalism on global scale and planet earth is in danger due to human activities.

Freedom of India through non-violent social movement was his greatest achievement in his life which gave a new strength to non-violence and trasformed it into an effective and nondestructive instrument for achieving any change, be it a social, political or environmental.

During the last seventy years the India has swayed far away from the those cherished ideals.

We must give some credit to our former rulers for establishing comprehensive administrative and legal infrastructure for governing such a vast country with intricate diversity in language, culture, social and economical status. Our great forfathers have laid strong ethical grounds in the social culture and peaceful coexistence. Many leaders stregthened the nationalism and created urge for freedom.

Dr. Babasaheb Ambedkar laid the foundation of Indian constitution with democracy and social equity as basic ingradients.

But what we find today?

The same words democracy and social equity are being interpreted for political and personal gains.

We forget that success of democracy depends on discipline. All political parties endorse democracy but infortunately fail to follow the essential prerequisites coming with it.

1. Resposibility - Constitution grants freedom of speech to citizen, but does not permit instigating speech against any person, religion or group. One must respect other's freedom of speech. Even if some person's views are not not aggreable or derrogatory to social fabric, only non-violent, non-disruptive methods can be permitted to express disapproval.

2. Law - No citizen is allowed to take law in hand. There is a legitimate legal system developed for addressing grievences of people. Hence disruptive activities, destruction of national property, road blockages have no place in demcracy. No man is above law. Anybody who instigates lawless activities has no right to talk about democracy.

3. Honesty - You should be honest with your own ideals. This word has become only of historic importance. Old retired people tell the stories of honesty and idealism. Now the people shift from one party to other party overnight, evenif the ideals of the other pary are totally opposite to earlier party. Unfortunately followers are honest with the leader and they also shift their loyalties with the decision of leader within minutes.

4. Freedom from Prejudice -

Any fact or event should be analyzed without any prejudice and only in the national interest. However, it is observed that opinions are made on who or which party has initiated it. This distorts the picture and separates the society in different groups evil to each other.

We find oppressed people resorting to strikes, fast or those in deep trouble or frustration even suicides. Many a times, political parties, instead of suggesting and helping the government to solve the problem try to use such issues to blame the other parties.

Rampant corruption is the root cause of the failure of democracy and administration in India. Many a times, I wonder, how India is still steering ahead and preserving democracy. Is it due to helplessness of common man or his acceptance to corruption as necessity. India's progress path is full of man made hurdles, though essential for keeping track in proper direction, but unfortunately most of the times it is motivated to gain political advantage.

Every political party has at least one favorite 'ism'.
Congress - Secularism,
BJP- Hinduism,
Communists - Socialism.

Role of other parties to represent aspirations region or sectors of society have also assumed importance in national decision making but their philosophies seem to be transient based on situation. Though every party keeps Nationalism and Democracy at the top of agenda, their action is only in the line of their 'ism'.

Parties are desperate to enroll their followers only for attaining power. Decisions are taken on number strength and power politics. Vhips are issued to keep members bound to political party. It is surprising that no leader of any party takes objection to huge digital banners proclaiming loyalty and birthday wishes with self portraits of local leaders at every corner of city. In fact, they demand it. It is merely confirm vote bank. There is no freedom to act otherwise making discussions a mere farce. This is not implied in true and fare democracy. As a matter of fact, every decision should be taken only on the basis of National interest.

If the situation has to improve there is a need to free the common citizen from any particular dogma and free to form his opinion on his own assessment. Democracy and progress will be possible if free, unprejudiced and responsible citizens form the majority of voters in elections.

What we really need is strong Indian Nationalism tailored by our great leader Mahatma Gandhi, which includes essence of all three 'isms' plus my nation attitude. Secularism ensures equal status to all religions, Hinduism, which is the broadminded religion of majority of citizen and true faith in any other religion can foster honesty and love for mother earth, socialism which has social uplifting and empowerment as the main goal. All these constitute the true national spirit of India.

Let us hope we follow the footsteps of this great leader and develop India rising above our personal or sectorial gains and lead the world for peace and prosperity in future.

Thursday, August 9, 2018

भारतात विदेशी खेळण्यांचा बाजार नको

माझ्या अमेरिकेतील अनुभवाबद्दल सुमारे बारा वर्षांपूर्वी मी Toy Mania in US ( अमेरिकेतील खेळण्यांचे बाजारीकरण)  हा लेख लिहिला होता. त्याची सुरुवातच अशी होती.

Since my visit to USA three years back, I am becoming increasingly restless about the way the toy industry is handling American children. ...

सध्याही हा बाजार जोमाने चालू असून तेथील विद्यार्थ्यांना ह्या मोहमयी दुनियेचे वेड लागले आहे व त्याचा शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. आता या बाजाराने आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले असून भारतात आधुनिकतेच्या  नावाखाली मोठ्या प्रमाणावर त्याने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे, त्यास वेळीच आवर घातला पाहिजे. अन्यथा आपल्या शेक्षणिक परंपरेचे नुकसान होईल.

अमेरिकेतील खेळण्यांचे जग प्राचीन डायनॊसार, आधुनिक रोबोट वा यंत्रमानव आणि जादूच्या विचित्र मिश्रणातून तयार झाले आहे. याचे एक कारण म्हणजे अमेरिकेला सांगावा असा इतिहासच नाही. सार्‍या जगातून स्थलांतरित झालेल्या  लोकांनी हा प्रदेश व्यापला आहे. विविध देशांतून आपआपल्या संस्कृती घेऊन आलेल्या लोकांना एकसूत्रात बांधण्यासाठी त्यांना प्राचीन डायनोसॉर युगाची व उंदरामांजरांची मदत घ्यावी लागली. त्यातूनच जगप्रसिद्ध डिस्ने लँड निर्माण झाले.  मुलांची संवेदनशील मने अशा काल्पनिक गोष्टीत रमून जातात. याचात फायदा तेथील व्यापारी वृत्तीच्या हुशार लोकांनी घेतला व खेळण्यांचा एक सर्वव्यापी व्यवसाय त्यांनी सुरू केला.

लेखक, कलाकार व संगणकक्षेत्रातील लोकांना यात काम मिळाले. बघताबघता बालविश्वाच्या सर्व क्षेत्रात
या खेळण्यांना फार महत्व प्राप्त झाले. मिकी माऊस, डोनाल्ड डक,  ही मुलांची आवडती जिवंत पात्रे बनली. आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी या खेळण्यांची  विविधप्रकारे प्रसिद्धी करण्याची चढाओढ सुरू झाली. खेळण्यांवर आधारित स्टिकर्स, गोष्टी, पुस्तके, टीव्ही प्रोग्रॅम, सिनेमा,  कपडे, खाद्यपदार्थ यात त्यांचे वेगळे स्तोम बनले. खेळण्यांच्या मोठ्या प्रतिकृती,  हलणारी, बोलणारी यांत्रिक वा खरी पात्रे, मोठी प्रदर्शने यांनी मनोरंजनाचे एक नवे आकर्षक क्षेत्र बनविण्यात आले.
 
खेळ म्हणजे स्पर्धा, संघर्ष, लढाई. मग त्यात यशस्वी होण्यासाठी विज्ञान कल्पनांचा आधार घेत मात्र अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या गोष्टी रचल्या गेल्या. त्यात अभ्यास न करता जादूच्या प्रयोगाने सर्व काही साध्य होऊ शकते निसर्गनियमांवर आपण मात करू शकतो असा विश्वास मुलांच्यात  रुजविण्यात आला. शस्त्रांचा वापर, हिंसा, मोडतोड यांना शॊर्याचे प्रतीक समजण्यात येऊ लागले. स्पायडर मॅन,  हॅरी पॉटर, स्टार वार्स,  गुगलचे "Angry Young Birds",यामुळेच मुलांच्यात आवडीचे झाले आहेत. या गोष्टी वाचून, वा असे खेळ खेळून मुले स्वप्नाळू, विज्ञान म्हणजे जादूचा दिवा आहे असा भ्रम असणारी व विध्वंसात आनंद मानणारी होत आहेत याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

जादू चालण्यासाठी विशिष्ठ मंत्र लागतो. या मंत्रासाठी नेहमीचे शब्द चालत नाहीत हे सांगण्यासाठी अक्षरांच्या विचित्र जोडणीने केलेले शब्द गोष्टीत सर्वत्र विखुरलेले असतात. मुले ते शब्द पाठ करतात. असे शब्द वापरल्याने त्यांचे शुद्धलेखन बिघडते.

कोठलीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही. अभ्यास केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. पदार्थ, वस्तू, उर्जा, गती हे अविनाशी निसर्गनियमांनी बांधले गेले आहेत व विज्ञान हे ते नियम शिकण्यासाठी आहे.  विज्ञानकल्पनांचा जादूसारखा वापर करणे म्हणजे आधुनिक युगातील  अंधश्रद्धा आहे.

खेळण्यांचा उद्देश हा मुलांना प्रत्यक्ष जगाचे ज्ञान व्हावे असा असावा, आपला भातुकलीचा खेळ मुलांना आवडतो. ते त्यात स्वयंपाक शिकतात. भोवरा, भिंगरी, गोट्या, कॅरम  यातून हाताचे कॊशल्य वाढते. चेंडू, विटीदांडू, क्रिकेट यांनी व्यायाम होतो.

आरसा, भिंग, दुर्बीण, लगोर, कागदाचे विमान  ही खेळणी विज्ञान समजण्यास उपयुक्त असतात.

साध्या वस्तूंचा उपयोग करून वॆज्ञाननिक खेळणी बनविणे  हा विज्ञान शिकविण्याचा उत्तम उपाय आहे. मुलांची जिज्ञासा वृत्ती वाढीस लागून, निर्मितीकॊशल्य व नवे प्रयोग करण्याची प्रेरणा यातून मिळते. प्रा. भालबा केळकरांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चळवळीला पुन्हा गती देण्याची आवश्यकता आहे.

Friday, August 3, 2018

विजयाची गॊरवगाथा

(वालचंद कॉलेजचे १९७१-७२ चे मासिक प्रा. भालवणकर यांचे कडून मला मिळाले. त्यातील माझा बांगला स्वातंत्र्य युद्धावरील लेख. प्रा. भालवणकर यांचे आभार)
---------------------------------------------------------------------------------------------------










आजची शिक्षणपद्धती - परकियांचे अंधानुकरण

परीक्षार्थी शिक्षण

आपण नेहमी म्हणतो की  आजकालचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी झाले आहेत व त्यांचे लक्ष विषयांचे ज्ञान मिळविण्याऎवजी  परिक्षेत जास्त मार्क कसे मिळतील याकडे असते. त्यामुळेच क्रमिक पुस्तके व पुरवणी साहित्य  न वाचता गाईड वापरण्याकडे त्यांचा कल असतो.   याबाबतीत आपण विद्यार्थ्यांना  दोष देतो. पण विद्यार्थ्यांच्या अशा वागण्यास सध्याची शिक्षणपद्धती पूर्णपणे जबाबदार  आहे हे समजून घेतले पाहिजे.

शालेय शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे  वैयक्तिक लक्ष देणे शक्य असते व तेथे  निरंतर  मूल्यमापन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना योग्य मानांकन दिले जाऊ शकते मात्र कॉलेजमध्ये  विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरविण्यासाठी परिक्षेतील यश हा एकमेव मापदंड वापरला जातो.  परिक्षेच्या प्रश्नपत्रिकाही ठराविक छापाच्या झाल्याने व वस्तुनिष्ठ प्रश्नांचे महत्व  गरजेपेक्षा वाढून, माहितीपर प्रश्नांची संख्या कमी झाल्याने  विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्नांचा अंदाज करणे  व केवळ घोकंपट्टी करून जास्त मार्क मिळविणे सहज शक्य झाले आहे. साहजिकच जे विषय समजण्यासाठी  पाठांतराएवजी त्याचा सखोल अभ्यास करतात ते या स्पर्धेत मागे पडू शकतात. सृजनशीलता व  संशोधन वृत्तीचे संवर्धन हे ज्ञान संपादनाचे   मूळ उ्द्दीष्ट या परिक्षाधिष्ठित शिक्षण पद्धतीत साध्य होऊ शकत नाही.

    अभ्यासक्रमासाठी नेमलेले  विषय व त्यातील माहिती जुनी, कालबाह्य व उद्योग व्यवसायास अनुरूप नसणे हाही दोष आपल्या  शिक्षणपद्धतीत आढळतो. विषय शिकविणार्‍या शिक्षकांच्या इच्छेनुसार असे अभ्यासक्रम बनविले  जातात. त्यावर विचारलेले प्रश्नही तेच तेच असतात.   इंटरनेटवर सर्व विषयातील अत्याधुनिक ज्ञान मिळू शकते. मात्र बहुतांश शिक्षक  या अद्ययावत ज्ञानकोषाचा वापर न करता क्रमिक पुस्तकांचाच वापर शिकविण्यासाठी करतात.  शिक्षक प्रगत ज्ञानाशी अवगत नसेल, बाह्य जगात आवश्यक असणार्‍या माहिती व कौशल्याचे  त्याला ज्ञान नसेल तर अभ्यासक्रमही तसेच मागासलेले राहतात. परिणामी मार्क जास्त मिळूनही  विद्यार्थ्याचे ज्ञान कौशल्य अपेक्षेप्रमाणे वाढलेले नसते.

  त्यामुळेच असेल कदाचित. पण परिक्षेत उत्तम गुण मिळवून  पास झालेले विद्यार्थ्यांत  उद्योग व व्यवसायासाठी  लागणारी पात्रता आढळत नाही. बर्‍याच वेळा कमी गुण असलेले विद्यार्थी याबाबतीत अधिक  योग्य व सरस असतात. मात्र दुर्दैवाने अशा विद्यार्थ्यांना उद्योग वा व्यवसायात गुणांकन  स्पर्धेमुळे नोकरी मिळणे दुरापास्त होते.

  शिक्षणाचा हेतू विशि्ष्ठ  विषयातील ज्ञान संपादन करणे व त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून समस्यांचे निराकरण  करणे व जीवन अधिक सुसह्य, सुखकर व सुरक्षित बनविणे हा आहे ही गोष्ट आपण विसरून गेलो  आहे. परिक्षा पास होणे व चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हे एकमेव उद्दीष्ट आज विद्यार्थ्यांसमोर  आहे. साहजिकच मनासारखी नोकरी नाही मिळाली की निराशा, आर्थिक विवंचना  व इतरांकडून अवहेलना याला सामोरे जावे लागते. नोकरीच्या  कमी संधी, नोकरभरतीतील भ्रष्टाचार व नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांची प्रचंड संख्या  यामुळे बेरोजगारांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. यातूनच नैराश्यातून आत्महत्या, गुन्हेगारी,  व्यसनाधीनता, हिंसा व गुंडगिरी यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. सर्वसामान्य जनतेची  व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षाही यामुळे धोक्यात येत आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरीची ओढ

बहुराष्ट्रीय कंपन्या ऎषारामाचे जीवन व भरपूर पगार देऊ शकतात. यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष अशा नोकर्‍या मिळवण्याकडे असते. मात्र या कंपन्या आपल्या सर्व साधनसंपत्तीचा वापर करून व कमी मनुष्यबळ लागणार्‍या रोबोटिक तंत्रज्ञानाचा व संगणक प्रणालींचा वापर करीत असल्याने त्यांना फार कमी कर्मचार्‍यांची आवश्यकता असते.

परिणामी अशा नोकर्‍यांच्या मागे लागलेल्या लाखॊ पदवीधरांच्या पदरी निराशा येते. तरीदेखील अशा नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवून शिक्षणसंस्था सरसकट सर्वांना याच प्रवाहात आणून सोडतात. भारतातील बरेच उद्योग, व्यवसाय व बँकांसारख्या आर्थिक संस्था आंतरराष्ट्रीय यांत्रिक व संगणकचलित पद्धतींचा वापर करीत असल्याने तेथेही मनुष्यबळाची आवश्यकता खूप कमी झाली आहे.

याउलट आपल्या समाजात व परिसरात मर्यादित तंत्रज्ञानाचा वापर करून श्रमाधिष्ठीत कार्यपद्धतींचा विकास करण्यास खूप आव आहे. साधी कचरा समस्या हे त्यावरचे उत्तम उदाहरण आहे.  स्वच्छता व कचरा निर्मूलनासाठी आवष्यक ती आरोग्यसंरक्षक्ल साधने वापरून मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला तर स्थानिक रोजगाराची समस्या बर्‍याच प्रमाणात सुटू शकेल. शेती पारंपरिक उपकरणे व यांत्रिक साधने यांना अधिक कार्यक्षम बनविणे सहज शक्य आहे .

भारतात मनुष्यबळाप्रमाणेच पशुधनही अमर्याद आहे. त्यांचा उपयोग न करता यांत्रिक साधनांचा उपयोग उद्योगाला आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत असला तरी राष्ट्राच्या दृष्टीने पशुधनाचाही सुयोग्य वापर करण्याचे तंत्रज्ञान आज हवे आहे. त्या संदर्भात पूर्वी  स्कूल ऑफ अप्लाईड रिसर्च या वालचंदच्या प्राध्यापक - विद्यार्थ्यांचा सहभाग असणार्‍या संस्थेने  ’बलवान बॆलगाडी’ विकसित केली होती याची आठवण झाली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आज असंख्य संधी उपलब्ध आहेत मात्र त्या छोट्या उद्योग व व्यवसायांसाठी आहेत. व्यापारी व छोटे उद्योग यांच्यासाठी साध्या स्थानिक भाषांमध्ये संगणकप्रणाली विकसित करणे हे एक मोठे क्षेत्र आहे. आपले साहित्य, कला, संस्कृती यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी तर असंख्य संधी आहेत. संगणकावर भारतीय भाषेत मजकूर टाईप करणे, भारतीय व परदेशी भाषांमधील साहित्याचे व व्यवसायविषयक  माहितीचे भाषांतर करणे, भारतीय चित्र व शिल्पकला, संगीत व नाट्य, लोकव्यवहार व सांस्कृतिक संचित ज्ञान सार्‍या जगात पसरावे यासाठी वेबसाईट व मोबाईल ऍप बनविणे, छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करण्याचे शिक्षण देणे अशी असंख्य कामे आज अर्धकुशल स्तरावरील युवकांसाठी उपलब्ध आहेत.

बुद्धीमान व उच्चशिक्षित युवकांनाही भारतातील अनेक सामाजिक, पर्यावरणीय व ऊर्जा, तसेच आरोग्यविषयक समस्यांवर स्थानिक पातळीवर उपयुक्त ठरतील अशा संगणक प्रणाली विकसित करण्याचे मोठे क्षेत्र खुले आहे. केवळ इन्फोसिस, विप्रोसारख्या संस्थात कोडमंकी म्हणून काम करण्यापेक्षा या क्षेत्रात त्यांनी आपली बुद्धी वापरली तर आज आपल्याला परदेशी तंत्र व संगणक ज्ञानावर अवलंबून रहावे लागणार नाही.

याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आपला भारत खर्‍या अर्थाने स्वयंपूर्ण होईल. सर्व हातांना काम मिळेल, शहरीकरण थांबेल व सर्व परिसराचा सर्वांगीण व चिरस्थायी विकास होईल.

संगणक युगाच्या सुरुवातीपासून ज्ञानदीपने स्थानिक गरजांना सर्वात महत्वाचे स्थान देऊन संगणक शिक्षणाचा प्रयत्न केला. पण येथे शिकलेले विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गिळंकृत केले. त्यामुळे ज्ञानदीपची स्थिती एखाद्या शाळेसारखी वा रेल्वे प्लॅटफॉर्मसारखी राहिली. विद्यार्थी पुढे जातात पण शाळा तेथेच राहते, रेल्वे पुढे जाते पण प्लॅटफॉर्म तेथेच राहतो. अर्थात याबाबतीत मला काही दु:ख  नाही. उलट भोवतालची परिस्थिती, विद्यार्थ्यांची मानसिकता व स्थानिक चिरस्थायी विकासाची गरज यांचे यथायोग्य आकलन झाल्याने शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा देणे आवश्यक आहे हे उमजले. ज्ञानदीप फॊंडेशनने हेच एकमेव उद्दीष्ट आता आपल्या नजरेपुढे ठेवले आहे.


Thursday, August 2, 2018

पलु्सकर शाळेमध्ये अटल इनोव्हेशन लॅब

पलूस येथील पंडित विष्णु दिगंबर पलु्सकर शाळेमध्ये अटल इनोव्हेशन लॅबचे उद्‌घाटन प्रसिद्ध उद्योगपती व वालचंद कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री. अरविंद देशपांडे यांचे हस्ते झाले अशी बातमी वाचली. सांगली जिल्ह्यातील अटल लॅब सुरू करण्याचा पहिला मान मिळवणारी शाळा तसेच अटल लॅब पाहण्यासाठी प्रा. भालबा केळकर, श्री. अरविंद यादव आणि मी पलूसला गेलो. इस्लामपूरचे प्रा. प्रशांत देशपांडेही मुद्दाम आमच्यासाठी तेथे आले होते.

तेथे पलुसकर शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट उदय परांजपे आणि शाळेच्या कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी आमचे स्वागत केले. सकाळी १२ वाजता तेथे पोचणार असे आम्ही कळविले होते. मात्र आम्हाला पावसामुळे जवळजवळ एक तास उशीर झाला तरी सर्वजण आमच्यासाठी थांबले होते.  श्री. परांजपे यांनी शाळेच्या प्रगतीची तसेच अटल लॅब उभारण्यासाठी शाळेने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.  ’शिक्षणविचार’ नावाचे महाराष्ट्रातील शिक्षणतज्ञांचे लेख असलेले एक बहुमोल पुस्तक व शाळेची रॊप्य महोत्सवी स्मरणिका  भेट देऊन त्यांनी आमचे स्वागत केले.

अटल लॅबसाठी आवश्यक असणारा अद्ययावत प्र्शस्त हॉल, भिंतीवरीलअटल इनोव्हेशन मिशनचे तक्ते, तसेच प्रयोगशाळेतील सर्व उपकरणांची  आकर्षक मांडणी पाहून आम्ही भारावून गेलो. आपण पुन्हा विद्यार्थी होऊन या शाळेत प्रवेश घ्यावा व येथे प्रयोग करावेत असा विचार मनात चमकून गेला.

भारत सरकारने या अटल लॅबसाठी १० लाख रुपयांची ग्रँट दिली आहे. यात प्राथमिक इलेक्ट्रॉनिक सर्किट त्यार करण्यासाठी लागणारे ब्रेडबोर्ड, युएसबी केबल्स, रेझिस्टन्स, कपॅसिटन्स,बॅटरी या साधनांशिवाय विविध सेंसॉर्स, पंप, सोल्डरिंगची साधने, एलसीडी डिस्प्ले बोर्ड, अर्ड्युनो, रासबेरी पाय यासारखे मायक्रो~कॉम्प्युटर्स, थ्रीडी प्रिंटीग मशिन. ड्रोन व रोबोटिक साधने निर्माण करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आहे.


दरवर्षी १० लाख रु. याप्रमाणे पाच वर्षे ही ग्रँट मिळणार असून परिसरातील शाळांना याचा वापर करता येणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या प्रायोगिक सोयी उपलब्ध करून देऊन नवसंशोधनासाठी प्र्वृत्त करण्याचा शासनाचा हा प्रयत्न खरोखरीच कॊतुकास्पद आहे.

सर्व उपकरणांची पाहणी करून झाल्यावर एकत्र बसून आम्ही या लॅबच्या कार्याविषयी चर्चा केली. तेव्हा असे आढळून आले की हे प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था शाळेला आपल्या खर्चाने करावी लागणार आहे. शाळेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या जोडणीचे ज्ञान शिक्षकांना नाही. बाहेरचे तंत्रज्ञ नेमण्यासाठी ग्रँट नाही. परिणामी ही सर्व प्रयोगशाळा केवळ प्रदर्शनीय म्हणून राहण्याची शक्यता आहे. शाळेला आपल्या शिक्षकांनाच प्रशिक्षित करून ही प्रयोगशाळा चालवावी लागणार आहे. शिवाय इतर शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

 ज्ञानदीप फॊंडेशन अशी सेवा पुरवण्यासाठीच   सर्वांच्या सहकार्याने नवनिर्माण व उद्योजगतेचे केंद्र उभारणार आहे. 

Wednesday, August 1, 2018

Seminar on Promotion of Innovation and Entrepreneurship



I am happy to announce that Dnyandeep Foundation is organising a Seminar on Innovation and Entrepreneurship in collaboration with Walchand College of Engineering and Marathi Vidnyan Prabodhini.  In the first stage, we plan to conduct innovation and creativity workshops in schools and then expand the activities to colleges and rural areas. 

 The seminar is open to anybody interested in fostering culture of creativity and innovation in education system.

I am giving below general information about proposed seminar. The final programme brochure shall be released within 3/4 days.

Please inform about your participation / presentation of paper before 8th August 2018.

I hope to get good response for this path breaking venture of Dnyandeep Foundation. 

------------------------------------------------------------------------------------------------
Draft  contents of Proposed Seminar 
-------------xxxxx-------------
Seminar on Promotion of Innovation and Entrepreneurship 
Jointly organized by Dnyandeep Foundation, Sangli and  Walchand College of Engineering, Sangli
Place – Tilak Hall, Walchand College of Engineering, Sangli
Date 12th August 2018 ( Sunday)
Program Timing – 9-30 to 5.00 pm
Registration Charges – Rs. 500/- per participant
Introduction
When Steve Vozniac (Co-Founder of Apple Computers with Steve Jobs) says that “Innovation in India is not at all possible. India has been producing job seekers and not providing job creators”, Shall we accept this as our attitude and ability? Never So!
               We have great heritage of innovation and creative ability, However in the course of history, सरस्वती पराधीन होती  for a long period, when we were governed by Invaders. However after independence, we have made remarkable progress in various fields of Science and Technology and now स्वाधीन सरस्वतीचा उज्वल काळ सुरु झाला आहे.   
It is observed that there is a major focus in the present days on “ Placement of Students” in the colleges and education pattern only emphasizes competition in terms of percentage of marks and focus only on employability.
Spirit of creativity and attitude of innovation and entrepreneurship are the words used in the speeches on platform & not nurtured through other activities. Government of India is supporting many activities under the schemes like Atal Innovation Mission, Incubation Centers and Entrepreneurship  promotions. Start up and Make in India are the words getting momentum now a days. However, we have to help this drive by way of social awakening about the subject.
Theme
We have started the activity of Innovation Centre through which the spirit of creative thinking and Innovative ideas useful for solving problems in day today life, Science & Technology and Social Engineering will be collected and followed for getting Solutions.
To gather the speed of activity and make this mission successful and gain momentum, we have arranged a half day seminar on this subject of Creativity, Innovation & Entrepreneurship on 12th August, Sunday, 2018 at Sangli.
Sessions
We invite your attention and request you to think about the practical ways of activity in this field. We welcome your suggestions / your short papers to be presented in this seminar and the way you would like to contribute for this cause.


Topics for group discussion  and for your consideration
1.      Programmes for inculcating the spirit of creativity and culture of innovation in school / college students and social activists.
2.      Training  Teachers / Professors for the same.
3.      Tapping  Innovative talents in rural areas
4.      Collecting problems from society / industries
5.      Future planning for  such an organization to work in this direction
6.      Placements of under graduates/ graduates in industries for practical training ( internship)
7.      Guiding students in hobby workshops
Seminar on Promotion of Innovation and Entrepreneurship 
Jointly organized by Dnyandeep Foundation, Sangli and  Walchand College of Engineering, Sangli
---------------------------------------------------------------------------------------------------------
PROGRAM DETAILS
9.30 - 10.00 am     Registration
10.00 – 10.30 am  Inauguration and Welcome
10.30 to 12.00 am First Session
12.00 – 1.30 am    Second session
1.30 to 2.00           Lunch
2.00 to 4.00 pm    Discussion & Conclusion

 Please send your synopsis of paper on or before before 10-8-2018
We shall be grateful to learn in advance about your participation in the seminar

                                            Seminar Convenors

 Prof. B. D. Kelkar             Dr. S. V. Ranade                           Shri Arvind Yadav
Innovation Centre     Dnyandeep Foundation          Marathi Vidnyan Prabodhini   
-----------------------------------------------------------------------------------------------------------------