Wednesday, May 31, 2017

क्लोरिनीकरण

पिण्याच्या पाण्यासाठी क्लोरिनचा जंतुनाशक म्हणून उपयोग करता येतो. पाण्यामुळे ज्या रोगांचा प्रसार होतो त्या रोगांशी बहुतेक वेळेला संबंधीत असणाऱ्या जिवाणूंशी क्लोरिनमुळे प्रभावीपणे नाश होतो. मात्र क्लोरिन नेहमीच्या प्रमाणात वापरला तर काही सिस्ट, ओव्हा व संधारित कणांच्या आतल्या बाजूस दडलेले जीवाणू यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. क्लोरिन पाण्यात घातल्याबरोबर, त्याचा पाण्यातील कार्बन पदार्थाशी लगेच रासायनिक संयोग होतो व तयार झालेली संयुगे जंतुनाशनासाठी अजिबात उपयुक्त नसतात. म्हणून इतर कार्बनी पदार्थाशी संयोग झाल्याने पाण्यात क्लोरिनची चव येते त्यामुळे क्लोरिनची चव हे पाण्यात मुक्तशेष क्लोरिन असल्याने लक्षण नसते. सर्वसाधारणपणे गढूळ वा बऱ्याच प्रमाणात कार्बनी पदार्थ मिसळल्याने जास्त दुषित झालेले क्लोरिनीकरणस योग्य नसते. पाणी गढूळ असल्याने निस्पंदन होऊन ते स्वच्छ झाले की त्यात क्लोरिनीकरण चांगले होऊ शकते.
द्रावण स्वरुपात क्लोरिनचा पुरवठा करण्यासाठी क्लोरिन फार सोयीस्कर असतो. द्रावणाचा साठा करावयाचा असेल तर सुमारे १ टक्का उपलब्ध क्लोरिन असणारे द्रावण तयार करणे इष्ट असते. या द्रावणाची तीव्रता इतर झोनाईट, निल्टन किंवा जव्हेल पाणी यासारख्या अँटीसेप्टीक औषधा इतकीच जवळजवळ असते. 
धुण्यासाठी वापरण्याची विरंजक द्रावणे निरनिराळ्या नावाने बाजारात विकत मिळतात. त्यामध्ये सुमारे ३ ते ५ टक्के उपलब्ध क्लोरिन असतो. व अवमिश्रण करून याचे प्रमाण सहज १ टक्क्यांवर आणता येते. डेकीनच्या द्रावणात सुमारे ०.५ टक्के उपलब्ध क्लोरिन असतो.
विरंजक चूर्ण किंवा क्लोरिनीकरण केलेला चुना ही पांढरी भुकटी असून तयार केल्यावेळी त्यात सुमारे ३० टक्के उपलब्ध क्लोरिन असतो. तथापि डबा उघडल्यानंतर भुकटीची तीव्रता झपाट्याने कमी होत जाते. भुकटी बराच काळ साठवून ठेवली तरी तीव्रतेत अशीच घट दिसून येते. यासाठी संचित द्रावण तयार करताना डबा उघडल्यानंतर डब्यातील सर्व विरंजक भुकटीचा लगेच वापर करणे उषट असते. विरंजक भुकटी म्हणजे क्लोरिनीकरण केलेला चुना असल्याने काही तासानी द्रावणाच्या तळाशी निष्क्रीय चुन्याच्या गाळ बसतो आणि वर क्रियाशील क्लोरिनचे स्वच्छ द्रावण तयार होते.

दुसऱ्या प्रकारची भुकटी म्हणजे जास्त तीव्रतेचे हायपोक्लोराईट यात सुमारे ७० टक्के उपलब्ध क्लोरिन असतो. या भुकटीचे डबे शक्य तितक्या थंड जागी ठेवावे लागतात. कारण कडक उन्हात वा गरम जागेत नेले असता अशा डब्यांचा स्फोट झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. संचित द्रावण तयार करावयाचे असल्यास क्लोरिनीकरण केलेल्या चुन्याचे द्रावण करताना जी पद्धत वापरली जाते तीच पद्धत या भुकटीसाठीही वापरता येते.क्लोरिनीकरण केलेल्या चुण्यापेक्षा तीव्र हायपोक्लोराईट हे जास्त टिकाऊ असते व डबा उघडला तरी त्याची तीव्रता लगेच कमी होत नाही त्यामुळे डब्यातील सर्व भुकटीचा एकावेळी वापर करणे आवश्यक नसते. तथापि डबा उघडल्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत याचीही तीव्रता कमी होते.

No comments:

Post a Comment