इलेक्ट्रॉनिक सर्कीटमध्ये मुख्यत्वे खालील कांपोनंट (Component) वापरले जातात.
१. Resistor - रेझिस्टर (विदयुतरोधक)
इलेक्ट्रीक सर्कीटमधील करंट कमी करण्यासाठी रेझिस्टरचा वापर केला जातो. रेझिस्टर या चिन्हाने सर्कीटमध्ये दाखविण्यात येतो. रेझिस्टरची रेझिस्टन्स व्हॅल्यु (R) ही Ohm (ओहम) या युनिटमध्ये मोजली जाते. 1000 ओहम म्हणजे 1K-Ohm.
रेझिस्टरची सलग व समांतर जोडणी (In Series and parallel)
इलेक्ट्रीक वा इलेक्ट्रॉनिक सर्कीटमध्ये रेझिस्टर सलग पणे (In Series) जोडले असतील तर त्याचा एकूण रेझिस्टन्स हा सर्व रेझिस्टन्सच्या बेरजेइतका असतो.
R=R1 + R2 + R3
अशावेळी प्रत्येक रेझिस्टरमध्ये वेगवेगळा व्होल्टेज ड्रॉप (V1,V2,V3) होतो मात्र या सर्व रेझिस्टरमध्ये करंट एक सारखाच म्हणजे एकूण व्होल्टेज ड्रॉप भागिले एकूण रेझिस्टन्स एवढा राहतो.
V=V1 + V2 + V3
I=V/R
मात्र असे रेझिस्टर जर समांतर पद्धतीने (In parallel) जोडले असतील तर त्यांचा एकूण रेझिस्टन्स हा खालील सूत्राने काढता येतो.
1/R=1/R1 + 1/R2 + 1/R3
सर्कीटमध्ये फिक्स्ड आणि व्हेरिएबल असे दोन प्रकारचे रेझिस्टर वापरले जातात. रेझिस्टरच्या रेझिस्टन्स व्हॅल्युबरोबरच त्याचे पॉवर रेटींग आणि टॉलरन्स या दोन गोष्टींचा विचार करून कोणता रेझिस्टर वापरायचा हे ठरवावे लागते. पॉवर रेटींग म्हणजे विद्युतशक्ती सहन करण्याची क्षमता आणि टॉलरन्स म्हणजे प्रमाणित रेझिस्टन्स व्हॅल्युपेक्षा किती कमी जास्त व्हॅल्युसाठी तो सुरक्षितपणे वापरता येईल याचे मोजमाप. टॉलरन्स हा परसेंटेजमध्ये दिलेला असतो. इलेक्ट्रिक करंट व्हॅल्यु (I) मोजण्यासाठी amp (अँपियर) हे युनिट वापरतात तर व्होल्टेज V= I x R आणि इलेक्ट्रिक पॉवर E= V x I किंवा E=I x I x R या सूत्राने काढता येते व ती वॅटमध्ये मोजतात.
इलेक्ट्रॉनिक सर्कीटमध्ये सर्वसाधारणपणे 1/8,1/4,1/2 watt या पॉवर रेटींगचे रेझिस्टर वापरलेले असतात.
२. Capacitor कपॅसिटर -
कपॅसिटरमध्ये दोन धातूच्या पट्ट्या थोडे अंतर ठेवून बसविलेल्या असतात. कपॅसिटर
या चिन्हाने सर्कीटमध्ये दाखविण्यात येतो. इलेक्ट्रॉनिक सर्कीटमध्ये कपॅसिटर असला की डायरेक्ट किंवा एकदिश करंट खंडित होतो. मात्र धातूच्या पट्टीवर धन विद्युत भार वाढत जातो. अल्टरनेटिंग किंवा उलतासुलट विद्युतप्रवाह असेल तर कपॅसिटरमध्ये आळीपाळीने दोन्ही पट्ट्या विद्यु्तभारीत होतात व इलेक्ट्रॉनिक सर्कीटमध्ये करंट चालू रहातो. या क्रियेत कपॅसिटरमध्ये विद्युतशक्ती साठविली जाते. कपॅसिटरची कपॅसिटन्स व्हॅल्यु मोजण्यासाथी फॅरेडे हे युनिट वापरता. एक फॅरेडे एवढा कपॅसिटन्स इलेक्ट्रॉनिक सर्कीटच्या मानाने फार मोठा असल्याने 1/1000 फॅरेडे (मायक्रोफॅरेडे) हे युनिट वापरण्यास सोयीचे ठरते.
कपॅसिटर (कन्डेन्सर) ची सलग व समांतर जोडणी (In Series and parallel)
कपॅसिटर सलगपणे जोडले(In Series) असतील तर त्यांच्यावरील संचित होणारा विद्युतभार सारखा राहतो व एकूण कपॅसिटन्स खालील सूत्राने काढता येतो.
1/C=1/C1 + 1/C2 + 1/C3
मात्र कपॅसिटर समांतरपणे जोडले (In parallel) असतील तर त्यांच्यावरील संचित होणारा विद्युतभार वेगवेगळा असतो व एकूण कपॅसिटन्स हा सर्व कपॅसिटन्सच्या बेरजेइतका असतो.
C=C1 + C2 + C3
३. Inductor इन्डक्टर -
इन्डक्टर या चिन्हाने सर्कीटमध्ये दाखविण्यात येतो.
एखाद्या रिळाभोवती तांब्याच्या तारेचे अनेक वेढे घालून ते इलेक्ट्रॉनिक सर्कीटमध्ये लावले की या तारेतून वीज वाहताना रिळाभोवती इंडक्शनमुळे मॅग्नेटिक फील्ड (चुंबकीय क्षेत्र) निर्माण होते. त्यामुळे या साधनाला इन्डक्टर असे म्हतले जाते. विद्युतप्रवाहात कमीजास्त बदल होत असतील इन्डक्टरच्या मॅग्नेटिक फील्डमुळे अशा बदलास विरोध होतो व करंट एकसमान राहण्यास मदत होते. इंडक्टरची इन्डक्टन्स व्हॅल्यु (L) मोजण्यासाठी H (Henry) हेन्री हे युनिट वापरतात.
४. Diode डायोड -
डायोड हे अर्धवाहक उपकरण अ्सून यामुळे विद्युतप्रवाह फक्त एका दिशेने वाहू शकतो. डायोड
या चिन्हाने सर्कीटमध्ये दाखविण्यात येतो. AC ( Alternating Current) चे DC(Direct Current) मध्ये रुपांतर करण्यासाठी, ऑन/ऑफ स्विच म्हणून वापरण्यासाठी किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीमधील संदेश वेगळा करण्यासाठी डायोडचा उपयोग करता येतो.
डायोडचे तीन प्रकार आहेत.
अ) Zener Diode झेनर डायोड - व्होल्टेज नियंत्रणासाठी झेनर डायोडचा उपयोग करतात. झेनर डायोड हा
या चिन्हाने सर्कीटमध्ये दाखविला जातो.
ब) LED ( Light emitting diode) एलईडी दिवा हा एक प्रकारचा डायोडच आहे. एलईडी हा
या चिन्हाने सर्कीटमध्ये दाखविला जातो. या डायोडमधून विद्युत प्रवाह वाहू लागला की त्याच्या कॅथोडमधून इलेक्ट्रॉन उत्सर्जनामुळे प्रकाश बाहेर पडतो.
या चिन्हाने सर्कीटमध्ये दाखविला जातो.
क) Variable capacitance diode व्हेरिएबल कपॅसिटन्स डाय़ोड -
व्हेरिएबल कपॅसिटन्स डाय़ोड हा
या चिन्हाने सर्कीटमध्ये दाखविला जातो. विरुद्ध दिशेने डायोडवर व्होल्टेज लावले तर डायोडमधून विद्युतप्रवाह वाहू शकत नाही अशावेळी व्होल्टेज बदलून व्हेरिएबल कपॅसिटर म्हणून डायोदचा उअपयोग करता येतो.

No comments:
Post a Comment