Monday, September 8, 2014

क्लाउड स्टोअरेज - (Cloud Storage )


क्लाउड म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून विविध ठिकाणी असलेल्या अनेक कॉम्प्युटर्सच्या समूहांचा वापर करून   माहिती साठविण्याची  तसेच  त्या माहितीच्या आधारे आवश्यक निष्कर्ष अहवाल मिळविण्याची व्यवस्था. याचे अनेक प्रकार आहेत

पब्लिक अथवा सार्वजनिक क्लाउड(Public Cloud)
या क्लाउड स्टोअरेजमध्ये सर्व उद्योगांची माहिती एकत्रितपणे साठविली जाते. अर्थात प्रत्येक उद्योगाच्या माहितीच्या सुरक्षेसाठी व गुप्ततेसाठी विशिष्ट पासवर्ड वापरलेले असल्याने माहिती बाहेर फुटत नाही. या प्रकारचे स्टोअरेज कमी खर्चाचे असते कारण यात क्लाउडच्या साधनसामुग्रीच्या वापरात माहितीच्या समायोजित हाताळणीमुळे बरीच बचत होऊ शकते. 

प्रायव्हेट अथवा खासगी क्लाउड (Private Cloud)
 ज्या उद्योगांना आपल्या माहितीच्या साठ्यासाठी वा विश्लेषणासाठी स्वतंत्र क्लाउड व्यवस्था हवी असेल तर केवल त्या उद्योगापुरती सीमीत अशी प्रायव्हेट क्लाउड व्यवस्था मिळू शकते.

हायब्रीड (Hybreed Cloud )अथवा वरील दोन्ही प्रकारांचा समावेश असणारा क्लाउड
 काही मोठे उद्योग खर्चात बचत करण्यासाठी हायब्रीड क्लाउड पद्धतीचा वापर करतात. अतिशय महत्वाची व संवेदनशील माहिती प्रायव्हेट क्लाउडवर आणि कमी महत्वाची पण जास्त आकारमानाची माहिती पब्लिक क्लाउडवर साठविणे अशा वेळी हायब्रीड क्लाउड सेवा वापरली जाते.

क्लाउड मधील कॉम्प्युटर्स एकमेकाना (Clustor) क्लस्टर म्हणजे समूह स्वरुपात वा नेटवर्क(Network) अथवा इंटरनेटद्वारे जोडलेल्या स्वरुपात असू शकतात.

 कॉम्प्युटर्सवर माहिती जतन करण्यासाठी दोन प्रकारच्या व्यवस्था वापरता येतात.

SAN - सान किंवा स्टोअरेज एरिया नेटवर्क म्हणजे सॉफ्टवेअर व माहितीसाठा करणार्‍या हार्डडिस्क असणार्‍या कॉम्प्युटर्सचे इथरनेट किंवा फायबर केबल्सच्या साहाय्याने तयार केलेले एकत्रित जाळे. या प्रकारच्या माहितीसाठ्यात माहितीची देवाणघेवाण अतिशय वेगाने होऊ शकते. इकॉमर्स वेबसाईटवर हजारो ग्राहक दर सेकंदाला वस्तू खरेदी करीत असतात.  अशा प्रकारच्या किंवा फेसबुक वा ट्विटरसारख्या लोकप्रिय चॅटिंग वेबसाईट वरून येणार्‍या गतिमान माहितीची नोंद डाटाबेसमध्ये त्याच वेगाने होण्याची आवश्यकता असते.  याठिकाणी सान पद्धत अधिक उपयुक्त ठरते.

NAS - नास म्हणजे नेटवर्क अटॅच्ड स्टोअरेज. याबाबतीत कॉम्प्युटर सर्व्हर हा आपल्या माहितीसाठ्याचे आदानप्रदान इतरांशी नेतवर्कद्वारे करतो. यात सर्व्हर व माहिती साठा वा प्रक्रिया करणारे कॉम्प्युटर इथरनेट नेटवर्कच्या माध्यमातून तयार केले एकत्रित जाळे. या पद्धतीत माहितीचे हस्तांतरण फाईल स्वरुपात टीसीपी / आयपी (TCP/IP)  पद्धतीने होत असल्याने वेळ जास्त लागतो. प्रत्येक युजरला होम डिरेक्टरी पुरवायची असेल तर या पद्धतीचा उपयोग होतो. शिवाय या पद्धतीत एकमेकांशी कॉम्प्युटर अगदी सहजपणे विशेष वेगळी प्रणाली न वापरता जोडता येतात.

सान व नास या दोन्ही प्रकारांचा वापर करून हायब्रीड पद्धतीने माहिती साठा करता येतो.

No comments:

Post a Comment