Sunday, February 20, 2011

जावास्क्रिप्टच्या साहाय्याने पाढे तयार करणे

बेचे पाढे

सूर्य नमस्कार घालताना अनेक कृती आपण त्याच क्रमाने पुन्हा पुन्हा करतो.गणितातही अशा पद्धतीचा वापर केला जातो. पाढे हे याचे उत्तम उदाहरण आहे. बेच्या पाढ्य़ात २ संख्येला १ ते १० संख्यांनी गुणले की बेचा पाढा तयार होतो. दोनात एक मिळवून पुन्हा हीच क्रिया केली की तिनाचा पाढा तयार होतो. असे २ पासून १० पर्यंतचे पाढॆ म्हणजे बेचे पाढे सर्वांना माहितीचे आहेत.

जावास्क्रिप्टच्या लूप(loop) पद्धतीचा वापर करून असे पाढे आपल्याला बनविता येतात.For आणि While असे दोन प्रकारचे लूप यासाठी वापरता येतात.
for loop
var i=1;
for (i=1;i<=10;i++)
{
document.write( i*2);
document.write(", ");
}
वरील प्रोग्रॅममध्ये i चे मूल्य 1 पासून 10 पर्यंत वाढून उत्तर 2,4,6,8,10,12,14,16,18,20 असे येईल. एका लूपमध्ये दुसरा लूप घालून त्यात j चॆ मूल्य 2 ते 10 पर्यंत वाढविले व j*i चे मूल्य काढले तर पाढ्याचा प्रोग्रॅम तयार करता येईल. पाढे नीट दिसावेत यासाठी table टॅगचा वापर करून बेचे पाढॆ लिहिण्याचा प्रोग्रॅम खालीलप्रमाणे करता येईल.

उदाहरण

















अशा प्रोग्रॅमचा फायदा म्हणजे केवल आकडे बदलून हाच प्रोग्रॅम आपल्याला कोणतेही पाढॆ तयार करण्यासाठी वापरता येईल. उदा. 41 ते 50 पर्यंतचे पाढे लिहिण्यासाठी j चे मूल्य खालीलप्रमाणे लिहावे लागेल.

for(j=41; j<=50; j++)

No comments:

Post a Comment