पक्षांच्या आवाजाच्या ध्वनिमुद्रिका च सीडी त्यांनी तयार केल्या आहेत. मात्र त्यांच्या विक्रीबाबत त्याना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. दुकानात सीडी ठेवून त्याची माहिती न कळल्याने विक्रीही फारशी झाली नाही. त्यांचे कार्यही त्यांच्या ओळखीच्या व या क्षेत्रातील लोकांनाच माहीत होते. वेबसाईटचा याकामी काही उपयोग होईल याविषयी ते प्रथम साशंक होते. ज्ञानदीपने त्यांची वेबसाईट केल्यावर त्यांचे नाव तर सर्वांना माहीत झालेच जगभरातील पक्षीप्रेमींना त्यांच्या कार्याची ओळख झाली. ठिकठिकाणी त्यांना भेटीचे निमंत्रण येऊ लागले.

या वेबसाईटवर सुमारे ३०० पक्ष्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऎकायला मिळतात शास्त्रीय पद्धतीने त्याचे वर्गीकरण करून डाटाबेसवर आधारित वेब अप्लीकेशन केलेले असल्याने पक्षी अभ्यासकांना याचा चांगला उपयोग होतो.

वेबसाईटचा त्यांना खरा फायदा झाला तो सीडी विकण्यासाठी. केवळ बॅंकेच्या खात्याचे नाव देऊन सीडी विकण्याची सोय केल्याने त्यांच्या २००० वर सीडी विकल्या गेल्या. आता क्रेडीट कार्डच्या माध्यमातून अशा विक्रीसाठी विशेष वेब अप्लिकेशन करून घेण्याचा त्यांचा विचार आहे. यामुळे परदेशातील ग्राहकाम्ना या सिडी विकत घेणे सोपे होईल. वेबसाईटमुळे छंदाला अर्थप्राप्ती होते ती अशी.
बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळाची वेबसाईट पाहिल्यावर कवी व संगीतकार यांना एकत्र आणून काव्याचे संगीतात रूपांतर करण्याची वेबसाईट करण्याचे काम श्री गिरीश मुकुल यांनी ज्ञानदीपवर सोपविले.

No comments:
Post a Comment