सांगलीतील अपंग सेवा केंद्राची वेबसाईट ज्ञानदीपने पाच वर्षांपूर्वी तयार केली होती व त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

जायंट्स ग्रुप व महापालिका यांच्या मदतीवर चालणार्या मूकबधिर मराठी मुलांची शाळा वेबसाईटचा आपली माहिती लोकांपर्यंत वेबसाईटद्वारे पोहोचविते व आता या शाळेने चांगला नाव लौकीक मिळविला आहे.

कुपवाडच्या गौंडाजे पतीपत्नींनी आपल्या मतिमंद मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्यावर त्यास इतर पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला व या शाळेचे रुपांतर अजिक्य फौंडेशन ह्या संस्थेत करण्यात आले. ज्ञानदीपमध्ये आर्थिक मदतीविषयी विचारणा करण्यास आलेल्या गौंडाजे यांना माहिती तंत्रज्ञानाद्वारे ज्ञानदीप करीत असलेल्या कार्याची माहिती झाली व लोकांपर्यंत आपल्या संस्थेचे कार्य पोहोचविण्यासाठी वेबसाईट हे प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आले. ज्ञानदीपने त्यांची वेबसाईट तयार केली.

श्री. गौंडाजे यांना मोठ्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने वेबसाईटसाठीही मार्केटींग लागते याची त्यांना जाणीव होती. राजकीय नेते,व्यापारी व मोठ्या कंपन्यांशी संपर्क करून व आपल्या संस्थेचे कार्य वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना दाखवून अजिक्य फौंडेशनला भरीव आर्थिक साहाय्य मिळविले. आता या संस्थेचा विस्तार करून वृद्धाश्रम व इतर सुविधा निर्मान करण्यासाथी एक कोटीचा प्रकल्प त्यांनी आखला आहे. या त्यांच्या कार्यात ज्ञानदीपच्या वेबसाईटचा खारीचा वाटा आहे.
सांगलीतील भगिनी निवेदिता या महिलांसाठी कार्य करणार्या सस्थेच्या व मा. शरद पाटील यांच्या पुढाकारातून चाललेल्या वृद्ध सेवाश्रमाच्या वेबसाईटचे काम सध्या चालू आहे.


इतर सेवाभावी संस्थांना वेबसाईटच्या उपयुक्ततेविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment