Thursday, July 16, 2009
ग्रीन बिल्डिंग
वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे.
शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक पटीनी वाढते. साहजिकच त्यांची पाण्याची गरज त्याचप्रमाणात वाढते. मात्र पाणीपुरवठ्याचा नळ मोठा करता येत नाही. कारण तो शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील एक छोटा भाग असतो. त्यामुळे मोठ्या व्यासाचा नळ बसविला तरी पाणीपुरवठा वाढू शकत नाही. जी गोष्ट पाण्याची तीच सांडपाणी वाहून नेणार्या गटारांची वा नळांची. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी व पंपाची व्यवस्था करता येते मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलजल व्यवस्थेत सोडणे बहुधा शक्य होत नाही. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. नव्या इमारतींच्या किंमती अधिक असल्याने त्यात राहणाया लोकांचे जीवनमानही उच्च असते. त्यांच्याकडे स्कूटर व मोटार वाहने असतात. त्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करावी लागते. रस्त्यावरील वाहतुकही वाढते. रस्ता अधिक रुंद व जास्त टिकावू करावा लागतो. अधिक विजेची गरज भागविण्यासाठी उच्च दाबाच्या तारा व ट्रॅन्स्फ़ार्मर बसवावे लागतात.
एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल तर शहरात ठिकठिकाणी अनेक इमारतींचे असे रुपांतर झाल्यास शहराची सर्व सुविधा यंत्राणाच कोलमडून पडते. याशिवाय अनेक जुन्या इमारती पाडण्याचे वा नवीन बांधण्याचे काम चालू असल्याने ट्रकांची वाहतूक, जुने नवे बांधकाम साहित्य व कामगारवस्ती यांचाही ताण शहर व्यवस्थेवर पडतो. शहरातील लोकसंख्या वाढते तशी जीवनावश्यक वस्तूची गरजही वाढते. ती पुरविण्यासाठी मोठी दुकाने, मॉल यांचीही त्यात भर पडते. करमणूक व इतर सुखसोयीही आहे त्या जागेत निर्माण केल्या जातात. परिणामी शहराचे मुळचे रूप नष्ट होऊन त्याला कांक्रीटच्या जंगलाचे रूप येते.
बिल्डिंग व्यवसायात वाढ झाली असली तरी बांधकाम व्यावसायिक इमारतीच्या दिखाऊपणास जास्त महत्व देताना दिसतात. त्यामुळे गरज नसताना किंवा इमारतीतील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होईल अशा रचना करताना आढळतात. यामुळे एअर कंडिशनर, प्रकाशासाठी जास्त ऊर्जा लागणारे दिवे, घातक वायू उत्पन्न करणार्या अंतर्गत सजावटीच्या वस्तू यांचा वापर केलेला आढळतो. त्यामुळे इमारतीतील पर्यावरण दूषित होते ऊर्जेसाठीच्या खर्चात वाढ होते व शहराच्या सेवासुविधांवरही अतिरिक्त ताण पडतो. यासाठी पर्यावरणपूरक इमारत म्हणजेच ग्रीन बिल्डिंग बांधण्याविषयी लोकशिक्षण व जागृती अभियान आवश्यक आहे.
ग्रीन बिल्डिंग संकल्पना• सौरऊर्जेचा उष्णता व प्रकाश मिळविण्यासाठी वापर,
• नैसर्गिक वायुवीजन
• निर्मितीसाठी कमी ऊर्जा लागणार्या तसेच पर्यावरणास पूरक ठरणार्या वस्तूंचा बांधकामात वापर
• पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर
• घरातील हवेचा दर्जा योग्य राखणे
• पर्जन्य जलसंधारण
• सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर, घन कचर्यापासून खत वा बायोगॅस
ग्रीन बिल्डिंगच्या कल्पनेला अधिक चालना मिळावी यासाठी अमेरिकन ग्रीन बिल्डिंग कौंसिलने इमारतीचा पर्यावरणविषयक दर्जा निश्चित करण्यासाठी Leadership in Energy and Environmental Design (LEED) गुणांकन पद्धत तयार केली आहे.
लीड गुणांकन पद्धत• २६-३२ गुण लीड प्रमाणित बिल्डिंग
• ३३- ३८ गुण सिल्व्हर दर्जाची बिल्डिंग
• ३९- ५१ गुण गोल्ड दर्जाची बिल्डिंग
• ५५-६९ गुण प्लॅटिनम दर्जाची बिल्डिंग
सूर्यप्रकाश
भारत उत्तर गोलार्धात असल्याने सूर्याचा मार्ग दक्षिणेकडे झुकलेला असतो. म्हणजेच मध्यान्ही स्थानीय अक्षांशाएवढा सूर्य दक्षिणेकडे कललेला असतो. साहजिकच सूर्यशक्तीवर पाणी गरम करणारी यंत्रणेचे तोंड दक्षिणेकडे असते. मात्र दक्षिणेकडे खिडकी असल्यास जास्त उष्णता घरात येते. यासाठी दक्षिण बाजूस खिडकी न ठेवता ती उत्तरेस ठेवणे योग्य असते. वर्षात सूर्याचा मार्ग बदलत असल्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त ऊर्जा मिळविण्यासाठी सौरऊर्जा साधनांची दिशा बदलावी लागते.
सौरचूल व सौरशक्तीवर पाणी तापविण्याची यंत्रणा आता सर्वांच्या परिचयाच्या झाल्या आहेत तरी त्यांचा वापर अजून फार कमी आहे. मोठी हॉटेल्स, होस्टेल्स, दवाखाने व अपार्टमेंट्स यांच्यासाठी पॅराबोलिक सोलर कुकर वा आंतरगोलीय संग्राहकांचा वापर करता येतो.
सोलरपॅनेल वापरून सौरशक्तीचे विजेत रुपांतर करता येते. स्टोअरेज बॅटरीत ही वीज साठवून रात्री प्रकाशासाठी वा पंख्यांसाठी या ऊर्जेचा उपयोग करता येतो. पवनचक्की व सौरऊर्जा यांचा एकत्रित उपयोग केल्यास इमारतीमधील विजेची गरज भागवून अतिरिक्त वीज ग्रिडला पुरवता येणे शक्य आहे.
घरात सूर्यप्रकाशाचा जास्तीतजास्त वापर होण्यासाठी छ्परामध्ये काचेची कौले, दुधी प्लॅस्टीकचे पत्रे, आरसे, भिंगे यासारखी विविध प्रकाश उपकरणे वापरून घरात कोठेही नैसर्गिक सूर्यप्रकाश पोहोचविणे आता शक्य झाले आहे. असा सूर्यप्रकाश कमी तपमानाचा व अधिक आल्हाददायक असतोच पण मुख्य म्हणजे यामुळे विजेच्या खर्चात खूपच बचत होते. मोठ्या व्यावसायिक ऑफिसेसमध्ये असा कमी तपमानाचा सूर्यप्रकाश विजेच्या दिव्यांऐवजी वापरल्यास शीतकरणाची गरज कमी होऊन खर्चात बचत होते.
सूर्याच्या उष्णतेपासून घराचे संरक्षण
सूर्यप्रकाशात असणार्या घराचा पृष्ठभाग आवश्यकतेनुसार उघडता व झाकता येण्याची सोय केलेली असते. पूर्वी घरांच्या भिंती जाड असत व त्यामुळे आपोआपच उष्णता राखण्यास मदत होत असे. बाहेरच्या खिडक्या व दारे यातून सूर्यप्रकाश सरळ आत येतो व आतील उष्णता वाढते.
खिडकी छतालगत उंचावर असल्यास असा परिणाम अधिकच जाणवतो. यासाठी खिडक्या खालच्या बाजूस ठेवून त्यावर पूर्ण सावली पडेल अशा रीतीने खिडक्या व दारांवरील कनातीची रूंदी ठरवावी लागते. तसेच घराच्या आत येणारा सूर्यप्रकाश सरळ न येता परावर्तित होऊन तो छताकडे जाईल व तेथून सर्वत्र पसरेल अशी योजना करता येते.
छतावर किंवा गच्चीत पाणी साठविण्याची सोय केलेली असते. यामुळे घर दिवसा थंड तर रात्री गरम राहते. बाहेरच्या बाजूस सावली देणारी झाडे असणे फायदेशीर असते. पडदे, व्हरांडा, उतरते छप्पर यांचीही सूर्यप्रकाश रोखण्याचे उपाय नैसर्गिक वायुवीजनाचा दुहेरी फायदा होतो. त्यामुळे गारवा येतो व घरातील बांधकाम घटकही थंड होतात.
घराचे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करणे व त्याचवेळी घरातील प्रकाशाची गरज भागविण्यासाठी सूर्यप्रकाशाचा जास्तीतजास्त उपयोग करणे हे उद्दीष्ट ठेऊन घराचे डिझाईन करावे लागते.
नैसर्गिक वायुवीजन
सूर्याच्या उष्णतेने हवा गरम होऊन वर जाते या तत्वाचा वापर करून घराचे डिझाईन केले की नैसर्गिक वायूवीजन होऊन आतील तापमान थंड व सुखकर राहते. घरातल्या फरशीखाली पाणी साठविण्याची सोय केल्यास त्याचीही तापमान थंड ठेवण्यास मदत होते.
इमारतीच्या बाहेरील बाजूच्या भिंती आणि छप्पर वा स्लॅब सूर्याच्या उष्णतेने तापतात व त्याचा परिणाम इमारतीच्या आतल्या तापमानावर होतो. त्यामुळे बाहेरील बाजूस पडवी वा व्हरांडा ठेवल्यास भिंतीवर ऊन पडत नाही. पडदे, उष्णतारोधक काचा यांचा उपयोग करूनही आत येणारी उष्णता थोपविता येते. स्लॅब व बाहेरील भिंतीना प्रकाश परावर्तक पांढरा रंग दिल्यास उष्णता शोषली न जाता ६० ते ७० टक्के उष्णतेचे परावर्तन होऊन ती परत वातावरणात सोडली जाते व त्यामुळे आतले तापमान थंड राहण्यास मदत होते. अशी उपाय योजना केल्यास घरातील तापमान २ ते ३ डिग्रींनी कमी होऊ शकते. घरातील शीतकाच्या शीतकरण द्रवाचे बाष्पीभवन करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर केल्यास शीतकाच्या वीज वापरात बचत होते. १० चौरस मीटर जागेवरील सूर्यप्रकाशाचा उपयोग केल्यास ८ तासात ०.५ ते १.२ टन हवेचे शीतकरण साधता येते.
पर्यावरण पूरक वस्तू
इमारतीसाठी निर्मितीसाठी कमी ऊर्जा लागणार्या व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा. बांबू, ज्यूट व कापड यापासून बनविलेल्या वस्तू, उसाच्या बगॅसपासून तयार केलेले तक्ते, उन्हात वाळविलेल्या विटा, प्रीकास्ट सिमेंट कांक्रीट ब्लॉक, तुळया, स्लॅब,सच्छिद्र वा पोकळ कांक्रीटचे ब्लॉक, सिमेंटचा रंग, मातीची कौले, फ्लाय अँशच्या विटा असे अनेक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत.
हवा प्रदूषण टाळण्यासाठी बाष्पशील सेंद्रीय पदार्थ(व्हीओसी) नसणारे रंग वापरा. पाण्याची ओल व गळतीमुळे बुरशी व जिवाणूंची वाढ होते यासाठी योग्य जलावरोधक वापरावेत. फ्लाय अँश, टाइल्सचे तुकडे व पुनर्वापर करतायेणार्या वस्तूंचा बांधकामात वापर करावा.
पर्जन्यजल संकलन ( रेन वाटर हार्वेस्टींग)पाण्याच्या सर्व उपलब्ध स्रोतांमध्ये पावसाचे पाणी सर्वात शुद्ध असते व मोफत मिळू शकते. मात्र ते साठविण्यासाठी व्यवस्था करावी लागते. ढगातून पाणी खाली पडताना हवेतील धूळ व कार्बन डॉय ऑक्साईड वायू या खेरीज या पाण्यात कोणतेही विद्राव्य क्षार वा गढूळपणा नसतो. घराच्या छपरावर वा गच्चीत पडणारे पाणी एकत्र करण्यासाठी पन्हाळी व उभे नळ लावून हे पाणी एकत्र करता येते. पहिल्या पावसाबरोबर येणारे छपरावरील पालापाचोळा व कचरा असलेले पाणी तसेच वाहून जाईल अशी व्यवस्था व नंतर येणारे चांगले पाणी विशिष्ट गाळणीतून स्वच्छ होऊन पाण्याच्या टाकीत जमा होईल अशी व्यवस्था करावी लागते. असे साठविलेले पाणी पिण्यासाठी वापरता येते. घराच्या आवारात, बागेत वा रस्त्यावर पडणारे पाणी गाळून बोअरवेलमध्ये सोडले तर भूजल पुनर्भरण करता येते. यासाठी बोअरवेलच्या सभोवती वाळू व खडीचे थर असणारा फिल्टर तयार करावा.
पाण्याची बचत
घरात वापरावयाच्या पाण्यात बचत केली की पाण्याची बचत होतेच शिवाय व घरातील सांडपाणी कमी तयार होते. यासाठी ड्युएल फ्लश तसेच पाण्याचा प्रवाह आपोआप बंद हॊणारे वॉशबेसिन व पॅरीचे अजिबात पाणी न लागणार्या (वाटरलेस) युरिनल वापरल्यास अशी बचत करता येते.
सांडपाणी शुद्धीकरण व पुनर्वापर
सांडपाणी शुद्धीकरणासाठी वाळूचा थर असणारी टाकी बांधली व त्यात पानवनस्पती लावल्या तर सांडपाण्यातील सर्व दूषित द्रव्यांवर प्रक्रिया होऊन सांडपाणी शुद्ध होते व ते बागेसाठी वापरता येते. यामुळे सांडपाणी निचरा करण्याची समस्या रहात नाही.
प्लॅटिनम दर्जाची इमारत
भारतातील पहिली प्लॅटिनम दर्जाची इमारत हैदराबाद येथील सोहराबजी गोदरेज ग्रीन बिझिनेस सेंटर ही आहे. २००० चौ. फूट क्षेत्र असणार्या या इमारतीतील ९० ट्क्के क्षेत्रातील खोल्यात सूर्यप्रकाश मिळण्याची व बाहेरचा निसर्ग पाहण्याची सोय आहे. दक्षिणेकडे सोलर पॅनेल वापरून सौरऊर्जेपासून वीज मिळवून इमारतीतील ८८ टक्के विजेची गरज भागवण्यात आली आहे. सांडपाणी प्रक्रियेसाठी पाणवनस्पतीचा उपयोग करून शुद्ध केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला आहे. यामुळे पाण्याच्या वापरात ३५ टक्के घट झाली आहे. वाया गेलेल्या फूटक्या काचा, टाईलचे व कौलांचे तुकडे, पुनर्वापरातील कागद व साखर कारखान्यातील बगॅस यांचा वापर बांधकाम साहित्यात केला असून ९६ टक्के बांधकाम साहित्य पुनर्वापरयोग्य आहे. वरच्या भागातील थंड हवा आत घेण्यासाठी विंड टॉवर व पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी ८ लाख लिटर क्षमतेचे तळे यांची योजना केली आहे.
आता भारतात अनेक ठिकाणी ग्रीन बिल्डिंग बांधण्यात आल्या असून भारतीय परिस्थितीस अनुकूल असे दर्जा ठरविण्यासाठी निकष तयार करण्यात आले आहेत. भविष्यकाळात सर्व इमारती ग्रीन निकषांना उतरतील असे निर्बंध घालण्याचा शासन विचार करीत आहे. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून इमारती बांधणे आवश्यक आहे.
याविषयी लोकजागृती व प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनने गेल्या चार वर्षांच्या काळात अनेक कार्यसत्रे घेतली असून www.envis.org व www.green-tech.biz ही संकेतस्थळे व ग्रीन टॆक नावाचा एक याहू ग्रुप चालू केला आहे. त्यावर तज्ञांचे लेख तसेच ग्रीन बिल्डिंगविषयी सर्व महत्वाची माहिती देण्यात आली आहे त्याचा सर्व बांधकाम व्यावसायिकांनी फायदा घ्यावा अशी अपेक्षा आहे.
Wednesday, July 15, 2009
My Comments Ted.com lectures
July 14, 2009: I liked his brilliant talk and the way he analysed the staleness and rigidity of traditional thinking about architecture and his somewhat disturbing opinions about architecture. However, when I read the comments, I was surprised to find the sarcasm and criticism from established architects and their mention of his failures in actual practice. I was reminded of a novel 'Fountainhead' written by Ayn Rand, where Howard Roark, a young architect struggling against tradition-worship being thrown out of university and profession.
In spite of vagueness and arguable statements in view of majority of commentators, I feel that he has succeeded in shaking the very foundations of established architecture principles.
• A comment on Talk: John Doerr sees salvation and profit in greentech
Jun 7 2009: Very well organised, thought provoking and emotional appeal for going green. I liked following two sentences.
'Going green is the largest economic opportunity of the 21st century' and
'Entrepreneurs do more than any one thinks possible with less than anyone thinks possible'
In India, there is awareness about going green, but as green alternatives have high initial cost component, their adoption is still marginal. Our foundation proposes to launch www.green-tech.biz to boost sale of green products and processes by educating people about long term economical and environmental advantages of going green.
Honorable speaker. Well done. You have correctly and effectively driven a idea into minds of all listeners.
• A comment on Talk: Nandan Nilekani's ideas for India's future
Jun 6 2009: I do not agree with Mr. Nilekani's view that cities are centres of innovation and progress. May be it is a transitional state today, but the problems of urbanisation and environmental deterioration would soon shift the focus to rural area, where availability of remote skilled manpower through easy communication, low wages, low land costs would make sustainable industrial growth. Mahatma Gandhi's idea of empowering villages is real solution to India's development. In Western Maharashtra, growth of sugar and agrobased industries in rural area have shown how decentralised development is successful.
• A comment on Talk: Nandan Nilekani's ideas for India's future
Jun 5 2009: In India, education has assumed a status of big business. Education thus has become a restricted area for rich who can afford to pay such high fees. Ironically, less attention is paid by promoters of educational institutes to attract and retain good, dedicated teachers. Students also give more importance to examination success rather than learning the subject.
With the spread of BSNL Broadband connectivity and availability of computers in all schools and villages, the idea of FREE EDUCATION can really become a successful venture. Fortunately internet has capability to fulfill most of the needs of students at practically no cost. The idea is to search and provide useful and relevant free educational and informative links available on the internet. One such effort is made in www.school4all.org by Dnyandeep Foundation. Big businesses can sponsor such projects instead of Cricket and entertainment TV serials.
Monday, July 13, 2009
Internet Service Forum
As a part of collaborative projects under MOU signed with the college, Dnyandeep Education & Research Foundation suggests formation of Internet Service Forum in each college to cater the needs of local industries and professionals with web based networking to be provided by Dnyandeep Education & Research Foundation.
Objectives: To provide essential information available on the internet to industries, professionals and organizations to solve present day problems facing the industry, new concepts in process, domain knowledge base, quality improvement and effective management.
Scope of work:
1. Survey and data collection from customers about their business, difficulties, promotion aspects and degree of awareness about information technology.
2. Estimation of quantum of work input and documentation needs.
3. Rate fixation for supply of information.
4. Internet search for information, classification, evaluation and report preparation.
5. Development of website portal for exchange of information and development of other channels of communication.
6. Arranging seminars and training programmes on topics of common interest.
7. Development of Expert and teacher database and providing advice and consultancy to customers.
8. To explore and work on sponsored research and marketing projects.
9. Translate the information into teaching modules by restructuring syllabi or development of new need based courses.
10. To develop e learning courses with the help of experts and teachers based on the knowledge base generated.
Division of work.
1. As the college has ample skilled human resource in the form of students and teachers expert in various fields, it is proposed to allocate following works to the college
a. Survey and data collection
b. Internet search
c. Development of lesson plans, e learning courses, syllabi formulation and providing domain specific consultancy
2. As Dnyandeep Education & Research Foundation is basically web design and software development company, it is allocated following works
a. Development of website portal
b. Development of programs suitable for e learning modules, online consultation forums, classification of data, documentation and reporting
c. Arranging seminars and training programs
d. Keeping liaison between service provider college and customers
e. Development of CDs on specific topics
3. Planning, estimation of work, rate fixation, remuneration to knowledge workers and financial input for infrastructure development shall be done jointly by College and Dnyandeep Education & Research Foundation by mutual consent.
It is necessary to form a committee of staff members from the college for identifying the needs, defining scope of work and mobilizing college resources for successful implementation of the project. One contact person shall be designated to coordinate college activities with work plan of Dnyandeep Education & Research Foundation.
Benefits of the this joint venture project.
1. Students will get exposed to problems and difficulties being faced by nearby industries and professionals.
2. Development of better relationship, enhancement of college image in society and meeting the needs of technology transfer.
3. Experience in gathering the knowledge from internet and exposure to vast information store available.
4. Better utilization of infrastructure.
5. Revenue generation through service to industry and getting new sponsored research projects.
6. Development of consultation and education modules by college staff.
7. Sharing of experience and knowledge with other colleges through education portal Dnyandeep Education & Research Foundation ie. www.dnyandeep.net
Sunday, July 12, 2009
हायड्रोजन ऊर्जा
संदर्भ - http://en.wikipedia.org/wiki/Fuel_cell
भू- औष्णिक ऊर्जा
भारतात अनेक ठिकाणी गरमपाण्याचे झरे आहेत. यांचा आपण भूऔष्णिक ऊर्जेसाठी वापर करून घ्यायला काहीच हरकत नाही.
अमेरिकेतील ``द गिझर्स'' या ठिकाणी भूऔष्णिक ऊर्जेचे दोन निरनिराळे साठे आहेत. यातून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या वाफेच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत निर्मिती केली जाते.
अणुउर्जा
खनिज इंधनांव्यतिरिक्त इतर अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्यास भविष्यकाळात ऊर्जेची चिंता राहणार नाही.
न्यूक्लिअर पॉवर प्लॅंट
न्यूक्लिअर फ्यूजन - संघटन ऊर्जा
संदर्भ - http://www.energyquest.ca.gov/story/chapter13.html
सौर ऊर्जा
त्यामुळे सूर्य शक्तिचा वापर हा सौरकुकर, सौरभट्टी, सोलरहिटर यांच्या साधनांच्या सहाय्याने अल्पप्रमाणात केला जातो. याचे कारण म्हणजे सौर उपकरणांसाठी भांडवली खर्च जादा लागतो. वीज, तेल, कोळसा, या ऊर्जा त्यामानाने स्वस्त आहेत. परंतु सध्या प्रत्येक राष्ट्राची विजेची गरज ही फारच वाढली आहे. आणि इतर ऊर्जा पदार्थांची मुबलकता कमी झाली आहे. त्यामुळे सौर ऊर्जेच्या पर्यायावर सर्व राष्ट्रांचा भर आहे. सौरऊर्जेच्या उपयोगाची आधुनिक उपकरणे पुढीलप्रमाणे आहेत. पेटीचा कुकर, सौरभट्टी, पाणी गरम करण्याचा प्लॅट, प्लेट कलेक्टर, गरम हवेचा कलेक्टर, शेतीचे पदार्थ वाळविण्यासाठी ड्नयर, खाऱ्यापाण्यापासून गोडेपाणी करणारा सोलर स्टील, उबदार राहणारे सौर घट, हिट पंप अशा अनेक प्रकारची सौर ऊर्जा उपकरणे विकसित झाली आहेत.
परदेशामध्ये पॉवर प्लॅट, सूर्य विजेवर चालणारे फ्रिज, सूर्यवीज केंद्रे इत्यादी वापरात आले आहेत. भारतामध्ये सुध्दा आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सूर्यशक्तिचे प्रकल्प अनेक ठिकाणी सुरू आहेत. भोर-नाशिक भागातील रस्त्यावरील दिवे सूर्य विजेवर चालतात. धुळे जिल्ह्यात ३२० एम. डब्ल्यू. सूर्य वीज प्रकल्प १९८५ मध्ये सुरू झाला आहे. तामीळनाडूत सूर्यविजेवर रेल्वे सिग्नल, तिरूपती-बंगळूर-विशाखापट्टणम येथे इंटरलॉक पध्दती, ग्रामीण पंपासाठी, सूर्य विजेचा वापर दिल्लीजवळ मसुदपूर खेड्यात प्रत्येक घरात स्वयंपाक, दिवे, पाण्याचे पंप, टी. व्ही. रेडिओ हे सर्व सूर्यविजेवर चालतात. अपंगाच्या सायकलीसाठी सूर्य ऊर्जा वापरली जाते.
सध्याच्या विज्ञानयुगात प्रगत तंत्रज्ञानासाठी लागणारीवीज अंतराळात मोठ्या प्रमाणात निर्मिती करून तिचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे अंटार्क्टिका मोहिमेसाठी उपग्रहाच्या रिमोट कंट्रोलसाठी, रडार यंत्रणा इत्यादी ठिकाणी सूर्य विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
जलशक्ति व पवन ऊर्जा
समुद्रातील लाटांपासून वीजनिर्मिती -
पवन ऊर्जा -
खनिज स्वरूपाच्या ऊर्जेवर पर्याय शोधताना साहजिकच आपले लक्ष न संपणाऱ्या ऊर्जासाधनांकडे जाते. पवनऊर्जा हे एक असेच साधन आहे. पृथ्वीवरील वातावरणातील हवेच्या हालचालीमुळे आपल्याला पवन ऊर्जा मिळते. शिडांची जहाजे चालविणे, पवनचक्की व्दारे पाणी उपसणे आणि पिठाची जाती चालविणे अशासारखी पवन ऊर्जेचे उपयोग प्रचलित होते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून पवनचक्कीव्दारें मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आता शक्य झाले आहे.
पवनऊर्जा वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. व तिची क्षमता वेगाच्या धन प्रमाणात वाढते. साधारणपणे सागरी किनारपट्टी व डोंगराळ प्रदेशात वाऱ्याचा वेग चांगला असतो. पवन जनित्राव्दारे वीज निर्मिती करण्यासाठी १५ कि.मी. पेक्षा अधिक वेगाचे वारे लागते. ते अशा ठिकाणी सहज मिळते. पाणी उपसण्यासाठी १० कि. मी. पेक्षा अधिक वेगाने वाहणारे वारे लागते. अशा ठिकाणी शोधून तिथे पवनचक्या लावता येतात.
भारताच्या अपारंपारिक ऊर्जास्त्रोत विभागाने भारतामध्ये पवनमळे उभारले आहेत. महाराष्ट्नत देवगड येथील पवनमळयात १० पवनजनित्रे १९८६ साली उभारली आहेत. आणि त्यातून मिळणारी वीज महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या ग्रीडमध्ये दिली जाते. पवनजनित्रामध्ये मुख्यत्वे पवनचक्की, मुख्य कणा, गीअर पेटी,, जनित्र, ब्रेकची व्यवस्था, पवनचक्की वाऱ्याच्या दिशेला फिरण्याची व्यवस्था व कंट्नेल व्यवस्था हे मुख्य भाग आहेत.
देवगड येथील पवनमळयात १० पवनजनित्रे ३ रांगामध्ये बसवली आहेत. दोन जनित्रांमध्ये किमान पवनचक्कीच्या व्यासाच्या चौपट इतके अंतर ठेवावे लागते. ही रचना वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून आहे. याची विद्युत क्षमता ५५० किलोवॅट इतकी आहे आणि वर्षाला सुमारे ८ ते १० लाख युनिट इतकी वीज निर्मिती यातून होते.
पवनमळे उभे करण्यासाठी डोंगरमाथ्यावरील जागा निवडावी. तेथील वाऱ्याचा वेग चांगला असावा व शक्यतो हा वेग वार्षिक सरासरी ताशी १२ ते १५ कि. मी. असावा. मात्र भारतात बऱ्याच ठिकाणी वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ५ ते ८ कि. मी. असूनही पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या आर्थिक सवलतींमुळे हे शक्य झाले आहे व यामुळे पवनाउर्जा निर्मितीस प्रोत्साहन मिळाले आहे. सुझलान कंपनीमार्फत महाराष्ट्रात असे पवनमळे उभारले आहेत. पवनजनित्रे व ती उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री नेण्यासाठी चांगल्या रस्त्याची सोय असावी लागते. पवनचक्क्यांमुळे पाऊसमानात घट होते या समजुतीने, तसेच जमीन हस्तांतरण आणि रस्त्यांची दुरवस्था या मुद्यांवरून स्थानिक पातळीवर अशा प्रकल्पांना विरोध होत आहे. त्यावे योग्य निराकरण होण्याची आवश्यकता आहे.
जैविक ऊर्जा
अ) घन ऊर्जा - लाकूड-जंगलापासून मुख्यता लाकूड मिळते. हे लाकूड उष्णता निर्मितीसाठी बऱ्यचा ठिकाणी वापरले जाते. खेड्यांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड सर्रास वापरले जाते. तसेच कारखान्यांमधील बॉयलर्समध्ये इंधन म्हणून लाकूडच वापरतात. लाकूड हे भारताचे आद्य इंधन आहे.
कोळसा (लोणारी) - लाकडापासून हा कोळसा तयार करतात. याच्या ज्वलनामध्ये धूर होत नाही. हा कोळसा स्वयंपाकासाठी वापरला जातो.
शेण - गुरांचे शेण हा एक इंधन प्रकार खेड्यातील लोक शेणाच्या गोवऱ्या करून इंधन म्हणून वापरतात.
कचरा- औद्यौगिक, शहरी आणि शेतातील कचरा ऊर्जेची भूक भागवण्यास मदत करतात. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीच्या एकूण चार पध्दती आहेत. खांस भट्ट्यांतून कचरा जाळून त्या उष्णतेचा वापर करणे, ऊर्जा भट्ट्यांमधून पूरक इंधन म्हणून वापर करणे, कचऱ्याचे विघटनात्मक शुध्दिकरण करणे, इतर मार्गांनी ऊर्जा निर्मिती प्रणालीत कचरा वापरणे. बऱ्याच ठिकाणी कचऱ्यापासून कचरा वीट बनवली जाते. आणि या विटा इंधन म्हणून वापरतात.
ब) वायु इंधने - बायोगॅस -शेण, शेतीमालाचा टाकाऊ भाग आणि काही औद्योगिक कारखान्यातील सांडपाणी यांपासून गोबर गॅस अथवा बायोगॅस तयार करतात. हे इंधन आता ग्रामीण भागात फारच लोकप्रिय होत चालले आहे. डिस्टीलरीपासून बाहेर पडणाऱ्या मळीपासून तयार होणारा बायोगॅस बॉयलरमध्ये पूरक इंधन म्हणून वापरला. यामुळे खनिज इंधनाची बचत होते.
लाकडापासून वायू इंधन - लाकडाचे रूपांतर वायू-इंधनात करण्याचे उपकरण मिळते. या इंधनाचा उपयोग स्वयंपाकासाठी तसेच इंजिने, जनित्रे व बॉयर्ल्स चालविण्यासाठी करतात.
क) द्रव इंधने - वनस्पतीपासून मिळणारी तेले, इंधन म्हणून वापरली जातात. आणि अशी तेले खनिज तेलांना पर्याय ठरू शकतात. तसेच अल्कोहोलसारखी द्रव्ये सुध्दा इंधन म्हणून वापरता येतात.
ड) सजीव ऊर्जा - प्राण्यांच्या शक्तिचा वापर करून विहिरीतून पाणी बाहेर काढणे, शेतीची अवजारे ओढणे, शेतीची कामे करणे, किंवा अवजड वस्तू उचलणे इत्यादी कामे केली जातात. यासाठी बैल, उंट, गाढव, घोडे व हत्ती यासारख्या प्राण्यांच्या बळाचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळापासून प्राणी बळाचा उपयोग वाहतूकीसाठी केला जातो. भारतातील खेड्यात प्राणीबळच प्रमुख ऊर्जेचे स्त्रोत आहे.
ऊर्जेचे प्रकार
२. इंधन ऊर्जा - प्रकाश व उष्णता निर्माण करण्यासाठी आणि यंत्रे चालविण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेला इंधन ऊर्जा म्हणतात.
अ) पुनर्निर्मिती न करता येणारे ऊर्जा प्रकार - खनिज तेल, दगडी कोळसा, फर्नेस तेल, केरोसिन, वायू इंधन (एल. पी. जी. वायू)
आ) पुननिर्मित होणारी ऊर्जा - जलप्रपात, वारा, सौर उर्जा, भू औष्णिक ऊर्जा.
ऊर्जा साधने
सध्याच्या इंधन समस्येवर तोडगा काढणे ही काळाची गरज आहे.
आतापर्यंत फक्त खनिज तेल वापरूनच ऊर्जा निर्मिती करता येते असा समज होता. परंतु आता शास्त्रज्ञांनी बऱ्याच पर्यायी ऊर्जाप्रणाली पुढे आणल्या आहेत. यात वायुजन्य ऊर्जा, सौर ऊर्जा, लाटांपासून ऊर्जा निर्मिती, सागरी प्रवाहांतील तपमानाच्या फरकाचा फायदा घेऊन ऊर्जा निर्मिती, भू-औष्णिक ऊर्जा असे अनेक पर्याय आहेत. परंतु या सर्व ऊर्जाप्रणालीवर निर्सगाचे नियंत्रण चालते. आणि मानवी इच्छेवर निसर्ग चालत नाही. त्यामुळे यापासून आपल्या ऊर्जेच्या गरजा भागवता येणे अशक्य आहे.
रासायनिक ऊर्जा निर्मिती व आण्विक ऊर्जा निर्मिती प्रक्रिया या दोनच मानवी हुकमाखाली राहू शकणाऱ्या ऊर्जानिर्मिती पध्दती आहेत. पण या पध्दती खर्चिक आणि धोकादायकही आहेत. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांना दोनच आशेचे मार्ग आहेत. एक म्हणजे हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे अणु (साधन) संघटन किंवा फ्यूजन. परंतु हे ऊर्जास्त्रोत प्रचलीत होण्यासाठी अजून बरेच संशोधन करावे लागणार आहे. खनिज इंधनाव्यतिरिक्त सध्या प्रचलित असणारे ऊर्जाप्रकार पुढे संक्षिप्तपणे सांगितले आहेत.
Monday, July 6, 2009
ऊर्जा
प्राचीन काळापासून लाकूड हाच मानवाचा एकमेव उर्जास्त्रोत होता. अगदी सतराव्या शतकापर्यंत लाकूडच वापरले जायचे. सतराव्या शतकात वेगवेगळे ऊर्जास्त्रोत सापडले. हे ऊर्जास्त्रोत म्हणजे दगडी कोळसा आणि पेट्रोलियम. यांची ऊर्जा पुरविण्याची शक्ति लाकडापेक्षा प्रचंड असल्यामुळे त्यांचा वापर यंत्रामध्ये केला गेला. आणि पुढील ३ शतकांत मानवी संस्कृतीने प्रगतीचा मार्ग प्रचंड वेगाने कापला. एकोणीसाव्या शतकात मोठमोठी जनित्रे निर्माण झाली. विद्युत शक्तिने तर जगाचे स्वरूपच पालटून टाकले. विद्युत शक्तीवर चालणारी हजारो नवी उपकरणे, यंत्रे तयार झाली. आज घरातील बरीचशी कामे विजेच्या सहाय्याने होतात. आज कोळसा हा रेल्वे इंजिन आणि आगबोटीत वापरला जातो. रस्त्यावरील लहान मोठी वाहने ही खनिज पेट्रोलियम पासून शुध्द केलेल्या पेट्रोल व डिझेलवर चालतात. पण आज हे ऊर्जास्त्रोत संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. भरमसाठ जंगलतोडीने जगातील मोठमोठी जंगले नष्ट झाली आहेत आणि त्यातून प्रदूषणाची दुसरी समस्या उभी राहिली आहे.
भविष्यातील वाहतूक समस्या
परदेशात याउलट परिस्थिती आढळते. उत्तम रस्ते, सुस्थितीतील अत्याधुनिक वाहने व नियमाची कांटेकोर अंमलबजावणी यामुळे तेथील प्रवास जलद आणि सुरक्षित होणे सहज शक्य होते. अर्थात परदेशात लोकसंख्या भारताच्या मानाने खूप कमी आहे. ते देश सधन असल्याने त्यांना रस्ते बांधणी व त्यांची योग्य निगा राखणे जमू शकते.
आपल्याकडे पायी चालणारे लोक तसेच ठेले व बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटार सायकल, जीप, मोटारी व टृक टृॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करीत असतात साहजिकच वाहतूक व्यवस्था प्रभावी होऊ शकत नाही. त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होते. साहजिकच शहरात राहणाऱ्या लोकांना वाहतूक समस्येचा फार त्रास होतो. शिवाय प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तरीही नोकरी धंद्यासाठी शहरातील वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतर रहात नाही.
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या बिकट समस्येवर अगदी वेगळया प्रकारचा अभिनव उपाय सापडेल अशी आशा निर्माण झाली आहे. माणूस प्रवास कशासाठी करतो. नोकरीधंद्यानिमित्त ऑफिस वा दुकानात जाण्यासाठी, शिक्षण, वैद्यकीय उपचार अशांसारख्या सुविधा घेण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी, इतर व्यक्तींना भेटण्यासाठी वा प्रत्यक्ष वास्तू , परिस्थिती वा निसर्ग पाहण्यासाठी. या व अशाप्रकारच्या सर्व कामांसाठी भविष्यात प्रत्यक्ष प्रवास करण्याची जरूर भासणार नाही. घरबसल्या या सर्व गोष्टी संगणकाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येतील.
यातील बऱ्याचशा गोष्टी परदेशात तसेच आपल्या देशातही यशस्वीरीत्या राबविण्यास सुरवात झाली आहे. मोबाईल, फोन व इंटरनेटच्या साहाय्याने जगातील कोणत्याही संपर्क साधता येऊ लागला आहे व माहितीची देवाण घेवाणही करणे सहज शक्य झाले आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरबसल्या ऑफिसचे काम करण्याची सुविधा कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला देऊ केली आहे. वेगवेगळया गावात राहणाऱ्या व्यक्ती आता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एकत्र चर्चा करू शकतात. वेबसाईटच्या माध्यमातून दुकानदार आपल्या वस्तू जगभरातील गरजू ग्राहकांना दाखवू शकतो. अशा अनेक वेब दुकानांतून फेरफटका मारून आपण क्रेडीट कार्डद्वारे पैसे देऊ न आपल्या पसंतीची खरेदी करू शकतो.
भविष्यात शिक्षणासाठी शाळा, कॉलेजमध्ये जावे लागणार नाही. संगणकावरच दूरस्थ शिक्षण देणाऱ्या मान्यतापात्र संस्थांतर्फे हे सर्व शिक्षण आपल्याला मिळेल. प्रत्यक्ष उपचार, इंजेक्शन वा ऑपरेशन वगळता बाकी सर्व वैद्यकीय सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून घेता येईल. औषधेही घरपोच मिळतील.
लग्न ठरविणे, घर पाहणे, कारखाना, प्रत्यक्ष प्रक्रीया वा कार्यक्रम पाहणे, भेट देणे या सर्व गोष्टी इंटरनेटच्या साहाय्याने करता येतील. केवळ करमणूक म्हणून वा सहलीसाठी लोक प्रवास करतील. अर्थात वस्तूंची निर्मिती करणे, प्रक्रिया करणे त्याची वाहतूक करणे, संरक्षण वा ज्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते अशा व्यवसायातील व्यक्तींना प्रवास टाळता येणार नाही.
भारतात इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे. इंटरनेटच्या सुविधांसाठी लागणाऱ्या खर्चातही झपाट्याने घट होत आहे व सर्व सामान्यांच्या आवाक्यात हे प्रभावी माध्यम नजिकच्या भविष्यकाळात येईल. असे झाले तर बऱ्याच लोकांना मोठ्या शहरात वा परदेशात जाऊन राहण्याची गरज पडणार नाही. आपल्या देशात संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता नाही. गरज आहे ती त्याच्या योग्य व्यवस्थापनाची व दूरदृष्टीची. अशा संगणक तंत्रज्ञांनी इंटरनेट व वेबसाईटचा कल्पकतेने वापर केला व सर्व लोकांनी या तंत्रज्ञानानाचा डोळसपणे स्वीकार केला तर एरव्ही अशक्य वाटणाऱ्या वाहतुकीसारख्या समस्या सहजपणे सुटतील. लोक शिक्षणाद्वारे अशी संगणक क्रांती करून भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणे हा ज्ञानदीप एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फौंडेशनचा उद्देश आहे.
भविष्यात असे खरोखरीच घडले तर काय होईल? रस्त्यांचा वापर प्रामुख्याने फक्त वस्तूंची वाहतूक करण्यासाठीच होईल. लोक आपल्या घरात, खेडेगावात, शेतात राहून सर्व कामे करू शकतील. घरातील लोकांना परस्परांशी बोलायला तसेच जीवन खऱ्या अर्थाने जगायला वेळ मिळेल. पाळणाघरे, वृद्धाश्रम यांची गरज राहणार नाही. मग मोठी शहरे व रस्ते ओस पडतील. पेटृोल डिझेलच्या किंमती खाली येतील. प्रदूषण थांबेल व खऱ्या अर्थाने भारतात नंदनवन अवतरेल. परदेशांतील आपले मौलीक बुद्धीवंतांचे धन भारतात परत येईल व त्या आधारे भारतात राहूनच आपण साऱ्या जगातील उद्योग धंदे व व्यवहार करू शकू.
बॅंकाकची सफर भाग - ३
थायलंडमधील साखर, कागद व अल्कोहोल निर्मिती करणार्या अनेक कारखान्यांना आम्ही भॆटी दिल्या. त्या सर्व ठिकाणी विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे तेथील सर्वांचा, मॅनेजरपासून कामगारापर्यंत एकच गणवेश होता. प्रत्येकाच्या शर्टावर रंगीत फोटो असणारे आयडेंटिटी कार्ड होते. प्रत्येक कारखान्यात स्वागतकक्षाशेजारीच एक छोटा हॉल होता. त्यात सरकते फळे, स्लाईद प्रोजेक्टर व ओव्हरहेड प्रोजेक्टरची सोय होती. कारखान्याविषयी सर्व माहिती तेथे दिली जायची. एका ठिकाणी तर कारखान्याची व्हिडिओ फिल्म आम्हाला दाखविण्यात्त आली.
सर्वांची बोलण्याची पद्धत नम्र व अदबीची. थायलंडमधिल सर्व वास्तव्यात कोठेही गडबड, गोंधळ वा भांडण पहायला मिळाले नाही. हा विशेष खरोखरच आपण आत्मसात करावयास हवा. कारखान्यातील स्वच्छता व टापटीप वाखाणण्याजोगी होती. कारखान्यात, हॉटेल, ऑफिस, दुकाने या सर्व ठिकाणी आम्हाला स्त्रियांचे प्रमाण खूपच जास्त आढळले. त्यातही हे विशेष की स्त्रियाही सर्व कामे अतिशय सहजतेने व कुशलतेने करताना आढळली. अगदी टॅक्सी, बस वा ट्रकचे ड्रायव्हर, पोस्टमन, पोलीस यासारखी कामेही स्त्रिया करीत होत्या. ब्रह्मदेशाला स्त्रियांचा देश म्हणायचे. थायलंड ब्रह्मदेशाच्या जवळचा म्हणून असे असेल कदाचित. याबाबतीत तेथील लोकांना विचारले तेव्हा कळले की व्हिएटनामच्या लढाईपासून येथील बहुतेक पुरूष व मुले सैन्यात भरती होतात.
बॅंकाकमध्ये पहिले तीन दिवस कारखान्यांच्या भेटी देण्यात गेले. ५ मे रोजी थयलंडचा राश्ट्रीय दिवस ‘राज्यारोहण दिन’ अस्ल्याने सुट्टी होती. म्हणून त्या दिवशी बॅकाकमधील प्रेक्षणीय मंदिरे व अयुधयाची पुरातन राजधानी पाहिली. येथील देवळांमध्ये नक्षीकाम व सोनेरी रंगाचा वापर बराच केलेला आढळला. इमारतींची छपरे वेगवेगळ्या रंगांची, विशेष करून गडद जांभळ्या, निळ्या वा लाल रंगाची होती. त्यासाठी त्यात्या रंगांची कौले वापरली होती. एकावर एक पांगरुणे गेतल्यासारखी दोन किंवा तीन छपरांची रचना, मोर व अन्य काही नक्षीकामाचे नमुने या चपराम्वर लावलेले असल्याने थाई लोकांच्या कलात्मकतेचे दर्शन होत होते.
दिनांक ७ व ८ तारखांना चुलालुकॉंग विद्यापिठात चर्चासत्र झाले. आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था, थायलंद्ड सरकारचे प्रतिनिधी, विद्यापिठातील प्राध्यापक आणि तेथील कारखान्यांचे जवळजवळ ५०-६० प्रतिनिधी व आम्ही ३२जण असे १०० लोक चर्चासत्रास उपस्थित होते.
प्रत्येक सत्रात एक थायलंडमधील तज्ञ व एक भारतीय तज्ञ अशा दोघांनी आपले शोध प्रबंध सादर केले. भारतीय व थाई तंत्रज्ञानाचा सापेक्षाने विचार झाल्याने या माहितीचा सर्वानाच लाभ झाला. नंतर थायलंड येथील प्रदूषण नियंत्रणाबाबत असणार्या कायद्यातील तरतुदी व व्यवस्था याविषयी उद्बोधक चर्चा झाली.
बॅंकाकमधील वास्तव्यानंतर आम्ही सिंगापूरला रवाना झालो. सिंगापूरमधील बाजार व प्रेक्षणीय स्थळे पाहून तेथील प्रगतीची कल्पना आली मात्र तेथे थायलंडमध्ये जो अनोखा नव्या जुन्याचा संगम झालेला अनुभवास आला त्याची सर आधुनिक सिंगापूरला आली नाही.
बॅंकाक-सिंगापूरची ट्रीप करून परत आलो व इतके दिवस झाले तरी बॅंकाकची सफर मनात जशीच्या तशी ताजी आहे. एकाचवेळी प्राचीन भारतातील सुवर्णयुगाचा काळ व भविष्यकाळातील प्रगत वैभवसंपन्न भारताचे दर्शन झाल्यासारखे मला वाटले. भविष्यात भारत प्रगत झाला तर त्याने थायलंडसारखी प्राचीन भारतातील सुवर्णयुगाची प्रतिसृष्टी पुढच्या पिढ्यांसाठी निर्माण करायला हवी.
बॅंकाकची सफर भाग - २
थायलंडचे चलन `बाथ' सर्वसाधारणपणे २ बाथ म्हणजे एक रूपया असा हिशोब धरता येईल. थायलंडमधील मुख्य पीक भात. खाण्यामध्ये मात्र थाई लोक समुद्रातील मासे व इतर जलचरांचा भरपूर वापर करतात. येथील ७० टक्के लोक बुद्ध धर्मीय आहेत व धार्मिक परंपरांची जपणूक ते काळजीपूर्वक करतात. थायलंडमध्ये राम नावाचा राजा आहे व त्याच्या आज्ञेनुसार सर्व राज्यकारभार चालतो. मिसेस लेक सांगत होती आम्ही भोवतालची रहदारी पहात होतो विविध रंगी छपरे असणार्या देखण्या इमारती, नक्षीकाम केलेली देवळे व रेखीव रस्ते यामुळे आपण परदेशात आहोत हे क्षणोक्षणी जाणवत होते.
पेनुन्सुला हॉटेल या भव्य वातानुकुलित हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय केली होती. सर्व आधुनिक सोयीनीयुक्त असलेल्या प्रत्येक खोलीत डबल बेड, फ्रीज व छोटा `सोनी' टीव्ही होता. टीव्हीवर सकाळी ७ पासून रात्री २ पर्यंत १२ चॅनेलवर विविध कार्यक्रम चालू असायचे. भारतीय हिंदी सिनेमे इंग्लिश, थाई व चिनी चित्रपटांच्या व्हिडीओ फिल्म टीव्ही मधून दाखविण्याची सोय हॉटेलमध्ये केलेली होती. सकाळी कार्यक्रम सुरू व्हायचे तेच थायलंदच्या राजाचे गुणगानाने व त्याच्या दिनक्रमाचे दर्शन घडविले जायचे. नंतर बातम्या प्रथम थाई व नंतर इंग्लिश. त्यानंतर व्यायाम. संगीताच्या तालावर चालणारा कवायतीचा हा कार्यक्रम इतका आकर्षक असायचा की प्रत्येक प्रेक्षकाला त्या तालावर व्यायाम करण्याची प्रेरणा व्हावी.सध्या भारतातही टीव्हीवर असे प्रयोग चालू झाले आहेत. पण त्यात खूपच सुधारणा व्हावयास हवी असे येथील कार्यक्रम पाहून वाटले. प्लॅस्टिकच्या नाजुक फुलांचा फ्लॉवर पॉट शोभिवंत सिलिंग, डनलॉप गाद्या व वुलनची पांघरूणे, गार, गरम पाण्याच्या शॉवरची सोय यामुळे तेथे राहण्याचे सुख काही औरच होते. आंघोळीसाठी मात्र टब असल्याने फारच पंचाईत व्हायची भरलेल्या टबमध्ये बसून आंघोळ करणे न आवडल्याने टब रिकामा ठेवून शॉवरवरच आम्ही आंघोळ उरकून घेत असू. सकाळी ब्रेकफास्ट म्हणून टोस्ट, आम्लेट, संत्र्याचा रस मिळायचा. चहा पिणार्याचे मात्र जरा हालच व्हायचे. दूध पावडरचे व पिवळया रंगाचे, चहाही अगदी बेचव व फार महाग ८ - ९ रूपयाला एक कप. त्यामुळे चहा पिण्यापेक्षा संत्र्याचा रस घेणेच आम्ही पसंत केले.
हवा मुंबई, गोव्यासारखी पण त्यामानाने खूपच दमट व ऊनही जाणवण्यासारखे कडक. त्यामुळे बाहेर हिंडताना घामाची चिकचिक नकोशी वाटते. जेवणाखाणाचे बाबतीत नवख्या व त्यातून शाकाहारी माणसाची पंचाईत होते. कारण सर्व हॉटेलमधून `सी- फूड' समुद्रातील अन्न या नावाखाली विविध प्रकारचे मासे, झिंगे, आईस्टर, खेकडे व इतर कीटक तळून दर्शनी कपाटांत लावलेले असतात व त्यांचा उग्र दर्प नाकात भरतो त्यामुळे खाण्यावरची वासनाच उडते. सी-फूड हा थाई लोकांचा आवडीने आमच्या सर्व दौर्यात आम्ही हॉटेलमधून मुद्दाम भारतीय अन्नपदार्थांचे डबे घेऊन जायचो त्यामुळे आमचा तेथे निभाव लागला.
बँकॉकची सफर भाग -१
सांगली परिसर संरक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने थायलंडमधील साखर, अल्कोहोल (मद्यार्क) व कागद कारखान्यातील सांडपाण्याच्या शुद्धीकरण व्यवस्थांचा अभ्यास करण्यासाठी २ मे ते १२ मे १९८७ असा एक अभ्यास दौरा व तेथील तंत्रज्ञानाबरोबर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भारतातील निरनिराळया ठिकाणच्या साखर व कागद कारखान्यांचे संचालक, तंत्रज्ञ तसेच जलप्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असे एकूण ३२ प्रतिनिधी या दौर्यात सहभागी झाले होते. या दौर्याचे वैशिष्ठ म्हणजे थायलंड सरकार, आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था आणि बँकॉक मधील चुलालुकॉर्न विद्यापीठ यांचे सहकार्य या दौर्यासाठी व चर्चासत्रासाठी मिळाले होते. सांगलीहून या अभ्यास दौर्यात संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. सुब्बाराव व कार्यवाह म्हणून मी सहभागी झालो होतो.
परदेशी प्रवासाला जायचे म्हणजे पासपोर्ट व व्हिसा काढणे जरूर असते. देशाबाहेरजाण्याचा परवाना म्हणजे पासपोर्ट. व दुसर्या देशात प्रवेश करण्याची अनुमती म्हणजे व्हिसा. कोणताही सरकारी परवाना मिळविताना जो व्याप व त्रास सहन करावा लागतो त्याला पासपोर्ट काही अपवाद नाही. सहा फोटोच्या प्रती, जन्मतारीख व शिक्षण व रेशनकार्डेचे सर्टीफिकेट यासह अर्ज केला की पासपोर्ट मिळायला सुमारे दोन महिने लागतात सी. आय. डी. खात्यातर्फे पोलिसतपास होऊन त्यांचे नाहरकत पत्र आले की पासपोर्ट दिला जातो. एकदा पासपोर्ट मिळाला की व्हिसा मात्र १/२ दिवसात मिळतो. तुम्ही प्रथमच परदेशी जात असाल तर सरकारतर्फे तुम्हाला ५०० अमेरिकन डॉलर परदेशी चलन मिळू शकते. त्याला एफ.टी. एस. असे म्हणतात. येथून प्रवासास निघण्यापूर्वी बँकेमार्फत ते विकत घेता येते. एकदा एफ.टी. एस. मिळाले की पुढे तीन वर्षे परदेशी चलन मिळू शकत नाही.
पासपोर्ट, व्हिसा व परदेशी चलन यांची पूर्तता होईपर्यंत ३० एप्रिल उजाडला. आम्ही १ तारखेला रात्रीच्या विमानाने मुंबईहून प्रयाण करणार होतो व आमच्या प्रवासी सहाय्यक संस्थेच्या चुकीमुळे सर्वांना विमानात जागा मिळाली नाही. बाकी प्रतिनिधींना पाठवून आम्ही आमचे प्रयाण एक दिवस पुढे ढकलले.
२ तारखेला ११ वाजताच आम्ही सहार विमानतळाकडे टॅक्सीने निघालो. मनात अमाप उत्साह होता पण त्याचबरोबर कुतूहल आणि भीती यांचीही लपाछपी चालू होती. प्रवेशव्दारातील आपोआप उघडणार्या भव्य काचेच्या दारांनी आमचे स्वागत केले. विमानतळावरील भव्यता, स्वच्छता, सजावट पाहिल्यावर परदेशातच पाऊल टाकल्याची अनुभूती आली. पण भारतीय व्यवस्थेचा हिसका बसल्यावर आम्ही परत मूळ ठिकाणीच असल्याचे जाणवले. म्हणजे असे झाले की तेथे गेल्यावर कळले की दुपारी तीन चे विमान आठ तास उशीरा सुटणार आहे. म्हणजे रात्री ११ पर्यंत येथेच वेळ काढावा लागणार काय करणार? आलिया भोगासी असावे सादर म्हणत तेथेच मुक्काम ठोकला. काही प्रवासी तर बस स्टँड किंवा रेल्वे फलाटावर झोपतात तसे पथारी पसरून झोपले देखील. आम्हीच उगीच शिष्ठपणाचा आव टिकवण्यासाठी ताटकळत बसून राहिलो. वेळ जावा म्हणून तेथील रेस्टॉरंटमध्ये गेलो. एका बाजूच्या काचेच्या भिंतीतून विमानतळावरील दृश्य दिसत होते ते पहात व कॉफी पीत बराच वेळ काढला. जवळजवळ प्रत्येक पाच मिनिटाला एक विमान येत होते वा सुटत होते. येताना सावकाश फेरी मारत विमान कसे उतरते व उतरल्यावर रनवेवर धावून कसे थांबते हे पाहणे मोठे मनोरंजक होते विमान सुटताना देखील वेग आल्यावर ते हवेत केव्हा झेपावते हे पहाताना उत्कंठा ताणली जायची श्वास रोखायचा. एकदा विमान वर जाऊन त्याने आपला तोल सांभाळला की हायसे वाटायचे. आपले विमान उडतानाही असेच कोणीतरी पहात असतील अशी कल्पना येऊन गंमत वाटली. शेजारीच पाकिस्तान इंटरनॅशनलचे हिरव्या पंखांचे विमान उभे होते. त्यात सामान चढविण्याची पद्धत देखील नाविन्यपूर्ण वाटली. ट्रकसारख्या वाहनावरून सामानाचे मोठे खोके यायचे ट्रक थांबला की खालच्या स्प्रिंग उघडून सर्व खोके वर उचलले जायचे. सर्व काम यंत्राने. माणसे फक्त हात लावण्यापुरती आहेत असे वाटले.
रात्र झाली आठ वाजताच चेक इन कौंटरवर आमच्या विमानाचा AI308 असा फलक लागला. प्रथम आमचे सामान सुरक्षा तपासणीसाठी एक्स रे मशीन मधून पाठविले. बाहेर बसणार्या माणसाला टी. व्ही. पडद्यावर बंद बॅगमधील सर्व सामान दिसू शकत होते. काही संशयास्पद वाटले तर येथील अधिकारी बॅग उघडावयास लावतात. तपासणी झालेल्या बॅगवर कागदाचे लेबल लावले जाते. आमच्या बॅगांवर लेबले लागली आणि बॅगा त्यांच्या ताब्यात गेल्या. तिकीट मिळाले की सामान आधीच विमानात ठेवण्यासाठी फिरत्या पट्ट्यावरून नेले जाते. मग डिक्लेरेशन कौंटरवर सोबत असणार्या कॅमेरासारख्या वस्तूंची नोंद करावी लागते व नंतर आपली व्यक्तिगत तपासणी होते. प्रत्येकाच्या हातातील हॅण्डबॅगची तर तपासणी होतेच पण एक्स रे रूममधून जावे लागते व अंगावर चाचपून प्रत्यक्ष तपासणी होते नंतर विमानात जाण्यासाठी अनुमती दर्शक शिक्का मारला जातो. ही तपासणी झाल्यावर आम्ही विमानाची प्रतीक्षा करीत आतल्या दालनात बसलो. विमान उभे होतेच प्रथम विमानाचे वैमानिक व एअर होस्टेस आपल्या आकर्षक गणवेशात सर्कस सुंदरी सारख्या मोठ्या दिमाखाने आमच्या दालनातून विमानाकडे गेल्या नंतर आम्हाला सूचना आली. रांगेने तिकिटे दाखवून आम्हाला दाराबाहेर सोडले तर तेथे एक तरंगता बोगदाच विमानाच्या दारापर्यंत लावल्याचे दिसले त्यातून आम्ही विमानात गेलो. राजेशाही थाटाचे प्रचंड विमान प्रत्येक सीटवर लाईट, वारा मिळावा याची व्यवस्था सामानासाठी कप्पा, कोचसारख्या खुर्च्या, खुर्ची मागेपुढे करण्याची समोर घडी करता येणारे टेबल, समोर ‘नमस्कार’ नावाचे रंगीत आर्टपेपरवर छापलेले मासिक, बाजूला १० चॅनेल मध्ये संगीत ऐकण्याची सोय. दारे बंद झाली तरंगता बोगदा दूर झाला. स्वागत होऊन बेल्ट बांधण्याची सूचना आली. बेल्ट बांधले तर संकटकाळी प्राणवायू पुरविणारे साधन कसे आपोआप वरून खाली येईल व त्याचा कसा वापर करायचा याचे एअर होस्टेसने प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांनी ते प्रात्यक्षिक नेहमीचा उपचार म्हणून दाखविले तरी आमच्या मनात उगीचच धडकी भरली. विमानाचा सूऽई असा आवाज सुरू झाला विमानाने गती घेतली ती ते खिडकी बाहेरचे दिवे जोरात मागे पळताना पाहिल्यावरच जाणवले. एकदम आवाजात तीव्रता आली आणि कोणीतरी आपल्याला एकदम खुर्चीसकट उचलल्यासारखे वाटले. विमानाने हवेत झेप घेतली. क्षणार्धात बाहेरच्या इमारती तिरक्या झाल्या, आमचे विमान कलल्याचा तो परिणाम होता. विमानाने जशी उंची गाठली, तसे मुंबईचे मनोहारी दृश्य दिसू लागले. प्रचंड मोठी मुंबानगरी आमच्यापुढे छोटी होऊन दिव्यानी सजलेले रूप आम्हास दाखवीत होती. समुद्रकिनारा व इमारतीवरून कोणता भाग आहे याची ओळख पटण्यापूर्वीच विमान अधिक उंचीवर गेले व मुंबईचे दृश्य अंतर्धान पावून त्याची जागा गडद अंधाराने घेतली. १ वाजता दिल्ली आली. विमान तासभर थांबून बँकॉककडे निघाले. विमानातील नाजुक साजुक जेवणाचा प्रसाद घेऊन, इयर फोन कानाला लावून संगीत ऐकत डोळे मिटले अन झोप केव्हा लागली ते कळलेच नाही.
जाग आली ती एकदम डोळयासमोर प्रकाश चमकल्याने. त्यानेच मी दचकून उठलो. माझी सीट खिडकीशेजारी असल्याने खिडकीतून सूर्यप्रकाश माझ्या अंगावर पडला होता. खिडकीतून बाहेर नजर गेली माझा विश्वासच बसेना. समोर निळे आकाश तर खोलवर खाली कापूस पिंजून पसरावा त्याप्रमाणे शुभ्र ढगांची बिछायत पसरली होती. खरोखरी स्वर्गातून आपण विहार करीत आहोत असे वाटले. ढगांच्या फटींतून काही खालची जमीन दिसते का ते पाहू लागलो. एका ढिकाणी ढग जरा चांगले होते. खाली वळणावळणाने जाणार्या सोनेरी नदीचा प्रवाह दिसला व शेतांचे आणि घरांचे पुंजके दिसू लागले विमानातील संगीत बंद झाले व कानावर शब्द आले आपण आता थोड्याच वेळात बँकॉक विमानतळावर उतरणार आहोत पट्टे बांधावेत. बँकॉकमधील तापमान २८०से. असून तेथे सकाळचे ७ वाजून २० मिनिटे झाली आहेत. मी घडाळयात पाहीले तर फक्त ५ वाजले होते. बँकॉक पूर्वेस असल्याने आम्ही सूर्याला दोन तास आधीच गाठले होते म्हणायचे. घड्याळ नव्या जगातील वेळेशी जमवून घेतले. पट्टा बांधला व उत्सुकतेने बँकॉक विमानतळाची व परदेशात पहिले पाऊल टाकण्याची वाट पाहू लागलो. विमान खाली येऊ लागले तशी खालची घरे स्पष्ट होऊ लागली सुबक चौकोनी इमारती आणि रस्त्यावरून धावणार्या खेळण्यातल्या मोटारी पाहील्यावर थोड्याच वेळात आपण त्यापैकी एखाद्या मोटारीत असणार या कल्पनेने मन आनंदीत झाले. सारा देखावा एकदम कलला विमान तिरके होऊन उतरण्याची तयारी करू लागले. विमानतळ दृष्टीपक्षात आला. विमान खाली आले आणि एस. टी. खडकाळ रस्त्यावरून जाताना जसे धक्के बसतात तसे धक्के बसले आणि मी ओळखले विमानाची चाके जमिनीला लागली आपले पायच जमिनीला लागल्यासारखा मला आनंद झाला व हायसेही वाटले. विमानाचा आवाज बदलला वेग कमी होऊन ते थांबल्यास ५/१० मिनिटे लागली. एअर होस्टेसच्या अभिवादनाचा स्वीकार करीत सर्वजण जिन्यावरून खाली उतरलो. विमानाशेजारी आलेल्या बसेसमधून विमानतळावर गेलो तेथे विमानात भरलेला फॉर्म व पासपोर्टची तपासणी झाली. नंतर फिरत्या पट्ट्यावरून सामान काढून घेतले व ट्रॉलीवर टाकून स्वत:च ट्रॉली ढकलत विमानतळाच्या बाहेरच्या दाराशी आलो आमच्या ट्रॅव्हल एजन्सीची गाईड मिसेस लेक आमच्या स्वागतासाठी उभीच होती. एका वातानुकुलीत स्टेशनवॅगनमधून आम्ही रस्त्याला लागलो. गाडीतील थाट पाहू की बाहेरच्या बिल्डिंग पाहू अशा संभ्रमात असतानाच मिसेस लेकने स्पीकरवरून बँकॉकची माहिती सांगण्यास सुरूवात केली.
भिंग
त्या दिवशी लाल कागदाच्या पुडीतून काचेचे भिंग काढून मी तिला दिले तेव्हा ती काय खूष झाली. दिसेल ती वस्तू भिंगातून पहाण्याचा तिने सपाटाच लावला. ते नवे विश्व पहाण्यात ती गर्क झाल्याचे पाहून मलाही समाधान वाटले. आता एक-दोन दिवसांची तरी निश्चिती झाली असा विचार करून मी ही नि:श्वास टाकला.
एक तास झाला असेल नसेल त्या घटनेला. खुर्चीत रेलून पुस्तक वाचत असताना सुमेधा माझ्यासमोर केव्हां येऊन उभी राहिली कळलेच नाही मला. बाबा ! तिने दुसऱ्यांदा हाक मारली आता लगेच कशाला आली या भावनेने थोड्या त्रासिक चेहऱ्याने मी म्हटले काय ? पण तिचा गंभीर चेहरा पाहताच मी नरमाईचा सूर घेतला.
``काय पाहिजे तुला ? काय झाले ? ''
``हे भिंग नको मला''.
तिने भिंग माझ्या हातावर ठेवले व तोंड फिरवून निघू लागली. मी तिचा हात धरला व थोडे रागावूनच म्हटले अग तुला मुद्दाम नवीन भिंग आणले. अगदी सूक्ष्म वस्तूही नीट पहाता याव्यात म्हणून. तर तू -- माझे शब्द तसेच अर्धवट राहिले. तिच्या टपोऱ्या डोळयात पाणी भरलेले होते.
`म्हणून तर नकोय मला ते'
`अगं पण झालं तरी काय?'
तिने माझ्याकडे मान वर करून पाहिले.
`भिंग नव्हते तेच बरे होते. मगाशी काय झाले? कोपऱ्यातली मुंग्यांची रांग मी बघत होते. अंगावर आलेली मुंगी झटकून टाकली पण नंतर वाटले भिंगातून तिला पहावे. तर भिंगातून मला काय दिसले असेल? त्या मुंगीचे दोन पाय अर्धवट तुटले होते एक मिशी लोळागोळा झाली होती व गुंगीची चालण्याची केविलवाणी धडपड चालली होती. भोवतालच्या तुरुतुरु पळणाऱ्या मुंग्यांंमध्ये ही मुंगी जायबंदी होऊन तुटके पाय हलवीत उभी होती. मला वाईट वाटले. मी तिच्या डोळयापाशी भिंग नेले मला वाटले तिच्या डोळयात पाण्यासारखे काही असावे. मी असे तिला बघतेय. कदाचित तिलापण त्याच भिंगातून मी दिसत असेन का. मी चटकन् भिंग बाजूला केले. मी किती क्रूर आहे, विनाकारण तिला जखमी करून वाऱ्यावर सोडणारी. मला ते पहावेना ती मुंगी जितक्या वेळ जिवंत राहील तोपर्यंत असह्य दु:ख भोगणार. ते दु:ख लवकर संपवावे म्हणून मी हात मारून तिची हालचाल बंद करायचा प्रयत्न केला. साध्या डोळयांनी तरी मला काही हालचाल जाणवली नाही. पण भिंगातून ती खरीच मेली की नाही हे पहाण्याची मला उत्सुकता लागली आहे पण ती अशाही परिस्थीतीत जिवंत असल्यास तिच्याकडे मला बघवणार नाही आणि कदाचित तिच्या मरणप्राय यातना मला कल्पनेतही सहनही होणार नाहीत. तेव्हा बाबा ! हे भिंग कुठेतरी दूर फेकून द्या.'
मी अवाक् होऊन तिच्याकडे पहात होतो. नकळत माझ्याही डोळयात अश्रू आले. मी तिला जवळ घेतले व व तिची समजूत काढली व विषय बदलला. पण भिंग हे नुसते छोटी वस्तु पहाण्याचे यंत्र नाही तर सूक्ष्म जीवांचे दु:ख जाणून घेण्यासाठी विज्ञानाने बहाल केलेला. तो डोळा आहे हे मला उमजले.
जमशेटजी टाटा
भारतातील प्रथम क्रमांकाचे उद्योगपती म्हणून नाव कमावण्यासाठी जमशेटजीना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. लहानणापासून तल्लख बुद्धिमत्ता व वाचनाची प्रचंड आवड यामुळे जमशेटजींनी आपले कॉलेजचे शिक्षण केवळ १८ व्या वर्षीच पूर्ण केले. जमशेटजींचे वडील चीनला कापूस व अफू पाठवीत असत व त्याबदल्यात चिनी वस्तू आयात करीत असत. त्यांनी चीनमधील ऑफिस चालविण्यासाठी १८ वर्षाच्या जमशेटजींची योजना केली. आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या जमशेटजींनी ती जबाबदारी हसत स्वीकारली. इतकेच नव्हे तर शांघाय येथेही दुसरे ऑफिसही काढले. म्हणजे या वेळेपासूनच त्यांच्या अंगी असलेली धाडसी वृत्ती दिसून येते.
चीनमधील कामगिरी पार पाडून परत आल्यावर इंग्लंडमधील ऑफिस चालविण्यासाठी त्यांना पाठविले. तेथेही कापडगिरण्यांसाठी कापूस भारतातून पाठविला जाई. जमशेटजी इंग्लंडला जाईतो कापसाचे भाव खाली आल्यामुळे धंद्यात मंदी आली. देणेकरी दारात आले पण पोरसवदा जमशेटजी डगमगले नाहीत. त्यांची मनाची शांतता, विवेकबुद्धी व संकटावर मात कारण्यासठी लागणारी हुशारी या तीन गोष्टींच्या जोरावर ते आल्या प्रसंगातून सहजपणे पार पडले, एवढेच नव्हे तर त्यांच्या बोलण्यातील चतुराईमुळे देणेकर्यांचा जमशेटजींवरील विश्वास दुणावला. आपला प्रतिनिधी म्हणून देणेकर्यांनी जमशेटजींची एकमुखानेनिवड केली. यामुळे जमशेटजींचा आत्मविश्वास बळावला.
काही कालावधीनंतर भारतात परत आल्यावर त्यांनी एक बंद पडलेली तेलेगिरणी चालवायला घेत्तली. तिचे रूपांतर कापसाच्या गिरणीत करून तिला चांगल्या नावारूपास आणली. पूर्वी मुंबई अहमदाबाद या शहरातच कापडगिरण्या असायच्या. जमशेटजी इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाने विचार करीत. त्यांनी मुंबईऎवजी नागपूरमध्ये कापडगिरणी काढण्याचे ठरविले. इंग्लंडमध्ये सुद्धा नसलेल्या कामगारकल्याण योजना अंमलात आणल्या. कामगारांसाठी सुरक्षा, मदतफंड, घरे, दवाखाना, पेन्शन इत्यादी महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. नागपूरसारख्या वेगळ्या गावात कापडगिरणी उभारून ती प्रचंड फायद्यात चालवून दाखविली.
जमशेटजींचे वैशिष्ट्य म्हणजे जुन्या आजारी गिरण्या ते धाडसाने विकत घेत असत. कुशल तंत्रज्ञ, सुधारित मशिनरी वापरून गिरणीचा दर्जा उंचावण्यास मदत करीत. यातून त्यांच्यातील धाडसी, कुशल उद्योगपतीचे गुण दिसून येतात. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील ‘ताजमहाल’ हॉटेल पहिले म्हणजे जमशेटजींच्या सौंदर्यदृष्टीचे दर्शन होते. भारतात परदेशी लोक येतात, वाढ्त्या प्रमाणात यावेत, त्यांची जेवणखाणाची, राहण्याची अतिशय उत्तम व्यवस्था असावी असा विचार करून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हे हॉटेल बांधले. जर्मनी, फ्रान्स येथून आणलेल्या उत्तमोत्तम प्रतीच्या मालाचा वापर करून या हॉटेलची उभारणी केली. जगात भारताची प्रतिमा उंचावली जावी या हेतूने ‘ताजमहाल’ हे हॉटेल बांधले गेले. १०० वर्षांपूर्वी बांधलेले हे हॉटेल अद्यावत सुविधांनी युक्त आहे. जमशेटजींची दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
केवळ एका उद्योगावर समाधान मानणे हे जमशेटजींच्या वृत्तीत बसणारे नव्हते. त्यासाठी त्यांनी म्हैसूर येथे जमीन खरेदी करून त्यावर तुतीची लागवड केली आणि रेशीम उत्पादनही सुरू केले. एका उद्योगापाठोपाठ दुसर्या उद्योगाचा त्यांचा आराखडा तयार असे. जमशेटजीना भारताला उद्योगप्रधान देश बनवायचे होते. त्यासाठी महत्वाचे म्हणजे लोखंडाचा उद्योग स्थापन केला पाहिजे या विचाराने त्यांना झपाटून टाकले. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. अनंत अडचणी आल्या. तरी खचून न जाता त्यांनी त्या सर्व अडचणींवर धैर्याने मात केली. एका जर्मन तंत्रज्ञाचा लेख त्यांच्या वाचनात आला. त्यानुसार भारतात लोखंड व कोळसा कोठे सापडू शकेल याचा त्यांनी शोध घेतला. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले. बंगाल प्रांतातील दुर्गापूर व साकची येथे लोखंड व कोळसा याचा मुबलक साठा सापडला.लोखंडाचा कारखाना तेथेच उभारायचे ठरले जमशेटजीच्या प्रयत्नांमुळे आकारास आलेल्या या वस्तीचे, शहराचे नावही जमशेटपूर असेच ठेवण्यात आले. जमशेटजींचे निधन १९०४ साली झाले तरी त्यांच्याप्रमाणेच कर्तृत्ववान असलेल्या त्यांच्या मुलाने - दोराबजी टाटा यांनी आपल्या वडिलांच्या महास्वप्नाला मूर्त रूप दिले. १९११ साली ‘टाटा आयर्न, स्टील कंपनी’ हा कारखाना उभारला गेला. त्याचबरोबर कामगारांसाठी घरे, शाळा, बाजार, हॉस्पिटल, रेल्वे लाईन, बस, पोस्ट ऑफिस इत्यादी सर्व सुविधाही केल्या गेल्या.
अशा थोर उद्योगपतींच्या चरित्रावरून प्रत्येकाला आळस झटकून सतत उद्योगी राहण्याची प्रेरणा मिळेल. कष्ट करण्याची तयारी, जिद्द हे गुण मुलांच्या अंगी उतरावेत यासाठी पालकही प्रयत्नशील राहतील.
उद्योगपती वालचंद हिराचंद
Saturday, July 4, 2009
शिक्षण व उद्योग यांची सांगड घालणारे हॉर्वर्ड विद्यापीठ
हॉर्वर्ड विद्यापीठ १९५७ मध्ये स्थापन झाले. विद्यापीठाचे शैक्षणिक शुल्क देता यावे यासाठी त्यावेळी अनेक विद्यार्थी आपल्या राहत्या खोलीत काहीतरी व्यवसाय करीत होते. अशा विद्यार्थ्यांना मदत म्हणून विद्यार्थ्यांचीच एक कंपनी सुरू करायची कल्पना पुढे आली. विद्यापीठाने उद्योगातून विकास हे ध्येय मानून विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग काढण्यास केवळ शिक्षण व प्रोत्साहन न देता त्यांनी सुरू केलेल्या उद्योगांच्या विकासासाठी १३ डिसेंबर १९५३ मध्ये ७००० डॉलरच्या भांडवलावर हॉर्वर्ड स्टुडंट एजन्सी नावाची कंपनी स्थापन केली. यावेळी जॉन मन्रो, डस्टीन बर्क, ग्रेग स्टोन, जॉन ग्यानेटी, थिओडोर एलिओट आणि हॅरोल्ड रोजेन्वाल्ड हे विद्यार्थीच कंपनीचे प्रवर्तक होते. हॉर्वर्ड विद्यापीठाला कापडपुरवठ्याचे काम या कंपनीने हाती घेतले. विद्यार्थ्यानी हॉर्वर्ड विद्यापीठातील इमारतीत सुरू केलेला हा उद्योग हळू हळू वाढत गेला.
या छोट्या रोपट्याचे आता एका मोठ्या उद्योग समूहात रुपांतर झाले आहे. आज त्यातील ‘लेटस गो’ ही हॉर्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी चालविलेली जगातील सर्वात मोठी कॉर्पोरेट कंपनी बनली आहे. या कंपनीत ५०० विद्यार्थी विविध स्तरांवर काम करतात. या कॉर्पोरेटचे नऊ मोठॆ उपविभाग आहेत व प्रत्येक विभागाचा प्रमुख विद्यार्थी आहे. ‘लेटस गो’ ही कंपनी जगातील पर्यटन स्थळांविषयी माहितीपूर्ण पुस्तके प्रसिद्ध करते. यासाठी विद्यार्थी जगभरातील विविध ठिकाणांना प्रत्यक्ष भॆट देऊन माहिती गॊळा करतात.
आपल्या भारतात पालक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा भार सोसतात. अमेरिकेत मात्र विद्यार्थ्यांना स्वतः त्यासाठी झटावे लागते. विद्यार्थ्यांची परिक्षार्थी वृत्ती कमी होऊन स्वावलंबन व श्रम यांचे महत्व त्यांना कळावे तसेच उद्योग विकासाला चालना मिळावी यासाठी भारतातील शिक्षणसंस्थांना हॉर्वर्ड विद्यापीठाचा आदर्श घ्यावयास हवा. मात्र केवळ फी व डोनेशन या मार्गांनी पैसे मिळविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना उद्योजक बनवून व त्यांच्या उद्योगात सहभागी होण्यासाठी आवश्यक पावले त्यांना उचलावी लागतील. नवीन उद्योग सुरू होतांना येणार्या अडचणींवर सहज मात करता यावी यासाठी बॅंकेकडून अर्थ साहाय्य मिळवून देणे, आपली इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा व वर्कशॉप वापरण्यास देणे, उत्पादित मालाला गिर्हाईक मिळवून देण्यास मदत करणे. ही कामे शिक्षणसंस्थांना करावी लागतील. तसे पाहता या संस्थांमधील बर्याच सुविधा वापराविना पडून असतात. विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ या धर्तीवर ग्रंथालय, ऑफिस, बागकाम, डाटा एन्ट्री अशी अनेक कामे देता येऊ शकतात.आज शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांची अनेक मंडळे असतात. त्यांचा उद्देश करमणुकीचे कार्यक्रम, खेळ वा स्पर्धा घेणे वा सामाजिक कार्य करणे असा असतो. उद्योगासाठी अशी मंडळे स्थापन झाली तर विद्यार्थ्यांच्या कार्यास नवे क्षेत्र मिळेल व स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांच्यात क्षमता येईल.ज्ञानदीप फौण्डेशन अशा उपक्रमांसाठी शिक्षणसंस्थांना मार्गदर्शन देण्यास तयार आहे.
ज्ञानदीप डॉट नेट या फौंडेशनच्या संकेतस्थळावर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षणसंस्था यांचे परस्पर सहकार्यासाठी समूह करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या घटकांची संलग्नता करून सार्वत्रिक विकासासाठी विचारविनिमय करणे, परिसंवाद आयोजित करणे, प्रकल्प राबवणे वा संशोधन करणे असे कार्य प्रभावीपणे करता येईल. हॉर्वर्ड विद्यापीठाने केलेला यशस्वी प्रयोग आपल्या शिक्षण संस्थात उद्योगासह विविध कार्यांसाठी करणे देशाच्या सर्वांगीण् विकासाला साहाय्यभूत ठरेल यात शंका नाही.
संदर्भ - http://www.harvardstudentagencies.com
Friday, June 26, 2009
घरबांधणीमध्ये सौरऊर्जेचा उपयोग
भारतामध्ये सौरऊर्जा अपार आहे. घरबांधणीमध्ये सौरऊर्जेचा वापर केल्यास वीजेच्या निर्मितीसाठी, पाणी तापविण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळेलच याशिवाय सूर्यप्रकाशाचा वापर घरातील अंधाऱ्या जागेत उजेड आणण्यासाठी केल्यास विजेची बचत होऊ शकेल. उन्हाळयात पंख्यांना व शीतकाला लागणाऱ्या ऊर्जेसाठी सूर्यप्रकाशाचा उपयोग करता येईल.
सौर ऊर्जेचा वापर करुन घराचे संकल्पन
या प्रकारच्या घरबांधणीमध्ये सूर्यप्रकाशात असणाऱ्या घराचा पृष्ठभाग आवश्यकतेनुसार उघडता व झाकता येण्याची सोय केलेली असते. जाड भिंतीचा उपयोग उष्णता रोधक म्हणून केला जातो. यामुळे घर उन्हाळयात थंड तर हिवाळयात गरम राहते.
छतावर किंवा गच्चीत पाणी साठविण्याची सोय केलेली असते. यामुळे घर दिवसा थंड तर रात्री गरम राहते. सूर्याचा मार्ग घराची योग्य मांडणी उत्तर गोलार्धात दक्षिणेकडील खिडकी हा घरबांधणीमध्ये एक महत्वाचा घटक असतोे. खिडकीच्या काचा तिरक्या बसविलेल्या असल्यास हिवाळयात त्यामुळे उबदारपणा वाढला तरी उन्हाळयात त्यामुळे घरात गरम हवा येते. सरळ उभ्या काचा बंद करणे व पडद्याने झाकणे सोपे असते.
बाहेरच्या बाजूस सावली देणारी झाडे असणे फायदेशीर असते. पडदे, व्हरांडा, उतरते छप्पर यांचीही सूर्यप्रकाश रोखण्याचे उपाय नैसर्गिक वायुवीजनाचा दुहेरी फायदा होतो. त्यामुळे गारवा येतो व घरातील बांधकाम घटकही थंड होतात. नैसर्गिक वाऱ्याची झुळूक आल्यास अंगावरील घामाचे बाष्पीभवन होते व सुखद गारवा वाटतो. केवळ खिडक्या व दारे उघडून नैसर्गिक वायुवीजन साधता येते. विशेषत: उष्ण व दमट हवामानात याचा अधिक फायदा होतो.
प्रकाशाची दिशा बदलून नैसर्गिक सूर्यप्रकाश घरातील आतल्या भागात येईल अशी व्यवस्था केल्यास विजेच्या प्रकाशाची गरज कमी होते व वीजबिलात घट होते. यासाठी आरसे, भिंगे यासारखी विविध प्रकाश उपकरणे वापरून घरात कोठेही नैसर्गिक सूर्यप्रकाश पोहोचविणे आता शक्य झाले आहे. असा सूर्यप्रकाश कमी तपमानाचा व अधिक आल्हाददायक असतोच पण मुख्य म्हणजे यामुळे विजेच्या खर्चात खूपच बचत होते. मोठ्या व्यावसायिक ऑफिसेसमध्ये असा कमी तपमानाचा सूर्यप्रकाश विजेच्या दिव्यांऐवजी वापरल्यास शीतकरणाची गरज कमी होऊन खर्चात बचत होते. सावली असणाऱ्या खिडक्या चे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करणे व त्याचवेळी घरातील प्रकाशाची गरज भागविण्यासाठी सूर्यप्रकाशाचा जास्तीतजास्त उपयोग करणे हे उद्दीष्ट ठेऊन घराचे डिझाईन करावे लागते. सूर्याच्या उष्णतेने हवा गरम होऊन वर जाते या तत्वाचा वापर करून घराचे डिझाईन केले की नैसर्गिक वायूवीजन होऊन आतील तापमान थंड व सुखकर राहते. घरातल्या फरशीखाली पाणी साठविण्याची सोय केल्यास त्याचीही तापमान थंड ठेवण्यास मदत होते.
इमारतीच्या बाहेरील बाजूच्या भिंती आणि छप्पर वा स्लॅब सूर्याच्या उष्णतेने तापतात व त्याचा परिणाम इमारतीच्या आतल्या तापमानावर होतो. त्यामुळे बाहेरील बाजूस पडवी वा व्हरांडा ठेवल्यास भिंतीवर ऊन पडत नाही. पडदे, उष्णतारोधक काचा यांचा उपयोग करूनही आ येणारी उष्णता थोपविता येते. स्लॅब व बाहेरील भिंतीना प्रकाश परावर्तक पांढरा रंग दिल्यास उष्णता शोषली न जाता ६० ते ७० टक्के उष्णतेचेे परावर्तन होऊन ती परत वातावरणात सोडली जाते व त्यामुळे आतले तापमान थंड राहण्यास मदत होते. अशी उपाय योजना केल्यास घरातील तापमान २ ते ३ डिग्रींनी कमी होऊ शकते. पूर्वी घरांच्या भिंती जाड असत व त्यामुळे आपोआपच उष्णता राखण्यास मदत होत असे. बाहेरच्या खिडक्या व दारे यातून सूर्यप्रकाश सरळ आत येतो व आतील उष्णता वाढते.
खिडकी छतालगत उंचावर असल्यास असा परिणाम अधिकच जाणवतो. यासाठी खिडक्या खालच्या बाजूस ठेवून त्यावर पूर्ण सावली पडेल अशा रीतीने खिडक्या व दारांवरील कनातीची रूंदी ठरवावी लागते. तसेच घराच्या आत येणारा सूर्यप्रकाश सरळ न येता परावर्तित होऊन तो छताकडे जाईल व तेथून सर्वत्र पसरेल अशी योजना करता येते.
भारत उत्तर गोलार्धात असल्याने सूर्याचा मार्ग दक्षिणेकडे झुकलेला असतो. म्हणजेच मध्यान्ही स्थानीय अक्षांशाएवढा सूर्य दक्षिणेकडे कललेला असतो. साहजिकच सूर्यशक्तीवर पाणी गरम करणारी यंत्रणेचे तोंड दक्षिणेकडे असते. मात्र दक्षिणेकडे खिडकी असल्यास जास्त उष्णता घरात येते. यासाठी दक्षिण बाजूस खिडकी न ठेवता ती उत्तरेस ठेवणे योग्य असते.
स्वप्न हरित नगरीचे
वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे. शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत.
एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक पटीनी वाढते. साहजिकच त्यांची पाण्याची गरज त्याचप्रमाणात वाढते. मात्र पाणीपुरवठ्याचा नळ मोठा करता येत नाही. कारण तो शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील एक छोटा भाग असतो. त्यामुळे मोठ्या व्यासाचा नळ बसविला तरी पाणीपुरवठा वाढू शकत नाही. जी गोष्ट पाण्याची तीच सांडपाणी वाहून नेणाया गटारांची वा नळांची. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी व पंपाची व्यवस्था करता येते मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलजल व्यवस्थेत सोडणे बहुधा शक्य होत नाही. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. नव्या इमारतींच्या किंमती अधिक असल्याने त्यात राहणाया लोकांचे जीवनमानही उच्च असते. त्यांच्याकडे स्कूटर व मोटार वाहने असतात. त्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करावी लागते. रस्त्यावरील वाहतुकही वाढते. रस्ता अधिक रुंद व जास्त टिकावू करावा लागतो. अधिक विजेची गरज भागविण्यासाठी उच्च दाबाच्या तारा व ट्रॅन्स्फ़ार्मर बसवावे लागतात.
एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल तर शहरात ठिकठिकाणी अनेक इमारतींचे असे रुपांतर झाल्यास शहराची सर्व सुविधा यंत्राणाच कोलमडून पडते. याशिवाय अनेक जुन्या इमारती पाडण्याचे वा नवीन बांधण्याचे काम चालू असल्याने ट्रकांची वाहतूक, जुने नवे बांधकाम साहित्य व कामगारवस्ती यांचाही ताण शहर व्यवस्थेवर पडतो. शहरातील लोकसंख्या वाढते तशी जीवनावश्यक वस्तूची गरजही वाढते. ती पुरविण्यासाठी मोठी दुकाने, मॉल यांचीही त्यात भर पडते. करमणूक व इतर सुखसोयीही आहे त्या जागेत निर्माण केल्या जातात. परिणामी शहराचे मुळचे रूप नष्ट होऊन त्याला कांक्रीटच्या जंगलाचे रूप येते.
पूर्वीचे खेडेगाव म्हणजे एक रम्य, निसर्गाच्या सान्निध्यात असणारे वसतीस्थान असायचे. गावाच्या प्रवेशद्वाराशी कमान, गावाच्या मध्यभागी एक देऊळ, वड, चिंच वा पिंपळाच्या झाडाखाली असणारा कट्टा, चार गल्ल्या वस्ती, बाजूला एक ओढा, आणि सभोवताली पसरलेली शेती आणि मळे. रस्ते साधेच असले तरी आपले वाटायचे. साध्या दगडा-मातीची वा कुडाची घरेदेखील विलक्षण सुखद असायची. गावातील माणसे, त्यांचे विचार व व्यवहार एका घट्ट विणीत गुंफ़ल्यासारखी एकसंध वाटायची. पारंपारिक जत्रा हे गावाचे आकर्षण असायचे. आता या खेडेगावाचे रूप पार पालटले आहे. शहरी संस्कृतीचे आघात त्यावर झाले आहेत.
पूर्वीचे शहर म्हणजे खेडेगावातल्या लोकांना आकर्षण असायचे. मोठ्या आकर्षक इमारती, रुंद व स्वच्छ रस्ते, बागा, क्रीडांगणे, सरकारी कचेया, वाचनालय व शाळा- कॉलेजच्या देखण्या इमारती, नदी असेल तर रुंद बांधीव घाट, घाटावरील देवळे, सार्वजनिक सभांसाठी खास पटांगणे, एक ना दोन. आठ्वड्याच्या बाजारासाठी वा नाटक- सिनेमा पाह्ण्यासाठी खेडेगावातील लोक शहरात यायचे.
पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत दिवसाच्या विविध कालखंडांत निसर्ग विविध रुपे धारण करीत असतो. पहाटेचे दंव, उष:कालची लाली, पक्षांचे कूजन, उमलत्या फ़ुलांचे ताटवे, दुपारचे ऊन, संध्याकाळचा गार वारा आणि रात्री आकाशातील नक्षत्रांचा मनमोहक नजारा या गोष्टींना शहरातील माणूस पारखा झाला आहे. या नैसर्गिक सुखकारक गोष्टीऎवजी दूरदर्शनवरील आभासी दृश्यांवर त्याला समाधान मानावे लागत आहे. कृत्रिम वायुवीजन व प्रकाशयोजना तसेच अयोग्य घरबांधणी व अंतर्गत सजावट यामुळे घरातील प्रदूषण्ही वाढले आहे. रस्त्यावरून पायी चालणायाला गर्दी, गोंगाट, प्रदूषित हवा, सांडपाण्याची दलदल, कचयाचे ढीग यातून मार्ग काढावा लागत आहे. तर वाहन वापरणायाला ट्रॅफ़िक जॅम, वेगात चालणारी वाहने व धोकादायक खाचखळग्यांचे रस्ते व पार्कींग समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वृद्ध व्यक्तींना सुरक्षितपणे हिंडण्यासाठी रस्ते नाहीत. विरंगुळ्यासाठी बागा नाहीत. मुलांना खेळण्यासाठी मोक्ळ्या जागा वा क्रीडांगणे नाहीत.
यावर काहीच उपाय नाही का? सर्वसामान्य माणसाचे सुंदर शहराचे स्वप्न हे स्वप्नच राहणार का? पर्यावरणाची आपण काळजी घेतली व त्या प्रमाणे गृहरचना व शहररचना करण्याचा निश्चय केला तर हे स्वप्नही सत्य ठरू शकेल. आपल्या सुखी जीवनासाठी व आपल्या भावी पिढ्यांसाठी हे अत्यावश्यक आहे.
Domestic KPO for stable and decentralized growth of IT
India, with its large pool of educated employees grabbed this opportunity and emerged as a major service provider in the world. In IT sector, BPO or more correctly KPO ( Knowledge Process Outsourcing) played a significant role in development of corporate companies like Wipro, Infosys, Satyam who gave a real boost to Indian economy by earning sizable foreign exchange through KPO.
These companies recruited large number of software engineers, paid them handsome salary, erected huge infrastructural and info structural facilities and established high quality criteria with strict time management and safeguarding data security essential for undertaking such projects. The companies also could easily collect large share capital through public. The boom in KPO created competition in hiring talent manpower and companies tried to book good students from professional colleges even one or two years before their graduation offering attractive pay packages. This resulted in unprecedented rush to IT and computer courses. As a result new colleges sprung up to meet the need and IT education itself became a most profitable business. Everything was OK till the companies were getting projects.
Unexpectedly, there was a big blow to this lucrative business growth. The collapse of the housing market led to bank collapses in the US and Europe, causing the amount of available credit to be sharply curtailed, resulting in huge liquidity and solvency crises. World giant Lehman Brothers Holdings Inc., a global financial-services firm in US declared bankruptcy in 2008. This triggered crashing of stock market and collapse of many banks and businesses. The previous recession during Mar-Nov 2001 was due to collapse of the dot-com bubble and accounting scandals. The same happened this time also. Recession is not a new phenomenon. Wikipedia lists 11 recessions in US economy during 1945-2007 where the average duration of recession was 10 months. However the present recession started from Dec 2007 and is still continuing.
IT industry in India which was dependent on the service sector outsourcing by these foreign firms had to face sudden decrease in project inflow for which they were not prepared. Corporate India’s other debacle was confession by Chairman of the $2-billion Satyam Computer Services of misleading financial statements to the tune of Rs 7,136 crore, including Rs 5,040 crore of non-existent cash and bank balances. This raised doubts about the reliability of published financial statements of other IT firms also. Satyam fraud put a question mark on the entire corporate governance system in India
Unfortunately the growth of IT industry in India has been concentrated in urban centres with few big corporates occupying major share. The small scale IT industries are mainly engaged in education and meeting the local software needs. Their share in BPO is negligible. This is mainly due to nonexposure to the global market and inability to meet the criteria for acquiring BPO projects. The major drawback is low capital, non availability of talented workforce due to its migration to big IT corporates. The projects handled by small IT firms are of short duration, customized to suit local market and not of international acceptable quality. It never-the-less a huge store of IT manpower and must be converted into valuable sustainable resource by financial inputs, training and upgrading their product quality.
The big corporate IT firms in India, who need economy and flexibility in operations should help building this resource by outsourcing tiny subunits or modules of their projects to small IT firms located in semi-urban and rural area. This will help in reducing their skilled manpower requirements and providing them ample resource availability at less cost. However, these firms who were mainly providing services to foreign businesses will have to develop effective methods to get the services managed through remote small scale IT firms. Thus they will have to act as middle link between small scale IT firms and foreign industries offering large scale projects. In absence of foreign projects, these IT corporate can concentrate on large scale domestic project requirements.
Fortunately, there is a great scope for IT industry in India. The major sectors which are witnessing a special thrust for adoption of IT are e-Governance initiatives by Govt. and semi-government agencies, Insurance, Banks, Energy, Financial Institutions, Defense, Public Tax System,. In industry also ERP implementations and systems integration continue to be at the forefront of IT growth in India.
All these large IT projects requiring huge financial input and requiring long time span for completion are generally beyond the reach of small firms due to financial requirements and incapability of planning and coordination of such projects. Big corporate firms can easily arrange for necessary finance, meet the software and hardware infrastructure requirements and can wait for long period to get returns. These firms should use BPO techniques for allocating the project sub-modules to small firms. This will not only give stability to their business, but would help in decentralized and sustainable growth of IT sector in India.
A large section of women are now employed in various IT companies located in urban area. Generally family is nuclear with no elder nonworking persons in the house. In IT companies, employees have to work 10/12 hours and often at odd hours daily. If the company is far away from residence, travel time required adds to this period. It becomes difficult for women to manage both service and home front after marriage. Once the have kids, problem increase as home workload increases and it becomes difficult for women to take care of the kids personally. This results in increasing psychological tension in addition physical hardship of service. It is observed that many women leave the service at the peak of their career. Not doing the job or leaving the job creates a sense of frustration in educated women. Thus a vast resource of talented workforce remains unutilized. There is need to devise methods for tapping this resource without hampering the hormonius family relations.
Fortunately advances in communication technology have created facility of working at home. With high speed secure internet messenger services the office work can be remotely from house. If proper infrastructural and software facilities are used, the work can be outsourced easily to individuals. Proper coordination and detailed organization work flow can be developed to have effective domestic level BPO. This will be economical for the employing industries and convenient to women. Unemployed youth and those who have lost jobs due to recession can also be given job at reduced rates.
Facility of working remotely will be more beneficial to small firms and people located in rural and semi urban area. This will usher a new era of overall growth of region without burden on urban centres and would avoid mass migration of talent from rural area.Educational institutes, women and unemployed youth, small software firms and large IT corporate would for a stable chain to meet human resource requirements.
Small software firms in India are mostly engaged in educationactivity or are meeting the needs of customized software for local clientale. They have low capital, often no licensed software or proper hardware and workforce who is transitory waiting for joining big firms.This situation will have to be changed if they have to play a role of producing high quality software needed for oversea’s projects. The big IT companies should take up this challenge by investing in strengthening these small firms instead of building costly infrastructure in urban centres.
The IT personnel, working in big IT companies and drawing handsome salary should realize uncertainty of job and should spend money not in unproductive items like purchase of real estates, or share market but should lend helping hand to unemployed youth, form small group and start own business. May be, they would get less returns, but they will create a place, where they can keep working if job is lost. The biography’s of may industrial stalwarts and milliners show that they have taken such risks in their early career in spite of odds and other tempting offers.
Dnyandeep Education & Research Foundation has a vision of developing such network. Dnyandeep Infotech Pvt. Ltd., main sponsor organization of foundation has successfully completed many small scale foreign projects even with high attrition rate of trained employees. Dnyandeep Foundation has close links with many educational institutes in Maharashtra and has started work in this direction by signing MoU with these institutes, motivating the teachers and individual free lance workers to participate in this novel experiment.
No doubt, the task of building quality conscious and capable small independent centres and train them to meet basic requirements of BPO projects like data security, quality, work efficiency and strict time management is enormous and capital intensive. But it is the need of the hour and IT industries or government should do allout efforts to build it.
If big corporate IT firms take a lead in this project, significant progress can be made in disseminating benefits of BPO to grassroot level human resource without their relocation. I had made similar comment on Nandan Nilekani’s views on strengthening urban centres in his talk on www.ted.com.
I hope IT people now working in big firms will think over on this topic and express their views.
Thursday, June 25, 2009
आयटी उद्योगाचे विकेंद्रीकरण आवश्यक
परदेशातून काम करून घेतले तर त्याला ऑफशोअर आउटसोर्सिंग म्हणतात तर माहिती तंत्रज्ञानातील कामे बाहेरून करून घेतली तर त्याला नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग ( केपीओ) म्हणतात.
भारताचे परदेशातील कंपन्यांकडून आयटी क्षेत्रातील बीपीओमार्फत मिळालेले उत्पन्न २००७ मध्ये १० बिलियन डॉलर होते. हे जगातील आयटी क्षेत्रातील बीपीओ व्यापाराच्या ६३ टक्के होते. मात्र याआधीच्या वर्षी हेच ७० टक्के होते. ७ टक्क्यांची ही घट पूर्व युरोप, फिलिपाईन्स, मोरोक्को,इजिप्त आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडे वाढलेल्या बीपीओमुळे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. चीननेही या व्यवसायात पदार्पण केले असून त्याचा येथील व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.
आज भारतात इंजिनिअरिंग उद्योगांमध्ये सुट्या भागांच्या उत्पादनाचे काम छोट्या उद्योगांकडून करून घेतले जाते. बहुतेक सर्व मोठॆ उद्योग बीपीओचा वापर करून आपल्या कामाचे विकेंद्रीकरण करतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात असणार्या औद्योगिक वसाहतीतील व एमआयडीसीतील बरेचसे उद्योग अशा सुट्या भागांच्या निर्मितीवर आधारलेले आहेत. उद्योगाची व त्याद्वारे राज्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी अशा बीपीओची फार गरज असते.
सध्या भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या जागतिक मंदीमुळे अडचणीत आल्या आहेत. आतापर्यंत परदेशातून बीपीओच्या माध्यमातून मोठे प्रकल्प व प्रचंड पैसा मिळत असल्याने भरपूर पगार देऊन आयटी क्षेत्रातील पदवीधारकांची भली मोठी फौज आपल्या पदरी ठेवून या कंपन्यांनी बलाढ्य साम्राज्ये उभी केली व सर्व अर्थ व्यवस्थेला चांगली गती दिली. मात्र जागतिक मंदीमुळे ऑफशोअर आउटसोर्सिंग करणार्या देशातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढल्याने त्यांना असे प्रकल्प मिळणे कमी झाले व त्याचा फटका भारतातील आयटी कंपन्यांना बसला. खर्चात काटकसर करायची तर पगार कपात वा नोकरकपात करावी लागणार. मात्र या उद्योगांचे शेअर भांडवल जनतेतील जनतेतील उद्योगाविषयी असणार्या प्रतिमेवर अवलंबून असल्याने काटकसरीचे उपाय न करता तोटा होत असूनही तो दडविण्याकडे व ‘सर्व आलबेल आहे’ असे दर्शविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परदेशातील ‘ल्हेमन ब्रदर्स’ काय व इथले ‘सत्यम कॉम्पुटर्स’ काय, दोन्हीकडे असे बलाढ्य उद्योग बंद पडले. आज भारतात सुस्थितीत दिसत असणार्या उद्योगांची खरी स्थिती काय आहे हे त्यांच्याशिवाय इतर कोणालाच माहीत नाही. मात्र नवीन नोकरभरतीत झालेली घट परिस्थिती बिकट असल्याचे दर्शविते.
यावर उपाय हा बीपीओच ठरू शकतो. या कंपन्यांनी आपले बहुतेक काम ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या कंपन्यांना आउटसोर्स केले तर बीपीओचे वर वर्णन केलेले सर्व फायदे या कंपन्यांना मिळू शकतील. निम्याहून कमी खर्चात प्रकल्प पूर्ण करता येतीलच याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या संगणक कंपन्यांना नवसंजीवनी मिळून अनेक सुशिक्षित संगणक तज्ज्ञांना आपल्या गावीच काम मिळेल. त्या भागाचा विकास होईल. शहरीकरण व त्यातून येणारी महागाई व प्रदूषण टळेल.
आतापर्यंत या आयटी कंपन्यांनी केवळ सेवा व मनुष्यबळ देण्याचे काम केले त्यांना आता सेवा व मनुष्यबळ छोट्या कंपन्यांकडून घेण्याचीही भूमिका पार पाडावी लागेल. याबाबतीत बीपीओविषयी छोट्या कंपन्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना भांडवल पुरवणे, शैक्षणिक संस्थांमधून पदवी घेऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व त्यांचा मानसिक कल बदलणे ही कामे करावी लागणार आहेत. परदेशातील उद्योगांना भारतात काम देताना जी ‘माहितीची गुप्तता राखणे’, ‘कामाचा दर्जा उत्तम ठेवणे’, ‘वेळेचे गणित पाळणे’ व ‘विश्वासार्हता’ या गोष्टींची काळजी वाटते तशीच काळजी भारतातील मोठ्या उद्योगांना वाटणे स्वाभाविक आहे. अशा उत्तम दर्जाच्या छोट्या संस्था तयार करणे हेही एक मोठे आव्हान आहे ते मोठ्या उद्योगांनी पेलायला हवे. ज्ञानदीप फौंडेशनच्या मते भारतातील शिक्षणसंस्था, छोटे उद्योग, मॊठे उद्योग अशी परस्परपूरक व परस्परावलंबी साखळी तयार करता आली तर या संगणक उद्योगाचा चिरस्थायी व विकेंद्रित विकास होऊ शकेल.
आयटी क्षेत्राच्या विकासात महिला पार मोठे योगदान देऊ शकतात. आजही मोठया आयटी कंपन्यांत महिलाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे दररोज १०/१२ तास काम करावे लागते व घरातील जबाबदार्या सांभाळाव्या लागतात त्यामुळे त्यांना मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागतो व लग्नानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट .होते अनेक महिला नोकरी सोडतात. नोकरी न केल्यामुळे व आपल्या शिक्षणाचा काही उपयोग करता येत नाही अशा विचाराने निराश होणार्या अशा महिलांना काम देण्याची काहीतरी व्यवस्था करणे आवश्यक आहे. सुदैवाने माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे घरी बसून ऑफिसमधील काम करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मोठ्या कंपन्यांनी अशा महिलांना अर्धवेळ वा घरी राहून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर महिलांचे फार मोठे मनुष्यबळ या कंपन्यांना कमी पगारात उपलब्ध होऊ शकेल. महिला सशक्तीकरणालाही यामुळे चालना मिळेल. आपल्या कुटुंबाला हातभार लावल्याचे समाधान महिलांना मिळेल.
मंदीमुळे नोकरी न मिळालेल्या वा नोकरी गमवावी लागलेल्या संगणकतज्ज्ञांचा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. महिलांचा व या कुशल मनुष्यबळाचा उपयोग छोट्या कपन्यांना करून घेता येईल. यासाठी बीपीओच्या कार्यपद्धतीचा सर्वांनी अभ्यास करणे व वापर करणे आवश्यक आहे.
ज्ञानदीप फौंडेशनशी संलग्न असणार्या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. कंपनीने परदेशातील अनेक प्रकल्प बीपीओतर्फे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. ज्ञानदीपचा अनेक शिक्षण संस्थांशीही निकटचा संबंध आहे. बीपीओचे महत्व लक्षात घेऊन ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत जनजागृती करण्याचे ठरविले आहे. सर्व शिक्षण संस्था, महिला व घरी संगणकावरील काम करण्याची असणार्यांसाठी दूरस्थ शिक्षणाद्वारे प्रशिक्षण वर्ग घेण्याचाही विचार आहे. परदेशात राहणार्या संगणकतज्ज्ञांनाही यात सामावून घेता येईल. आपल्या या बाबतीत काही सूचना असतील तर संपर्क साधावा.
Friday, June 19, 2009
सिलिकॉन व्हॅली ग्रेटस् - पुस्तक परिचय
सिलिकॉन व्हॅली ग्रेटस् - पुस्तक परिचय
लेखक - एस. एस. क्षत्रिय
विकास पब्लिशिंग हाउस प्रा. लि.
आय. टी. क्षेत्रात नाव मिळविलेल्या यशस्वी उद्योजकांचे फोटो व माहिती असणारे ‘सिलिकॉन व्हॅली ग्रेटस्’ हे पुस्तक बंगलोरला फोरममध्ये पाहिले. कुतुहलाने पुस्तक चाळले तेव्हा त्यात बंगलोर व सिलिकॉन व्हॅली यांची तुलना केलेली व दोन्ही ठिकाणच्या आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन माहिती लिहिलेली आढळली.
मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये नुकताच जाऊन आलो होतो. तेथील वैभव पाहून माझे डॊळे दिपून गेले होते. सिलिकॉन व्हॅलीला हे वैभव मिळवून दॆण्यात भारतीयांचा महत्वाचा वाटा आहे हे ऎकल्याने मी मनोमन सुखावलो होतो. टेक म्युझियममध्ये ‘सुहास पाटील’ हे नाव कोरलेले पाहिल्यावर माझी छाती अभिमानाने भरून आली होती. आय. टी. उद्योगाची पंढरी असणार्या स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीला भेट दिल्यावर तर मी भक्तीभावाने तेथील दगडगोटे सिलिकॉन चिप मानून घरी घेऊन आलो होतो. भारतात परतल्यानंतर आमच्या ज्ञानदीपच्या भावी संगणक तज्ञांना त्यातील एक एक दगड देऊन तो देवात ठेवण्यास सांगितले होते व तुम्ही सर्वांनी सिलिकॉन व्हॅलीत जाऊन यश मिळवायची खूणगाठ बांधा असे सुचविले होते. साहजिकच ‘सिलिकॉन व्हॅली’ हे नाव वाचताच मी ते पुस्तक विकत घेतले.
अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर असणार्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रॅन्सिस्को ते सॅन ओसे पर्यंतच्या दहा मैल रुंदीच्या व ३० मैल लांबीचा प्रदेशास ‘सिलिकॉन व्हॅली’ असे म्हणतात. तेथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या गतीने प्रगती झाली व नव्या कंपन्या उदयास आल्या, त्याचीच पुनरावृत्ती भारतात बंगलोरमध्ये पहावयास मिळाली. त्यामुळे लेखकाने बंगलोरला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हटले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत सिलिकॉन व्हॅली व बंगलोरविषयी माहिती व भारतीयांच्या सिलिकॉन व्हॅलीमधील वास्तव्य व टेक्नॉलॉजीमधील प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे व मुख्य भागात नऊ उद्योजकांची माहिती देण्यात आली आहे. त्याचा थोडक्यात सारांश.
१. चंद्रशेखर - चैन्नईजवळच्या कुंभकोरम या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात १९६० मध्ये कि. बा. चंद्रशेखर यांचा जन्म झाला. इंजिनिअरिंगच्या प्रवेशपरिक्षेत यश न मिळाल्याने त्यांनी बीएससीत प्रवेश घेतला. विद्यापिठात तिसरा क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवली व मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा मिळविला. सात वर्षे विप्रोत नोकरी केल्यानंतर त्यांनी १९९० मध्ये अमेरिकेतील रोल्टा कंपनी जॉईन केली. १९९२ मध्ये आपल्या घरातच स्वतःची फोरेस नावाची कंपनी काढली. त्यांची पत्नी सुकन्या हिने त्यात मदत केली. पुढे याच कंपनीचे एक्झोडस हे नामांतर झाले. अमेरिकेतील प्रोजेक्ट मिळवून भारतातील त्यांच्या मित्रांनी बंगलोरमध्ये स्थापन केलेल्या कंपनीमार्फत काम करुन घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायाचा व्याप वाढवला. ऎक्झोडस ही कंपनी १९९८ मध्ये पब्लिक लिमिटेड झाली. टीआयई या भारतातील आय टी उद्योजकांना मदत करणार्या संस्थेचे कंवल रेखी यांनी २००,००० डॉलरची मदत केली. यातूनच जॅमक्रॅकर या सॉफ्टवेअर कंपनीची इ. स. २००० मध्ये स्थापना केली व त्यासाठी १०० दशलक्ष डॉलरचे भांडवल मिळविले. नंतर त्यांनी e4e नावाची नव्या उद्योगांना भांडवल पुरविणारी कंपनी स्थापन केली.
२. बी. व्ही जगदीश - जगदीश यांनी १९७८ मध्य् बी. ई. इलेक्ट्रिकल व १९८० मध्ये व्हीजेटीआयमधून एमटेक केले व महिना १२०० रु. ची नोकरी पत्करली. दोन मुलांसह आठ बाय आठ फुटांच्या एका खोलीत त्यांनी दोन वर्षे संसार केला. टाटा एलेक्सी व नंतर सिंगापूर मध्ये नोव्हेल कंपनीत त्यांनी नोकरी केली. अमेरिकेतील कंपन्यांशी संपर्क वाढवून व चंद्रशेखरांच्या एक्झोडसमध्ये जॉईन होऊन त्यांनी आपल्या उद्योगाचा जम बसविला. नेटमॅजिक, नेट स्केलर या डाटा सेंटर कंपन्या तसेच आयस्टेशन नावाची मेल सर्व्हीस देणारी कंपनी काढली.
३. कंवल रेखी - स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी रावळपिंडी येथे जन्म झालेले कंवल रेखी कानपुरात विस्थापित म्हणून रहायला आले. १९६३ मध्ये बीएससी व आय. आय टी, मुंबईला १९६८ मध्ये बी टेक. करून मिशिगन युनिव्हर्सिटीत एमएस केले. १९७० मध्ये आर.सी.ए कंपनीत नोकरी सुरू केली. १९७१ मध्ये त्यांना ले ऑफ मिळाला. ४-५ वर्षे स्वयंशिक्षण व व्यवसाय केल्यानंतर झीलॉग कंपनीत ३० टक्के पगार कपात असणारी नोकरी मिळाली. इंदरनील व सुभाष बाल यांच्या मदतीने एक्सेलॉन या कंपनीची १९८२ मध्ये स्थापना. १९८९ मध्ये ही कंपनी नोव्हेलने २१० दशलक्ष डॉलरला विकत घेतली व नोव्हेल कंपनीत ते अधिकारी बनले. १९९४ मध्ये त्यांनी टीआयईची स्थापना केली. एक्झोडसमध्ये पैसे गुंतवले व नव्या उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
४. नरेन बक्षी - १९६३ मध्ये बिटसमध्ये बी ई व अमेरिकेत एमएस व एमबीए केले. हिंदुथान मोटर्स व स्टॅन्डर्ड ऑईल कंपनीत नोकरी केल्यानंतर अमेरी ट्रस्ट बॅंकेत उपाध्यक्ष झाले. १९७९ मध्ये टीआरडब्ल्यू कंपनीत संचालक. व्हर्साटा व व्हिजन सॉफ्टवेअर कंपन्यांची स्थापना. इ. स १९९८ मध्ये केवळ एक दशलक्ष भांडवल असणार्या व्हर्साटा कंपनीला इ. स. २००० मध्ये १०० दशलक्ष भांडवल शेअरमधून मिळाले. राजस्थान आयटी उद्योजकांसाठी RITEG संस्थेची स्थापना. त्यांची पत्नी कुसुम हिने अमेरिकेत RANA राजस्थानी असोसिएशन स्थापन केली. जैन मंदिरे व असोसिएशनच्या कामात आता व्यस्त.
५. प्रदीप कार - १९८१ मध्ये नागपूरमधून बीई. १९८३ मध्ये एमबीए. विप्रोत एक वर्ष नोकरी. १९८४ मध्ये कॉम्प्युटर पॉईंट, मुंबई, बंगलोर व दिल्ली येथे. शिवा कॉंप्युटर्सची स्थापना. नंतर सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीत अधिकारी म्हणून अमेरिकेत नोकरी. १९८८ मध्ये परत भारतात. १९८९ मध्ये मायक्रोलॅंड कंपनीची स्थापना. नोव्हेलचे भारतातील एज्युकेशन सेंटर म्हणून मायक्रोलॅंडचे काम. १९९२ मध्ये कॉंम्पॅक कॉंप्युटर्सची स्थापना. सिनॉप्टिक व सिस्कोशी संबंध. इंडिया डॉट कॉम, ITspace.com व media2india.net वेबसाईटची निर्मिती.
६. राज सिंह - १९६८ मध्ये बीई, १९७० मध्ये आय आय टी दिल्लीत पीजी डिप्लोमा, १९८१ मध्ये मिनेसोटा युनिव्हर्सिटीत एमएस. नौदलात आयएनएस विक्रांतवर नोकरी. डिजिटल डिझाईन व व्हेरीलॉग वर पुस्तक प्रसिद्ध. InterHDL, Fiberlane Communications, Cerrent, Siara कंपन्यांची स्थापना. भांडवल पुरवठा करणार्या संस्थात भागीदारी.
७. सबीर भाटीया - बीएस व एमएस. अँपल कॉंप्युटर्स व नंतर फायर पॉवर सिस्टीम मध्ये नोकरी. फायर पॉवर सिस्टीममध्ये नव्या RISC प्रोसेसर असणार्या पॉवरपीसी चिपवर आधारित कॉंप्युटरची निर्मिती. १९९५ मध्ये जावासॉफ्ट कंपनीची स्थापना. DFJ कंपनीकडून १५ टक्के भागीदारीच्या मोबदल्यात ३ लाख डॉलरचे भांडवल मिळविले. १९९६ मध्ये HOTMAIL ची निर्मिती. एका वर्षात ५ दशलक्ष सभासद व दररोज ३०००० सभासदांची भर. मायक्रोसॉफ्ट ने हॉटमेल ४०० दशलक्ष डॉलरला विकत घेतले. आरजू वेबसाईटची निर्मिती परंतु पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने साईट बंद केली. टेलेव्हॉईस कंपनीत सध्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.
८. उमंग गुप्ता - आय.आय.टी. कानपूर मधून १९७१ मध्ये बी. टेक., १९७२ मध्ये अमेरिकेत एमबीए. व कॉपर फील्ड, ओहिओ येथे नोकरी. १९७३ मध्ये आयबीएममध्ये रुजू. भारतात आयबीएम मार्केटींग मॅनेजर म्हणून सहा महिने काम. मॅग्नसन कॉंप्युटर्समध्ये नोकरी. सिस्टीम आर विकसित केले. १९८४ मध्ये एसक्यूएल डाटाबेसवर आधारित प्रणालीसाठी गुप्ता टेक्नॉलॉजीजची स्थापना. गुप्ता टेक्नॉलॉजीजचे सेंचुरा सॉफ्टवेअर म्हणून नामांतर. कीनॊट सिस्टीम्समध्ये गुंतवणूक. नेटलॉक कंपनीचे अध्यक्ष.
९. एन. आर. नारायण मूर्ती - १९६७ मध्ये म्हैसूर् येथे बीई. १९६९ मध्ये आय.आय.टी. कानपूर मधून एम. टेक., सेसा या फ़्रेंच कंपनीत नोकरी. सिस्टीम रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे दोन वर्षे नोकरी. १९७७ मध्ये पटनी कॉंप्युटर्समध्ये रुजू. केवळ २५० डॉलर भांडवलावर १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना. अमेरिका व फ़्रॉन्समधील कंपन्यांशी करार. १९८७ मध्ये बोस्टन येथे इन्फोसिसची शाखा. १९९३ मध्ये पब्लिक कंपनी म्हणून नोंदणी. १९९६ मध्ये ब्रिटन व १९९७ मध्ये जपानमध्ये शाखा. इ. स. १९९९ मध्ये नॅसडॉक स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी.
वरील सर्व उद्योजकांची चरित्रे वाचल्यावर मला पहिल्याप्रथम हे जाणवले की ही सर्व माणसे मध्यम वर्गातून पुढे आली आहेत. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात अपयश, निराशा व नोकरीतील अशाश्वतता व हाल अपेष्टा आल्या होत्या. पण या सर्वांवर मात करून केवळ चिकाटी, दुर्दम्य आत्मविश्वास व उच्च ध्येय गाठण्यासाठी लागणारी कष्ट करण्याची तयारी या गुणांवर त्यांनी दैदीप्यमान यश मिळविले आहे. आपल्याकडे बर्याच वेळा एकदा अपयश आले की मुले निराश होऊन प्रयत्न सोडतात. त्यांच्यासाठी चिकाटी व धाडस असले की कशी प्रगती साधता येते हे या उद्योजकांनी दाखवून दिले आहे.
आजच्या मंदीच्या व बेरोजगारीच्या काळात वरील उद्योजकांची चरित्रे निश्चितच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व नवी प्रेरणा देणारी ठरतील. आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखतीवर पुस्तक लिहून लेखकाने नव्या पिढीसाठी अनमोल खजिना खुला केला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
Friday, May 1, 2009
My Birthday
Today is my birthday. Even though I am not so young to celebrate my birthday, thoughts got crowded in my mind. Realising that it is a minor event, I tried to divert my attention but the thought of becoming elder created uneasy feeling every now and then.
I thought of preparing abalancesheet of what I gained and what I lost during the lifespan elapsed so far. But the question propped up “Who am I?” The question created a host of answers; I in my own view, first son in view of my parents,Husband in view of my wife, father in view of my children, friend in view of my friends, teacher in view of my students, a common citizen in view of my nation, a male human being living in this time period in view of all human race, a fragile and temporal living being in view of earth, a small speck with momentary existence in view of universe. As I started moving away from myself, my importance,my achievements, whats more, even my very existence also started diminishing rapidly and found myself lost in the vast expanse of universe. The thought made my mind numb but in the next moment, I realised that ranking is completely reverse in view of my grasping and experience. Though my presence was insignificant in universe, in view of my knowledge and experience, expanse of universe was insignificant to me. Thinking in the same line and traversing backward, I could visualise my true identity completely in myself.
Still my scientific reasonng was not ready to give me special importance than others. I realised that understanding of self and feelings and aspirations must have been equally strong in other human beings also. Naturally feeling of superiority than others had no place in my mind. When such false feeling of superiority becomes more prominent, man tries to retain memory of achievements and experiences and thinks of writing autobiography. People write autobiography. Should I write mine? Why should I write? Are there any memorable events in my life which will help to guide others? Or atleast entertain them? Is my achieve so great that other people will aspire to become like me? Am I honest enough to describe all events without prejudice or self ego? Do I have courage to write about others without caring for consequences? What is guarantee that I shall not justify my wrong action or praise myself? If answer to any of these questions is “No”, then logically thinking I do not have right to publish my autobiography. I know really well that my mind is not so strong to say “Yes” to every question. Hence, I shall not try to write my autobiography.
I feel that there is other better option; i.e. to write about our feelings and thoughts. Memory of thoughts needs to be preserved not the memory of person. Because memory of person without thoughts is just lifesketch. If thoughts are wrapped in person’s personality, then they become tagged and difficult to extract objectively. Do my thoughts are so advanced or important that they are worth preservation ? There is no necessity that the thoughts and feelings should possess these qualities. If they are objective, they can help others in enriching knowledge and process of thinking with high assimilative capacity. If the thoughts display a strong mind and logical reasoning they will guide the mind in confusion. If they represent frustation and pessimism, they will guard against negative thinking.
If all people express their thoughts and feelings in this way, there will be a rich collection of human perceptions without personal or time attributes and such a knowledge treasure will become a great asset for future generations.
Hence, I have decided to express my thoughts not with personal glorification point of view but in generalised objective way without bothering whether people will read or not . At least today, on my birthday, my thoughts guided me come out of my self-ego cage and prompted me to become impersonal write down thoughts without tag of “my thoughts”.