Saturday, July 13, 2013

कोडइग्नायटरचा वेबडिझाईनसाठी वापर भाग - ३

कोड इग्नायटरमध्ये केलेल्या सॉफ्ट्वेअरमध्ये एम.व्ही.सी. वापरले असले तरी त्यातील मॉडेल,व्ह्यू व कंट्रोलर या फोल्डरमधील पीएचपी प्रोग्रॅमना  कोड इग्नायटरच्या सिस्टीममधील अनेक तयार सुविधांचा आधार असतो. कोड इग्नायटरच्या सिस्टीम फाईल्स या सॉफ्ट्वेअर अप्लिकेशनपेक्षा वेगळ्या फोल्डरमध्ये ठेवलेल्य असतात.

कोडइग्नायटर १.७.२ या व्हर्जनपर्यंत सिस्टीम फोल्डरच्या आत अप्लिकेशन फोल्डर असायचे.  कोडइग्नायटरच्या नव्या २.१.३ व्हर्जनमध्ये ते सिस्टीम फोल्डरच्या बाहेर स्वतंत्र असते.
आपल्याला कोड इग्नायटरमध्ये वेबसाईट डिझाईन करायची असेल तर कोडइग्नायटरच्या साईटवरून (http://ellislab.com/codeigniter) लेटेस्ट कोड इग्नायटरचे व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. आपल्या कॉम्प्युटरवर लोकलहोस्ट तयार केला असेल तर त्यात योग्य त्या फोल्डरमध्ये ( xampp इन्स्टॉल केले असेल तर c://xampp/htdocs या फोल्डरमध्ये) नियोजित वेबसाईटच्या नावाचे फोल्डर तयार करावे. त्यात डाउनलोड केलेली कोड इग्नायटरची झिप फाइल ओपन करावी. आत कोड इग्नायटरचे वेगळे फोल्डर तयार झाल्यास त्यातील फाईल्स वेबसाईटच्या फोल्डरला कॉपी कराव्यात.

आता येथे झिप फाईलशिवाय एक इंडेक्स व लायसेन्सची फाईल सिस्टीम, युजर गाईड व अप्लिकेशन अशी तीन फोल्डर दिसतात. युजर गाईडमध्ये  कोडइग्नायटरची सर्व माहिती असते. सिस्टीम फोल्डरमध्ये कोडइग्नायटरचे मुख्य स्ट्रक्चर व अप्लिकेशन फोल्डरमधील सर्व पीएचपी प्रोग्रॅमसाठी आवश्यक असणारे बेसिक क्लासेस डिफाईन केलेले असतात. यात कंट्रोलर व मॉडेल या मुख्य क्लासेसचा समावेश होतो. अप्लिकेशन फोल्डरमधील क्लासेस हे सिस्टीम फोल्डरमधील या मूळ  क्लासेसवरच आधारलेले असल्याने सिस्टीमच्या सर्व सुविधा त्याना अंगभूत प्राप्त होतात.

आता ब्राउजरमध्ये http://localhost/websitename/  असे टाईप केले की ( websitename च्या जागी आपल्या वेबसाईट फोल्डरचे नाव घालावे). वेबसाईट फोल्डरमधील index.php  च्या साहाय्याने कोडइग्नायटर फ्रेमवर्क इन्स्टॉल होण्याची प्रक्रिया सुरू होते.  वेबसाईटच्या फोल्डरचे नाव ucode  असे घातले  तर खालीलप्रमाणे कोड इग्नायटरचा वेलकम मेसेज दिसेल व कोड इग्नायटर इन्स्टॉल झाल्याचे समजेल. 





आपले वेबडिझाईनचे सॉफ्ट्वेअर आपल्याला अप्लिकेशन या फोल्डरमधे करावे लागते. हे फोल्डर ओपन केले की त्यात चित्रात दाखविल्याप्रमाणे फोल्डर्स दिसतात. म्हनजे कंट्रोलर्स, मॉडेल्स व व्ह्यूज नावाच्या फोल्डर बरोबर इतरही अनेक फोल्डर कोडइग्नायटर कडून आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे मूळ एम.व्ही.सी. च्या पद्धतीपेक्षा कितीतरी अधिक कार्यक्षमतेचे डिझाईन करणे व त्याचे व्यवस्थापन करणे आपल्याला कोडइग्नायटरमुळे शक्य होते.

 अप्लिकेशन फोल्डरमधील कंट्रोलर्स फोल्डर  ओपन केले की  आत index.html  आणि welcome.php  या दोन फाईल्स दिसतील.

यातील welcome.php   हा प्रोग्रॅम खाली दिला आहे ( कॉमेंटस वगळून)

<?php if ( ! defined('BASEPATH')) exit('No direct script access allowed');

class Welcome extends CI_Controller {

   
    public function index()
    {
        $this->load->view('welcome_message');
    }
}

/* End of file welcome.php */
/* Location: ./application/controllers/welcome.php */

 येथे  Welcome नावाचा क्लास तयार केला असून तो कोड इग्नायटरच्या CI_Controller  या सिस्टीम कंट्रोलरवर आधारित आहे.  या क्लासमध्ये index  नावाचे फंक्शन आहे आणि ते व्ह्यू फोल्डरमधील welcome_message(.php) लोड करण्याची सूचना देते.

 आता आपण अप्लिकेशन फोल्डरमधील views हे फोल्डर ओपन केले तर त्यात आपल्याला आत index.html  आणि welcome_message.php   या दोन फाईल्स दिसतील. 
welcome_message.php या फाईल पाहिली तर त्यात योग्य सीएसएस लावून तयार केलेला वेलकम मेसेज ( जो वर दाखविला आहे तो) दिसेल.





No comments:

Post a Comment