यापूर्वी दोन लेखात मी कोड इग्नायटरची वैशिष्ठ्ये सांगितली होती. त्यात कोड इग्नायटर हे पीएचपीचे प्रभावी, लाईटवेट( कमी मेमरी लागणारे) व अत्यंत सुरक्षित असे फ्रेमवर्क आहे हे मी नमूद केले होते.
ज्ञानदीपच्या वेब डिझायनर्सनी कोड इग्नायटर वापरून डायनॅमिक वेबसाईट तयार करायचे कसब साध्य केले होते. अलिकडच्या काळात अनेक आकर्षक वेबसाईट त्यांनी कोड इग्नायटर फ्रेमवर्क वापरून तयार केल्या आहेत. मला मात्र या फ्रेमवर्कची फारशी ओळख नव्हती. त्यामुळे अशा वेबसाईट स्वत: करायला शिकणे व ज्ञानदीपमध्ये नव्याने आलेल्या वेब डिझायनर्सना हे तंत्रज्ञान शिकवणे असे दुहेरी आव्हान मला स्वीकारणे भाग पडले.
या संदर्भात अभ्यास केल्यावर मला असे लक्षात आले की कोड इग्नायटर वापरता येण्यासाठी खालील टप्प्यात शिक्षण द्यावे लागेल.
१. कॉम्प्युटरवर स्थानिक सर्व्हर ( लोकलहोस्ट) स्थापित करणे.( इन्स्टालिंग लोकलहोस्ट) यासाठी अपाचे किवा आयआयएस ह्या सर्व्हर चा उपयोग करणे.( इन्स्टालिंग अपाचे ऑर एमएसएसक्यूएल सर्व्हर)
२. कॉम्प्युटरवर पीएचपी व मायएसक्यूएल डाटाबेस स्थापित करणे.
३. सुदैवाने xampp किंवा wampp पॅकेज वापरल्यास वरील तीनही गोष्टी एकदम साध्य करता येतात.
४. पीएचपी लँग्वेजच्या विविध संज्ञा व आज्ञा शिकून त्यांचा वेबडिझाईनमध्ये वापर करणे.
५. पीएचपी लँग्वेजच्या साहाय्याने मायएसक्यूएल डाटाबेसमधील माहितीचा वापर व व्यवस्थापन करता येणे तसेच त्याचा वापर करून डायनॅमिक वेबसाईट डिझाईन करणे. याला पीएचपीचे हार्ड कोडिंग असे म्हणतात.
६. ऊप किंवा ऑब्जेक्ट ओरिएन्टेड प्रोग्रॅमिंगचा अभ्यास करून क्लास व ऑब्जेक्ट यांचा वापर करून डाटाबेस अप्लिकेशन डिझाईन करणे.
७. एमव्हीसी ( मॉडेल, व्ह्यू, कंट्रोलर) सिस्टीमचा वापर करून वेब डिझाईन करणे.
८. एमव्हीसी सिस्टीमवर आधारित कोड इग्नायटरचे स्ट्रक्चर समजावून घेणे.
९. कोड इग्नायटर सिस्टीम वापरून वेब डिझाईन करणे.
१०. कोड इग्नायटर हे ओपनसोर्स सॉफ्टवेअर असून त्यात सतत नवनवीन सुधारणा होऊन त्याच्या नव्या आवृत्या प्रसिद्ध होत असतात. पूर्वीच्या आवृत्तीप्रमाणे डिझाईन केलेली उदाहरणे नेटवर उपलब्ध असली ( version 1.7.2) तरी त्यांचा नव्या आवृत्तीत ( version 2.1.3) आहे तसा वापर करता येत नाही.
११. यासाठी नव्या आवृत्तीचा वापर करताना त्यातील बदल लक्षात घ्यावे लागतात.

No comments:
Post a Comment