पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.शिक्षणक्षेत्रात तर पुण्याचे स्थान भारतात सर्वोच्च पदावर आहे. कला, विज्ञान,विधी, व्यापार, तंत्रज्ञान याच क्षेत्रात शिक्षण देणा-या अनेक नामवंत संस्था पुण्यात आहेत. सा-या महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्याला प्रथम पसंती देतात.
तंत्र वैज्ञानिक क्षेत्रातही पुण्याने जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळविले असून इंजिनिअरिंगच्या विविध शाखात मोठे उद्योग पुणे परिसरात उदयास आले असून असंख्य तज्ज्ञ अभियंते त्यात काम करीत आहेत. या अभियंत्यांसाठी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स(इंडिया)ची पुणे शाखा एक हक्काचे व्यासपीठ असून तिची इमारत पुण्यातील शिवाजीनगरच्या मध्यवर्ती भागात 1962 साली बांधण्यात आली असून त्यात १४० क्षमतेचे एक सभागृह, ५० आणि १०० क्षमतेचे दोन पूर्ण बैठक कक्ष, एक प्रदर्शन कक्ष, १५ क्षमतेचे दोन कॉन्फरन्स हॉल, ६० क्षमतेचे पाच वर्ग खोल्या आणि २० क्षमतेचे दोन वर्ग खोल्या आहेत. शिवाय 8000 पेक्षा जास्त पुस्तके संस्थेच्या ग्रंथालयात आहेत असे समजले.
असे असूनही गेल्या अनेक वर्षात या इमारतीमध्ये नव्या सुधारणा झालेल्या दिसून येत नाहीत. 1982 साली मी दिलेले व्याख्यान आणि गेल्या महिन्यात केलेले प्रेझेंटेशन यात इन्फ्रास्ट्रक्चर व सुविधा तशाच मर्यादित राहिल्याचे जाणवले.आज पुण्यातील इतर इंजिऩिअरिंगची ऑफिसेस, सकाळ इटरनॅशनल स्कूल, यशवंतराव सभागृह, अनेक कॉलेजमध्ये असणा-या आधुनिक सुविधा पाहिल्या तर या संस्थेकडे मोठी जागा, देखणी प्रशस्त इमारत व विविध शाखांतील अनेक मान्यवरअभियंत्याचे सद्स्यत्व असूनही संस्था दुर्लक्षित राहिल्याचे दिसून येते.
या स्थितीवर सर्वानी गांभिरयाने विचार करून संस्थेचे आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या संस्थेच्या ऐतिहासिक वास्तूचे आधुनिकीकरण करून तंत्रज्ञान प्रशिज्ञण तसेच इंटर्नशिपयाठी सर्व सुविधा निर्माण केल्या तर विद्यार्थ्यांना तसेच नोकरी व व्यवसायात प्रविण्य मिळविण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक, उद्योजक यांचे मार्गदर्शन मिळण्याची सोय या मध्यवर्ती सर्वसमावेशक अभियांत्रिकी केंद्रात होऊ शकेल.
कमवा व शिका या कै. भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत सुरू केलेल्या योजनेचा वापर इंटर्नशिप योजनेत केला तर हे शिक्षण गरीब विद्यार्थ्यांनाही मिळू शकेल.शासन आणि उद्योग यांचे सहकार्य या योजनेस मिळू शकते.
ज्ञानदीप फौंडेशन यासाठी आयईपीएलसी ( इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स(इंडिया)ची पुणे शाखा)बरोबर परस्पर सहकार्य व आर्थिक गुंतवणूक करण्यास तयार असून वेबसाईटचे नूतनीकरण, ग्रंथालय व्यवस्थापन, प्रशिक्षण ऑडिओव्हिज्युअल व्यवस्था यात सहभागी होऊ इच्छिते.
24 जानेवारी 2025 रोजी सर्क्युलर इकॉनॉमी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर एक दिवसाचे सेनिनार झाले. त्यासाठी भारतातील प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यांचे ध्वनीचित्रण व्यवस्थित होऊ शकले नाही. माझ्या मोबाईलवरून केलेल्या व्हिडीओ मी यूट्यूबवर विद्य़ार्थ्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केल्या आहेत मात्र त्याचा दर्जा चांगला नाही. याची मला खंत वाटते.
https://youtu.be/jAICtP6BE-4?si=rOgn2objxl4bJkWj
येथे होत असणा-या सा-या शैक्षणिक कार्यक्रमांचे ध्वनीचित्रण व ऑनलाईन प्रसारण शक्य झाल्यास ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू करता येतील.
असे झाले तर या संस्थेला दूरस्थ शिक्षणसंस्थेचे स्वरूप येईल व त्याचाी फायदा विद्यार्थी तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी होऊ शकेल.
ज्ञानदीप फौंडेशन याबाबतीत पुढाकार घेऊन वेबसाईटट्सया माध्र्वयमातून सभासद व उद्योग यांचेकडून देणगी वा अन्य साहाय्य मिळविण्याचा प्रयत्न करेल.फौंडेशनकडे असणारी सर्व पुस्तके व टेक्निकल जर्नल्स तसेच ईबुक्स या ग्रंथालयात ठेऊन विद्यार्थ्यांना सशुल्क देता येतील.
संस्थेच्या पदाधिका-यांनी या प्सतावास मान्यता द्यावी ही विनंती.
- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली
No comments:
Post a Comment