Tuesday, November 30, 2021

वेबसाईट डिझाईन स्पर्धेमागची ज्ञानदीपची भूमिका

 


ज्ञानदीपने मराठीतून वेबसाईट डिझाईन स्पर्धा जाहीर केल्यानंतर अनेकांना शालेय विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती वा कुवतीबाहेरचा विषय  वाटला. प्रत्यक्षात वेबडिझाईन दहावीच्या भौतिक वा गणितापेक्षा कमी क्लिष्ट आणि समजायला अगदी सोपे आहे हे सांगण्याची गरज आहे.

अमेरिकेतील माझ्या माहितीच्या काही लोकांनी आता वेबसाईट डिझाईन आता कालबाह्य तंत्रज्ञान झाले असून फेसबुक, अॅमेझॉन, गुगलसारख्या सर्वव्यापी आणि सोप्या प्रसारमाध्यमांचा उपयोग आपल्या शिक्षण, व्यवसाय वा छंद जोपासण्यासाठी करणे जास्त उपयुक्त आहे असे मत व्यक्त केले. शिवाय वेबडिझाईनसाठी विक्ससारख्या अनेक नो-कोड किंवा ड्रॅग-ड्रॉप सुविधा नेटवर उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले.

मात्र या सुविधा वापरत असताना वेबसाईट म्हणजे काय, तिचे कार्य कसे चालते याची माहिती न झाल्याने एकप्रकारचे परावलंबित्व येते. तसेच या प्रसारमाध्यमांचे तंत्रज्ञान एक अवघड आणि अनाकलनीय असून आपल्याला त्यात काही काम करणे अशक्य  आहे असा ग्रह होतो. या सर्व सुविधात  क्लिष्ट कोडींग वापरून त्यात जादूमय वाटणा-या बदलांची वा माहिती शोधाची यात गुंफण केली असली तरी नेटवरून माहिती प्रसारित करण्यासाठी आवश्यक असणा-या अगदी साध्या ग्रहितांवर आणि इंटरनेटच्या ज्ञानावर     वेबपेज करणे व त्यांच्या समूहाची साधी वेबसाईट बनविणे अगदी सोपे आहे.

वेबडिझाईन हे तंत्रज्ञान शालेय विद्यार्थीही सहज शिकू शकतो. त्याचा वापर करून त्याला हवी तशी वेबसाईट तयार करता येते आणि आपले विचार इंटरनेटवर आपल्या पूर्ण मालकीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करता येतात. हे सप्रमाण सिद्ध करणे हे ज्ञानदीपच्या वेबदिझाईन स्पर्धेचे उद्दीष्ट आहे.

जे विद्यार्थी यात भाग घेतील त्यांना वेबडिझाईनची प्राथमिक सर्व माहिती व्हिडिओ, मराठीतून लेख आणि प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून  देऊन त्यांना या तंत्रज्ञानाविषयी वाटणारी भीती दूर करून एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा ज्ञानदीप प्रयत्न करणार आहे.  शिवाय मराठी भाषेचा वापर करणे आपल्या परिसर व निसर्गसंवर्धनाची माहिती  सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी याचा  उपयोग करण्यास प्रोत्साहन देणे व  एकूणच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने सोपे व शालेय विद्यार्थ्यांना सहज समजेल असे प्रशिक्षण साहित्य निर्माण करण्याचे मोठे आव्हानही ज्ञानदीप टीमच्या सर्व सहका-यांपुढे आहे. तरीदेखील अशा प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन   ज्ञानदीपने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

 या अभिनव प्रयोगाचे विद्यार्थी व ज्ञानदीपचे सहकारी स्वागत करतील व व २०२२ च्या नव्या वर्षात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा संकल्प करतील अशी मला आशा आहे.  स्पर्धेविषयी अधिक माहिती - https://tinyurl.com/yeywtped

- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
 

Friday, November 19, 2021

पर्यावरण विषयावर मराठीतून वेब डिझाईन ची अभिनव स्पर्धा

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि.  ही संस्ठा गेली वीस वर्षे वेबडिझाईनच्या क्षेत्रात कार्य करीत असून आतापर्यंत 150 वेबसाईट, 20 सॉफ्टवेअर आणि 20  अँड्रॉईड व आयफोन एप या संस्ठेने विकसित केले आहेत.

माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण या विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली. या ज्ञानदीप फौंडेशनचे वेबसाईट डिझाईन कार्य ज्ञानदीप इन्फोटेकतर्फे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून करण्यात येते.   

माध्यमिक शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या   विद्यार्थ्यांना मोबाईल आणि कॉम्प्यटरवर मराठी टाईप करता यावे, आपला परिसर व पर्यावरण यांचा अभ्यास करून तो स्वच्छ आणि निसर्गसेवी करण्याची प्रेरणा मिळावी आणि  वेबसाईट डिझाईनचे प्राथमिक ज्ञान व्हावे या उद्देशाने   ज्ञानदीप फाउंडेशन मराठीतून वेब डिझाईन स्पर्धा जाहीर करीत आहे.

सूचना - स्पर्धेविषयी संपूर्ण अधिकृत माहिती वा नोंदणी फर्म ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईटवर (http://dnyandeep.net) प्रसिद्ध केली  जाईल. 

 या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या नावाचा ईमेल तयार करून ज्ञानदीप फौंडेशनच्या संकेतस्थळावर   नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

.
स्पर्धेत भाग घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना  वेब डिझाईन म्हणजे काय ते कसे करायचे  याविषयी सविस्तर माहिती ज्ञानदीपतर्फे  दिली जाईल.  

वेबडिझाईन, फौटोशॉप, तसेच वेबसाईटविषयी प्राथमिक माहितीचे ज्ञानदीप टीमने केलेले मराठी माध्यमातील  व्हिडीओही स्पर्धकांना पाठविले  जातील.

याशिवाय मराठीतून वेबडिझाईन शिका या नावाचे ज्ञानदीपचे एक ॲप आहे ते पहावे


स्पर्धेचा विषय आणि व्याप्ती

 
आपला वा आपणास आवडणारा वा महत्वाचा वाटणारा कोणताही परिसर निवडता येईल
उदा.  माझे गाव ( गावाचे नाव असावे), आमची सोसायटी,  माझी शाळा किंवा महाविद्यालय वा माझ्या दृष्टीने प्रदूषित परिसर यासारखा कोणताही विषय घेता येईल.

विद्यार्थ्याने आपल्या वेबसाईट साठी आपले संकेत चिन्ह ( लोगो) फोटोशॉप, पेंट किंवा दुसर्‍या कुठल्याही सुविधेचा वापर करून तयार करावे. तसेच परिसराचे मोबाईल ने स्वतः घेतलेले फोटो संपादन करून  योग्य नाव वा माहितीसह द्यावेत. व्यक्तिगत माहिती किंवा व्यक्तींचे फोटो यात नसावेत.


 गुगल वा इंटरनेटवर मिळालेल्या फोटो व चित्रांत मध्ये आवश्यक ते बदल करून ते या वेबसाईटवर वापरण्यास हरकत नाही. वेबसाईटमध्ये स्वागतकक्ष नावाचे एक  मुख्य पान असावे त्यातून इतर  सर्व पानांना लिंक द्याव्यात आणि कोणत्याही पानावरून परत मुख्य पानावर जाण्यासाठी लिंक असावी.


स्वागतकक्ष किंवा मुख्य पानावर फोटो व वेबसाईट विषयी थोडक्यात माहिती द्यावी

परिसराची माहिती देताना रस्ते, इमारती, झाडे, स्वच्छता व पाणीपुरवठा, सांडपाणी व कचरा संकलन व प्रक्रिया इत्यादी माहिती असावी. परिसराची  सध्याची स्थिती,  त्यावर आपले मत तसेच यात सुधारणा करून हा परिसर अधिक चांगला व पर्यावरणप्रेमी कसा करता येईल याविषयी आपले विचार वेबसाईटच्या माध्यमातून व्यक्त करावेत आणि आपल्या कल्पनेतील भविष्यातीलआपल्या परिसराचे चित्र कल्पनेने रंगवावे.

 स्पर्धेत सादर करण्याच्या वेबसाईटवर किमान दहा पाने व एक फोटोगॅलरी असावी.

स्पर्धेला शिक्षणाची काही अट नाही मात्र स्पर्धकाचे वय 20 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.

पहिले पारितोषिक  - रुपये 5000 /-
दुसरे पारितोषिक - रुपये 3000 /-
तिसरे पारितोषिक - रुपये 2000 /-

नावनोंदणी शुल्क - 100 रुपये

स्पर्धक नोंदणी तपशील

संपूर्ण नाव-

जनमतारीख -

शिक्षण-

पत्ता - 

फोन -

इमेल -  

वेबसाईटसाठी निवडलेला परिसर य स्थान

गुगल मॅपवर परिसर नकाशा

स्पर्धा नाव नोंदणी अंतिम तारीख- 10 डिसेंबर 2021

वेबसाईट ज्ञानदीपकडे पाठविण्याची  अंतिम तारीख 25 डिसेंबर 2021
 

वेबसाईट सादर केल्यानंतर ज्ञानदीप तर्फे स्पर्धकांची एक ऑनलाईन चाचणी घेतली जाईल.

निकाल 31 डिसेंबर 2021 व पारितोषिक वितरण 1 जानेवारी 2022 रोजी होईल.

ही स्पर्धा आयोजित करण्यामागे विद्यार्थ्यांना पर्यावरण व वेबडिझाईन प्रशिक्षण देणे व त्यांना प्रत्यक्ष प्रकल्प करण्यास प्रोत्साहित करणे असा ज्ञानदीपचा हेतू आहे. 

तरी सर्व शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेची माहिती द्यावी ही विनंती.


- डॉ. सु. वि. रानडे,