Wednesday, February 6, 2019

स्क्रॅच शिकण्यासाठी उपयुक्त संदर्भ

लिहिता वाचता न येणा-या लहान मुलांनाही चित्रपट्ट्या जोडून संगणकावर प्रोग्रॅम  करता यावेत यासाठी गुगलच्या ब्लॉकली प्रकल्पावर आधारित चित्ररुपी संगणक भाषा एमआयटी मिडीया लॅबने विकसित केली व अनेक मनोरंजक संगणक खेळांची निर्मिती जगभरातील अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी केली आहे.
भारतीय भाषांत असे खेळ तयार केल्यास त्याचा संगणक शिक्षणासाठी खूप उपयोग होईल.

प्रथम  स्क्रॅच, नंतर टर्टल ग्राफिक्स व पुढे पायथॉन प्रोग्रॅमिंग शिकविले तर सध्याच्या IOT ( internet of Things) यंत्रांचे संचालन करण्याच्या संशोधनात भारतीय मुले मोठे योगदान देऊ शकतील.

सुदैवाने या तंत्रज्ञानाची सर्व माहिती व सुविधा पूर्णपणे कोणालाही मोफत उपलब्ध असून  जागतिक स्तरावरील अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांनी  यासाठी शिक्षणसाहित्य विकसित केले आहे.स्क्रॅचच्या तिस-या नव्या आवृत्तीची सर्व माहिती विकीपीडीयाच्या खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या नव्या आवृत्तीत मोठ्या व प्रत्यक्ष उपयोगाच्या संगणक प्रणालींचा समावेश करण्यात आला असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही याचा उपयोद करता येईल.


हार्वर्ड विद्यापिठाने  http://scratched.gse.harvard.edu एक स्वतंत्र संकेतस्थळ स्क्रॅचसाठी तयार केले असून  त्यांचेतर्फे चर्चासत्रे व सेमिनार घेतली जातात.


No comments:

Post a Comment