My first video developed using iMovie
श्री गणेशस्तोत्रम् (Shri Ganesh Stotra by Mrs. Shubhangi Ranade )
Thursday, February 28, 2019
Wednesday, February 6, 2019
स्क्रॅच शिकण्यासाठी उपयुक्त संदर्भ
लिहिता वाचता न येणा-या लहान मुलांनाही चित्रपट्ट्या जोडून संगणकावर प्रोग्रॅम करता यावेत यासाठी गुगलच्या ब्लॉकली प्रकल्पावर आधारित चित्ररुपी संगणक भाषा एमआयटी मिडीया लॅबने विकसित केली व अनेक मनोरंजक संगणक खेळांची निर्मिती जगभरातील अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी केली आहे.
भारतीय भाषांत असे खेळ तयार केल्यास त्याचा संगणक शिक्षणासाठी खूप उपयोग होईल.
प्रथम स्क्रॅच, नंतर टर्टल ग्राफिक्स व पुढे पायथॉन प्रोग्रॅमिंग शिकविले तर सध्याच्या IOT ( internet of Things) यंत्रांचे संचालन करण्याच्या संशोधनात भारतीय मुले मोठे योगदान देऊ शकतील.
सुदैवाने या तंत्रज्ञानाची सर्व माहिती व सुविधा पूर्णपणे कोणालाही मोफत उपलब्ध असून जागतिक स्तरावरील अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांनी यासाठी शिक्षणसाहित्य विकसित केले आहे.

स्क्रॅचच्या तिस-या नव्या आवृत्तीची सर्व माहिती विकीपीडीयाच्या खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या नव्या आवृत्तीत मोठ्या व प्रत्यक्ष उपयोगाच्या संगणक प्रणालींचा समावेश करण्यात आला असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही याचा उपयोद करता येईल.
हार्वर्ड विद्यापिठाने http://scratched.gse.harvard.edu एक स्वतंत्र संकेतस्थळ स्क्रॅचसाठी तयार केले असून त्यांचेतर्फे चर्चासत्रे व सेमिनार घेतली जातात.
पायथॉन प्रोग्रॅमिंग - मनातला आकडा ओळखा.
पायथॉन प्रोग्रॅमिंग
मनातला आकडा ओळखा. ट्रिंकलेट मुविधा वापरल्याम आपल्याला पायथॉन प्रोग्रॅम इंटरनेटवर सहजपणे चालवून पाहता येतात. मनातला आकडा ओळखा. हा असाच एक छोटा प्रोग्रॅम उदाहरणादाखल दिला आहे.
------
मनातील आकडा ओळखा. मी 1 ते 100 यामधील एक आकडा मनात धरला आहे. तो ओळखा. 56 तुमचा अंदाज फार कमी आहे. पुन्हा प्रयत्न करा. तो ओळखा. 76 तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा प्रयत्न करा. तो ओळखा. 64 तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा प्रयत्न करा. तो ओळखा. 60 तुमचा अंदाज फार जास्त आहे. पुन्हा प्रयत्न करा. तो ओळखा. 57 तुमचा अंदाज फार कमी आहे. पुन्हा प्रयत्न करा.
-------
वरील प्रोग्रॅममध्ये हवे तसे बदल करा व उत्तर पहा.
Subscribe to:
Posts (Atom)