अमेरिकेत आल्यावर मॅक मिनी वापरण्याची माझी पहिलीच वेळ. नेहमी मी मराठी लिहिण्यासाठी बराहा वापरत असे. पण बराहा फक्त विंडोज वर चालत असल्याने माझी पंचाईत झाली मायक्रोसॉफ्ट ऐवजी गूगलड्राईव्हचा वापर करणे सोयीचे पडेल असे वाटले कारण भारतात विंडोज आणि मायक्रोसॉफ्टचीच चलती आहे. मॅक आणि विंडोज या दोहोंना जोडणारा दुवा गूगलड्राईव्ह आहे.
पण गुगल डॉक, गुगल शीट यात मराठी लिहिण्याची सोय नाही असे दिसले. सुदैवाने गुगलने ब्लॉग वर मराठी एडीटर दिला असल्याने मला आता मराठीत लिहिता येऊ लागले आहे . ब्लॉगवरील मराठी एडीटर वापरून तोच मजकूर गुगल डॉक, गुगल शीट यात पेस्ट करता येतो.
शिवाय गूगलड्राईव्हचा वापर केला की सर्व मराठी साहित्य सेव्ह करता येते व इतराना पाठविता येते
गूगलचे आभार
No comments:
Post a Comment