आज गणेशजयंतीच्या शुभमुहुर्तावर ज्ञानदीप फौंडेशन अँड्रॉईड प्रोग्रॅमिंगच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. मराठी माध्यमाच्या शाळात विद्यार्थ्यांच्या हातात आकाश टॅबलेट येण्यापूर्वी अशा टॅबलेटवर मराठीतून शैक्षणिक सॉफ्टवेअर तयार करण्याचा संकल्प ज्ञानदीप करीत आहे.
शालेय स्तरावरील सर्व विषयांची माहिती ज्ञानदीपच्या http://www.school4all.org या संकेतस्थळावर दिली आहे. त्याला सर्वांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या संकेतस्थळाला पूरक असे मोबाईल अप्लीकेशन आकाश टॅबलेटद्वारे सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची योजना श्री गणेशाच्या कृपेने आम्हाला साध्य करता येईल असा विश्वास वाटतो. आपण या कार्यात ज्ञानदीपला सक्रीय सहकार्य करावे ही विनंती.

No comments:
Post a Comment